21 जुन अंतरराष्ट्रीय योग दिवस मराठी माहिती.
प्रचंड धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेचे अनन्यसाधारण महत्व आधीच अधोरेखित झालेले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता “आंतरराष्ट्रीय योग दिवस” औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे.
संयुक्त राष्ट्रानं 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केला आहे. संयुक्त राष्ट्राच्या 177 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. या पाठिंब्यासह 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून आता साजरा होणार आहे. मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आवाहनानुसार दि.२१ जून २०१५ रोजी टिळकनगर शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये योगदिवस साजरा करण्यात आला. या दिवशी रविवार असुनही सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
ताण तणावा पासून मुक्ती
रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणार्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर टाकली जातात.
अंतर्ज्ञानात वाढ
तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.
एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !
21 जून का?
21 जून हा दिवस उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, तर दक्षिण गोलार्धात हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातल्या अनेक भागांमध्ये या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. याच दिवशी सूर्याचं दक्षिणायण सुरु होतं. अर्थात सूर्य दक्षिणेकडे कलू लागतो. सूर्याचं दक्षिणायण सुरु झाल्यानंतरची पहिली पौर्णिमा म्हणजेच पूर्ण चंद्र दिसणारा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकराने योगाविषयीचं ज्ञान जगासमोर आणलं. शिवाय सूर्याच्या दक्षिणायण कालात आध्यात्मिक पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी नैसर्गिक परिस्थितीही अनुकूल असल्याचं मानलं जातं.
21 जून...जागतिक योग दिवस...2015 सालापासून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. योगसाधनेचं मूळ उगमस्थान हे भारतात असल्यामुळे संपूर्ण भारतात योग दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात
What is Yoga in Marathi | योग म्हणजे काय?
•••
योग हा शब्द 'युज' या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, पिळले जाते आणि अवघड श्वसन प्रक्रियांचा अवलंब केला जातो. खरेतर मानवी मन आणि आत्मा यांची अनंत क्षमता जाणून घेणाऱ्या या विज्ञानाची ही म्हणजे योगाभ्यासाची केवळ वरवरची ओळख झाली. योगाभ्यासामध्ये जीवनशैलीचा परिपूर्ण सारांश प्राप्त होतो.
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे.”
योगाचा इतिहास | History of Yoga
योग दहा हजार पेक्षा जास्त वर्षापासून प्रचलित आहे. या परंपरेचा उल्लेख नारदीय सुक्त आणि सर्वात प्राचीन अश्या ऋग्वेदामध्ये आढळतो. हा आपणास पुन्हा सिंधू-सरस्वती सभ्यतेचे दर्शन घडवतो. या सभ्यतेमधील पशुपतीनाथांच्या एका नाण्यावर योगमुद्रा विराजमान आहे जी त्या काळातील योगाच्या व्यापकतेचे द्योतक आहे. अतिप्राचीन उपनिषद बृहद अरण्यक मध्ये योगामधील काही शारीरिक आसनांचा उल्लेख आढळतो. छान्दोग्य उपनिषदामध्ये प्रत्याहार चा तर बृहद अरण्यक मधील एका स्तवनामध्ये प्राणायाम चा सविस्तर उल्लेख आहे. प्रचलित योगाच्या स्वरूपाचा प्रथम उल्लेख कठोपनिषदमध्ये आहे जी आयुर्वेदाच्या कथा शाखामधील अंतिम आठ वर्गांमध्ये पहिल्यांदा येते जे मुख्य आणि अत्यंत महत्वाचे उपनिषद आहे. येथे योगाला अंतर्मनाच्या यात्रेसाठी तसेच चेतनेच्या विकासासाठी गरजेच्या प्रक्रियेच्या रुपात जाणले जाते.
प्रसिद्ध संवाद “योग याज्ञवाल्क्य”, जो बाबा याज्ञवल्क्य आणि शिष्या गार्गी यांच्यामधील संवाद आहे, ज्याचे वर्णन बृहद अरण्यक उपनिषदमध्ये आहे, यामध्ये श्वास घेण्याचे कित्येक व्यायाम प्रकार, शारीरिक शुध्दतेसाठी गरजेची आसने आणि ध्यानाचा उल्लेख आहे. गार्गी लिखित छांदोग्य उपनिषद मध्ये देखील योगासनांचा उल्लेख आहे.
अथर्ववेद मध्ये संन्याश्यांच्या एका समुहामधील चर्चेनुसार शारीरिक आसने हि योगासने म्हणून विकसित होऊ शकतात यावर भर दिला आहे. विविध संहितांमध्ये असा उल्लेख आढळतो कि प्राचीन काळी मुनी, महात्मा आणि विविध संतांद्वारे कठोर शारीरिक आचरण, ध्यान आणि तप केले जात असे.
काळानुसार योग एक आचरणाच्या रुपात प्रसिध्द होत गेला आहे. भगवत गीतेसह महाभारतातील शांतिपर्वा मध्ये योगाचा खुलासेवार उल्लेख आढळतो.
महाभारत आणि भगवत गीतेच्या फार पूर्वी वीस पेक्षा ज्यादा उपनिषदामध्ये सर्वोच्च चेतनेसोबत मनाचे मिलन होणे म्हणजे ‘योग’ असे सांगितले गेले आहे. हिंदू दर्शनातील प्राचीन मुलभूत सूत्रांच्या रुपामध्ये योगाची चर्चा आहे, ज्यांचा अलंकृत उल्लेख पतंजली योग सूत्रमध्ये आहे. महर्षी पतंजली आपल्या दुसऱ्याच योग सूत्र मध्ये योगाची व्याख्या
“योगः चित्त-वृत्ती निरोधः “ – योग सूत्र १.२
अशी करतात. पतंजलींचे लेखन देखील अष्टांग योग साठी आधार बनले आहेत. जैन धर्मातील पांच प्रतिज्ञा आणि बौध्द धर्मातील योगाचाराची बीजे पतंजली योग सूत्रामध्ये आहेत.
