K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 December 2018

शाळासिध्दी लेखमाला - 11 . 

हात धूण्याची सुविधा (Handwash Station)


शाळासिध्दी लेखमाला -  11
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम -  शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – हात धूण्याची सुविधा  (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 11 )

हात धूण्याची सुविधा (Handwash Station)
अन्न वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेमानवी शरीराला कार्य करण्यासाठीविकासासाठी व शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी अन्नाची गरज असतेअन्नामुळे शरीराला आवश्यक उर्जा मिळतेअन्न हे पोटात गेल्यानंतर त्यावर विविध प्रक्रीया होतेअन्नपचनाची क्रीया झाल्यानंतर अन्नाचा काही भाग शरीराला वापरण्यायोग्य राहत नाहीत्याला शरीर बाहेर काढते.  घन(मल),  द्रव (मूत्र व घामव वायू या स्वरुपात अन्नाचा नको असलेला भाग शरीराच्या बाहेर टाकला जातोमल व मूत्रविसर्जनासाठी शौचालयाचा वापर केला जातोअशावेळी विसर्जनासाठी ज्या शरीराच्या भागाचा उपयोग केला जातो त्या भागाची स्वच्छता करणे महत्वाचे असते.  शरीरातून बाहेर टाकल्या जाणा-या टाकाऊ घन व द्रव पदार्थात असंख्य जीवाणूविषाणू , रोगजंतू व अपायकारक द्रव्य असतातशौचास झाल्यानंतर संबंधित भागाची स्वच्छता करण्यासाठी  हाताचा उपयोग होतो. अशावेळी मानवी विष्टेमध्ये असलेलीअसंख्य रोगजंतू, जीवाणू, विषाणू, जंताची अंडी आपल्या हाताला चिकटतात. केवळ पाण्याने हात धूतल्याने हाताला चिकटलेले रोगजंतू दूर होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शौचालयास जाऊन आल्यानंतर हात साबण किंवा हात धूण्याच्या द्रावणाने स्वच्छ धूणे आश्यक असतेहात  स्वच्छ धूतला गेला नाही तर आपल्या हातावर असलेले रोगजंतू पोटात जाण्याची शक्यता असते.याबरोबरच आपल्या शरीरातील घाम हा त्वचेमार्फत बाहेर टाकला जातो. आपले संपूर्ण शरीर हे त्वचेने आच्छादलेले आहेत्यामुळे संपूर्ण शरीरातून त्वचेच्या माध्यमातून  घाम बाहेर पडत असतोतळहाताला देखिल घाम येत असतो.घामामधून देखिल शरीराला नको असलेले द्रव्ये बाहेर पडत असतात.याद्रव्यामध्ये शरीराला नको असलेले घटक असण्याची शक्यता असतेया बरोबरच घाम आल्याने शरीराला दुर्गंध येतो. जास्त वेळ घाम शरीरावर राहील्यास या घामात जीवाणू किंवा सुक्ष्मजीव जंतू निर्माण होण्याची शक्यता असते.तळहाताला सुटलेल्या घामातून निर्माण झालेले किंवा प्रदूषित वस्तूला हात लावण्याने हातावर आलेले हे जंतू जेवण घेतांना आपल्या पोटात जाण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी जेवणापूर्वी योग्य पध्दतीने हात धूणे आवश्यक आहे.
आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची कृती किंवा प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक स्वच्छता होय. सार्वजनिक आरोग्य म्हणजे समाजाच्या एकूण लोकसंख्येच्या आरोग्याची अवस्था होय. लोकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे व ते सुधारणे यासाठी समाजाने संघटीत केलेल्या प्रयत्नांना सार्वजनिक आरोग्य म्हणतात. यामध्ये विविध विज्ञान शाखा,कौशल्य व लोकसमजुती यांचा समावेश होतो. सामुहिक कृतीद्वारे आरोग्य टिकविण्याच्या व सुधारण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा उपयोग करतात. सार्वजनिक आरोग्यविषयक कार्यक्रम व सेवा आणि त्यात कार्यरत असलेल्या संस्था यामध्ये रोगांचा प्रतिबंध करणे, समग्र लोकसंख्येच्या आरोग्यविषयक गरजा भागविणे यावर भर देतात. रोगांचे प्रमाण, अकाली मृत्यू, शारीरिक दौर्बल्य, अस्वास्थ्य, कुपोषण इत्यादी  सार्वजनिक आरोग्याचे विषय असतात. सार्वजनिक स्वच्छता जितकी महत्वाची तितकीच व्यक्तिगत स्वच्छता महत्वाची आहे. शाळा महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देणे काळाची गरज आहे.
