शाळेचे सामर्थ्य स्त्रोत –
संगणक (शाळासिध्दी लेखमाला - 7)
शाळासिध्दी लेखमाला - 7
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – संगणक (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 7)
संगणक
बुध्दी ही मनुष्य प्राण्याला मिळालेले वरदान आहे. बुध्दीच्या जीवावर माणसाने अनेक क्षेत्रात क्रांती घडऊन आणलेली आहे. स्मृती, तर्कशुद्धविचारशक्ती आणि कल्पनाशक्ती ही माणसाच्या बुद्धीची तीन अंगे आहेत. स्मृतीहे माणसाच्या बुद्धीचे अंग बरेच मर्यादित आहे. माणूस एकदा अनुभवलेली गोष्ट आयुष्यात सहजासहजी विसरत नाही. मानसाच्या जीवनात घडलेल्या काही घटना व गोष्टी त्याच्या स्मृतीमध्ये किंवा सुप्त मनात साठविलेल्या असतात. तर काही घटना व शिकलेल्या अनुभवलेल्या काही गोष्टी माणसाच्या जाणत्या मनाला ठराविक कालावधीनंतर आठवत नाहीत. मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यकाळात किती घटना व अनुभव स्मरणात ठेऊ शकेल याच्या मर्यादा आहेत.
“अशाप्रकारची वस्तुस्थिती असली तर अशाप्रकारची गोष्ट घडते” हातर्कशुद्ध विचारशक्तीचा गाभा आहे. ही तर्कशुद्ध विचारसरणी साधीसरळ असून सर्वच माणसे ती नेहमी वापरत असतात. परिस्थिती व अनुभवानुसार व्यक्ती व्यक्तींमध्ये तर्कशुध्द विचार करण्याची शक्ती कमी अधिक असते. काही माणसे फक्त माफक प्रमाणात तर्कशुद्ध विचार करू शकतात तर काही खोलवर विचार करू शकणारी असतात. माणसे पुष्कळदा फक्त काही प्रांतांमधेच खोल विचार करू शकतात. जी माणसे खोल तर्कशुद्ध विचार करू शकतात त्यांच्याहीतर्कशुद्ध विचारसरणीला स्मृतीच्या मर्यादा येतात. एक उदाहरण म्हणजे गणितातील आकडेमोड करणे. आकडेमोड करण्यामागे तर्कशुद्धता असते. तसेच आकडेमोड करण्यासाठी स्मृतीचीही गरज असते. पाढे पाठांतर हे स्मृतीवर अवलंबून असते. स्मृतीच्या मर्यादेमुळे आपण मनातल्या मनात मोजक्या आकडेमोडी करू शकतो. छोटी आकडेमोड असेल तर आपण तात्काळ उत्तर देतो. पण जास्त संख्या व क्रीया असलेली आकडेमोड करायला बराच वेळलागतो. आपण केवळ पाठांतर व स्मरण यांच्या जीवावर त्याचे उत्तर देऊ शकत नाही. कारण आपल्या स्मृतीच्या मर्यादा होय. "अशाप्रकारची वस्तुस्थिती असली तर अशाप्रकारची गोष्ट घडते” या विचारसरणीचे गणितामध्ये व आकडेमोडींमध्ये रूपांतर करता येते ही कल्पना माणसाच्या लक्षात आली. या विचारातूनच संगणक विज्ञान ही कल्पना पुढे आली. आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा अफाट विस्तार करायला मदत करणा-या संगणक या महत्वपूर्ण साधनाचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने लावला. संगणकाला अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे सुरु आहे. गेल्या पन्नास वर्षांच्या विचार केला तर लक्षात येते की संगणकाच्या शोधाने माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे. भविष्याचा विचार केल्यास संगणकाच्या साह्याने आणखी किती प्रगती होईल हे आज सांगता येऊ शकणार नाही पण संगणक ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील अत्यावश्यक बाब असेल हे ही तितकेच खरे आहे.माणसाच्या निसर्गदत्त बुद्धीचा अफाट विस्तार करायला संगणक प्रचंड मदत करू शकतात यामागे संगणकाची स्मृती हे वैशिष्ट्य आहे. माणसाच्या स्मृतीच्या कोणत्याच मर्यादा संगणकाला लागू नाहीत. किती गोष्टी संगणक लक्षात ठेवू शकतील ह्याची मर्यादाही शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत.
संगणकाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे गुंतागुंतीच्या तर्कशुद्ध विचारसरणी आकडेमोडींच्या रूपात करण्याकरता ज्या लाखो आकडेमोडींची गरज असते त्या रटाळपणाच्या, कंटाळवाण्या न मानता काही सेकंदांमधे त्यांचा फडशा पाडणे हा संगणकांच्या हातचा मळ झाला आहे. कमीकमी वेळात आकडेमोडी करण्याचे संगणकांचे कसब शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ दिवसेंदिवस वाढवत आहेत. संगणकांना गरज असते ती फक्त माणसाकडून गुंतागुंतीच्या तर्कशुद्धविचारसरणीबद्दल अचूक आणि निःसंदिग्ध सूचना मिळण्याची. त्या सूचना संगणकांना विशद करायला जे बरेच कौशल्य लागते ते कौशल्य म्हणजे संगणक संचालन विज्ञान. संगणक संचालन विज्ञान देखिल वेगाने प्रगती करत आहे.संगणकाचा वापर हल्ली सर्वच क्षेत्रामध्ये होत आहे. संगणक वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येतात. संगणकांना पुरवलेली माहिती आकडे, चित्रे,आवाज(Sound) अशी बहुरूपी असू शकते, पण संगणक संचालकांनी रचलेल्या तर्कशुद्ध प्रोग्रॅमनुसार (सूचनांच्या यादीनुसार) व पुरवलेल्या माहितीनुसार संगणक कार्य करते.
संगणकाचा विकास - प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृतीत अबँकस (ABACUS) या यंत्राचा उपयोग केला जात होता .१८७१ साली चार्ल्स बँबेज यांच्या गणन यंत्रात अमुलाग्र बदल करण्यात आले. या यंत्राला सुचनांचा संच पुरविता येत असे. स्मरण शक्ति व उत्तरांची छपाई करण्याची सोय ही या यंत्राची वैशिष्टे होती. या यंत्राचे नाव अनोलिटिल इंजिन असे होते. १८८० साली डॉ. हर्मन होलेरिथ या अमेरिकन शास्त्रद्याने पंचकार्ड प्रणालीचा शोध लावला .या प्रणालीमध्ये वेगात काम पार पड़ता येवू लागले. त्यानीच पुढे आई बी एम कंपनी (इंटरनेशनल बिज़नेस मशीन) सुरु केली. १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनीने जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला .त्याचे नाव इलेक्ट्रानिक्स नुम्रिकल ईंटेग्रेटर एंड कैलकुलेटर असे होते.
प्रथम पिढी (First Generation) 1942 ते 1955 यामध्ये व्हॅक्युम ट्यूब म्हणजेच काचेच्या नळ्या वापरलेल्या होत्या. या नळ्यांद्वारे संदेश नियंत्रित केले जात असत.त्या काळातील हे सर्वात गतिमान यंत्र होते व यात आकडेमोड करण्यासाठी एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागत असे. EDVAC-45 मध्ये डेटा व प्रोग्राम साठवून ठेवता येत असे तसेच यात प्रोसेसिंग यूनिट होते. जॉन व्हॉन न्युमन यांनी हा संगणक विकसित केला. मात्र या संगणकाचे बरेचसे तोटे होते.
दुसरी पिढी (Second Generation) 1955 ते 1964 च्या सुमारास विलियम शॉकले यांनी ट्रान्झिस्टरचा शोध लावला व त्यानंतरच्या दहा वर्षात त्यांचा उपयोग संगणकामध्ये केला जाऊ लागला. या पिढीतील संगणक खूप माहिती साठवून ठेवू शकत असे तसेच यात प्रिंटर, टेप, मेमरी, स्टोरेज या सर्वांचा समावेश होता. सुरूवातीला फक्त अणुशक्ती केंद्रात (Automic Research) मध्ये वापरले जाणारे हे संगणक हळूहळू मोठमोठ्या कंपन्या, व्यवसाय, विद्यापीठ व सरकारी कामकाजात वापरले जाऊ लागले.