मध्य कालीन युगात हठ योगाचा विकास झाला.
योग ग्रंथ: पतंजली योग सूत्र | Patanjali Yogasutra
महर्षी पतंजली योग पित्याच्या रुपात जाणले जातात आणि त्यांची योग सूत्रे पूर्णपणे योगिक ज्ञानासाठी समर्पित आहेत.
'पतंजली योग सूत्र' या प्राचीन ग्रंथावरील गुरुदेवांची अमुल्य प्रवचने आपल्याला योग ज्ञानाबाबत लाभान्वित करतात तसेच योगाची उत्पती आणि उद्देशांबाबत माहिती करून देतात. योगाची तत्वे, सिद्धांत बनवणे आणि सूत्रांना समजण्यास आणखी सोपे बनवणे हाच या योगसूत्रांचा उद्देश आहे. यामध्ये योग जीवनशैलीचा उपयोग योगाच्या अंतिम लाभांचा अनुभव होण्यास सहाय्यभूत अश्या आपले लक्ष केंद्रित करणाऱ्या काही प्रक्रियांचा उल्लेख आहे.
गुरुदेवांनी देखील योगसूत्र उपनिषदांचा खूप खुलासा केला आहे. भगवत गीता वरील आपल्या प्रवचनामध्ये त्यांनी सांख्ययोग, कर्मयोग, भक्तियोग राजगुह्य योग आणि विभूतियोगासारख्या योगाच्या विविध अंगावर प्रकाश टाकला आहे.
योगाचे प्रकार | Types of Yoga
योगामध्ये विविध प्रकारचे अभ्यास आणि पध्दती यांना समाविष्ट केले आहे.
‘ज्ञान योग’ / दर्शन शास्त्र
‘भक्ती योग‘ / भक्ती – आनंदाचा मार्ग
‘कर्म योग’ / सुखमय कर्म मार्ग
राज योग: ज्याची पुढे जाऊन आठ अंगांमध्ये विभागणी केली आहे त्यालाच अष्टांग योग म्हणतात. योगाच्या विविध पद्धती आणि प्रक्रिया यांना संतुलित आणि एकत्र करून योगासनांचा अभ्यास करणे हेच राजयोगाचे सार आहे.
सर्वांसाठी योग | Yoga for all
योगाचे एक वैशिष्ट्य हे आहे कि तुम्ही युवक असा कि वयोवृध्द, निरोगी असा कि आजारी, योगाभ्यास सर्वांसाठी लाभदाई आहे आणि तो सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो. वयपरत्वे आपली आसनांची समज अधिक परिपक्व होऊ लागते. मग आपण शारीरिक आसनांसोबत अंतर्गत सुक्ष्मतेवर अधिक कार्य करू लागतो.
योग आपल्यासाठी कधीही नवीन नव्हता. आपण हे सर्व अगदी बालपणापासून करत आलो आहोत, मग ते पाठीचा कणा मजबूत करणारे मार्जारासन असो कि पचनशक्ती वाढवणारे पवनमुक्तासन असो. आपण शिशूंना दिवसभर काही न काही योग क्रिया करताना पाहतो. हरएक व्यक्तीला योगाचे वेगवेगळे महत्व आणि आवश्यकता आहे. योग प्रत्येकाच्या जीवनाची आदर्श दिशा ठरवण्यासाठी सहाय्य करायला दृढ संकल्प आहे.
प्राणायाम आणि ध्यान | Pranayama and Meditation
प्राणायाम म्हणजे आपल्या श्वासोश्वासाचे नियंत्रण आणि विस्तारीकरण. श्वासोश्वसाच्या योग्य तंत्रांचा सराव केल्यास रक्तामधील आणि मेंदूला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळे प्राणशक्ती आणि जीवन ऊर्जा यांच्या नियंत्रणास मदत होते. प्राणायाम आणि योगासने हे एकमेकास पूरक आहेत. या दोन योगतत्वांचा मिलाफ झाल्याने शरीर आणि मनाच्या उत्तम प्रतीचे शुद्धीकरण व आत्म नियमन प्राप्त होते. प्राणायाम ही ध्यानाच्या गहऱ्या अनुभवाची तयारी असते.
मानवी जीवनात योगाचे महत्त्व
''शरीर माध्यम खलू द्यर्म साद्यनम्'' ही संस्कृत उक्ती अतिशय महत्त्वाची आहे. कोणतंही सत्कार्य (खलू-द्यर्म) साद्यायचं झालं तर ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाद्यानकारक मिळणे द्वरापास्त आहे. मनाचे स्वास्थ्य शरीरावर अवलंबून आहे, तर उलट पक्षी मनासह शरीराचे तंत्र सुरळीत राहते.
मनाचा 'योग' कसा साद्यला जातो पहा; विनोबाजी लिहितात, खाटेवर रुग्ण द्वःखी कष्टी आहे, नर्सची ड्युटी संपलेली आहे. त्याच्या संपूर्ण व्यथा व औषद्यीचे तिला सातत्याने आकलन आहे. तिची वेळ झाली म्हणून ती घड्याळाकडे पाहून निघून जाणार व द्वसरी रुजू होणार. तो अत्यवस्थ रुग्ण पाहून तिने 'सेवाभावनेने दिलेला अद्यिकचा वेळ ही आंतरिक सेवेची पोचपावतीच नाही का? यालाच गीतेत कर्मタविकर्मタअकर्मタ'योग' असे म्हटले आहे. तुम्ही स्वतः आतून जोडून घ्या, मग 'मानसिक शांती' कुठे बाहेर शोद्यावी लागत नाही.
