K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 December 2018

शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – 

संगणक (शाळासिध्दी लेखमाला - 7)


शाळासिध्दी लेखमाला - 7
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – संगणक   (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 7)

संगणक

बुध्दी ही मनुष्य प्राण्याला मिळालेले वरदान आहेबुध्दीच्या जीवावर माणसाने अनेक क्षेत्रात क्रांती घडऊन आणलेली आहेस्मृतीतर्कशुद्धविचारशक्ती आणि कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीची तीन अंगे आहेत. स्मृतीहे माणसाच्या बुद्धीचे अंग बरेच मर्यादित आहेमाणूस एकदा अनुभवलेली गोष्ट आयुष्यात सहजासहजी विसरत नाहीमानसाच्या जीवनात घडलेल्या काही घटना व गोष्टी त्याच्या स्मृतीमध्ये किंवा सुप्त मनात साठविलेल्या असताततर काही घटना व  शिकलेल्या अनुभवलेल्या काही गोष्टी माणसाच्या जाणत्या मनाला ठराविक कालावधीनंतर आठवत नाहीत. मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यकाळात किती घटना व अनुभव स्मरणात ठेऊ शकेल याच्या मर्यादा आहेत.
अशाप्रकारची वस्तुस्थिती असली तर अशाप्रकारची गोष्ट घडते हातर्कशुद्ध विचारशक्तीचा गाभा आहे. ही तर्कशुद्ध विचारसरणी साधीसरळ असून सर्वच माणसे ती नेहमी वापरत असतातपरिस्थिती व अनुभवानुसार व्यक्ती व्यक्तींमध्ये तर्कशुध्द विचार करण्याची शक्ती कमी अधिक असतेकाही माणसे फक्त  माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करू शकतात तर काही खोलवर विचार करू शकणारी असतातमाणसे पुष्कळदा फक्त काही प्रांतांमधेच खोल विचार करू शकतातजी माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याहीतर्कशुद्ध विचारसरणीला स्मृतीच्या मर्यादा येतात. एक उदाहरण म्हणजे गणितातील आकडेमोड करणेआकडेमोड करण्यामागे तर्कशुद्धता असतेतसेच आकडेमोड करण्यासाठी  स्मृतीचीही गरज असते. पाढे पाठांतर हे स्मृतीवर अवलंबून असतेस्मृतीच्या मर्यादेमुळे आपण मनातल्या मनात मोजक्या आकडेमोडी करू शकतोछोटी आकडेमोड असेल तर आपण तात्काळ उत्तर देतोपण जास्त संख्या व क्रीया असलेली आकडेमोड करायला बराच वेलागतोआपण केवळ पाठांतर व स्मरण यांच्या जीवावर त्याचे उत्तर देऊ शकत नाहीकारण आपल्या स्मृतीच्या मर्यादा होय"अशाप्रकारची वस्तुस्थिती असली तर अशाप्रकारची गोष्ट घडते या विचारसरणीचे गणितामध्ये व आकडेमोडींमध्ये रूपांतर करता येते ही कल्पना माणसाच्या लक्षात आली. या विचारातूनच संगणक विज्ञान ही कल्पना पुढे आलीआपल्या निसर्गदत्त बुद्धीचा अफाट विस्तार करायला मदत करणा-या संगणक या  महत्वपूर्ण साधनाचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने लावला. संगणकाला अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे सुरु आहे. गेल्या पन्नास वर्षांच्या विचार केला तर लक्षात येते की  संगणकाच्या शोधाने माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे. भविष्याचा विचार केल्यास संगणकाच्या साह्याने आणखी किती प्रगती होईल हे आज सांगता येऊ शकणार नाही पण संगणक ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यावश्यक बाब असेल हे ही तितकेच खरे आहे.माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात यामागे संगणकाची स्मृती हे वैशिष्ट्य आहेमाणसाच्या स्मृतीच्या कोणत्याच मर्यादा संगणकाला लागू नाहीत. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील ह्याची मर्यादाही शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत.
संगणकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडींच्या रूपात करण्याकरता ज्या लाखो आकडेमोडींची गरज असते त्या रटाळपणाच्याकंटाळवाण्या न मानता काही सेकंदांमधे त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या हातचा मळ झाला आहेकमीकमी वेळात आकडेमोडी करण्याचे संगणकांचे कसब शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंतीच्या तर्कशुद्धविचारसरणीबद्दल अचूक आणि निःसंदिग्ध सूचना मिळण्याची. त्या सूचना संगणकांना विशद करायला जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणक संचालन विज्ञानसंगणक संचालन विज्ञान देखिल वेगाने प्रगती करत आहे.संगणकाचा वापर हल्ली सर्वच क्षेत्रामध्ये होत आहेसंगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतात. संगणकांना पुरवलेली माहिती आकडेचित्रे,आवाज(Sound) अशी बहुरूपी असू शकतेपण संगणक संचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार संगणक कार्य करते.
संगणकाचा विकास - प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत अबँकस (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज यांच्या गणन यंत्रात अमुलाग्र बदल करण्यात आलेया यंत्राला सुचनांचा संच पुरविता येत असेस्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते. १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचकार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रणालीमध्ये वेगात काम पार पड़ता येवू लागले. त्यानीच पुढे आई बी एम कंपनी (इंटरनेशनल बिज़नेस मशीन) सुरु केली. १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनीने जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते.
प्रथम पिढी (First Generation) 1942 ते 1955 यामध्ये व्हॅक्युम ट्यूब म्हणजेच काचेच्या नळ्या वापरलेल्या होत्याया नळ्यांद्वारे संदेश नियंत्रित केले जात असत.त्या काळातील हे सर्वात गतिमान यंत्र होते व यात आकडेमोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागत असे. EDVAC-45 मध्ये डेटा व प्रोग्राम साठवून ठेवता येत असे तसेच यात प्रोसेसिंग यूनिट होते. जॉन व्हॉन न्युमन यांनी हा संगणक विकसित केला. मात्र या संगणकाचे बरेचसे तोटे होते.
दुसरी पिढी (Second Generation) 1955 ते 1964 च्या सुमारास विलियम शॉकले यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला व त्यानंतरच्या दहा वर्षात त्यांचा उपयोग संगणकामध्ये केला जाऊ लागला. या पिढीतील संगणक खूप माहिती साठवून ठेवू शकत असे तसेच यात प्रिंटरटेपमेमरीस्टोरेज या सर्वांचा समावेश होता. सुरूवातीला फक्त अणुशक्ती केंद्रात (Automic Research) मध्ये वापरले जाणारे हे संगणक हळूहळू मोठमोठ्या कंपन्याव्यवसायविद्यापीठ व सरकारी कामकाजात वापरले जाऊ लागले.
तिसरी पिढी (Third Generation) 1964 ते 1975 -  इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात इंटिग्रेटेड सर्किटचा (ICs) चा शोध लागला. सिलिकॉनपासून बनलेल्या छोट्या चिप्स संगणकात वापरल्या जाऊ लागल्या. यामध्ये अनेक सर्किटस् एका छोट्या चिपवर बसवल्या जातात. या संगणकात सूचनांचा एक मोठा संच साठवलेला होता व या वेगवेगळया सूचनांच्या साहाय्याने हे संगणक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकत होतेयामध्ये एकच मुख्य प्रोग्राम इतर प्रोग्राम्सचे नियंत्रण करीत असे. यातुनच Operating System ची कल्पना पुढे आली.
चौथी पिढी (Fourth Generation) 1975 नंतर या पिढीतील संगणकातल्या चिपवर केवळ 10 ते 20 छोटे भाग मावत मात्र चौथ्या पिढीतील संगणकात अधिक विकसित चिप्स वापरल्या गेल्या. यात एका छोट्या चिपवर जवळ जवळ अगणित भाग मावतात. यामुळे संगणकाचा आकार साहजिकच लहान झाला. अतिशय स्वस्त असल्याने याचा जगभर वेगाने प्रसार झाला. आज जगात वापरले जाणारे सर्व संगणक चौथ्या पिढीतील आहेत. यात आकारकाळ व क्षमतेनुसार या पिढीतील अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