तिसरी पिढी (Third Generation) 1964 ते 1975 - इलेक्ट्रॉनिकच्या क्षेत्रात इंटिग्रेटेड सर्किटचा (ICs) चा शोध लागला. सिलिकॉनपासून बनलेल्या छोट्या चिप्स संगणकात वापरल्या जाऊ लागल्या. यामध्ये अनेक सर्किटस् एका छोट्या चिपवर बसवल्या जातात. या संगणकात सूचनांचा एक मोठा संच साठवलेला होता व या वेगवेगळया सूचनांच्या साहाय्याने हे संगणक वेगवेगळ्या प्रकारची कामे करू शकत होते. यामध्ये एकच मुख्य प्रोग्राम इतर प्रोग्राम्सचे नियंत्रण करीत असे. यातुनच Operating System ची कल्पना पुढे आली.
चौथी पिढी (Fourth Generation) 1975 नंतर या पिढीतील संगणकातल्या चिपवर केवळ 10 ते 20 छोटे भाग मावत मात्र चौथ्या पिढीतील संगणकात अधिक विकसित चिप्स वापरल्या गेल्या. यात एका छोट्या चिपवर जवळ जवळ अगणित भाग मावतात. यामुळे संगणकाचा आकार साहजिकच लहान झाला. अतिशय स्वस्त असल्याने याचा जगभर वेगाने प्रसार झाला. आज जगात वापरले जाणारे सर्व संगणक चौथ्या पिढीतील आहेत. यात आकार, काळ व क्षमतेनुसार या पिढीतील अनेक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.
संगणक कार्यप्रणाली
संगणक कार्यप्रणाली (operating system) संगणकाचे मूलभूत नियंत्रण करते. सिस्टिम सॉफ्टवेअर या वर्गात संगणक कार्यप्रणालीचे वर्गीकरण होते. संगणकाच्या हार्डवेअरचे आणि संगणकावर चालणा-यावेब ब्राऊझर, ईमेल प्रोग्रॅम, वर्ड प्रोसेसर इ. सगळ्या सॉफ्टवेअर्सचे नियंत्रण संगणक कार्यप्रणाली करते. संगणकाने करावयाच्या कामासाठी सूचना देण्यासाठी विविध प्रकारच्या संगणक प्रणाली अर्थात प्रोग्रॅमिंग लँग्वेज अस्तित्वात आहेत. संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी, प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमड लँग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो. प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गिकरण केले जाते. कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages), वस्तुनिष्ठ भाषा (Object Oriented language) , विवृत भाषा (Interpreted language) इत्यादी.
संगणकाची वैशिष्ट्ये
१. वेग - संगणकाच्या कामाचा वेग अतिप्रचंड आहे.
२. स्मरणशक्ती – संगणकांची मुख्य स्मरमशक्ती मर्यादित असली तरी दुय्यम स्मरणशक्ती साधने वापरून खूप मोठ्या प्रमाणावर माहिती साठविता येते.
३. अचूकता – संगणक दिलेले काम दिलेल्या सुचनांप्रमाणे अतिशय अचूकतेने करतो.
४. अष्टपैलू उपयोगिता – ज्या कामाबाबत तर्कसंगत व क्रमवार सूचना देता येतात असे कोणतेही काम सामान्यपणे संगणक करू शकतो. या त्याच्या गुणधर्मामुळे संगणक विवध प्रकारची कामे पार पाडू शकतो उदा. वाहतुकीचे नियंत्रण, गुणपत्रिका छपाई इत्यादी.
५. संगणक हे एक तंत्र असल्याने त्याच्यामध्ये न कंटाळता व न थकता अचूकपणे काम करण्याची क्षमता आहे.
६. संगणकाच्या सर्व क्रियांमध्ये सातत्य, विश्वासार्हता दिसून येते.
७. संगणकाची विविधांगी उपयोगिता पाहता त्यावर होणारा खर्च नगण्य आहे.
८. भावनिक दृष्टीने कोणत्याही प्रसंगाचा संगणकाच्या कार्यक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
संगणकाची शैक्षणिक उपयुक्तता
संगणकाचा वापर दैनंदिन जीवनात पदोपदी होत असलेला दिसून येतो. संगणकज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे संगणक शिक्षणक्षेत्रात देखील वेगवेगळ्या कार्यासाठी एक साधन म्हणून उपयुक्त साधन आहे. गरज आहे ती आज संगणकाचा वापर कल्पकतेने आणि योग्य सावधगिरी बाळगून शैक्षणिक प्रक्रियेत वापरण्याची काही उपयुक्त अप्लिकेशन सॉफ्टवेअरमुळे संगणकाचा शिक्षणक्षेत्रात ट्यूटर, साधन म्हणून वापर करता येतो.
