K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 27 December 2018

शाळासिध्दी लेखमाला - 9 . मध्यान्ह भोजन – स्वयंपाक गृह आणि भांडी


शाळासिध्दी लेखमाला -  9
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – मध्यान्ह भोजन – स्वयंपाक गृह आणि भांडी  (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक  9 )
मध्यान्ह भोजन – स्वयंपाक गृह आणि भांडी
स्वयंपाक गृह 
वदनी कवळ घेता नाम घ्या …. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म’….भोजनालाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यज्ञकर्माचे महत्व द्यावेहा आशय व्यक्त करणारी ही प्रार्थना. शालेय पोषण आहार ही विद्यार्थ्यांचा आहार गुणात्मक आणि पोषणमूल्यदृष्ट्या वृद्धिंगत करणारी योजना. या योजनेला नवीन आयाम जोडतांना शासनाने त्यात स्नेह भोजन व अतिथीभोजन हे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे त्यामुळे या उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविणे शक्य झालेआहे. ही योजना केवळ शासकीय उपक्रम म्हणून नव्हे तर आधी उल्लेखकेलेल्या प्रार्थनेतील वचनाप्रमाणे ‘यज्ञकर्म’ म्हणून राबविली जात असल्याने उत्तम कामगिरी होत आहे. शाळा व्यवस्थापन समिती , मुख्याध्यापक , शिक्षक व पालक यांच्या उत्तम समन्वयमधून ही योजना राबविली जात आहे याचा अतिशय चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर णि आरोग्यावर झालेला दिसून येत आहे.
मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे, राष्ट्राचे भवितव्य आहे. मुलांचे आरोग्य , पोषण व वाढ देशाच्या आरोग्यासाठी व विकासासाठी महत्वाचे आहे. बालकांच्या विकासामध्ये कुटुंबाची व समाजाची भूमिका असते. सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार व शुध्द पाणी देखिल आवश्यक असते. परंतु भारत देशात सुमारे 40 % मुले कुपोषित आहेतहे याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पण श्रीमंत कुटुंबातही वेगळ्या प्रकारचे कुपोषण असतेच. कुपोषणाने आरोग्य बिघडते,कार्यक्षमता कमी होते आणि शालेय प्रगती खुंटते. कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी  देखिलनिगडित आहे.
कुपोषणाची कारणे बरेचसे कुपोषण आईच्या पोटातच सुरू होते. आई कुपोषित आणि कमी शरीरभाराची असली तर बाळही कमी वजनाचे होण्याची शक्यता वाढते.जन्मल्यानंतर उशिरा आणि कमी स्तनपान करण्याने बाळाचे पोषण आणि वाढ कमी होते. अशा वेळी पूरक आहारासाठी योग्य सल्ला मिळायला पाहिजे. काहीवेळा तापखोकलाजुलाब वगैरे आजारांनी बाळाची तब्बेत क्षीण होते आणि भूकही कमी होते. यामुळे कुपोषण आणि आजार यांचे दुष्टचक्र सुरू होते.
भारतीय बालकांच्या आहारात प्रथिने कमी पडतात. यामुळे स्नायूंची आणि हाडांची वाढ कमी पडते.तिसऱ्या वर्षापर्यंत बाळाच्या वाढीचा पहिला टप्पा पूर्ण होतो. या टप्प्यात वाढ कमी झाली तर पुढे ती पूर्ण भरून येत नाही.वाढीचा दूसरा टप्पा हा चार ते नऊ या वयोगटाचा असतो. यानंतर प्रारंभिक पौगंडावस्था नऊ ते तेरा वर्षे असते .या अवस्थेत शरीराची भरभर वाढ होते. मध्य पौगंडावस्थेमधे (वय चौदा ते पंधरा वर्षे ) विद्यार्थी पालकांपासून स्वतंत्र होतात. त्यांची स्वतंत्रओळख विकसित होते आणि मित्रांचे गट तसेच विरोधी लिंगाच्या व्यक्तिंसोबत नवीन नाते निर्माण होते.  नवनवीन गोष्टी करुन पाहण्याची देखील ऊर्मी येते. यानंतर ची अवस्था म्हणजे पौगंडावस्था (वय सोळा ते एकोणीस वर्षे ) या टप्प्या दरम्यान मुलांमध्ये शारीरिक लक्षणांचा विकास होतो. आणि सुरचित मते आणि कल्पनासह एक निश्चित ओळख निर्माण होते.
