K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 December 2018

शाळासिध्दी लेखमाला - 4 

विद्युतीकरण व विद्युत उपकरणे



शाळासिध्दी लेखमाला -  4
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – विद्युतीकरण व विद्युत उपकरणे  (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 4 )
विद्युतीकरण व विद्युत उपकरणे
विद्युतीकरण
माणसाच्या विकासाचा संपूर्ण इतिहास पाहता, माणसाच्या प्रगतीत विद्युत उर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगाच्या इतिहासात जसजसा उर्जेच्या विविध पर्यायांचा शोध लागत गेलातसतसे मानवी विकासाच्या विविध वाटांना वळण मिळत गेले. आज प्रत्येक व्यक्तिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतसुद्धा विजेची आवश्यकता असते.मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा प्रकार म्हणजे विद्युत होय. अवकाशवातावरण,जीवसृष्टीद्रव्यअणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी विद्युत आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत होय. प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवीत असणारा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार म्हणजे विद्युत होयअंबर या द्रव्यावर लोकरी कापड घासल्यास अंबर विद्युत भारित होतेतर विशिष्ट ईल मासे इतर  प्राण्यांना विजेचा झटका देऊ शकतात. ही देखिल विद्युतची विविध रुपे होय.विद्युतविज दिसत नाहीतिला गंध नसतो अथवा तिला आवाजही नसतो. तथापि वीज कार्य करतेप्रकाश वा उष्णता निर्माण करण्याची व तिचा व्यावहारिक वापर करण्याची पुष्कळ तंत्रे विसाव्या शतकात पुढे आली आहे. त्यामुळे तिचे उपयोग वाढत जाऊन वीज हे आधुनिक समाजाचे एक महत्वाचे अंग बनले आहे.
विजेबद्दलचा पहिला उल्लेख इ. स.पू. सहाव्या शतकात सापडतोग्रीक तत्त्वज्ञ व संशोधक मायलीटसचे थेलीझ ( इ.स. पू. ६४०५४६ )  यांना असे आढळले कीअंबर नामक धूपाच्या जातीच्या खड्यावर लोकरीच्या कापडाने घासल्यास धूलिकणकागदाचे कपटे इ. हलके पदार्थ त्याच्याकडे आकर्षित होतातपरंतु विजेबद्दल काहीच कल्पना नसल्याने त्यांना अंबराच्या या विचित्र वाटणाऱ्या गुणधर्माची संगती लावणे कठीण झाले. त्यानंतर खूप वर्षांनी ब्रिटिश संशोधक विल्यम गिल्बर्ट यांच्या लक्षात आले कीकाचगंधकमेणलाख या पदार्थांत देखील अंबरसारखा गुणधर्म आहे. या गुणधर्माचे वर्णन करण्यासाठी त्यांनी ‘इलेक्ट्रॉन’ हा नवा शब्द वापरला. अंबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ व लॅटिन भाषेत ‘इलेक्ट्रम’ म्हणतात. त्यावरून त्यांनी इलेक्ट्रिसिटी हा शब्द तयार केला व हाच शब्द रूढ झाला. इ.स. १६०० मध्ये विल्यम गिल्बर्ट यांनी घर्षणजन्य विजेवर खूप प्रयोग केले. त्यांनी निरनिरळ्या पदार्थांची विद्युत प्रवाहाचे संवाहक आणि दुर्वाहक अशा गटांत विभागणी केली. काही द्रव्यांतून वीज वाहते व काहींतून वाहत नाहीअसे स्टिफन ग्रे यांनी १७२९ साली शोधून काढले. धन आणि ऋण विद्युत भारांत फरक करावा लागण्याचे कारण म्हणजे काही विद्युत भारित पदार्थांत एकमेकांत आकर्षण आढळलेतर दुसऱ्या काही पदार्थांचे ते प्रतिसारण करीत असल्याचे आढळले. दोन धन विद्युत भार एकमेकांस दूर ढकलतात. दोन ऋण विद्युत भार देखील परस्परांस आकर्षित करतात. यावरून सम विद्युत भारांत प्रतिसारण असते आणि विषम विद्युत भारांत आकर्षण असते,असा नियम लक्षात आला. पुढे एकोणिसाव्या शतकात शास्त्राची जशी प्रगती होत गेली तसा द्रायू सिध्दांतांचा त्याग करण्यात आलापरंतु धन आणि ऋण विद्युत् हे शब्द आणि समभार-प्रतिसारणविषमभार-आकर्षण हा नियम कायम ठेवण्यात आला.बेंजामीन फ्रँक्लिन यांनी १७४६ साली विजेविषयीचे प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांनी गडगडाटी वादळात पतंग उडविण्याचा सुपरिचित प्रयोग केला. पतंगाला बांधलेल्या टोकदार तारेवर आकाशातील विजेचा आघात(तडिताघात) झाला व ती वीज पतंगाच्या ओल्या कागदामध्ये आली व तेथे विजेमुळे ठिणगी निर्माण झाली. आकाशातील वीज ( तडित) ही परिचयातील विद्युत असल्याचे या प्रयोगाने सिध्द झाले. गेओर्क झिमोन ओहम यांनी विद्युत रोधाविषयीचे नियम शोधून काढले व ते त्यांच्या नावाने ओळखले जातात. यानंतर ओर्स्टेडमायकेल फॅराडेक्लार्क मॅक्सवेलजॉर्ज जॉनस्टन स्टोनीरिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी केलेल्या शोधांमुळे आज आपण पाहत असलेल्या विद्युत उर्जेचे रुप उदयास आले आहे.