योगात अष्टांग मार्ग यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, द्यारणा नि समाद्यी याला प्राद्यान्य दिले गेले. याने वर पाहिल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य व सोबत जीवनात उठण्याबसण्याचे व खाण्यापिण्याचे नियम घालून घ्यावे लागतात. अन्यथा एकांगी स्वरूपाचे कार्य वा विचार होईल. गीतेत म्हटले आहे ''योगावरी चढू जाता शम साद्यन बोलिले'' शमचा अर्थ संयम.''न फार खावूनि किंवा खाणेचि सोडूनि, निजणे, जागणे, खाणे, फिरणे आणि कार्यही मोजूनि करितो त्यास योग हा दु: ख नाशन.'' अर्जुनाला दिलेला उपदेश सर्वांसाठी योगप्रेरक आहे.
एकदा आपण स्वतःला साद्यारण-सुलभ चाकोरीत बसवून घेतलं की योगाला पूरक अशी एवूत्ण शरीर-मनाची पार्श्चभूमी तयार होते. अर्थात तुम्ही जिथे राहता ते घर अंगण, परिसर, मित्र काया वाचा, पूजाविद्यी, पद्धती, चिंतन-मननाचे तुमचे विषय शरीरासाठी किती वेळ देता? जेवणासाठी, झोपण्यासाठी वेळ देतोच. व्यायाम-योग-आसन-प्राणायम याला विहित वेळ देणे गरजेचे आहे. पहेलवान खाल्लेले मुद्दाम मेहनतीने पचवतो व पुन्हा शरीरात कोंबतो.
योग-साधक तसे करणार नाही. त्याला सम्यक आहार, सम्यक विहाराची चाड लागलेली असावी. त्याला आरोग्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही. तो सकाळ, सायंकाळ योगासाठी वेळ काढणार, नियंत्रित आसन व प्राणायाम करणार.''योग म्हणजे जोडणे'' हा विचार तो आपल्या जीवनात घेऊन निघाला की त्याला निसर्गाशी व नैसर्गिक सहजयोगाशी तो आपले सूत्र जुळविण्याचा प्रयत्न करतो. कारण ''योगः हा दु:ख नाशन'' निसर्गाच्या नियमाप्रमाणे जोडत राहिल्याने उफराटे विचार, आचार नि उच्चार होण्याचे कारण नाही.जीवनात सर्वांच्या हिताची 'समदृष्टी' यायला लागते.''सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्यसंपदा, व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी द्वःखी असू नये.'' ही सर्वात्मक निरामय-आरोग्याची भावना घेऊन तो धारणेवर चढतो. कुठलीही हानिहारक, हिंसक, असत्य बाब तो वर्ज्य करतो. तशी योग्याची वृत्ती प्राणायाम नि आसनातून स्थिरावते. आता योगाचा अर्थ सकाळी कुठेतरी जाऊन आसने नि प्राणायाम करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. तो संपूर्ण 'जीवनरहाटीशी' निगडित झालेला असेल.
निसर्गात चैतन्य शक्ती काम करते व हे जीवन सहजीवन आहे. यात वाटा संपूर्ण सजीव सृष्टी-चैतन्याचा आहे. ''जिवो जीवस्य जीवनम्'' असे हे परस्परावलंबी जीवन आहे. व्यक्ती ते समष्टीचा प्रवास हा परस्परांना एका अदृश्य साखळीत बांधतो.सत्यम्-शिवम्-सुंदरम् असं मंगलमय जीवन एकमेका साह्य करून जगण्यास सुसह्य केल्या गेले पाहिजे. सूर्य, चंद्र, तारे आपले नियोजित कार्य करतात. त्यांचा सातत्य-योग आम्ही डोळ्यासमोर आदर्श पाठ म्हणून ठेवला तर हे जीवन सुयोग्य होईल. 'आत्म-मोक्षार्थ' जगत हितायच' असा 'वसुद्यैव कुटुंबाचा' द्यागा जुळावा!
योगाचे १० सर्वात महत्वाचे फायदे.
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन, उत्तम आरोग्य, यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योगा समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतू प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्र्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्र्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो.
योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात.
योगाच्या नियमित सरावामुळे होणारे सर्वात १० महत्वाचे फायदे आता आपण बघणार आहोत.
१. सर्व स्तरांवर तंदुरुस्ती. नुसती शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वस्थ राहिलं पाहिजे. श्री श्री रविशंकर जी नेहमी म्हणतात “फक्तं रोग विरहीत शरीर असन्याला स्वास्थ्य महता येणार नाही, तर आनंद, प्रेम आणि उत्साह हे तुमच्या जीवनात उत्स्फूर्तपणे व्यक्त होत असतील तर त्याला खरी आरोग्य संपन्नता म्हणता येईल”.
या ठिकाणी योगाच तुमच्या मदतीला धावून येतो. त्यासाठी आसने, प्राणायाम (श्र्वासोच्छ्वासाच्या लयी) आणि ध्यान धारणा या गोष्टी आरोग्य उत्तम राखायला आपल्याला उपयोगी पडतात
२. वजनात घट. याहून तुम्हाला अधिक काय पाहिजे ! योगाचा फायदा इथे सुद्धा होतो. सूर्य नमस्कार, कपाल भाती आणि प्राणायाम या योगिक क्रियांनी वजन कमी होते योगाच्या सहाय्याने वजन कमी करा. त्याचप्रमाणे रोज नियमित योगाचा सराव केल्याने आपल्या शरीराला कधी आणि कोणत्या अन्नाची गरज आहे याची जाणीव आपल्याला होते. योग्य आहार घेतल्याने सुद्धा वजन नियंत्रणात रहायला मदत होते.