१. शाळेमध्ये संगणक शिक्षकांना प्रभावी अध्यापन साहित्य म्हणून संगणक उपयोगी आहे. अध्यापन साहित्य, प्रश्नपत्रिका तयार करणे, जतन करणे, विद्यार्थी संकलित नोंदीसाठी, गुणदानासाठी, निकालपत्रके व विविध अहवाल तयार करण्यासाठी तसेच शिक्षणप्रक्रियेत संगणक अत्यंत उपयोगी आहे.
२.प्रशासनाच्या दृष्टीने कार्यालयांमध्ये कामे सोपी व लवकर करण्यास संगणक मदत करतो.
३. शालेय आरोग्य तपासणीसंबंधी माहिती साठवून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व संगणक मदत करतो.
४. दृक-श्राव्य माध्यमांमध्ये ग्राफिक्स आणि ऐनिमेशनच्या साहाय्याने प्रभावी व आकर्षक कार्टून्स, रेखाचित्रे, थ्रीडी चित्रे, पूर्णपणे संगणकाद्वारेच निर्णाण केली जातात. या आधारे भाषा विषयासंबंधी व विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे या विषयांतील शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती करता येते.
५. विविध शैक्षणिक व व्यावहारिक संदर्भ आंतरजालाच्या मदतीने निळविता येतात
६. संगणकाच्या साहाय्याने स्वयंअध्ययन प्रक्रिया प्रभावी व सुलभ होते.
७. क्रमान्वित पाठ अध्ययन पद्धतीचा वापर संगणकाच्या साहाय्याने करणे सुलभ जाते.
८. स्वगतीने विद्यार्थ्यास कुठल्याही घटकाचे अध्ययन करणे सुलभ जाते.
९. मानव विकासाच्या अवस्थेसंबंधी चित्रे, संबंधित शास्त्रज्ञांची चित्रे, पाठ घटकांतील आवश्यक चित्रे व नकाशे यंत्रांच्या साहाय्याने स्कॅनिंग करून संगणकावर साठवून त्याचा गरजेनुसार अध्यापनात वापर करता येतात.
१०. शालेय प्रयोगशाळेत संगणकाचा प्रभावी उपयोग करून प्रात्यक्षिक कृतिद्वारे अध्ययन अनुभव देता येतो.
११. संदर्भज्ञानासाठी आणि मूल्यमापनासाठी देखील माहिती संप्रेषण तंत्राचा प्रभावी उपयोग करता येतो.
१२. संगीत, खेळ, कार्यानुभव, चित्रकला या विषयांमध्ये माहिती संप्रेषण तंत्रांच्या वापराला अधिक वाव आहे.
13. पॉवर पॉईंट - विज्ञान व तंत्रज्ञान या विषयातील बरीचशी माहिती ओघ तक्त्यांच्या स्वरूपात व सचित्र मांडता येते. संगणकातील पॉवर पॉईंट या सॉफ्टवेअरचा यासाठी प्रभावीपणे वापर करता येतो. यासाठी स्लाईड्स तयार कराव्या लागतात.तयार केलेल्या स्लाईड्स क्रमवार दाखविता येतात. स्लाईड्सच्या पार्श्वभूमीचा रंग, चित्रांचा रंग, मजकुराची हालचालयुक्त मांडणी इत्यादींमुळे पॉवर पॉईंट वापरून केलेले सादरीकरण खूप आकर्षक व प्रभावी ठरते. हालचाली व रंग यामुळे अवधान टिकविले जाते व अध्यापनामध्ये मनोरंजकता येते.
14. संगणकाच्या साहाय्याने अनुदेशन- संगणक केवळ शिक्षकालाच मदत करून थांबत नाही तर शिक्षकाचे काम स्वतः करण्याची संगणकाची तयारी असते. प्रत्यक्ष अनुदेशन प्रस्तुतीकरणाचे काम देखील संगणक करू शकतो. संगणकाच्या या कार्यतंत्रालाच Computer Assisted Instruction (CAI)असे म्हणतात.