जगातील बहुतेक वीजनिर्मिती मोठ्या जनित्रांमार्फत होते व त्याकरिता दगडी कोळसाखनिज तेल अथवा नैसर्गिक वायू हे इंधन म्हणून वापरले जातात. ऋण  विद्युत् भारित इलेक्ट्रॉन व धन विद्युत् भारित प्रोटॉन हे अणूचे दोन मुख्य विद्युत् भारित घटक असून प्रॉटॉन अणुकेंद्रात असताततर इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती फिरत असतात. या दोन कणांवरील विद्युत भारांमधील प्रेरणांवर सर्व विद्युतीय आविष्कार अवलंबून असतात. या धन व ऋण विद्युत् भारांमधील आकर्षण प्रेरणांमुळे अणुकेंद्र व त्याभोवतीचे इलेक्ट्रॉन धरून ठेवले जाऊन अणू बनतो. काही परिस्थितींत अणूमधील एक वा अनेक इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि ते धातू वा अन्य द्रव्यातून अगर शलाकारूपात वाहत गेल्याने विद्युत प्रवाह निर्माण होतो. यंत्रसामग्री तसेच घरगुती वापराची यंत्रोपकरणे चालविणेशाळेतीलरस्त्यावरील व घरातील दिवे प्रज्वलित करणेकारखान्यामधून धातूचा मुलामा देणेवितळजोडकाम करणे,वाहकपट्टे फिरविणेभट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंमधील प्रदूषक कण साक्याच्या रूपात काढून टाकणे वगैरे असंख्य कामांकरिता वीज लागते. शिवाय दूरध्वनीदूरचित्रवाणी व रेडिओ (प्रेषण व ग्रहण),चित्रपटरडारसंगणकरोबॉटअवकाशयानेकृत्रिम उपग्रहविमाने,जहाजेरेल्वेमोटारगाड्या इ. ठिकाणी विजेचा वापर होतो. अशा रीतीने वीज ही वापरावयास सुटसुटीत असल्याने तिच्यामुळे समाजात परिवर्तन घडून आले आहे.