बाल्यावस्था व पौगंडावस्थेच्या वरील  होणा-या वाढीसाठी पुरेसे पोषण अत्यंत महत्वाचे आहे. कमकुवत पोषण हे वयात येण्यातील विलंबाचे एक कारण सांगितले जाते. विशेषतः भारतीय पौगंडावस्थेतील मुलींसाठी ते लागू पडते. 
कुपोषण कसे ओळखायचे?
बालकाचे पोषण आणि वाढ तपासण्यासाठी मुख्य पद्धती आहेत.
1.    दंडघेर मोजणे – दंडघेर मोजणे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे.  1-5 वर्ष वयाच्या बालकांमध्ये ही सारखीच लागू पडते. दंडघेर 13.5 से.मी.पेक्षा जास्त असणे चांगले.दंडघेर 11.5 से.मी.पेक्षा कमी असेल तर कुपोषण समजावे. दंडघेर 11.5 ते 13.5 च्या दरम्यान मध्यम कुपोषण समजावे. मोजमापासाठी साधा टेप किंवा दंडघेर पट्टी वापरा. वयोगट 6-9 व 10-14 करिता देखिल निकष विहित निकष दिलेले आहेत.
2.    वयानुसार उंची न वाढणे म्हणजे खुरटणे. खुरटणे म्हणजे दीर्घ कुपोषण असते. सुमारे 20% बालकांची वाढ खुरटलेली आढळते. बालकाच्या जन्मावेळी 50 से.मी. सहा महिन्याच्या शेवटी  65 सेमी1वर्षाच्या शेवटी 75 सेमी, 2 वर्षाअखेर 85 सेमी, 3 वर्षाअखेर 95 सेमी, 4वर्षाच्या शेवटी 100 सेमी, 5 वर्षाच्या अखेरीस 108 सेंमी, तर 11 व्या वर्षी 140 सेंमी उंची योग्य समजावी. यासाठी तक्तेही मिळतात.
3.    वयानुसार कमी वजन ही सर्वाधिक वापरातली पद्धती आहे. सुमारे 40%बालके अपेक्षित वजनापेक्षा हलकी असतात. कमी वजन म्हणजे शरीरभार आणि वाढ कमी असणे. अपेक्षित वजनासाठी काही साधारण निकष पुढीलप्रमाणे :जन्मावेळी 3 किलोसहाव्या महिन्याअखेर 6 किलो, 1वर्षाअखेर 9 किलो, 2 वर्षाशेवटी 12 किलो. 3 वर्षाअखेर 14 किलो. 4वर्षाअखेर 16 किलो असावे. 5 वर्षाअखेर 18 किलो तर 11 व्या वर्षी 32 किलो असावे.
4.    डोक्याचा घेरदेखील पोषणावर अवलंबून आहे. जन्मावेळी डोक्याचा घेर 34से.मी असावा. सहाव्या महिन्याअखेर 42, वर्षाअखेर 45 दुसऱ्या वर्षानंतर 47,  तिसऱ्या वर्षाअखेर 49, 4 ते 5 वर्षाअखेर 50 सेमी  त्र 11 व्या वर्षी 55 सेमी अपेक्षित आहे.