संगणक कार्यप्रणाली

संगणक कार्यप्रणाली (operating system) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेअर या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणा-यावेब ब्राऊझरईमेल प्रोग्रॅमवर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेअर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक प्रणाली अर्थात प्रोग्रॅमिंग लँग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठीप्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमड लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. या यादीला 'प्रोग्रॅमम्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमानेठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते. कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages), वस्तुनिष्ठ भाषा (Object Oriented language) , विवृत भाषा (Interpreted language) इत्यादी

संगणकाची वैशिष्ट्ये

१. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
२. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रणगुणपत्रिका छपाई इत्यादी.
५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्यविश्वासार्हता दिसून येते.
७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.
८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता

संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटरसाधन म्हणून वापर करता येतो.
१. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना प्रभावी अध्यापन साहित्य म्हणून संगणक उपयोगी आहेअध्यापन साहित्यप्रश्नपत्रिका तयार करणेजतन करणेविद्यार्थी संकलित नोंदीसाठीगुणदानासाठीनिकालपत्रके व विविध अहवाल तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत संगणक अत्यंत उपयोगी आहे.
२.प्रशासनाच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये कामे सोपी व लवकर करण्यास संगणक मदत करतो.
३. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व संगणक मदत करतो.
४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऐनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्सरेखाचित्रेथ्रीडी चित्रेपूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञानगणितसामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.
५. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात
६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.
७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.
८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.
९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रेसंबंधित शास्त्रज्ञांची चित्रेपाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.
१०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययन अनुभव देता येतो.
११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
१२. संगीतखेळकार्यानुभवचित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.
13. पॉवर पॉईंट - विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील बरीचशी माहिती ओघ तक्त्यांच्या स्वरूपात व सचित्र मांडता येते. संगणकातील पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा यासाठी प्रभावीपणे वापर करता येतो. यासाठी स्लाईड्स तयार कराव्या लागतात.तयार केलेल्या स्लाईड्स क्रमवार दाखविता येतात. स्लाईड्सच्या पार्श्वभूमीचा रंगचित्रांचा रंगमजकुराची हालचालयुक्त मांडणी इत्यादींमुळे पॉवर पॉईंट वापरून केलेले सादरीकरण खूप आकर्षक व प्रभावी ठरते. हालचाली व रंग यामुळे अवधान टिकविले जाते व अध्यापनामध्ये मनोरंजकता येते.
14. संगणकाच्या साहाय्याने अनुदेशनसंगणक केवळ शिक्षकालाच मदत करून थांबत नाही तर शिक्षकाचे काम स्वतः करण्याची संगणकाची तयारी असते. प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुतीकरणाचे काम देखील संगणक करू शकतो. संगणकाच्या या कार्यतंत्रालाच Computer Assisted Instruction (CAI)असे म्हणतात.
या तंत्राची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे – १. अनुदेशन तंत्र हे संगणक व अध्ययन कर्ता यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते आणि मानवी अध्ययन हे त्याचे उद्दिष्ट असते.२. संगणक प्रत्यक्ष विद्यार्थ्याला माहिती देत असतो व विद्यार्थ्याला अपेक्षित पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते.३. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगतरीत्यास्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते.