३. ताण तणावा पासून मुक्ती. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहाणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा रोज केलेला सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातली विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव तुम्हाला श्री श्री योग लेव्हल २ कोर्स मध्ये येईल.
४. अंर्तयामी शांतता. आपल्या सगळ्यांनाच एखाद्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडते. परंतू आपल्याला हवी असणारी शांती ही आपल्यामध्येच वसलेली आहे हे फार थोड्या लोकांना माहित असेल, फक्त या शांतीची अनुभूती घेण्यासाठी रोजच्या धकाधकीच्या कार्यक्रमातून थोडा वेळ काढायला हवा. या छोट्याशा सुट्टीत रोज योग आणि ध्यान केल्याने त्याचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगा सारखा दुसरा उपाय नाही.
५. रोगप्रतिकारक शक्तीत वाढ. शरीर, मन आणि आत्मा या तिघांचे मिळून एकसंघ अशी आपली यंत्रणा असते. त्यामुळे शारीरिक अस्वस्थपणाचे पडसाद जसे मनावर आघात करतात तसेच मानसिक अस्वस्थपणाचे परिणाम शरीरात रोगाच्या रूपाने प्रकट होतात. योगामुळे निरनिराळ्या अवयवांचे मर्दन केले जाते आणि त्यांचे स्नायू बळकट होतात. श्र्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे आणि ध्यान धारणेमुळे शरीरात साठलेला ताण तणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
६. सजगतेत वाढ होते. मन हे सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेत गुंतलेले असते. ते सतत भूतकाळ आणि भविष्यकाळ यात झोके घेत असते पण वर्तमान काळात मात्र ते कधीच राहत नाही. आपल्यातली सजगता वाढल्याने मनाचे हे लक्षण आपल्या सहज लक्षात येते; आणि त्यावर वेळीच उपाय योजून आपण ताण तणावातून मुक्त होऊ शकतो; आणि मनाला शांत करू शकतो. योगा आणि प्राणायाम यांच्या मदतीने आपल्यातली सजगता वाढते. सजगता वाढल्याने इकडे तिकडे पळणाऱ्या मनाला आपण परत वर्तमान क्षणात आणू शकतो. तसे केल्याने ते आनंदी आणि एकाग्र बनते.
७. नाते संबंधात सुधारणा. तुमचा जोडीदार, आई वडील, मित्र किंवा तुमच्या लाडक्या व्यक्ती या सगळ्यांशी असेलेले नातेसंबंध योगामुळे सुधारतात . तणावमुक्त, आनंदी आणि समाधानी मन नात्यां सारख्या संवेदनशील संबंधात फार उपयोगी पडते. योगा आणि ध्यान धारणेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. त्याचा उपयोग आपल्या जवळच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.
८. उर्जा शक्ती वाढते. दिवसभराच्या कामाच्या धावपळीमुळे शेवटी तुम्हाला गलठून गेल्यासारखे वाटते कां? सतत दिवसभर काम करत राहिल्याने तुम्ही पार थकून जाता. तुमच्यात काही त्राण उरत नाही. परंतू रोज काही मिनिटे नियमित योगाचा सराव केल्याने तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहता. दिवसभराच्या कामाच्या धबडग्यातून तुम्ही मध्येच १० मिनिटांचा वेळ काढून मार्गदर्शित ध्यान जरी केलेत तरी त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्यात परत उत्साह संचारेल आणि हातात घेतलेले काम तुम्ही तत्परतेने पुरे कराल.
९. शरीरातल्या लवचिकपणात आणि शरीराची ठेवण सुधारते. तुमच्या दैनंदिन कार्यक्रमात तुम्ही जर योगाचा समावेश केलात तर शरीर सशक्त, चपळ आणि लवचिक बनेल. रोज न चुकता योगा केलात तर तुमच्या शरीराच्या स्नायूंना बळकटी येईल. तुमच्या शरीराची ठेवण सुधारेल. उभे राहताना, बसताना, झोपताना, चालताना त्यात एक प्रकारचा डौल येईल. चुकीच्या पद्धतीने बसण्या उठण्या मुळे पूर्वी जे अंग दुखायचे तसे ते दुखणार नाही.
१०. अंतर्ज्ञानात वाढ. तुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगा आणि ध्यान धारणा या मध्ये आहे. तशी ती झाल्यामुळे कोणती गोष्ट कधी, कुठे आणि कशी करायला हवी याचे अचूक निर्णय तुम्ही घेऊ शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता. योगा केल्यामुळे हे बदल आपोआप होत असतात तुम्हाला फक्त याची अनुभूती घ्यायची असते.
एक लक्षात ठेवा, योगा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तिचा सराव सतत करत रहा !
योगदिन विशेष : लहान मुलांसाठी योगाचे 9 फायदे
शाळेत पीटीचा तास आला आणि व्यायाम प्रकार करावे लागले तर अनेक लहान मुले नाक मुरडतात. योगा म्हटल्यावर तर ही छोटी मुले आपला हातच दुखतो किंवा पायच दुखतो अशी कारणेही आपल्या शिक्षकांना देतात. पण, लहानपणापासूनच मुलांना योगा किंवा व्यायाम शिकवणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत असेलच. आता तर 21 जून या योगदिन साजरा करायला सुरुवात झाल्यापासून अनेक शाळांमध्ये पीटीचे शिक्षकही मुलांना अभ्यासात नियमितपणे योगासनांचे प्रशिक्षण देऊ लागले आहेत.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. पण, या आजारांचा उपचारही महागला आहे. औषधांपेक्षाही योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून कुठल्याही रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण, योगासनांमुळे शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये सुधारणा घडून येतात आणि मेंदूची क्षमता वाढते. मानसिक आरोग्यावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो. नैराश्य, ऑटिझमसारख्या मानसिक समस्यांवरही योगासने दुसऱ्या कुठल्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहेत, असे योगाभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिका रुग्णालयांतही डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांसाठी योगभ्यासाचे आयोजन करण्यात येते.
