K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 December 2018

पेपर लिहावा नेटका


                 आपण वर्षभर काय अभ्यास केलाय हे दाखवण्यासाठी परीक्षा नसतात. यामुळे उत्तरं चांगली लिहिण्याबरोबरच ती नेटकी मांडणंही आवश्यक आहे. पेपर नीटनेटका दिसला तर तो नक्कीच वाखाणला जातो. म्हणूनच अभ्यासपूर्ण आणि तितकीच सुंदर उत्तरपत्रिका लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.

योगेश बोराटे

आपण वर्षभर काय अभ्यास केलाय हे दाखवण्यासाठी परीक्षा नसतात. यामुळे उत्तरं चांगली लिहिण्याबरोबरच ती नेटकी मांडणंही आवश्यक आहे. पेपर नीटनेटका दिसला तर तो नक्कीच वाखाणला जातो. म्हणूनच अभ्यासपूर्ण आणि तितकीच सुंदर उत्तरपत्रिका लिहिण्याचा प्रयत्न करायला हवा.
पेपरात अमूकच लिहा.. तमूक टाळा असे सल्ले कानावर पडले की परीक्षा जवळ आल्याच म्हणून समजाव्यात. या छोट्या मुलांना असे सल्ले देण्यात कॉलेजातले दादा-ताईही मागे नसतात. पण, त्यांच्या परीक्षेची वेळ आली की त्यांची दांडी गुल झालेली असते. रट्टा मारून चालणार नाही, अजिबातच गुंडाळता येणार नाही, मग आम्ही पेपर लिहायचे तरी कसे? असे प्रश्न ही मोठी मुलंही विचारू लागतात.
अभ्यासक्रमांच्या 'सबजेक्टिव्हिटी'मध्ये पडलेला फरक आणि त्या दृष्टीने परीक्षेच्या कराव्या लागणाऱ्या तयारीच्या स्वरुपामध्ये झालेला बदल हा अशा परिस्थितीला कारणीभूत असतो. त्याच दृष्टीने बदलत असते, ते अशा पातळीवर उत्तरं लिहिण्याचं स्वरूप!

अभ्यास विस्तृत हवा

दहावी किंवा बारावीचा अभ्यासक्रम आणि पदवी-पदव्युत्तर पातळीवरचा अभ्यासक्रम यांची थोडी तुलना करून बघा. त्यातून आपल्या हे सहज लक्षात येते, की विषय आणि त्या विषयातील संबंधित घटक जरी सारखेच असले, तरी दहावी-बारावीपेक्षा पदवी पातळीवर ते आपण अधिक विस्तृतपणे अभ्यासत असतो. म्हणजे उत्तरं लिहितानाही आपल्याकडून तितक्याच उच्चप्रतीच्या सादरीकरणाची अपेक्षा असणारच. त्यामुळं कदाचित बारावीनंतर र्फस्ट इयरची परीक्षा देणाऱ्यांना पेपर लिहिताना थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतात. तीच बाब त्यांना पुढचे दोन-चार वर्ष लक्षात ठेवावी लागते. साहजिकचं परीक्षेदरम्यान अभ्यासाचा विस्तृतपणा मोजक्या वेळेत आणि मोजक्या जागेत मांडावा लागतो. या ठिकाणी उपयुक्त ठरतात ती आपली लेखन कौशल्ये.

अभ्यास परीक्षेसाठी नको तर स्वत:साठी...

दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये ऑबजेक्टिव्हिटी जास्त असते. मात्र, पदवी पातळीवर विषयाच्या सबजेक्टिव्हिटीला जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनीही विषय तशाच प्रकारे समजून घेणं अपेक्षित असते. त्यासाठीच विषयांचा सविस्तर अभ्यास महत्त्वाचा असतो. उत्तरे लिहिण्याची भाषा, त्यांचे ताकिर्कदृष्ट्या योग्य असणारे लेखन, आवश्यक मुद्द्यांची क्रमाक्रमाने होणारी मांडणी आणि मोजक्या, पण आवश्यक शब्दांमध्ये होणारे उत्तराचं सादरीकरण विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं असतं. उगाच भारंभार आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर लिहिल्यानेच गुण मिळतात असंही नसतं. भरलेल्या ओळींची संख्या आणि उत्तरासाठीचे गुण यांचा काहीही संबंध नसतो. ही समज विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला हवी. उत्तरं वाचताना त्यांची समज आणि जाणीव, मॅच्युरिटी जाणवल्यास तपासनिकावर त्याचा परिणाम नक्कीच होतो.'

अभ्यासासोबतच त्याचे सादरीकरणही महत्त्वाचंच!

परीक्षेचा कालावधी हा आपल्या वाषिर्क ज्ञानाचा 'शो-केसिंग पिरिअड'च असतो. त्यामुळं आपली उत्तरपत्रिका जितकी चांगली लिहिलेली, तशी आपली ग्रेड, हे एक साधं समीकरण आहे. नीटनेटकेपणा, लिहिताना व्यवस्थित समास सोडून आणि परिच्छेद पाडून केलेलं लिखाण, चांगलं किंवा निदान समजेल असं हस्ताक्षर, दोन शब्दांमधील सुयोग्य अंतर, सारख्या आकाराची अक्षरं ही एखाद्या आदर्श उत्तरपत्रिकेची लक्षणं म्हणून आपण सांगू शकतो. चांगल्या आकृत्या, त्यांचं लेबलिंग, समजतील अशा प्रकारे लिहिलेली सूत्रं, योग्य युनिट्स यामुळे अशा आदर्श उत्तरपत्रिकेला चांगल्या गुणांचं पारितोषिक मिळत असतं.' प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या क्रमानेच लिहिलेली उत्तरंही वेळप्रसंगी चांगल्या सादरीकरणामध्ये उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मानसिकता बदलायला हवी

मार्क्स हवेत, म्हणून अभ्यास करायचा हा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन पदवी पातळीवर त्रासदायक ठरू शकतो. पदवी पातळीवरील विद्यार्थ्यांकडून निदान प्रश्न नेमकेपणाने समजून त्या दृष्टीने उत्तर लिहिण्याची अपेक्षा ठेवली जाते. त्याच वेळी अभ्यासाविषयीचा आत्मविश्वास आपल्या लिखाणातून जाणवायला हवा. उत्तराच्या लिखाणातून विद्यार्थ्यांची वैचारिक उंचीही जाणवते. परीक्षेविषयीची कामचलाऊ मानसिकता नको. काही विद्याथीर् काम करत करत शिकतात. असे असले तरी परीक्षेला प्राथमिक महत्त्व द्यायलाच हवं. त्या वेळी इतर सर्व बाबी दुय्यमच ठेवाव्यात. तसंच, स्मार्ट स्टडी, टू द पॉइंट उत्तरं, उत्तरांचा लॉजिकल फ्लो, परीक्षेविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन, मार्क्सपेक्षाही अभ्यासामुळे स्वत:चा होणारा विकास या बाबीही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्याव्यात.

स्रोत - महाराष्ट्र टाईम्स

No comments:

Post a Comment