सार्वजनिक स्वच्छता
सार्वजनिक स्वच्छता हे सार्वजनिक आरोग्याचे एक महत्वाचे अंग आहे. अस्वच्छतेमुळे होणारे रोग व आजार यावर नियंत्रण करण्यासाठी पर्यावरणाचे नियमन करणाऱ्या यंत्रणा विविध प्रयत्न करतात असे प्रयत्न सार्वजनिक स्वच्छतेचाच भाग असतात. याबरोबरच व्यक्तिगत स्वच्छता महत्वाची असते.
व्यक्तिगत स्वच्छता
आपण खात असलेले अन्न, आपण ठेवत असलेली शरीराची स्वच्छता, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित व संतुलित  आहार हे सर्व शरीराचे आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात. खेड्यामध्ये अनेक रोग हे शारीरिक स्वच्छता न पाळल्यामुळे निर्माण होतात.परजीवी जंतू, कृमी, खरुज, फोड, दात किडणे, अतिसार आणि हगवण हे विकार व्यक्तिगत स्वच्छता न पाळल्याने होतात. स्वच्छतेचे पालन करून हे सर्व रोग टाळता येवू शकतात.
डोक्याची स्वच्छता – आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा शाम्पू किंवा अन्य साबण,शिकेकाई वापरून डोक्यावरून अंघोळ करणे.
डोळे, कान आणि नाक स्वच्छ करणे- दररोज पाण्याने आपले डोळे धुवावेत.कानामध्ये मळ साचल्याने हवेचा मार्ग अडतो. काहीवेळा त्यामुळे वेदना होतात.आठवड्यातून एकदा कापसाच्या स्वच्छ बोळ्याने कान साफ करावेत.नाकातील स्त्राव वाळून काही वेळा नाक बंद होते. त्यामुळे आवश्यक तेंव्हा नाक स्वच्छ करावे. स्वच्छतेसाठी नेहमीच स्वच्छ रुमालाचा वापर करावा.
त्वचेची निगा - त्वचा ही संपूर्ण शरीराला आवरण देतेशरीरातील अवयवांचे रक्षण करते आणि शरीराचे तापमान राखण्यात मदत करते. त्वचा ही घामाव्दारे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यात मदत करते. एखाद्यावेळी खराब त्वचेत,घामाच्या ग्रंथी बंद होतात आणि परिणामी फोडचट्टे आणि मुरुमे तयार होतात.आपली त्वचा स्वच्छ राखण्यासाठी दररोज साबण आणि स्वच्छ पाणी वापरुन अंघोळ करावी.
तोंडाची स्वच्छता - दात घासण्यासाठी दातांची मऊ पावडर आणि पेस्ट चांगली असते.  दिवसातून दोनवेळा दात ब्रशने घासावे. कोळशाची पावडरमीठ,खरखरीत दाताची पावडरइत्यादी वापरल्याने दातांच्या बाह्य आवरणावर चरे पडण्याची शक्यता असते.दात स्वच्छ करण्यासाठी मऊ पावडर वापरावी. कोणताही खाद्य पदार्थ खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने चुळा भरुन तोंड स्वच्छ करावे. त्यामुळं अन्नकण दातांच्या फटीमधे अडकून बसत नाहीतअन्यथा तोंडाला दुर्गंधी येतेहिरड्या खराब होतात आणि दात किडायला लागतात.पोषणयुक्त आहार घ्यावा, मिठाईचॉकोलेट्सआईसक्रीम आणि केक कमी प्रमाणात खावे. दात किडण्याची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ दंतवैद्यांचा सल्ला घ्यावा. दात काढण्यामुळे डोळ्यांचे  कुठल्याही प्रकारे नुकसान होत नाही.
हातांची स्वच्छता - आपण आपल्या हातांनी अन्न खाणेशौचानंतर धुणेनाक स्वच्छ करणेशेण गोळा करणे यांसारखी सर्व कामे करतो. विविध प्रकारची कामे करत असतानाअनेक प्रकारची रोगकारक जंतू नखांच्या फटीत आणि त्वचेवर राहतात. प्रत्येक काम केल्यानंतर आणि विशेषतः स्वयंपाक करण्यापूर्वी आणि जेवण घेण्यापूर्वी साबणाने हात धुतल्याने अनेक रोग टाळण्यात मदत होते. मुले चिखलामधे खेळतात. जेवण्यापूर्वी त्यांना हात धुण्याची सवय लावावी. आपली नखे नियमितपणे कापावीत.