या मोजमापाशिवाय कुपोषणाच्या काही खाणाखुणाही असतात. उदा.रक्तद्रव्याचे(हिमोग्लोबीन) प्रमाण 12 ग्रॅमच्या वर असावे. सुमारे 50 टक्के बालकांमध्ये रक्तपांढरी असते. रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्य कमी असणे.
प्राथमिक उपचार आणि प्रतिबंध
बालकांना दर 2-3 तासांनी खाणे-पिणे लागते. मोठ्यांप्रमाणे ते 2-3जेवणांवर दिवस काढू शकत नाहीत. प्राणिज प्रथिने बाळाच्या वाढीसाठी चांगली असतात.आपले कुटुंब शाकाहारी असेल तर शेंगदाणेसोयाबिनडाळींचा बालकाच्या आहारात समावेश करावा. बालकांना भरपूर तेलतूप खाऊ द्यावे. याने ऊर्जा वाढते.साखर आणि गुळानेही ऊर्जा वाढते. जंतांची काळजी करू नये त्याचा साखर-गुळाशी संबंध नसतो.फळेभाजीपालाखारीकबदाम इ. पदार्थ खायला पचायला सोपे करून भरवता येतात. बालकाची प्रगती आणि वाढ वेळोवेळी तपासून घ्यावी. यासाठी डॉक्टर किंवा नर्सची मदत घ्यावी. बाळाला भरवण्याआधी आपले हात स्वच्छ धुवायला पाहिजेत.महाराष्ट्रातील सर्वसामान्य पोषणाचा स्तर हा मध्यम पातळीवरच आहे,कारण महाराष्ट्रातील आहार व राहणीमानाचा दर्जा फारसा समाधानकारक नाही. महाराष्ट्रात सुमाते 30 टक्के बाळाचे जन्म वजन 2.5 किलो पेक्षा कमी असते. कमी शरीरभार हेही मुले मुळातच कुपोषित असण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण पिढीजात आहे त्यामुळे ते दूर व्हायला काही दीर्घ पल्ल्याची योजना करणे योग्य ठरते. महाराष्ट्रीयन जेवणात धान्य उष्मांकांचे प्रमाण बरे असले तरी प्रथिनांचे प्रमाण कमी पडते.
कुपोषण म्हणजे केवळ बालकुपोषण  नाही. शालेय वयात देखिल कुपोषण सुरु राहते. शालेय वयातील मुले, तरुण वय व प्रोढत्व व वृध्दत्व या अवस्थामध्ये देखील कुपोषण आढळून येते. भारतात व महाराष्ट्रात वयाच्या 18-20 वर्षापर्यंत कुपोषण सुरुच राहिल्यावर त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे कुपोषणावर बालवयात किंवा शालेय वयात उपचार व्हायला हवा. बालवयातच कुपोषण संपायला हवे. कुपोषण संपविण्यासाठी सर्वच वयोगटातील व्यक्तींना संतुलित आहार मिळायला हवा. सुक्ष्म पोषक घटकांचा समावेश अन्नामध्ये करायला हवा.
सूक्ष्म पोषक घटक – सुरक्षात्मक अन्न
सूक्ष्म पोषक घटक म्हणजे जीवनसत्वं आणि खनिजं होत. जी आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्यासाठीचयापचयाच्या कार्यांना आधार देण्यासाठी आणि संक्रमणांच्या विरोधात संरक्षण करण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. आरोग्य राखणे आणि दीर्घायुष्यासाठी ते अत्यावश्यक असतात.
