K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 27 December 2018

 आपला राष्ट्रध्वज 
   

 ■ ध्वजाचा वापर करताना घ्यावयाची काळजी ■

(१) ध्वजाचा चुकीचा वापर कोठेही करू नये.

(२) ध्वज चुरगळलेला, फाटलेला, मलीन असता कामा नये.

(३) कोणत्याही व्यक्तीच्या मानवंदनेसाठी ध्वज खाली उतरवू नये.

(४) ध्वज ज्या काठीवर लावला असेल त्याच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत.

(५) तोरण,गुच्छ,पताका म्हणून ध्वजाचा वापर करू नये.

(६) इतर रंगीत तुकडे ध्वजासारखे दिसतील असे जोडू नयेत.

(७)व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी ध्वज वापरू नये.

(८) ध्वजावरील केसरी रंगाचा पट्टा नेहमीच वरच्या भागात असावा.

(९) ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.

(१०)ध्वज फाटेल या रीतीने तो फडकवू नये. वा बांधू नये.

(११) ध्वज फाटला वा मळला तर तो कोठेही फेकून देऊ नये अथवा त्याचा अपमान होईल अशा रीतीने त्याला नष्ट करू नये.

(१२)ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.

(१३) काही उच्चपदस्थ व्यक्तीच्या मृत्यूशिवाय इतर कोणत्याही प्रसंगी ध्वज अर्ध्यावर उतरवू नये.

(१४)ध्वजारोहणाच्या वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे विधिपूर्वक उतरविण्यात यावा.

(१५) हवामान कसेही असले तरीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल.

      आपला राष्ट्रध्वज आपल्या देशाचा मानदंड आहे. आपल्या संस्कृतीचे, उज्ज्वल यशाचे,परंपरांचे ते प्रतीक आहे. त्याचा यथोचित आदर राखणे हे भारतीय नागरिक म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे.

No comments:

Post a Comment