K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 13 December 2018

लेखन कसे करावे ?

लेखन कसे करावे ?                                        

*📝 लिहिण्याचा सराव म्हणजे अभ्यासातील परिपूर्ततेची धडपड, आपला अभ्यास, बुद्धिमत्ता आणि विचार लिहून व्यक्त करावे लागतात. म्हणून लेखन कसे करावे ? याचा अभ्यास आवश्यकच आहे.*

*लेखन कसे करावे ?*

* लेखनाची सुरुवात उत्साहानेच करा .*

* दिलेला वर्गपाठ, गृहपाठ  व्यवस्थित लिहून घ्यावा.*

*गृहपाठ व्यवस्थित व स्वत:च्या मनानेच करावा.*

*लेखन करताना काना, मात्रा, उकार, वेलांटी याकडे लक्ष देऊन करावे.*

* उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, अर्धधिराम याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे.*

*लेखनातील प्रत्येक मुद्दे स्वत:च्या शब्दातच उतरविण्याचा प्रयत्न करा.*

* नवनवीन शब्दांची भर घातली तर आपले लेखन प्रभावी ठरेल.*

 चांगले लेखन होण्यासाठी चांगल्या वाचनाची खुपच गरज असते.*

* प्रश्नांची  उत्तरे गाईडमधून न लिहिता आपल्या उत्तरात वेगळेपणा कसा येईल याकडे लक्ष द्या.*

* प्रश्नाचा अर्थ समजून घेऊन स्वत:च्या शब्दात लेखन करा आणि लेखन करताना कुठला मुद्दा कुठे लिहायचा या क्रमाला अतिशय महत्त्व आहे.*
*उदा. समजा एखाद्या आजाराबद्दल माहिती द्यावयाची झाल्यास तो आजार कशाने होतो ? तो आजार म्हणजे काय ? आणि होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी.अशाप्रकारे लेखनात सुसंगती असावी.*

* चांगले लेखन होण्यासाठी सतत लेखनाचा सराव हवा.*

* लेखनात नवीन शब्द, वाक्ये, श्लोक, ओव्या किंवा कविताच्या ओळी यांचा समावेश असावा.*

* आपल्या लेखनामुळे वाचकाच्या मनातील अंधार दूर व्हावा.*

* लेखणी ही एक शस्त्र आहे. म्हणजेच दुधारी तलवार आहे. त्यामुळे तुमच्या लेखनात सत्यता, निर्भयता, समयसुचकता, कठोरता या गोष्टी यायला हव्यात.*

* आपल्या लेखनामुळे वाचकाचे मनही दुखावले जाणार नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या मनावर चांगल्या प्रकारे व्हावा , याकडे लक्ष द्या.*

* लेखनामध्ये वेगवेगळ्या कल्पनाशक्ती वापरायला विसरू नका.*
* उदा .निसर्गवर्णन, प्रवासवर्णन, एखाद्या शहराचे वर्णन इत्यादी.*

* निसर्गातील वेगवेगळ्या गमती-जमती, जगातील वेगवेगळे अनुभव, वेगवेगळे दृश्य किंवा एखाद्या थरारक चित्रपटाची कथा किंवा शाळेतील वेगवेगळे समारंभ यासारख्या गोष्टीविषयी लेखनात रस निर्माण व्हायला हवा.*

*एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिविशेष सांगताना त्याचा पोशाख, स्वभाव, त्याच्या आयुष्यातले अनुभव, ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास कशामुळे योग्य आहे ? किंवा ती व्यक्ती आवडण्याचे तुमचे कारण काय ? त्या व्यक्तीमध्ये असे काय विशेष आहे की, ते तुम्हाला लिहावे वाटते ? या सर्व गोष्टी टिपता याव्यात.*

*वैचारिक पातळीवरील लिखान करण्यासाठी तुमचे वाचन सखोल असावयास हवे . त्याचबरोबर तुमच्या विचाराची पातळी पण उंचावलेली असावी.*
*उदा .राष्ट्रीय एकात्मका :- राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ? आपल्या देशात जास्त प्रमाणात हा प्रश्न कशामुळे निर्माण झाला ? त्यावर परिणाम करणारे घटक कोणते ? त्यात ( चांगले कोणते व वाईट कोणते ) काय केले म्हणजे आपल्या देशात खरोखरच राष्ट्रीय एकात्मता नांदेल ? राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणा-या कोणत्या कृती भारतात घडतात ? यात राजकीय लोकांचा सहभाग आहे का ? तो येथील लोकांना कितपत समजतो ? आणि तो समजावण्यासाठी प्रसार माध्यामाने किंवा साहित्यिकाने काय केले पाहिजे ? अशा प्रकारचे मुद्दे तुमच्या लेखनात यायला हवेत.*

*🖌 आपले लेखन चांगले होण्यासाठी आपल्याकडे भरपूर शब्दसंपत्ती, ज्ञानाचे भांडार, जिज्ञासू वृत्ती, प्रगल्भता आणि प्रतिमा या गोष्टींची शिदोरी असायला हवी.*

*🖍 आपले लेखन हे स्वत:च्या शब्दात, दुस-याला समजेल अशा सहजपूर्ण भाषेत असावे.*

 लिखानासाठी चांगला पेन व चांगला जाड कागद असलेली वहीच वापरा.

No comments:

Post a Comment