संगणकाच्या साहाय्याने अनुदेशनाचे प्रकार

संवाद (Dialogue) - संवाद प्रकारामध्ये संगणकामध्ये विशिष्ट अशी माहिती भरलेली असते. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना जी माहिती हवी असेल ती त्याने संगणकाला विचारल्यास मिळू शकते. विद्यार्थ्याने संगणकाला प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळवायचे असा प्रकार येथे अभिप्रेत असतो.
उजळणी व सराव (Revision and Practice) –यामध्ये शिक्षकाने नवनवीन संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने करून द्यावयाची व त्यावर आधारित उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवायची अशी अपेक्षा असते. संगणकाची भूमिका विशिष्ट ज्ञानापुरती चाचणी घेणे. सराव घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते.
पृच्छा (Enquiry) – यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला माहिती विचारतो व ती माहिती त्याला संगणकाकडून दिली जाते किंवा ती माहिती कोठे मिळेल हे सांगितले जाते.
समस्या निराकरण (Problem Solving) –अध्ययनकर्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी येथे संगणकाचा उपयोग एखाद्या आकडेमोड करणा-या कॅलक्युलेटर प्रमाणे केला जातो.
ट्यूटोरिअल (Tutorial) – या प्रकारामध्ये अधिक गुंतागुंत असते. क्रमपाठावर आधारित असे पाठ असतात. प्रथम संगणक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने उत्तर दिल्यास पुढील भाग सादर करतोअन्यथा पूर्वज्ञानावर आधारित भागावर आशय अभ्यासण्यासाठी देतो व परत प्रश्न विचारतो. येथे प्रत्याभरण प्रबलन याचा वापर केला जातो. स्वयंअध्ययनासाठी उपयुक्त साधन.
प्रतिभास (Simulation) – या तंत्रामध्ये एखाद्या क्रियेचा किंवा वस्तूचा अभ्यास करण्यासाठी हुबेहुब परंतु भासमय अशी क्रिया किंवा वस्तूची प्रतिकृती वापरून अध्यापन केले जाते. उदा. युरेनियमपासून किरणांचे उत्सर्जन कसे होते किंवा अणुस्फोट कसा होतो हे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही. यासाठी संगणकामध्ये प्रतिभास प्रतिमान वापरून विद्यार्थ्यांसमोर त्या अनुदेशाने प्रस्तुतीकरण करता येते.
15.इंटरनेट (Internet) :१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर युरोपिअन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN)वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेटवर पाहणे शक्य झाले.इंटरनेट २१ व्या शतकातील एकमेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायरकेबलसॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटासही जोडून देतोवेब इंटरनेट चा वापर खालील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.
संपर्क :-इंटरनेट द्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. ईमेल च्या द्वारे तुम्ही जगातील कुठल्याही व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता.इंटरनेटमुळे आता एका देशातील शिक्षक व विद्यार्थी दुस-या देशातील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संपर्क करु लागले आहेत.
खरेदीविक्री :-इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही खरेदी व विक्री करू शकताबाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मिळते. नेट बॅंकींग किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .
माहिती शोधणे :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मिळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्सपुस्तके आपणास नेट वर मोफत व सहज वाचायला मिळतात. विविध शैक्षणिक पुस्तकेअध्यापन पध्दती व शैक्षणिक साधनांची माहिती आता सहज उपलब्ध होत आहे.
मनोरंजन :- या विषयावर बोलावे तेवढे कमी आहे कारण या विषयावर इंटरनेटमध्ये माहितीचा भरपूर खजिना आहे . संगीतचित्रपटमासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतोसध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापराला महत्व देण्यात आले आहेमहाराष्ट्रामध्ये शाळेत संगणक व तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो.जिल्हा परिषद व्यवस्थापन असलेल्या पष्टेपाडा ता शहापूर जिल्हा ठाणे या प्राथमिक शाळेमधून संगणक व शैक्षणिक तंत्रज्ञानाचा सर्व प्रथम मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलामोलमजुरी करणा-या गावातील गरीब लोकांना प्रेरीत करुन आर्थिक स्वरुपात व श्रमदानातून मदत घेऊन महाराष्ट्रातील पहिली डिजीटल शाळा साकारली गेलीशाळेत स्मार्ट बोर्ड,इंटर ॲक्टीव्ह मॉनिटरटॅबप्रोजेक्टर,स्मार्ट टी.व्हीसोलार सिस्टीम, 3डी चाईल्ड थिएटरस्टूडीओ रेकॉर्डींगव्हर्च्युअल क्लासरुम इत्यादी सोयी उपलब्ध झाल्या आहेतगावामध्ये विजेची सोय नाही अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली ता हवेली जिल्हा पुणे या शाळेने शाळेची सोलर यंत्रणा उभी केली व शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभी केली आहेराज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून शाळांमध्ये संगणकाद्वारे शिक्षण सुरु झालेले असून मोठ्या प्रमाणात शिक्षक हे तंत्रस्नेही व संगणक वापरकर्ते बनलेले आहेतसंगणकाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी शालेय शिक्षणात उपयोगी पडतील असे अनेक संगणकीय शैक्षणिक कार्यक्रमवेबसाईटस,ब्लॉगसॲप्लिकेशन्ससॉफ्टवेअर्स देखिल तयार केलेली आहेत.
श्रीसंदीप गुंड (ठाणेअध्ययन अध्यापनात 100 टक्के तंत्रज्ञान,श्रीरणजित डिसले (सोलापूरअध्ययन अध्यापनासाठी क्यु.आर.कोडचा वापरश्री.सुनिल अलुरकर (नांदेडशैक्षणिक वेबसाईट व ब्लॉगश्री. संतोष बोंबले (अकोला) संगणक व तंत्रज्ञानावर आधारीत चर्चासत्रेश्रीबालाजी जाधवश्रीप्रदीप कुंभारश्रीसंजय गोरेश्री.राम सालगुडे (सातारा) अध्ययन अध्यापनासाठी संगणक व विविध ॲपलिकेशन्सची निर्मितीश्री. रवि भापकरश्री. संतोष दहिवळ(अहमदनगरशैक्षणिक ॲपलिकेशन्सची निर्मितीश्री. शफी शेख(यवतमाळश्री. सुरज तांबोळी (सांगली श्री. दिनेश बोधनकर(अकोला), श्री. गुणेश डोईफोडे (ठाणे )अध्ययन अध्यापनात संगणकाचा उपयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम श्री. प्रदीप भोसलेश्रीमती स्वरदा खेडेकरश्री सुनिल बासुतकर (पुणेआधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,श्री अनिल सोनवणे (जालनामायक्रोसॉफ्टचा शैक्षणिक वापर,श्री.आनंद आनेमवाड(पालघरवर्गाध्यापनामध्ये संगणक व तंत्रज्ञान,माध्यमिक विभागासाठी श्री. बी बी पाटील सर कोल्हापूरश्री. शरद तांबे मुंबईश्रीशमशुद्दीन अत्तार (सिंधूदूर्गश्री. प्रफुल्ल माहुरे (चंद्रपूर), श्री.प्रशांत क-हाडे (नांदेड) या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात संगणकाच्या साह्याने खुप मोठे काम उभे केलेले आहेशैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संगणक व तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरत आहेम्हणूनच प्रत्येक शाळेत संगणक असणे ही काळाची गरज ठरत आहे.

केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  प्रत्येक माध्यमिक शाळेत संगणक असणे आवश्यक आहे.
v  प्रत्येक उच्च प्राथमिक शाळेत संगणक असणे आवश्यक आहे.
v  प्राथमिक शाळेत तरतूद उपलब्ध असल्यास संगणक आवश्यक आहे
 वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
संगणक याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
     1. शाळेत संगणक उपलब्ध आहे काय ?
     2.  शाळेमध्ये उपलब्ध संगणक संख्या:
                अध्ययन – अध्यापनासाठी    ) प्रशासनासाठी            )ग्रंथालयासाठी          संगणक नाही.
     3. शाळेमध्ये उपलब्ध आंतरजाल सुविधा वापरणारे
               केवळ शाळाप्रमुख                          ) केवल शिक्षक           विद्यार्थी          उपलब्ध नाही
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतातया वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते.मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावेवर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1)           a) अध्ययन अध्यापनासाठी संगणकाचा वापर नाहीडिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध नाही.
    b) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संगणक वापराच्या संधीचा अभाव आहे.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे.)
2)   a) शाळेत शिक्षक व विद्यार्थी दोघांसाठी सुलभ काही संगणक आहेत.काही मृदू संगणक साहित्य (संगणक आज्ञावलीआणि डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध आहेआंतरजाल सुविधा उपलब्ध नाही.
b) शिक्षक विविध वर्ग व विषयासाठी संगणक व डिजिटल साहित्य सुयोग्यपणे वापरतात.विद्यार्थ्यांना संगणक वापराची संधी काही प्रसंगी दिली जाते.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे.)
3)   a) शाळेत आंतरजाल सुविधा व पुरेशा संगणकासह संगणक कक्ष आहे.अद्ययावत पुरेसे डिजिटल अध्ययन अध्यापन साहित्य व मृदू साहित्य उपलब्ध आहे.
b) शिक्षक अध्ययन अध्यापन नियोजनात व अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा(संगणक व संबंधित डिजिटल साहित्यवापर एकात्मपणे करतातविद्यार्थांच्या मूल्यमापनातसुध्दा संगणकाचा वापर करतातसंगणक वापराची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते.
 ( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करताततसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितातत्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजतेगाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते.वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वतचे गुणवत्तेमधील स्थान समजते.त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागतेया नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतोप्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागतेया कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतोअशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

संकलित

No comments:

Post a Comment