शौच आणि मूत्र विसर्जनानंतर करावयाची स्वच्छता- शौच आणि मूत्र विसर्जनानंतरसंबंधित अवयव स्वच्छ पाण्याने धुवावेत आणि ते नेहमी स्वच्छ ठेवावेत. प्रत्येक वेळी व आपले हात साबणाने स्वच्छ धुण्यास विसरू नये. स्वच्छतागृह , आंघोळीची जागा व आसपासचा परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवण्यात यावा. उघड्यावर शौचास बसू नये. पुनरुत्पादक अवयवांची स्वच्छता नियमितपणे ठेवावी. शौचानंतर आणि लघवीनंतर संबंधित अवयव स्वच्छ पाण्याने धुवावेत.
अन्न शिजविताना घ्यावयाची काळजी - अन्न शिजविताना घेतलेली थोडीशी काळजी कुटूंबाला अन्नातून  होणाऱ्या विषबाधेपासूनआजारांपासून दूर ठेऊ शकते.अन्न ज्या ठिकाणी शिजविले जाते तो भाग व अन्न तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असावीत.शीळे किंवा दुषित अन्न खाणे टाळावे.जेवायला बसण्यापूर्वी व जेवण वाढायला घेण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. अन्न योग्य पद्धतीने साठवून ठेवावे.तयार खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांच्या वेष्टणावरील वापरण्याची मुदत तपासावी व मुदत संपली नसेल तरच तो पदार्थ खरेदी करावा.स्वयंपाकघरातील कचरा यांची योग्य विल्हेवाट लावावी. सुका कचरा व ओला कचरा यांच्यासाठी  वेगवेगळी कचराकुंडी वापरावी.
औषधोपचार करताना घ्यावयाची काळजी - जखमांवर नियमीत योग्य मलमपट्टी करावी.औषधे खरेदी करताना त्यांची मुदत तपासावीमुदतबाह्य औषधे खरेदी करू नयेत. मुदत संपलेल्या औषधांची व नको असलेल्या औषधांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.
हात धुणे या एका साध्या वाटणा-या गोष्टीचा विचार केला तरी त्यामध्ये अनेक गोष्टी लपलेल्या आहेतआपल्या देशामध्ये संसर्गजन्य रोगाचे प्रमाण खूप जास्त आहेडायरीयासारख्या आजारामुळे दवाखान्यात भरती होणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण मोठ्या संख्येने आहेभारतात दररोज हजारो बालके डायरीयामुळे मृत्यू पावतात तथापि संशोधन व विविध अभ्यासानंतर असे निदर्शनास आले आहे की साबणाने व योग्य पद्धतीने हात धुतल्याने डायरीयासारख्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन विद्यार्थ्यांची शाळेतील अनुपस्थिती कमी होईल.
 युनिसेफ तर्फे योग्य पद्धतीने म्हणजे सात पायऱ्या वापरून कसे धुवावेत यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येतेया हात धुण्याच्या पद्धतीचे व्हिडिओदेखील youtube वर उपलब्ध आहेत. जेवणाअगोदर साबणाने योग्य पद्धतीने हात स्वच्छ धुवावेत मात्र साबण नसेल तेथे नुसत्या पाण्याने हात धुवून काहीही उपयोग होत नाही. हात स्वच्छ पाण्याने धुतलेले असले तरी ते धुतलेले आहे असे मानू नये. साबणाने हात धुतले तरच हात धुतले असे मानावे. साबण किंवा हात धुण्यासाठी आवश्यक द्रावण उपलब्ध नसेल अशा परिस्थितीत चमच्याने जेवण करावेहात स्वच्छ धुतल्यानंतर तो पुसण्यासाठी सार्वजनिक टॉवेलचा वापर करण्यात येऊ नये. स्वतःचा रुमाल नॅपकिन असल्यास तो स्वच्छ असला पाहिजे. स्वच्छ रुमाल उपलब्ध नसेल तर एक-दोन मिनिटे हवेतच हातांची हालचाल करून हात आपोआप कोरडे झाल्यानंतर अन्नाला हात लावावा. हात शर्टला पुसणे तसेच खिशात घालून कोरडा करणे हे धोक्याचे आहे कारण त्या मार्फत सुद्धा रोग जंतूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. शौचालयाला जाऊन आल्यानंतर आपले हात साबण लावून योग्य पद्धतीने स्वच्छ धुवावेत. घरामध्ये अथवा घराबाहेर आपण अनेक वस्तू हाताळत असतो. पुस्तक व मोबाईल फोन, कॉम्प्युटरचे कीबोर्ड यामुळे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. परंतु त्यापेक्षा अधिक आपला हात उत्सर्जन म्हणून काम करत असल्यामुळे हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता असते. आजकाल फॅशन म्हणून हाताची नखे वाढविण्याची प्रथा आहे. पण हाताच्या बोटांची नखे काढली नाहीत तर नखांमध्ये मळ साचून वेगवेगळ्या प्रकारचे जंतू नखात राहतात. नखे वाढविणे धोक्याचे असते त्यामुळे स्वच्छ हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. हात धुण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये लागावी याकरिता हात धुण्याच्या सुविधा प्रत्येक शाळेमध्ये असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमांमध्ये देखील स्वच्छता शिक्षण आहे. यापूर्वीसुद्धा अनेक स्वच्छता विषयक मोहिमा राबविल्या गेलेल्या आहेत परंतु म्हणावे तसे यश प्राप्त झालेले नाही. शिक्षणाचा एक महत्त्वाचा उद्देश वर्तन-परिवर्तन आहे. आपण अभ्यासक्रमात शाळेत विद्यार्थ्यांसोबत जे काही करतो त्याने वर्तन परिवर्तन होणे आवश्यक असते. स्वच्छतेची आवश्यकता शाळेमध्ये पटल्यानंतर हात धुण्याची सवय शाळेमध्ये लागल्यानंतर हेच विद्यार्थी घरी देखील जेवणापूर्वी हात धुवून मगच जेवण करते. प्रत्येक मुलाला योग्य पद्धतीने हात धुवून भोजन करून वेळेत वर्गात जाता येईल एवढ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध असावी. या सुविधेमुळे शाळेच्या परिसरात चिखल निर्माण होण्याची शक्यता असते. हात धुण्याच्या सुविधेपासून पाण्याची योग्य विल्हेवाट लावलेली असावी. प्रत्येक वेळेस स्वच्छतागृहात जाऊन आल्यानंतर योग्य पद्धतीने हात धुण्याची सवय लावावी. मुलांना मध्यान्ह भोजनासाठी सुट्टीची वेळ ठरलेली असते ती वेळ 40 मिनिटे आहे असे समजल्यास एका मुलास योग्य पद्धतीने सात पायऱ्या वापरून हात धुवायला 40 ते 60 second वेळ लागतो. शाळेत हात धुण्यासाठी एकच नळ असेल आणि विद्यार्थी संख्या जास्त असेल तर हात धुण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत एकतर भोजनाच्या सुट्टीची वेळ वाढवावी लागेल अन्यथा योग्य पद्धतीने हात धुतले जाणार नाहीत. तेव्हा एक तर प्रत्येक मुलाला योग्य पद्धतीने हात धुण्यास लागणारा वेळ कमी करता येईल किंवा नळाच्या तोट्यांची संख्या वाढवता येईल. दिलेल्या निकषानुसार 12 ते 15  मुलांसाठी एक नळाची तोटी पुरेशी आहे. कमी वेळेत योग्य पध्दतीने हात धुण्याचे प्रशिक्षण दिल्यास मध्यान्ह भोजनासाठी असलेल्या वेळेत विद्यार्थी स्वच्छ हात धुऊन मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतील.वरील सर्व बाबींचाविचार करुन शाळेत हात धुण्याची आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त ठरते.
भारत सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्र शासनाने स्वच्छ विद्यालय मोहीम सुरु केलेली आहे. या मोहिमेमध्ये हात धुण्याची सुविधा प्रत्येक शाळेत निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. शाळेतील प्रत्येक मुलास हात धुण्याच्या पाय-या ( 7 steps) शिकवून प्रत्येकवेळी हात धुण्याची सवय लावण्याबाबत सांगितलेले आहे. जेवणाआधी व शौचालयास जाऊन आल्यावर प्रत्येक वेळी विद्यार्थ्याने साबणाने हात धुण्यासाठी शाळेने विद्यार्थ्याना सवय लावावी.
शाळेत हात धुण्याची सुविधा निर्माण करत असतांना खालीलप्रकारची काळजी घ्यावी.
१)      विद्यार्थी उंचीचा विचार करून हात धुण्याची सुविधा निर्माण करावी. बेसीनची उंची 2.5 किंवा 3 फुट एवढीच असावी.
२)     हात धुतल्यानंतर पाणी साचून राहणार नाही अशा पध्दतीने बेसीन बसवावे.
३)      हात धुतल्यानंतर वाहून जाणारे सांडपाणी शोषखड्डा खणून त्यात जिरवावे.
४)    शक्य असल्यास सांडपाणी वापरून परसबाग तयार करावी.
५)     हात धुण्याची सुविधा जेथे आहे तेथेच साबण किंवा हस्त प्रक्षालन द्रव्य ठेवावे.