या तंत्राची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे – १. अनुदेशन तंत्र हे संगणक व अध्ययन कर्ता यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते आणि मानवी अध्ययन हे त्याचे उद्दिष्ट असते.२. संगणक प्रत्यक्ष विद्यार्थ्याला माहिती देत असतो व विद्यार्थ्याला अपेक्षित पातळीपर्यंत नेण्यासाठी संगणकामध्ये आवश्यक ती माहिती भरून ठेवलेली असते.३. विद्यार्थ्याला स्वतः व्यक्तिगतरीत्या, स्वतःच्या वेगाने अध्ययन करता यावे अशी व्यवस्था संगणकामध्ये केलेली असते.
संगणकाच्या साहाय्याने अनुदेशनाचे प्रकार
अ) संवाद (Dialogue) - संवाद प्रकारामध्ये संगणकामध्ये विशिष्ट अशी माहिती भरलेली असते. विद्यार्थ्यांना अध्ययन करताना जी माहिती हवी असेल ती त्याने संगणकाला विचारल्यास मिळू शकते. विद्यार्थ्याने संगणकाला प्रश्न विचारायचा आणि उत्तर मिळवायचे असा प्रकार येथे अभिप्रेत असतो.
ब) उजळणी व सराव (Revision and Practice) –यामध्ये शिक्षकाने नवनवीन संकल्पनांची ओळख विद्यार्थ्यांना पारंपारिक पद्धतीने करून द्यावयाची व त्यावर आधारित उजळणी घेण्याची जबाबदारी संगणकावर सोपवायची अशी अपेक्षा असते. संगणकाची भूमिका विशिष्ट ज्ञानापुरती चाचणी घेणे. सराव घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित असते.
क) पृच्छा (Enquiry) – यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला माहिती विचारतो व ती माहिती त्याला संगणकाकडून दिली जाते किंवा ती माहिती कोठे मिळेल हे सांगितले जाते.
क) पृच्छा (Enquiry) – यामध्ये अध्ययनकर्ता संगणकाला माहिती विचारतो व ती माहिती त्याला संगणकाकडून दिली जाते किंवा ती माहिती कोठे मिळेल हे सांगितले जाते.
ड) समस्या निराकरण (Problem Solving) –अध्ययनकर्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी येथे संगणकाचा उपयोग एखाद्या आकडेमोड करणा-या कॅलक्युलेटर प्रमाणे केला जातो.
इ) ट्यूटोरिअल (Tutorial) – या प्रकारामध्ये अधिक गुंतागुंत असते. क्रमपाठावर आधारित असे पाठ असतात. प्रथम संगणक पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारतो. विद्यार्थ्याने उत्तर दिल्यास पुढील भाग सादर करतो, अन्यथा पूर्वज्ञानावर आधारित भागावर आशय अभ्यासण्यासाठी देतो व परत प्रश्न विचारतो. येथे प्रत्याभरण प्रबलन याचा वापर केला जातो. स्वयंअध्ययनासाठी उपयुक्त साधन.
ई) प्रतिभास (Simulation) – या तंत्रामध्ये एखाद्या क्रियेचा किंवा वस्तूचा अभ्यास करण्यासाठी हुबेहुब परंतु भासमय अशी क्रिया किंवा वस्तूची प्रतिकृती वापरून अध्यापन केले जाते. उदा. युरेनियमपासून किरणांचे उत्सर्जन कसे होते किंवा अणुस्फोट कसा होतो हे आपण विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही. यासाठी संगणकामध्ये प्रतिभास प्रतिमान वापरून विद्यार्थ्यांसमोर त्या अनुदेशाने प्रस्तुतीकरण करता येते.