जीवनसत्व अ
अ जीवनसत्व हे चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे.  दृष्टीप्रतिकारशक्ती आणि त्वचा तसंच श्लेष्मा पडद्याच्या एकात्मतेसाठी त्याची भूमिका महत्वाची असते.  भारतात शालेय वयाच्या टक्के मुलांना डोळ्यांच्या पांढ-या भागात करडा चट्टा येण्याच्या लक्षणांसारखी अ जीवनसत्वाच्या कमतरतेसारखी लक्षणं दिसतात.  अ जीवनसत्वाच्या कमतरतेच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक म्हणजे रातांधळेपणा.अ जीवनसत्व हे सामान्य दृष्टीसाठी अत्यावश्यक आहे.  त्याच्या कमतरतेमुळं रातांधळेपणा आणि अन्य तक्रारी उद्भवतात.महिलांमधे प्रसुतीपूर्वी आणि नंतर अ जीवनसत्वाची कमतरता टाळण्यामुळं त्यांच्या मृत्युचा आणि विकृतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो असं अभ्यासात दिसून आलं आहे.अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं होणा-या व्याधीं टाळण्यासाठी आहारातून अ जीवनसत्वाचं सेवन उपयुक्त आहे.अ जीवनसत्व हिरव्या पालेभाज्यापिवळ्या आणि नारंगी रंगाची फळं आणि भाज्या यामध्ये मोठ्या प्रमाणात असते.त्यामुळे या घटकाचा अन्नामध्ये समावेश करावा.


जीवनसत्व क
क जीवनसत्व हे एक अत्यावश्यक जीवनसत्व असून एक प्रतिऑक्सिडीकारक आहे.  ते संक्रमणापासून संरक्षण देते.  क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं स्कर्व्ही होतो आणि अशक्तपणाहिरड्यातून रक्त येणे आणि हाडांची सदोष वाढ अशी लक्षणं दिसतात.  क जीवनसत्वजखम बरी करणंअमीनो असिड आणि कर्बोदकांचा चयापचय आणि काही संप्ररेकांच्या संश्लेषणांमधे मदत करते. त्याचा लोहाच्या शोषणावरही प्रभाव होतोक जीवनसत्वयुक्त अन्न पदार्थ -  सर्व लिंबूवर्गीय फळं जसेसंत्रीलिंबू आणि आवळा यांमधे असते.टोमॅटो आणि पेरु यांसारख्या सामान्यपणे खाल्ल्या जाणा-या फळांमधे क जीवनसत्वाचा चांगला स्रोत असतो.  मोडवलेले हरभरे हे देखील क जीवनसत्वाचा समृध्द स्रोत आहेत.
लोह
लाल रक्तपेशींमधे हिमोग्लोबीनच्या निर्मीतीसाठी लोह हे अत्यावश्यक घटक आहे आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीत त्याची महत्वाची भूमिका असते.   आपल्या देशातयुवा मुलंपौगंडावस्थेतील मुली आणि गर्भवती महिलांमधे अशक्तपणा ही सर्वात मोठी आरोग्याची समस्या आहे.  अंदाजे 50 टक्के लोकसंख्या पोषणाच्या अभावी होणा-या  अनिमियामुळं ग्रस्त असते.  अशा प्रकारच्या अशक्तपणामुळं प्रौढ व्यक्तींमधे कामाच्या क्षमतेवर आणि मुलांमधे शिकण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतोलोहसमृध्द अन्नपदार्थ वनस्पतीजन्य पदार्थ जसे पालेभाज्या,सुकी फळे आणि शिंबाकुलीय वनस्पती यांच्यात लोह असते. आणि बाजरी आणि रागी यांसारख्या पिष्ठमय पदार्थांमधे लोहाचा चांगला स्रोत असतो. वनस्पतीजन्य स्रोतामधून केवळ 3-5 टक्के लोहच शरीराव्दारे शोषले जातेलोह हे मांसमासे यासारख्या अन्नामधून मिळवले जाते. क जीवनसत्वं असलेली फळं (आवळापेरु आणि लिंबू ) ही वनस्पतीजन्य अन्नातून अधिक लोह शोषण्यासाठी मदत करतात.  जेवणानंतर चहा किंवा कॉफी घेणे टाळावे.