लहान मुलांसाठी योगाचे महत्त्व?
बौद्धिक क्षमता वाढते
अभ्यासात त्यांना फायदा होईल
लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल
लहान मुलांचा रक्तदाब नियंत्रित राहील
त्यांचं वजन नक्कीच कंट्रोल मध्ये राहू शकते
मुलं आजारी प़डत नाही, आनंदी राहतात
एकाग्रता, स्मरणशक्ती, त्यांच्या सवयीं बदलतात
अभ्यासातली भीती कमी होते. विश्वास वाढतो
उदासीनता घालवण्यासाठी होते मदत
लहान मुलांना आधीपासूनच जर योगासनांची सवय आणि आवड लावली तर, त्यांना अभ्यासात आणि भविष्यात नक्कीच फायदा होईल. लहान मुलांना प्राणायम, पोट हलवणं, श्वासोच्छवास चांगल्या पद्धतीने करणं असे प्रकार शिकवले जातात. याशिवाय, नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारी व्यक्ती. सध्या सगळ्यांचेच जीवन धकाधकीचे झाले आहे. लहान मुलांच्या दप्तराचे ओझे ही त्यांच्या वजनाचे एवढे असते. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीसुद्धा यातून सुटलेले नाहीत. तणाव नियंत्रणाचा योग विषयात अगदी मुळापासून विचार करण्यात आला आहे. पण, आयुष्यात योगाच्या माध्यमातून तणावाचे नियोजन करणे सहज शक्य झाले आहे.
10 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ब्रह्मविद्या देणं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आठवड्यातून 2-3 तास जर ब्रम्हविद्या दिली तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतावाढीस फायदा होतो. शरीराच्या आणि मनाच्या स्वास्थासाठी योग करणे हे गरजेचे आहे. योगसाधना आणि ब्रह्मविद्या ही महत्त्वाची गरज बनली आहे. त्यासाठी लहानपणापासूनच योगाचं महत्त्व मुलांना समजून दिलं पाहिजे.'
- डॉ. सुमन भांडेकर, ब्रह्मविद्या योग प्रशिक्षिका
केईएम रुग्णालयात दर बुधवारी आणि शुक्रवारी हायपरटेन्शन रुग्णांसाठी असलेल्या बाहृयरुग्ण विभागात योगासंदर्भात माहिती आणि प्रात्याक्षिके करून दाखवली जातात. योगाचे अनेक प्रकार आहेत. प्राचीन काळातील योगासनांसह आता ब्रह्मविद्या आणि पॉवर योगाही विकसित होऊ लागले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, स्तनाचा कर्करोग रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पण, अनेकदा रुग्ण पालिका रुग्णालयातील गर्दी पाहून उपचारासाठी येणे टाळतात. अशा स्थितीत खासकरून झोपडपट्टीतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात आणि योगाचे महत्त्व त्यांना पटावे, यासाठी मुंबईतील नायगाव आणि मालाड-मालवणी याठिकाणी हेल्थ केअर सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज किमान 40 रुग्ण उपचारांसाठी येतात. या रुग्णांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्या जाणून घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातात. औषधांसह त्यांना त्यांच्या आजारांनुसार योगासनेही शिकवली जातात.
- डॉ. मृदुला सोळंकी, सहयोगी प्राध्यापिका, जनऔषध शास्त्र विभाग, केईएम रुग्णालय
लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत कुठलीही व्यक्ती योग करूच शकते आणि प्रत्येकाने योगा हा केलाच पाहिजे. लहान मुलांकडे आपण बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की खेळता-खेळता ती सहज अनेक प्रकारची आसने करत असतात. लहान मुलांना आजार होऊ नये म्हणून त्यांना सहजसोपी आसने आणि प्राणायाम करायला हवा. गर्भवती महिलेने कुठल्या प्रकारची आसने करायला पाहिजेत, असा सल्लाही रुग्णांना दिला जातो. याशिवाय साधारण प्रसूतीनंतर तीन महिने आणि सिझेरियननंतरचे सहा महिने योग करू नयेत, असे रुग्णांना सांगितले जाते. तसेच हृदयरोगी व्यक्तींनी योगासने सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. सोलंकी यांनी म्हटले आहे.
वाशी येथे योग शिबिराचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यंदाच्या वर्षीही पालिका प्रशासनाद्वारे योग शिबीर भरवले जाणार आहे. याकरता वाशी येथील एक्झिबिशन सेंटरमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या प्रत्येक रुग्णालयातून 100 लोक या शिबिरात सहभागी होणार आहेत. यात रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह रुग्ण आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.
याच योगाचे महत्त्व ओळखून घाटकोपरच्या अभ्युदय विद्यालयात योगाचे वर्ग आयोजित केले होते. यावेळी शाळांमध्ये बच्चेकंपनी ही योगा करण्यात दंग होती.
योग अभ्यासामुळे शरीर, मन, बुद्धी आणि भावना यामध्ये समन्वय साधून चंचलता दूर करता येते. आजच्या या धावपळीच्या जीवनात ताणतणाव कमी करून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. म्हणून या दिनी योग शास्त्रातील आसनांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.
- आर. जी. हुले, संस्थापक, अभ्युदय विद्यालय
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2016 ला चंदिगडमधल्या कॅपिटॉल कॉम्प्लेक्स इथे पंतप्रधानांनी केलेले भाषण !
देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात या क्षणी लोक या सोहळ्याशी जोडले गेले आहेत. जगातले सगळे देशही आपापल्या वेळेनुसार या सोहळ्याशी जोडलेले आहेत. संयुक्त राष्ट्रांद्वारे संपूर्ण जगभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. भारताच्या विनंतीवरुन गेल्या वर्षी योग दिनाला प्रारंभ झाला. 21 जून हा दिवस जगातल्या अनेक भागात सर्वात मोठा दिवस असतो आणि एक प्रकारे सूर्याशी जवळीक साधणारा हा दिवस असतो. या गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 21 जून ही तारीख निश्चित करण्यात आली. यासाठी संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळाला. मग तो विकसित देश असो की विकसनशील देश असो. समाजातल्या प्रत्येक वर्गाचा पाठिंबा यासाठी मिळाला. तसे तर संयुक्त राष्ट्रांद्वारा असे अनेक आंतरराष्ट्रीय दिवस साजरे केले जातात. त्या सगळ्याचा उल्लेख मी नाही करणार पण संयुक्त राष्ट्रांद्वारा साजऱ्या होणाऱ्या एवढ्या साऱ्या दिवसांपैकी क्वचितच एखादा दिवस लोकचळवळीचा झाला असेल. जगातल्या प्रत्येक कोपऱ्यातून एवढा पाठिंबा, स्विकृती प्राप्त करणाऱ्यामध्ये, तेही एक वर्षाच्या आतच, आंतरराष्ट्रीय योग दिवसाची बरोबरी आणखी कुठला दिवस करु शकत नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रम होतात. संयुक्त राष्ट्रांचा जागतिक कर्करोग दिन असतो, जागतिक आरोग्य दिन असतो, जागतिक मानसिक आरोग्य दिन असतो, असे अनेक असतात.
आरोग्याशी संबंधित अनेक दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारे साजरे केले जातात. पण ज्याचा थेट संबंध आरोग्याशी आहे, शारीरिक-मानसिक-सामाजिक तंदुरुस्तीशी आहे, तो योग आज इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांच्या चळवळीत कसा रुपांतरित झाला आहे? मला असे वाटते की, आपल्या पूर्वजांची त्यांनी आपल्याला दिलेल्या वारशाची ताकद आहे. या वारशाची ओळख काय आहे? ती करुन घेऊया.
मला असे वाटते की योगासने म्हणजे एक प्रकारे जीवनातल्या शिस्तीचे अधिष्ठान आहे. कधी कधी लोक आपल्या कमी क्षमतेमुळे हे पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कधी कधी लोकांना वाटते, योगातून काय मिळणार आहे? हे संपूर्ण विज्ञान देण्याघेण्यासाठी नाही. काय मिळणार आहे, यासाठी योग नाही. मी काय सोडू शकेन, मी काय देऊ शकेन, कुठल्या कुठल्या गोष्टींपासून मी मुक्त होऊ शकेन, यासाठी योग आहे. हा मुक्तीचा मार्ग आहे. हा मिळवण्याचा मार्ग नाही.
सगळे संप्रदाय, धर्म, भक्ती, पूजापाठ या गोष्टीवर जोर देतात की मृत्यूनंतर इहलोकातून निघून जेव्हा परलोकात पोहचू तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे. आपण जर अशा प्रकारे पूजा-पाठ केले, ईश्वराची साधना-आराधना केली तर आपल्याला परलोकात ते मिळेल. योग परलोकासाठी नाही. मृत्यूनंतर काय मिळेल याची वाट योग दाखवत नाही म्हणूनच हे धार्मिक कर्मकांड नाही. इहलोकात आपल्या मनाला शांती कशी मिळेल, शरीर कसे निरामय राहील, समाजात एकसूत्रता कशी राहील यासाठी योग शक्ती देतो. हे परलोकाचे विज्ञान नाही. हे इहलोकाचे विज्ञान आहे. या जन्मात काय मिळेल, त्याचे विज्ञान योग आहे.
शरीर, मन, बुद्धी, आत्मा सुसूत्रपणे काम करु शकतील याचे प्रशिक्षण योग देतो. आपण जर स्वत:कडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल आपण चाललो न चाललो, आपण ताजेतवाने असू वा आळशी, थकलेले भागलेले असू की उत्साही, आपले शरीर कसेही असू शकते. शरीर जसे नेऊ तसे येते. पण मन, मन कधी स्थिर राहत नाही. ते चहूकडे फिरत असते. बसलेले इथे असाल पण अमृतसरची आठवण आली की मन तिथे जाते. आनंदपूर साहब आठवले तर तिथे पोहोचते. मुंबईची आठवण आली तर तिथे जाते. एखाद्या मित्राची आठवण आली तर मन त्याच्याकडे जाते. मन अस्थिर असते. शरीर स्थिर असते. मनाला स्थिर कसे करायचे आणि शरीराला गतिमान कसे करायचे, ते योग शिकवतो. म्हणजेच आपल्या मूलभूत प्रकृतीमध्ये परिवर्तन आणण्याचे काम योग करतो. ज्यात मनाला स्थिर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि शरीराला गतिमान करण्याचे प्रशिक्षणही मिळते. यात संतुलन साधले गेले तर जीवनात, ईश्वराने दिलेले जे हे शरीर आहे ते आपल्या सर्व संकल्पांच्या पूर्ततेसाठी उत्तम माध्यम ठरु शकते.