 भारतात सर्वाधिक विकास साधलेले महाराष्ट्र राज्य उद्योगउत्पन्नराहणीमान या सर्व आघाड्यांवर अग्रेसर आहे. तरीही वीज या पायाभूत सुविधेच्या उपलब्धतेची समस्या मात्र राज्याला आजही भेडसावते आहे. वीज नसल्यामुळे शाळांशाळांमध्ये होणारे शैक्षणिकवैयक्तिकव्यावसायिकनुकसान हे मोजण्याच्या पलीकडचे आहेविकासाची चाके सुद्धा विजेसारखी पायाभूत सुविधा नसल्याकारणाने मंदावण्याची शक्यता असतेप्रगत महाराष्ट्राचा विचार करतांना व भविष्यातील शाळेचा विचार करता शाळेला शक्य असल्यास विजेच्या बाबतीत स्वावलंबी व्हायलाच हवे. आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. विद्यार्थीसंख्या व विजेचा वापर लक्षात घेऊन प्रत्येक शाळेने आपली विजेची गरज निश्चित करायला हवीविजेच्या निर्मितीचे स्त्रोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात निर्माण करायला हवेकाही विजेचे स्त्रोत हे नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात मोफत मिळतात. जसे सूर्यप्रकाशपाणी,वारासमुद्री लाटा इत्यादी.  सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.असे असले तरी सूर्यप्रकाशाच्या साह्याने शाळेत आवश्यक उर्जा विद्युत निर्मिती करणे शक्य आहेआंतरराष्ट्रीय व नामांकित शाळांमधून अशा प्रकारे विद्युत निर्मिती केली जात आहेशाळा आपल्या आवश्यकतेनुसार सोलर पॅनलच्या साह्याने अशाप्रकारची विद्युत सुविधा उपलब्ध करुन घेत आहेत.वारा व समुद्री लाटा यांचे रूपांतर विद्युत उर्जेमध्ये करत असताना भौगोलिक अडचणी असतात. कारण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. पाण्याचा विचार केला असता. आजपर्यंत आपण फक्त काही प्रमाणात धरणे बांधून त्या पाण्यापासून विजेचे निर्माण करीत आहोत. ज्या ऊर्जा आपल्याला मोफत मिळतात त्याचा उपयोग विजेचे रूपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त तीन ते पाच टक्के आपण उपयोग करून घेतलेला आहे. कृत्रिमरित्या वीज निर्मिती आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासून तयार करून विजेचा वापर करतो. परंतु भौगोलिक पाहणीनुसार आपल्या देशातला कोळसा अंदाजे 40 ते50 वर्ष पुरतील या प्रमाणात साठा आहे असे लक्षात येते. तसेच कोळश्यापासून विजेचे निर्माण करताना क्षमता 29 ते 30 टक्के आहे. तसेच रासायनिक स्त्रोताचा विचार केला असता आपल्या देशामध्ये रासायनिक स्त्रोत हे दुसऱ्या देशापासून घ्यावे लागतात. कोळसा आणि रासायनिक स्त्रोत या दोन्ही गोष्टींचा वापर करून आज आपण आपल्या वापरात असलेली जवळपास 65  ते 70 टक्के वीज निर्माण करतो. वरील सर्व बाबींचा विचार करताना असे लक्षात येते की,आजपासूनच आपण विजेची बचत करणे आवश्यक आहे. भविष्याच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या देशातील विजेचे स्त्रोत व लागणारी वीज यामध्ये25 वर्षांनंतर मोठी तफावत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आजपासूनच विजेची बचत करणे व स्त्रोत निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे. केंद्रीय ऊर्जा विभागाने विजेची बचत करण्यासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकानी करावा असे नमूद केले आहेत्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार ट्युबलाईटच्याऐवजी सी.एफ.एल. व आता एल.ई.डी. लाईटचा वापर करावा अशी शिफारस केलेली आहे.जेणेकरून विजेची बचत होईल. कारण एल.ई.डी.बल्बची प्रकाश विस्तारण क्षमता ही प्रत्येक व्हॅटच्या प्रमाणात प्रकाश उत्सर्जित करते. तसेच प्रत्येक व्हॅटला लागणारा विद्युत प्रवाह दोन्ही गोष्टीच्या (सी.एफ.एल. आणि ट्युब लाईट) प्रमाणात फारच कमी लागतो. त्यामुळे वीजेचा वापर कमी होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या उर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहे. सूर्यप्रकाशाची ऊर्जा व तिचा वापर दैनंदिन वापरात कशाप्रकारे करता येईल याची जाणीव लोकांना करून दिली जात आहेत्यामध्ये सौरऊर्जा लाईट, सौरऊर्जा हिटरचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशाला वीज बचत करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन वापरात लागणाऱ्या विजेच्या वस्तुंचा सदुपयोग आवश्यकतेनुसार करून घेतल्यास वीज बचत करू शकतो. कारण आवश्यकता नसल्यास ताबडतोब वीज उपकरणे फॅन,लाईट बंद करून घेणे. तसेच ए.सी. चा वापरही इकॉनॉमिक मोडमध्ये केल्यास वीज बचत होईल व त्याचबरोबर क्लोरोफ्लोरो कार्बनसुद्धा कमी प्रमाणात उत्सर्जित होईल. त्यामुळे पृथ्वीच्या परिमंडलामधील जी ओझोन लेअर कमी होत आहेती कमी प्रमाणात होईल. तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर आपल्या शालेयदैनंदिन घरगुती व कार्यालयामध्ये करून घेतल्यास लागणारी वीज ही कमी होऊ शकते. सी.एफ.एल. व सौरउर्जेचा वापर प्रत्येकाने काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनात करण्यास सुरूवात केली तर देशातील वीज वापर काही प्रमाणात कमी होईल. ही वाचणारी वीज आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी ता शिरुर जिल्हा पुणे या शाळेमध्ये अशाप्रकारे सौर उर्जेचा वापर मोठ्याप्रमाणात केलेला आहे.प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थीसंख्येनुसार शाळेत वीजेची व्यवस्था करायला हवीवरीलप्रमाणे विद्युत सुविधा व प्रगतीचा सहसंबंध पाहता बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार व राज्य शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शाळेत विद्युत सुविधा व विद्युत उपकरणे सक्तीची केलेली आहे.