आयोडीन
थायरॉईड संप्रेरकाच्या (थायरॉक्सीन) संश्लेषणासाठी आयोडीन अत्यावश्यकअसते जे पुढे सामान्य शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी जबाबदार असते.आयोडीनची दैनंदीन आवश्यकता ही 100-150 मिलीग्रॅम प्रतिदिन असते आणि ती वय तसेच ठराविक शारीरिक परिस्थितींनुसार बदलते भारतामधे आयोडीनच्या कमतरतेमुळं होणा-या व्याधी  (आयडीडी) या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या सूक्ष्मपोषक घटकविषयक व्याधी आहेत.गर्भधारणेच्या काळात आयोडीनच्या कमतरतेमुळं गर्भाच्या वाढीवर आणि मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो.आयोडीनच्या कमतरतेमुळं हायपोथायरॉयडीझमगलगंड आणि वाढ खुंटणे या व्याधी होतात.आपण जे अन्न खातो विशेषतः  समुद्री अन्न आणि पाणी यांव्दारे आपल्याला आयोडीन मिळते.आयडीडी टाळण्यासाठी प्रत्येकाने दररोज जेवणात आयोडीनयुक्त मीठ वापरले पाहिजे.
शालेय पोषण आहार - कुपोषणावर मात करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनशालेयस्तरावर पुरक आहार, शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आलेली आहे.  सुरुवातीच्या काळात पौष्टीक आहार योजना व दूध पुरवठा योजना या कार्यक्रमामधून शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षण , आरोग्यासाठी प्रयत्न केले गेले.  सन 1995-96 मध्ये शासन निर्णय 22 नोव्हें 1995 अन्वये प्राथमिक शाळामधील इयत्ता 1 ली ते 5 वीतील विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरु करण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील 25 जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पुनर्रचित 171 गटातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरु करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे दृष्टीने तसेच प्राथमिक शाळामधील विद्यार्थ्यांच्या पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने ही केंद्र पुरस्कृत योजना सुरु करण्यात आली. या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांची मासिक उपस्थिती किमान 80 टक्के असल्यास, दरमहा 3 किलो तांदूळ वाटप करण्यात येत होता. केंद्र शासनच्या मुळ योजनेनुसार शालेय विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न देणे अपेक्षित होते. तात्पुरती व्यवस्था म्हणून सुरुवातीला धान्य वितरण करण्यात आले. याच बरोबर दरवर्षी टप्प्या टप्प्याने ही योजना विकसीत करण्याचे नियोजन करण्यात आले. सन 1996-97 मध्ये राष्ट्रीय साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी आहे अशा दोन जिल्ह्यातील (कोल्हापूर, उस्मानाबाद ) एकूण 29 गटांचा समावेश या योजनेत करण्यात आला. सन 1997-98 मध्ये रत्नागिरी व सिंधूदूर्ग  या जिल्ह्यातील सर्व गटांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला. ही योजना अशाप्रकारे 29 जिल्ह्यातील 300 गटांमध्ये सुरु झाली.केंद्र शासनाकडून मोफत धान्य तर राज्य शासनाकडून वाहतुकीवरील व अंमलबजावणी वरील खर्च करण्यात येत असे. विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्यासाठी लागणारा व इतर खर्च जिल्हा परिषदेने किंवा समाज सहभागाने करण्याचे निर्देश या योजनेत देण्यात आलेले होते. वरील प्रमाणे योजना अंमल बजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर आवश्यक अधिकारी / अधिक्षक यासारख्या काही पदांची देखिल निर्मिती करण्यात आली.
