K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 27 December 2018

🇮🇳 गणराज्य दिवस 🇮🇳
 

     २६ जानेवारी १९५० पासून भारताचे संविधानानुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून हा दिवस गणराज्य म्हणून साजरा केला जातो.

     भारताचे संविधानात न्याय,स्वातंत्र्य, समता,बंधुता व राष्ट्रीय एकात्मता, अखंडता इत्यादी तत्वांचा स्वीकार केलेला आहे

     संविधानामुळेच देशातील गोरगरीब सामान्य जनतेला न्याय व हक्क प्राप्त झाले.सर्वसामान्य माणसाची उन्नती व विकास झाला ही संविधाचीच देण आहे.

      देशाची गौरवचिन्हे आणि मानबिंदू म्हणजे जणू राष्ट्रीय अलंकारच असतात. त्यांच्या जपणुकीतून आपला देशाभिमानच जोपासला जातो. आपले राष्ट्रीय अलंकार असे आहेत..? राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभावरील चार सिंह हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहेत. सम्राट अशोकाची राजधानी सारनाथ येथील शिल्पावरून ते घेतले आहे. यात चार सिंह एकामागे एक उभे आहेत. (मात्र कोणत्याही एका बाजूने पाहता तीन सिंह दिसतात.) त्याखालील पट्टीवर एक आराम करणारा, हत्ती, वेगातला घोडा, एक बैल यांच्या शिल्पाकृती आहेत व त्यांच्या मध्यभागी चक्र आहे. राष्ट्रचिन्हाखाली 'सत्यमेव जयते' हे मुंडकोपनिषदातील वाक्य देवनागरी लिपित कोरले आहे. घंटाकृती (उलट्या) कमळावर हे विराजमान आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे राष्ट्रचिन्ह स्वीकारले गेले.

                                🇮🇳  राष्ट्रध्वज 🇮🇳

      तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे. उंची दोन भाग, तर लांबी तीन भाग या प्रमाणात तिरंगा बनवला जातो. उंचीचे समान तीन भाग बनवू. सर्वात वरचा भाग नारंगी, मधला भाग सफेद (पांढरा) व खालचा भाग हा हिरवा रंगात बनविला जातो. मधल्या भागामध्ये गडद निळय़ा रंगातील अशोक चक्र असते. या अशोक चक्राचा व्यास सफेद पट्टय़ाच्या उंचीच्या तीन-चतुर्थ्यांश असतो. या चक्राला २४ आरे असतात. राष्ट्रध्वजाच्या प्रत्येक रंगातून तसेच चक्रातून एक विशिष्ट अर्थ प्रतीत होतो. भगवा- एकात्मता, सफेद- सत्याचा मार्ग, हिरवा- निसर्गाशी व जीवनाशी नाते, अशोक चक्र - धर्माचे नियम, आरे - प्रगती, वेग, विकासाचे प्रतीक.


No comments:

Post a Comment