विद्युत उपकरणे 
1)      प्रकाशाचे दिवे बल्ब ) -  शाळेमध्ये वर्गखोल्याबरोबरच इतर खोल्यांचा समावेश असतोप्रत्येक खोलीमध्ये विद्यार्थी अध्ययन व अध्यापनविषयक कामकाज चालतेअशावेळी वर्गात पुरेशा प्रमाणात उजेड किंवा प्रकाश असायला हवावर्गाचा आकार पाहून वर्गात योग्य ते बल्ब किंवा प्रकाश सुविधा करायला हवीप्रत्येक विद्यार्थ्याला फळ्यावर लेखन केलेले सहज आणि स्पष्ट दिसेल व वाचन करता येईल अशाप्रकारचा उजेड असायला हवाकित्येक वेळा कमी उजेड असल्याने विद्यार्थ्यांना फळ्यावरील लेखन स्पष्ट दिसत नाही अशावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर ताण येऊन डोळ्याचे विकार होतातचष्मा लागतोविद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोम्हणूनच वर्गात उजेड असणे अत्यंत महत्वाचे असते.
2)      पंखे - एका वर्ग खोलीमध्ये 40 ते 50 विद्यार्थी सहा ते सात तास बसलेले असतातअशा वेळी सर्व मुलांना खेळती व शुध्द हवा मिळायला हवीविद्यार्थी श्वसनावाटे मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडलेला असतो.त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर थकवा येण्याची शक्यता असतेविद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असतेवर्गखोलीला खिडक्या असल्यास उत्तमउन्हाळा असतांना उष्णतेचा त्रास सर्वश्रुत आहेवर्गात अधिक विद्यार्थी असल्यास उकाडा वाढलेला असतोउकाड्यामुळे अध्ययन अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता असते.अशावेळी वर्गात पंखा असल्यास हवा खेळती राहण्यास मदत होतेशाळा आपल्या दर्जानुसार पंख्याबरोबर कुलर,वातानुकुलित व्यवस्था करतांना दिसत आहेत.
3)      ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर)- शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस, प्रासंगिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते. विद्यार्थी संर्वांगिण विकासामध्ये अशा उपक्रमाचा महत्वपूर्ण वाटा असतो. ध्वनिक्षेपकाद्वारे देशभक्तीपर गीते, विद्यार्थी कला गुणांचा कार्यक्रम सादर करुन वातावरण निर्मिती करता येते. ध्वनिक्षेपकामुळे आवाज स्पष्टपणे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. परिपाठामध्ये ध्वनिक्षेपकाचा प्रभावी वापर केल्यास मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व , भाषण- संभाषण इत्यादी कौशल्यांची निर्मिती होते. जास्त पटसंख्या व जास्त वर्ग खोल्या असलेल्या शाळांमधून काही प्रसंगी वर्गात सूचना देण्यासाठी , परिपाठासाठी ध्वनिक्षेपकाचा उपयोग केला जातो.