भारतातील लोकांचे एकंदर राहणीमान व कुपोषणाचा अभ्यास करता व देशामध्ये भूकबळी होत असल्या संदर्भात पिपल्स युनियन फोर सिव्हील लिबर्टीस या संस्थेने सर्वोच्च न्यायलयात याचिका क्रमांक 196/2001 दाखल केली. या याचिकेत असलेल्या विविध मुद्यांमध्ये शालेय पोषण आहार योजनेचा समावेश केलेला होता. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सुधारीत शालेय पोषण आहार योजना सन 2002 मध्ये सुरु करण्यात आली. इयत्ता ली ते वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठीवर्षातून किमान 200 दिवस, 300 उष्मांक आणि 8 ते 12 ग्रॅम प्रथिने युक्तआहार देण्याचे निश्चित करण्यात आले. सन 2004 मध्ये तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम या शाळेत घडलेल्या घटनेमुळे शालेय पोषण आहार योजनेमध्ये अंमल बजावणीमध्ये घ्यावयाची काळजी व करावयाची उपाययोजना निश्चित करण्यात आली. या उपाययोजनेत खालील मुद्यांचा समावेश होता.
1)      शालेय इमारत,मजले व वर्ग  लक्षात घेता आवश्यकतेनुसार अग्निशमन यंत्रे उपलब्ध असावीत.
2)      दरवर्षी नियमितपणे अग्निशमन यंत्र सिलिंडरचे नुतनीकरण करण्यात यावे.
3)      शाळेतील वर्ग खोल्यांचा स्वयंपाकासाठी वापर करण्यात येऊ नये. स्वयंपाकाची जागा ग्रामिण भागात शाळेच्या इमारतीपासून 100 फूट दूर असावी.
4)      शाळेच्या इमारतीत ज्वालाग्रही पदार्थ ठेवण्यात येऊ नये. तसेच स्वयंपाकासाठी लागणा-या इंधनाचा साठा शाळेत ठेऊ नये.
5)      शिक्षकांना सुरक्षिततेचे प्रशिक्षण सिव्हील डीफेंस, होमगार्ड यांच्यामार्फत आयोजित करावे.
6)      आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आग, वीज, पाणी, भूकंप इत्यादी आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी यासंबंधी असलेले फलक , चित्रे शाळेत लावण्यात यावी.
वरील उपाययोजनेसोबतच सन 2007 पासून स्वयंपाकगृहाची आवश्यकता लक्षात घेता प्रत्येक शाळेत स्वयंपाकगृह तयार करण्याच्या कार्याने वेग घेतला. शालेय पोषण आहारामधून विद्यार्थ्याच्या आरोग्यात झालेली सुधारणा पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांचे वजन मोजण्यासाठी वजनकाटे व विद्यार्थ्यांची उंची मोजण्यासाठी मोजपट्टी देण्यात आली.
इयत्ता 6 ते 8 वी साठी शालेय पोषण आहारतसेच इवी ते वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी देखिल शालेय पोषण आहार योजना 8 ऑगष्ट 2008 च्या शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आली. या शासन निर्णयामध्ये शालेय पोषण आहारसंबंधी सुधारीत कार्यपध्दतीचा उल्लेख करण्यात आला. शासन निर्णयानुसार इयत्ता 1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त दुपारचे भोजन तसेच इयत्ता 6 वी  ते  8 वी च्या विद्यार्थ्यांना 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त दुपारचे भोजन (Mid-Day-Meal) देण्यात निश्चित करण्यात आले. आहार तयार करण्यासाठी इतर जे अन्न घटक आवश्यक आहे (उदा. तेल, डाळी, कडधान्ये, मिठ, मिरची इत्यादी ) त्यांचा शाळांना थेट पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शालेय पोषण आहार गुणवत्ता व पोषणघटक यासाठी आवश्यक पाककृतीदेखिल देण्यात आल्या त्या खालीलप्रमाणे,

शालेय पोषण आहार पाककृतींचा तपशील
सोमवार – डाळ तांदळाची  खिचडी   (इयत्ता 1 ते 5)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
100
345
6.7
मुग / मसुर डाळ
20
68
5.0
सोयाबिन
10
43
4.3
सोयाबिन तेल
05
45
-
मिठ/ हळद / तिखट  चवीनुसार
02
-
-
एकूण
137
501
16
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 300 ते 325 ग्रॅम राहील
(इयत्ता 6 ते 8)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
150
517
10.5
मुग / मसुर डाळ
30
102
7.5
सोयाबिन
15
64
6.4
सोयाबिन तेल
7
63
-
मिठ/ हळद / तिखट  चवीनुसार
02
-
-
एकूण
204