६)     दोन नळामध्ये किमान 1.5 फुट एवढे अंतर असावे.
७)     एका विद्यार्थ्याला हात धुण्यासाठी कमीत कमी 30 सेकंद किंवा जास्तीत जास्त 1 मिनिट वेळ लागेल हा विचार करून व शाळेची पटसंख्या विचारात घेऊन हात धुण्यासाठी वेळ देण्यात यावा.
काही शाळामधून हात धुण्याची सुविधा नसल्याचे दिसून आलेले आहे. अशावेळी या शाळामधून झिरो बजेट हात धुण्याची सुविधा निर्माण करता येते. रिकामे झालेल्या तेल किंवा पाण्याचे ड्रम/पिंप वापरून अशाप्रकारची हात धुण्याची सुविधा शाळा निर्माण करू शकते. सध्या यु-ट्यूबवर नाविन्यपूर्ण हात धुण्याच्या सुविधा शाळेने निर्माण केल्याच्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत.या चित्रफिती पाहून किंवा टाकाऊ वस्तूपासून शाळेत हात धुण्याची सुविधा निर्माण करता येते. मार्च 2019 अखेर राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळामधून हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावयाची आहे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचना व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v  प्रत्येक शाळेत हात धूण्याची जागा/ हस्त प्रक्षलन केंद्र असणे आवश्यक आहे.
v  विद्यार्थी संख्या विचारात घेऊन हस्त प्रक्षलन केंद्र / तोट्या असावेत.
v  हस्त प्रक्षालन द्रव्य किंवा साबण उपलब्ध असावा.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
हात धूण्याची सुविधा याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1.      शाळेत हात धूण्याची सुविधा आहे काय ?
2.      विद्यार्थी व नळाच्या तोट्या यांचे प्रमाण : ------------------ ( 12:1 याप्रमाणे लिहा )
असल्यास,         
अ) हात धूण्यासाठी -----------------
ब) पिण्याच्या पाण्यासाठी -----------
     3. हात धूण्यासाठी उपलब्ध सुविधेचा प्रकार 
           अ ) तोट्या                                 ब) बादल्या व मग
क)    सुविधा नाही                          ड) इतर (कृपया उल्लेख करावा)
1.      पाणी उंचावरील टाकीमध्ये (डोक्याचे वर) साठवले आहे काय ?
होय / नाही.
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतातया वर्णन विधानानुसार शाळा स्वयंमूल्यमापन व बाह्यमूल्यमापन होत असते.मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावेवर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1.      a) पाण्याचा अपुरा पुरवठा व अपुरी तोट्यांची संख्या. साबणाची तरतूद नाही.
b) पाण्याचा पुरेसा पुरवठा मात्र अपुरी तोट्यांची संख्या. साबणाचा अपुरा पुरवठा केला जातो.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे.)
2.      a) पाण्याचा नियमित व पुरेसा पुरवठापुरेशा तोट्यांची उपलब्धता,साबणाचा पुरेसा व नियमित पुरवठा केला जातो.
b) हस्त प्रक्षालन केंद्र, पाण्याची टाकी क्वचित स्वच्छ केली जाते व देखभाल केली जाते.हस्त प्रक्षालन केंद्राचे महत्व शिक्षक क्वचित विद्यार्थ्यांना सांगतात. विद्यार्थी क्वचितच हात धूतात किंवा साबणाशिवाय हात धूतात.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे.)
3.      a) हस्त प्रक्षालन केंद्र, पाण्याची टाकी नियमित स्वच्छ केली जाते व देखभाल केली जाते. हस्त प्रक्षालनचे महत्व शिक्षक परिपाठात विद्यार्थ्यांना सांगतात. प्रसंगी हस्त प्रक्षालनाचे पर्यवेक्षण केले जाते.
b) हस्त प्रक्षालन केंद्र दररोज स्वच्छ केले जाते व देखभाल केली जाते. चित्र, नारे, नाटीका इत्यादीमार्फत शाळा हस्त प्रक्षालन व आरोग्य मोहीमेचे आयोजन करतात. हस्त प्रक्षालनाच्या महत्वावर भर देण्यासाठी व सवय लावण्यासाठी विविध मंचावर नियमित सत्र घेतले जातात. शाळा प्रमुख विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आरोग्याचे नियमित पर्यवेक्षण करतात.
वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करताततसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितातत्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजतेगाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते.वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वतचे गुणवत्तेमधील स्थान समजते.त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागतेया नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतोप्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागतेया कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतोअशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.

संकलित

No comments:

Post a Comment