या अर्थाने योग आस्तिक आणि नास्तिक माणसांसाठीही आहे. जगात कुठेही खिशात पैसे नसताना आरोग्य विमा मिळत नाही. पण योग शून्य पैशात आरोग्य विमा देतो. तो गरीब-श्रीमंत भेद करत नाही. विद्वान-अडाणी असा भेद तो करत नाही. गरिबातील गरीब व्यक्तीही आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही योग सहजपणे करु शकते. यासाठी कुठल्याही वस्तूची गरज नाही. एक हात पसरण्यासाठी कुठेही जागा मिळाली की माणूस योग करु शकतो आणि आपले शरीर व मन तंदुरुस्त राखू शकतो. भारतासारखे गरीब देश, जगातले गरीब देश, विकसनशील राष्ट्र यांनी जर प्रतिबंधात्मक उपायांवर आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला तर आरोग्यावर होणारा खर्च ते वाचवू शकतात आणि त्याचा योग्य उपयोग करु शकतात. प्रतिबंधात्मक आरोग्याच्या काळजीचे जितके उपाय आहेत त्यात योग एक सरळ, स्वस्त आणि प्रत्येकाला उपलब्ध असलेला मार्ग आहे.
योगाला जीवनाशी जोडले पाहिजे. अनेक लोक असतील, जे आज लवकर उठून टीव्ही पाहत असतील किंवा दिवसभरात त्यांना हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळेल. मी जगभरातल्या लोकांना विनंती करतो, तुम्ही स्वत:साठी, स्वत:ला जोडण्यासाठी, स्वत:ला ओळखण्यासाठी, स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की वाट पाहू नका. या जीवनात योगाला तुमच्या जीवनाचा भाग बनवा. काहीच कठीण काम नाही. फक्त ते करण्याची गरज आहे.
आपण योगाबाबत चर्चा करतो. ब्राझीलमध्ये एक धर्म मित्र योगी होते. त्यांचा असा दावा होता की योगाची 1008 आसने आहेत आणि त्यांनी प्रयत्न करुन 908 आसनांची त्यांच्या क्रियांची छायाचित्र काढली होती. ते ब्राझीलमध्ये जन्मलेले होते आणि योगाप्रति समर्पित होते. आज जगाच्या प्रत्येक भागात योग प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. जर योग आकर्षणाचा, प्रतिष्ठेचा विषय असेल तर ज्या महापुरुषांनी,ऋषिमुनींनी आपल्याला हे विज्ञान दिले, त्यांच्याप्रतीही आपली ही जबाबदारी बनते की, तो योग्य स्वरुपात आपण जगभरात पोहोचवला पाहिजे. आपल्याला क्षमतावृद्धी करायला पाहिजे. भारतातून उत्तमोत्तम योगशिक्षक तयार झाले पाहिजेत.
गुणवत्तेसाठी भारत सरकारची जी परिषद आहे, दर्जा परिषद, तिने योगाचे प्रशिक्षण कसे असावे, योगाचे शिक्षक कसे असावेत त्यासाठी काही नियम निश्चित करण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेसोबत संपूर्ण जगभरात योगाचा प्रोटोकॉल, वैज्ञानिक पद्धत यावर काम करायला सुरुवात केली आहे. देशभरात योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कशी व्यवस्था असावी, जगात योगाचे योग्य रुप कसे पोहोचेल, त्याची शुद्धता कायम राखण्यासाठी काय करावे, या संदर्भात काम सुरु आहे. यासाठी नव्यानव्या संसाधनांचीही आवश्यकता आहे.
तुम्ही पाहिले असेल, आजकाल मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, स्त्रीरोगतज्ञ गर्भार महिलांना गर्भारपणात योग करण्यासाठी आग्रह धरतात त्यांना योगशिक्षकाकडे पाठवतात, कारण प्रसूतीदरम्यान या योगिक क्रिया सर्वाधिक उपयोगी ठरतात. सांगण्याचे तात्पर्य असे की, जसजसा काळ जातो, जसजशा गरजा असतात त्यानुरुप संशोधन करुन बदल करणे गरजेचे असते.
आज आपण खूप व्यस्त झालो आहोत. स्वत:बरोबर आपण ना दुसऱ्याला जोडू शकत, ना आपण स्वत:साठी जगू शकत. आपण आपल्यापासूनच तुटत चाललो आहोत. आपण आणखी कोणाशी जोडले जाऊ न जाऊ पण योगामुळे आपण आपल्याशी जोडले जातो. म्हणूनच योग आपल्यासाठी शारीरिक, अध्यात्मिक आणि सामाजिक चेतनेचा केंद्रबिंदू झाला आहे. शरीरस्वास्थ्य तो देतो, अध्यात्मिक अनुभूतीसाठी मार्ग तो तयार करु शकतो आणि समाजाबरोबर संतुलित आचरण करण्याचे शिक्षण तो देतो म्हणूनच माझी अशी इच्छा आहे की, योगाला वादात अडकवू नका. तो सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आणि इहलोकाच्या सेवेसाठी आहे. परलोकासाठी संप्रदाय आहेत, धर्म आहेत, परंपरा आहे, गुरुमहाराज आहेत बरेच काही आहे. योग इहलोकासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आहे म्हणूनच आपण आपल्याला योगाशी जोडले पाहिजे. सगळे लोक योगाप्रती समर्पित नाही होऊ शकत. पण स्वत:शी जोडण्यासाठी योगाशी जोडले जाणे हा एक उत्तम मार्ग आहे. मला विश्वास आहे की, आपण या दिशेने पुढे जाऊ.
आज योग जगात एक मोठा आर्थिक व्यवसाय होत आहे. संपूर्ण जगात एक खूप मोठा पेशा म्हणून विकसित होत आहे. योग प्रशिक्षकांसाठी मागणी वाढत आहे. जगातल्या प्रत्येक देशात मागणी वाढत आहे. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. अब्जावधींचा व्यवसाय आज योग नावाच्या व्यवस्थेसह विकसित होत आहे. जगात अशा अनेक दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत, ज्या 100 टक्के योगासाठी समर्पित आहेत आणि त्या चालत आहेत. एक खूप मोठ्या व्यवसायाच्या रुपात हे विकसित होत आहे.