15.इंटरनेट (Internet) :१९६९ मध्ये अमेरिकेने अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्टरने इंटरनेशनल संगणक नेटवर्क विकसित केले . जगातील छोट्या नेटवर्क ला जोडणारे नेटवर्क म्हणजे इंटरनेट होय . १९९२ मध्ये स्वित्झलंड येथे सेंटर फॉर युरोपिअन न्यूक्लिअर रिसर्च मधून (CERN)वेब अर्थात वर्ल्ड वाइड वेब (www) आपल्या पर्यंत पोहचले . ह्याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे ग्राफिक्स , एनीमेशन , ध्वनी व्हिडिओ इंटरफेस नसलेल माध्यम होते . वेब मुळे ह्या सर्व गोष्टी नेटवर पाहणे शक्य झाले.इंटरनेट २१ व्या शतकातील एकमेकांच्या सपर्काचे प्रभावी साधन बनले. इंटरनेट वायर, केबल, सॅटॅलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. वेब इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या डाटासही जोडून देतो. वेब इंटरनेट चा वापर खालील गोष्टी साठी सामान्यत केला जातो.
संपर्क :-इंटरनेट द्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. ईमेल च्या द्वारे तुम्ही जगातील कुठल्याही व्यक्तिशी संपर्क साधू शकता . आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेवू शकता इतकेच नाही तर तुम्ही स्वतच वेब पेज म्हणजेच वेब साईट ही बनवू शकता.इंटरनेटमुळे आता एका देशातील शिक्षक व विद्यार्थी दुस-या देशातील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संपर्क करु लागले आहेत.
खरेदीविक्री :-इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही खरेदी व विक्री करू शकता. बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मिळते. नेट बॅंकींग किंवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .
माहिती शोधणे :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मिळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर मोफत व सहज वाचायला मिळतात. विविध शैक्षणिक पुस्तके, अध्यापन पध्दती व शैक्षणिक साधनांची माहिती आता सहज उपलब्ध होत आहे.
माहिती शोधणे :- एखाद्या विषयावर माहिती शोधणे इंटरनेट मुळे सोपे झाले आहे . जगातील कुठल्या ही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती हवी असल्यास ती आपणास इंटरनेट मुळे मिळु शकते . शिवाय इ-बुक मुळे कुठल्या ही ग्रंथालायाची बुक्स, पुस्तके आपणास नेट वर मोफत व सहज वाचायला मिळतात. विविध शैक्षणिक पुस्तके, अध्यापन पध्दती व शैक्षणिक साधनांची माहिती आता सहज उपलब्ध होत आहे.
मनोरंजन :- या विषयावर बोलावे तेवढे कमी आहे कारण या विषयावर इंटरनेटमध्ये माहितीचा भरपूर खजिना आहे . संगीत, चित्रपट, मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो. सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शासन निर्णयामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापराला महत्व देण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये शाळेत संगणक व तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसून येतो.जिल्हा परिषद व्यवस्थापन असलेल्या पष्टेपाडा ता शहापूर जिल्हा ठाणे या प्राथमिक शाळेमधून संगणक व शैक्षणिक तंत्रज्ञानाचा सर्व प्रथम मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. मोलमजुरी करणा-या गावातील गरीब लोकांना प्रेरीत करुन आर्थिक स्वरुपात व श्रमदानातून मदत घेऊन महाराष्ट्रातील पहिली डिजीटल शाळा साकारली गेली. शाळेत स्मार्ट बोर्ड,इंटर ॲक्टीव्ह मॉनिटर, टॅब, प्रोजेक्टर,स्मार्ट टी.व्ही. सोलार सिस्टीम, 3डी चाईल्ड थिएटर, स्टूडीओ रेकॉर्डींग, व्हर्च्युअल क्लासरुम इत्यादी सोयी उपलब्ध झाल्या आहेत. गावामध्ये विजेची सोय नाही अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली ता हवेली जिल्हा पुणे या शाळेने शाळेची सोलर यंत्रणा उभी केली व शाळेत अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभी केली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून शाळांमध्ये संगणकाद्वारे शिक्षण सुरु झालेले असून मोठ्या प्रमाणात शिक्षक हे तंत्रस्नेही व संगणक वापरकर्ते बनलेले आहेत. संगणकाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी शालेय शिक्षणात उपयोगी पडतील असे अनेक संगणकीय शैक्षणिक कार्यक्रम, वेबसाईटस,ब्लॉगस, ॲप्लिकेशन्स, सॉफ्टवेअर्स देखिल तयार केलेली आहेत.