4)      रेडीओ व दूरदर्शन – शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये अध्यापन साहित्याची भूमिका असते. अध्यापन साहित्यामध्ये दृकसाधने, श्राव्य साधने , दृकश्राव्य साधने अशा विविध प्रकारची साधने वापरली जातात. आधुनिक व बदलत्या कालानुरुप ही साधने देखिल बदलत आहे. 20 वर्षापूर्वी रेडीओचा वापर प्रभावी दृकसाधन म्हणून केला जात असे. इंग्रजी अध्याप्न पध्दती व कृतीपाठ रेडीओवर प्रसारीत केले जात असत. त्याचा परिणाम अतिशय चांगला होत असे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर रेडीओ पाठ घेतला जात असत. रेडीओत सांगितल्याप्रमाणे वर्गात प्रात्यक्षिक घेतले जात असत. आजही विविध वाहिन्यावरुन शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. रेडीओप्रमाणेच दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन म्हणून अतिशय प्रसिध्द माध्यम आहे. तज्ज्ञामार्फत घेतल्या जाणा-या पाठाचा लाभ विद्यार्थी घेतांना दिसून येतात. घराघरातून दूरदर्शन लोकप्रिय झालेले आहे. या लोकप्रियतेचा फायदा शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी करता येतो.
5)      संगणक – रेडीओ, टू इन वन टेपरेकॉर्डर, दूरदर्शन संच या सर्वांची जागा हल्ली संगणक घेतांना दिसत आहे. संगणकामुळे संपूर्ण जगामध्ये मोठी क्रांती झालेली आहे. अध्ययनामध्ये, अध्यापनमध्ये व मूल्यमापनामध्ये देखिल संगणक वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याची संधी आता प्राथमिक शाळेपासूनच उपलब्ध होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामधून देखिल अध्यापनासाठी संगणकाचा वापर केला जात आहे. विद्यार्थी स्वत: संगणकाच्या साह्याने पाठावरील प्रश्न क्लिक करुन सोडवितांना दिसून येत आहेत. संगणकामुळे शिकण्यात एकाग्रता वाढून स्वत: घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते. प्रगत व प्रयोगशील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या हातातील वह्या पुस्तके जाऊन त्यांच्या हातात लॅपटॉप व नोटपॅड दिसू लागले आहेत.संगणकाबरोबरच इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर, स्कॅनर इत्यादी साहित्य आवश्यक झाले आहे.
6)      प्रक्षेपक (प्रोजेक्टर) - शाळेची माहिती, प्रशिक्षण या बरोबरच इतर माहिती देण्यासाठी शाळांमधून प्रोजेक्टरचा वापर केला जातो. PPT चे सादरीकरण, व्याख्याने, चर्चासत्रे यासाठी प्रोजेक्टर आवश्यक असते. तंत्रज्ञानाचा वापर करणा-या नवोपक्रमशील शिक्षकांनी पाठ्यांशावर आधारीत आकर्षक व मुलांना आवडतील अशा चित्रफिती तयार केलेल्या आहेत. या चित्रफिती दाखविण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर होतो. शिक्षणामध्ये काम करणा-या अनेक संस्था व व्यक्ती यांचे मार्गदर्शन प्रोजेक्टरच्या साह्याने दाखविता येते. अध्ययन व अध्यापनाध्ये प्रोजेक्टरचा वापर अतिशय प्रभावी ठरत आहे.
7)      पाणी शुध्दीकरण यंत्र - विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील संबंधित सर्व व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करता शाळेत पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासनाकडून काही उच्च प्राथमिक शाळांमध्ये पाणी शुध्दीकरण यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले होते. राज्यातील काही जिल्हा परिषद व्यवस्थापनाने आपल्या जिल्हा निधीमधून काही शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्रणा उपलब्ध केलेली आहे. शालेय गुणवत्ता व उपयोगितेचा विचार करता पाणी शुध्दीकरण यंत्रासोबत पाणी थंड करण्याची यंत्रणा, शीतकपाट उपलब्ध असावे. काही शाळांमधून थंड पाणी , गरम पाणी असणारी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत.
8)      विज्ञान विषयक व प्रयोगशाळेत आवश्यक विद्युत उपकरणे –प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा असतेच. प्रयोगशाळा म्हटले कितीतरी उपकरणे व साधने आली. यामधील बहुतेक साधने ही विद्युत सुविधेवर अवलंबून असतात. या साधनांची निगा व काळजी महत्वाची असते. ही साधने अद्ययावत ठेवावी लागतात. यामध्ये SLIDE PROJECTOR, FILMSTRIPS, EPIDIASCOPE, OVER HEAD PROJECTOR, VCR, LCD PROJECTOR, MICROSCOPE, COMPUTER, LAPTOP त्यादी साधनांचा समावेश होतो.