आज आपण हरेक पद्धतीने योग करत आहोत. योगाशी संबंधित सर्व मान्यवरांना आज या सार्वजनिक मंचावरुन मी एक प्रार्थना करु इच्छितो. ही माझी विनंती आहे. पुढल्या वर्षी जेव्हा आपण योग दिवस साजरा करु तोपर्यंत या वर्षभरात आपण इतरही अनेक गोष्टी करु पण एका विषयावर आपण लक्ष्य केंद्रित करु शकतो का ? तो विषय आहे मधुमेह (डायबेटिस) डायबेटिस आणि योग. योगाच्या विश्वातले सर्व जण, जे काही ज्ञान त्यांच्याजवळ आहे, पद्धत त्यांच्याजवळ आहे, वर्षभर योगाच्या इतरही बाबी चालतील, पण हे प्रमुख असेल. भारतात मधुमेह रुग्णांची संख्या वाढते आहे. योगाद्वारे मधुमेहातून मुक्ती मिळेल न मिळेल पण त्यावर नियंत्रण तर मिळवता येऊ शकेल. मधुमेहावर कोणते यौगिक उपाय आहेत ते सामान्य माणसाला शिकवण्यासाठी आपण लोकचळवळ उभारु शकतो का ? देशात मधुमेहामुळे होणाऱ्या त्रासातून काही टक्के लोकांना जरी आपण मुक्ती देऊ शकलो तर ते या वर्षीचे यश ठरेल. पुढल्या वर्षी आपण दुसरा आजार घेऊ. पण मी हे सांगू इच्छितो की,उत्तम आरोग्यासाठी वर्षभर एखाद्या आजारावर लक्ष्य केंद्रीत करुन दरवर्षी एक आजार घेऊन आपण लोकचळवळ चालवली पाहिजे.
योग केवळ आजारातून मुक्ती देण्याचा मार्ग नाही, योग ही उत्तम आरोग्याची हमी आहे. ही केवळ तंदुरुस्तीची नाही तर उत्तम आरोग्याची हमी आहे. जीवनाला जर समग्र विकासाकडे घेऊन जायचे असेल तर हा त्याचा उत्तम मार्ग आहे.
आज आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दुसरे वर्ष आहे. भारताने जगाला हा अनमोल वारसा दिला आहे. जगाने आज आपापल्या पद्धतीने त्याचा स्वीकार केला आहे. अशा वेळी भारत सरकारतर्फे दोन पुरस्कारांची घोषणा मी करत आहे. पुढल्या वर्षी जेव्हा 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाईल तेव्हा भारताकडून या दोन पुरस्कारांसाठी निवड केली जाईल. हे पुरस्कार त्याच समारंभात दिले जातील. एक पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर जे योगासाठी उत्तम काम करत आहेत त्यांच्यासाठी, दुसरा भारतात योगासाठी जे उत्तम काम करत आहेत त्यांच्यासाठी. एक आंतरराष्ट्रीय योग पुरस्कार, दुसरा राष्ट्रीय योग पुरस्कार.
व्यक्ती, संस्था कोणीही यात सहभागी होऊ शकतात. यासंदर्भातली जी तज्ञ समिती असेल ती याबाबत नियम तयार करेल, त्यांच्या पद्धती ठरवेल, परीक्षक निश्चित करेल. जगात अनेक पुरस्कार आहेत, त्यांचे माहात्म्य आहे. भारताची अशी इच्छा आहे की, योगाशी जोडल्या गेलेल्या जगातल्या लोकांना सन्मानित करावे. हिंदुस्थानात जे लोक योगासाठी काम करत आहेत त्यांना सन्मानित करावे आणि ही परंपरा पुढे न्यावी. हळूहळू राज्य आणि जिल्हा स्तरावरही आपण हे राबवू शकतो आणि त्या दिशेने काम करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
मी पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे आभार मानतो. भारताच्या या महान प्राचीन वारशाला सन्मानित केल्याबद्दल, त्याचा स्वीकार केल्याबद्दल, भारताच्या या महान परंपरेबरोबर जोडले गेल्याबद्दल संपूर्ण विश्वाचे मी हार्दिक आभार मानतो. संयुक्त राष्ट्रांचे आभार मानतो. देशवासियांचे आभार मानतो. मी योग गुरुंचे आभार मानतो. योगासाठी समर्पित सर्व पिढीतल्या लोकांचे आभार मी मानतो. ज्यांनी ही परंपरा टिकवून ठेवली आणि अत्यंत सर्मपित वृत्तीने जे ही पुढे नेत आहेत त्यांचे मी आभार मानतो. शून्य पैसेवाल्या या आरोग्य विम्याला आपण नवी ताकद, नवी ऊर्जा, नवी प्रेरणा दिली पाहिजे.
आज चंदिगडच्या या धरतीवर आत्ताच मी बादल साहेबांना विचारत होतो की, या परिसराचा इतका उत्तम उपयोग यापूर्वी कधी झाला होता का ? मी खूप पूर्वी इथे येत असे. मी चंदिगडमध्ये राहायचो. सुमारे पाच वर्ष मी इथे राहिलो आहे. त्यामुळे या गोष्टी मला माहीत आहेत. जेव्हा चंदिगडमध्ये हा कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा मी सांगितले की, यापेक्षा उत्तम जागा, उत्तम परिसर कुठला असू शकत नाही. आज या परिसराचा उत्तम उपयोग झाल्याचे पाहून मनाला खूप आनंद होत आहे. हजारोंच्या संख्येने लोक योगाशी जोडलेले पाहून मन प्रसन्न झाले. संपूर्ण विश्व जोडले गेले ही एक गर्वाची बाब आहे. मी पुन्हा एकदा या महान परंपरेला प्रणाम करतो आणि उज्ज्वल भविष्याची कामना करत धन्यवाद देतो.
धन्यवाद
No comments:
Post a Comment