746
23.95
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 450 ते 475 ग्रॅम राहील

मंगळवार व शुक्रवार – गोडभात   (इयत्ता 1 ते 5)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
100
345
6.7
मुग डाळ
30
102
7.3
साखर/ गुळ
20
80
-
तेल
05
45
-
एकूण
145
572
14
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 300 ते 325 ग्रॅम राहील
(इयत्ता 6 ते 8)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
150
517
10.5
मुग डाळ
45
153
10.95
साखर/ गुळ
30
120
-
तेल
7
63
-
एकूण
232
853
21
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 450 ते 475 ग्रॅम राहील




बुधवार – पिठले किंवा बेसन व भात   (इयत्ता 1 ते 5)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
100
345
6.7
बेसन पीठ
30
99
6.7
मिठ / हळद / जिरे-मोहरी / तिखट चवीनुसार
02
-
-
तेल
03
27
-
एकूण
135
47
13.40
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 300 ते 325 ग्रॅम राहील
(इयत्ता 6 ते 8)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
150
517
10.05
बेसन पीठ
45
148
10.05
मिठ / हळद / जिरे-मोहरी / तिखट चवीनुसार
2
-
-
तेल
5
45
-
एकूण
203
710
20.10
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 450 ते 475 ग्रॅम राहील

गुरुवार – कडधान्याची उसळ व भात   (इयत्ता 1 ते 5)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
100
345
6.7
मोड आलेली कडधान्ये
30
102
6.0
मिठ / हळद / जिरे-मोहरी /तिखट चवीनुसार
02
-
-
सोयाबिन प्रक्रीया केलेले
10
43
4.3
तेल
03
27
-
एकूण
145
517
17.00
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 300 ते 325 ग्रॅम राहील
(इयत्ता 6 ते 8)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
150
517
10.05
मोड आलेली कडधान्ये
45
153
9.00
मिठ / हळद / जिरे-मोहरी / तिखट चवीनुसार
2
-
-
सोयाबिन प्रक्रीया केलेले
15
64
6.4
तेल
5
45
-
एकूण
218
779
25.45
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 450 ते 475 ग्रॅम राहील



शनिवार – वरण / आमटी व भात   (इयत्ता 1 ते 5)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
100
345
6.7
तूर डाळ
30
102
6.0
मिठ / हळद / जिरे-मोहरी /तिखट चवीनुसार
02
-
-
तेल
03
27
-
एकूण
135
474
12.7
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 200 ते 225 ग्रॅम राहील
(इयत्ता 6 ते 8)
खाद्य पदार्थ
वजन (ग्रॅम)
उष्मांक
प्रथिने
तांदूळ
150
517
10.05
तूर डाळ
45
153
9.00
मिठ / हळद / जिरे-मोहरी /तिखट चवीनुसार
2
-
-
तेल
5
45
-
एकूण
203
715
19.05
शिजवलेल्या अन्नाचे वजन साधारणपणे 450 ते 475 ग्रॅम राहील
 प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन वेळोवेळी सुक्ष्म पोषक घटकाचा देखिल पुरवठा शालेय पोषण आहार कार्यक्रमांतर्गत करण्यात येतो. यासाठी प्रोटीन फूड पावडर (Other health intervention) , weekly Iron and Folic Acid Supplimentation यासारख्या अन्नघटकांचा पुरवठा वेळोवेळी करण्यात आलेला आहे. शाळेत शालेय पोषण आहार साठविण्यासाठी  व सुरक्षिततेसाठी सर्व ती काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी शाळेत धान्य साठविण्याच्या कोठी असाव्यात. आहार शिजविण्यासाठी, साठविण्यासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची भांडी असावी. विद्यार्थीसंख्येनुसार व त्यापेक्षा जास्त जेवणाची ताटे, पात्र , ग्लास असावेत. पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध असावे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  विद्यार्थी पटसंख्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 100 पेक्षा कमी असल्यास टाईप या प्रकारचे स्वयंपाकगृह असावे, याचे क्षेत्रफळ किमान 11.97 चौरस मीटर असावे.