वरील सर्व उपकरणे किंवा शाळेला आवश्यक असणारी विद्युत उपकरणे वापरता येण्यासाठी शाळेमध्ये विद्युत सुविधा असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. विद्युत सुविधेचा विचार करतांना विद्युतीकरणाची पध्दती, अंडर ग्राऊंड वायरींग, आवश्यकतेनुसार कळफलक (बोर्ड ) यांच्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. ए ग्रेडशाळा व आंतरराष्ट्रीय शाळांना स्वत:ची विद्युत यंत्रणा , सौर उर्जा, विद्युत जनित्र, इन्व्हर्टर असायला हवे. विद्युत सुविधा वापरत असतांना विजेचा धक्का लागू नये याची काळजी घेतली जावी. वीज ही जीवनावश्यक सुविधा आहे. मात्र ती काळजीपूर्वक वापरली नाहीतर आग लागणेझटका बसणे व मृत्यूही ओढवणे यांसारखे धोके तिच्यामुळे उद्‌भवू शकतात. त्यासाठी प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यवस्था व उपाययोजना असायला हवी.  उपाययोजनामध्ये शाळेत अग्नीशमन यंत्रे, प्रथमोपचार पेटी प्रथम प्राधान्याने असायला हवी.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार विद्युतीकरण व विद्युत उपकरणेसंदर्भात दिलेले निकष.
v  शाळेला विद्युत सुविधा व सर्व खोल्यांमध्ये कलफलकासह विद्युतीकरण.
v  प्रत्येक वर्गात उजेडासाठी दिवे व वायुविजनासाठी पंखे.
v  प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये किमान दोन याप्रमाणे अग्निशमन यंत्र उपलब्ध करावी.
v  प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये एक वैद्यकीय प्रथमोपचार पेटी उपलब्ध असावी.
v  अग्निशमन यंत्राची व वैद्यकीय प्रथमोपचार पेटीची तपासणी दर तीन महिन्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिकशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत करावी.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.

विद्युतीकरण व विद्युत उपकरणे याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1.      शाळेत वीज आहे काय ?
उत्तर होय असल्यास ---   
अ) पंखे असलेल्या खोल्यांची संख्या –
ब) दिव्यांची सुविधा असलेल्या खोल्यांची संख्या –
       2. विद्युत उपकरणांची उपलब्धता
अ) आकाशवाणी                         ब) दूरदर्शन
क) सी डी प्लेयर                          ड) एल सी डी प्रोजेक्टर
इ) विद्युत जनित्र                           ई ) इतर --- (कृपया उल्लेख करावा)
मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावेवर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)      a) विजेची तरतूद नाही. विजेरी वर चालणारे रेडिओ सारखी उपकरणे आहेत.
b) विशिष्ट प्रसंगी शाळा जनरेटर किंवा विजेरी आणि इतर विद्युत उपकरणे उसनवारीने किंवा भाड्याने भाडेतत्वाने घेते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2)      a) वीज पुरवठा अनियमित आहे.वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नाही.सर्व खोल्यांमध्ये विजेचे दिवे पंखे आहेत. विद्युत उपकरणे टीव्ही रेडिओ इत्यादी उपलब्ध आहे.
b) कळफलक विद्युत वाहक तारा सुस्थितीत आहे. विजेची उपकरणे पंखे इत्यादी वेळोवेळी दुरुस्त केली जातात.
वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3)      a) वीज खंडित प्रकरणी शाळेला स्वतःची विज आधार प्रणाली जसे विद्युत जनित्र इन्व्हर्टर आहे. सर्व खोल्यांमध्ये विज दिवे आणि पंखे आहेध्वनिव्यवस्था व्यवस्थित आहे.
b) शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग टाळण्यासाठी एम सी बी कळांचा वापर केलेला आहे. सर्व विद्युत उपकरणे नियमित तपासली जातात दुरुस्त केली जातात.चालू स्थितीत ठेवली जातात.
 ( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करताततसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितातत्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजतेगाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते.वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वतचे गुणवत्तेमधील स्थान समजते.त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागतेया नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतोप्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागतेया कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतोअशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

संकलित

No comments:

Post a Comment