श्री. संदीप गुंड (ठाणे) अध्ययन अध्यापनात 100 टक्के तंत्रज्ञान,श्री. रणजित डिसले (सोलापूर) अध्ययन अध्यापनासाठी क्यु.आर.कोडचा वापर, श्री.सुनिल अलुरकर (नांदेड) शैक्षणिक वेबसाईट व ब्लॉग, श्री. संतोष बोंबले (अकोला) संगणक व तंत्रज्ञानावर आधारीत चर्चासत्रे, श्री. बालाजी जाधव, श्री. प्रदीप कुंभार, श्री. संजय गोरे, श्री.राम सालगुडे (सातारा) अध्ययन अध्यापनासाठी संगणक व विविध ॲपलिकेशन्सची निर्मिती, श्री. रवि भापकर, श्री. संतोष दहिवळ(अहमदनगर) शैक्षणिक ॲपलिकेशन्सची निर्मिती, श्री. शफी शेख(यवतमाळ) श्री. सुरज तांबोळी (सांगली ) श्री. दिनेश बोधनकर(अकोला), श्री. गुणेश डोईफोडे (ठाणे )अध्ययन अध्यापनात संगणकाचा उपयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम , श्री. प्रदीप भोसले, श्रीमती स्वरदा खेडेकर, श्री सुनिल बासुतकर (पुणे) आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,श्री अनिल सोनवणे (जालना) मायक्रोसॉफ्टचा शैक्षणिक वापर,श्री.आनंद आनेमवाड(पालघर) वर्गाध्यापनामध्ये संगणक व तंत्रज्ञान,माध्यमिक विभागासाठी श्री. बी बी पाटील सर कोल्हापूर, श्री. शरद तांबे मुंबई, श्री. शमशुद्दीन अत्तार (सिंधूदूर्ग) श्री. प्रफुल्ल माहुरे (चंद्रपूर), श्री.प्रशांत क-हाडे (नांदेड) या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात संगणकाच्या साह्याने खुप मोठे काम उभे केलेले आहे. शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी संगणक व तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे ठरत आहे. म्हणूनच प्रत्येक शाळेत संगणक असणे ही काळाची गरज ठरत आहे.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार
v प्रत्येक माध्यमिक शाळेत संगणक असणे आवश्यक आहे.
v प्रत्येक उच्च प्राथमिक शाळेत संगणक असणे आवश्यक आहे.
v प्राथमिक शाळेत तरतूद उपलब्ध असल्यास संगणक आवश्यक आहे.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
संगणक याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1. शाळेत संगणक उपलब्ध आहे काय ?
2. शाळेमध्ये उपलब्ध संगणक संख्या:
अ) अध्ययन – अध्यापनासाठी ब ) प्रशासनासाठी क)ग्रंथालयासाठी ड) संगणक नाही.
3. शाळेमध्ये उपलब्ध आंतरजाल सुविधा वापरणारे
अ) केवळ शाळाप्रमुख ब ) केवल शिक्षक क) विद्यार्थी ड) उपलब्ध नाही
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतात. या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते.मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) अध्ययन अध्यापनासाठी संगणकाचा वापर नाही. डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध नाही.
b) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी संगणक वापराच्या संधीचा अभाव आहे.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे.)
2) a) शाळेत शिक्षक व विद्यार्थी दोघांसाठी सुलभ काही संगणक आहेत.काही मृदू संगणक साहित्य (संगणक आज्ञावली) आणि डिजिटल अध्ययन साहित्य उपलब्ध आहे. आंतरजाल सुविधा उपलब्ध नाही.
b) शिक्षक विविध वर्ग व विषयासाठी संगणक व डिजिटल साहित्य सुयोग्यपणे वापरतात.विद्यार्थ्यांना संगणक वापराची संधी काही प्रसंगी दिली जाते.
(वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे.)
3) a) शाळेत आंतरजाल सुविधा व पुरेशा संगणकासह संगणक कक्ष आहे.अद्ययावत पुरेसे डिजिटल अध्ययन अध्यापन साहित्य व मृदू साहित्य उपलब्ध आहे.
b) शिक्षक अध्ययन अध्यापन नियोजनात व अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा(संगणक व संबंधित डिजिटल साहित्य) वापर एकात्मपणे करतात. विद्यार्थांच्या मूल्यमापनातसुध्दा संगणकाचा वापर करतात. संगणक वापराची संधी प्रत्येक विद्यार्थ्याला मिळते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते.वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते.त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
संकलित
No comments:
Post a Comment