v   विद्यार्थी पटसंख्या शंभर ते दोनशे असल्यास स्वयंपाकगृह टाईप B असावेयाचे किमान क्षेत्रफळ 18.54 चौरस मीटर असावे.
v   विद्यार्थी संख्या दोनशेपेक्षा जास्त असल्यास या प्रकारचे स्वयंपाकगृह असावे, याचे क्षेत्रफळ 27.8 चौरस मीटर इतके असावे.
v  स्वयंपाकगृह शाळेच्या मुख्य इमारतीपासून सुरक्षित अंतरावर असावे.
v  शहरी भागांमध्ये जागा उपलब्ध नसल्यास केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीचा अवलंब करावा.
v  शाळेत अग्नीशमन यंत्र व प्रथमोपचार पेटी आवश्यक संख्येनुसार उपलब्ध असावी.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
मध्यान्ह भोजन स्वयंपाकगृह आणि भांडी याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1)      शाले पोषण आहार योजनेसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर आहे काय ?
2)      शालेय पोषण आहार
अ)   शाळेतच बनविला जातो.
आ) बाहेरून पुरविला जातो ( एजन्सीमार्फत )
3)      आहार कीडे/ पाली द्वारे दूषित होऊ नये व खाण्यास सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी उचललेले पाऊल  लिहा -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतातया वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते.मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधानांचे अभ्यासपूर्वक वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावेवर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1. a) अन्न शिजविण्यासाठी योग्य पाक-आडोसा (किचनशेड) किंवा निर्देशित स्वयंपाकघर नाही. पाक आडोसा म्हणून एक तात्पुरती व्यवस्था आहे.स्वयंपाकाची भांडी पुरेशी नाही. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी विवक्षित जागा नाही.
b) जागा कमी असली तरी पाक आडोसा अथवा स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे.भांडी आकाराने व संख्येने पुरेशी आहेत. विद्यार्थ्यांसाठी बैठक जागा विवक्षित परंतू अपुरी आहे.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे.)
2. a) पाक आडोसा किंवा स्वयंपाकघरात भांडी साठविण्यासाठी व पाककृतीसाठी भरपुर जागा आहे. विद्यार्थ्यांना भोजनासाठी भरपुर जागा आहे.
b) स्वयंपाक करतांना व अन्न साठविण्यासाठी भांडी झाकून ठेवण्याचा प्रयत्न नाही. विद्यार्थ्यांसाठी जेवणाची जागा आरोग्यदायी नाही.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे.)
3. a) स्वयंपाकाची भांडी वापरास स्वच्छ आणि स्वयंपाक करतांना / अन्न साठवितांना झाकून ठेवलेली. विद्यार्थ्यांच्या जेवणाची जागा आरोग्यदायी आहे.
b) स्वयंपाकगृह व भांडी प्रत्येक वापरानंतर स्वच्छ केली जातात.स्वयंपाकास उत्तरदायी व्यक्ती वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करते.विद्यार्थी जेवणासाठी योग्य व्यवस्था केली जाते.निर्देशित शिक्षक नियमितपणे मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे पर्यवेक्षण करतात.   
वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )

वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करताततसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात.त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजतेगाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजतेवर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वतचे गुणवत्तेमधील स्थान समजतेत्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागतेया नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतोप्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागतेया कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतोअशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

संकलित

No comments:

Post a Comment