K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 25 December 2018

दहावीच्या यशाची गुरुकिल्ली

       तुमची दहावी पर्यायाने पुढील शिक्षण सोपे करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने दाखवलेली ही वाट...
दहावीच्या सायन्स आणि गणिताच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकही गोंधळले आहेत पण या बदललेल्या विषयांचा अभ्यास कसा केला पाहिजे हे समजून घेतलं तर तुम्हाला निश्चितच दहावीच्या यशाची गुरुकिल्ली सापडेल. तुमची दहावी पर्यायाने पुढील शिक्षण सोपे करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने दाखवलेली ही वाट...
...............

दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत 'यशाची गुरुकिल्ली' या मार्गदर्शन कार्यक्रमात तज्ज्ञांकडून चचेर्ला आलेले मुद्दे.


गणित
अभ्यासक्रमामधील धड्यांची संख्या कमी करण्यात आली असून त्या धड्यांमधील मॅथॅमॅटिकल कन्सेप्टस् वाढवण्यात आल्या आहेत. सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना ११ वी आणि १२ वी मध्ये अभ्यासाव्या लागणाऱ्या अनेक संकल्पनांचा समावेश यामध्ये आहे. तसेच इंजिनिअरींग किंवा गणित विषयातील करिअरच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अभ्यासक्रमाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

विज्ञान

यंदाचा विज्ञानाचा अभ्यासक्रम हा अॅक्टिव्हीटी बेस आहे. थेअरी बरोेबरच वैयक्तिक आणि सामुदायिकरीत्या करण्याच्या अनेक प्रयोगांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयांवर आधारीत प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या संकल्पना चांगल्या प्रकारे स्पष्ट होण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सहभाग वाढवणारा तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पधेर्मध्ये टिकून राहण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करणारा हा अभ्यासक्रम आहे.

का बदलला अभ्यासक्रम?

बारावीनंतर घेतली जाणारी इंजिनिअरींग, मेडिकल आणि फार्मसीची सीईटी २०१३ मध्ये संपूर्ण देशभर एकत्रितरीत्या घेण्यात येणार आहे. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना या स्पधेर्ची काठिण्यपातळी आणि त्याचा अभ्यासक्रम याचा दहावीपासूनच सराव व्हावा यासाठी या विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम 'एनसीईआरटी' तफेर् तयार करण्यात आला आहे.

गणिताचा अभ्यास करताना...

पाढे, वर्ग, घन, गुणोत्तर, शतमान, घातांकाचे नियम, लसावी-मसावी या गणिताच्या बेसिक कन्सेप्ट्स तुमच्या डोक्यात पक्क्या असायला हव्यात. त्या पक्क्या नसतील तर इथूनच अभ्यासाची सुरुवात करा. पाठांतर करणे ही गणिताच्या अभ्यासाची पध्दत नसली तरी काही समीकरणे आणि नित्यसमानता यांच्या संकल्पना पाठ असणे गरजेचे आहे. अगदी छोट्या-छोट्या शंकाही शिक्षकांकडून दूर करुन घ्या कारण त्यामुळेच पुढे मोठ्या संकल्पना शिकणे सोपे होणार आहे.

विज्ञानाचा अभ्यास करताना...

केवळ धडा वाचून त्यावरुन प्रश्नोत्तरांचा सराव करण्याची पध्दत या अभ्यासक्रमात चालणार नाही. प्रयोगातून विज्ञान समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार केला असल्याने अभ्यासक्रमात समाविष्ट प्रयोग करुन पाहणे गरजेचे आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजण्यास मदत होईल. विज्ञानाच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे.

कसा करावा अभ्यास?

दहावीचा अभ्यास सुरु करण्याआधी विद्यार्थ्यांनी आपली दिनचर्या निश्चित करणे गरजेचे आहे.

सुरुवातीपासूनच दररोज ३ ते ४ तास अभ्यासाला देणे अपेक्षित आहे तसेच एका विषयासाठी एकावेळी ४० मिनिटांपेक्षा अधिक वेळ अभ्यास करणे टाळावे. प्रत्येक विषयाला असलेल्या मार्कसच्या वेटेजनुसार त्या-त्या विषयाचा अभ्यास करावा.

दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'मिशन एसएससी' या संस्थेतफेर् दहावीचे विद्याथीर् आणि पालकांसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये, अभ्यास कसा करावा, त्याचा विद्यार्थ्यांना होणारा फायदा यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ घेणे शक्य झाले नाही त्यांच्यासाठी 'प्रगती फास्ट'च्या टीमकडून काही निवडक टीप्स.

प्रा. संजय रानडे

गणिताच्या मूळ संकल्पनांची तयारी म्हणजेच दहावीची तयारी. अनेकदा या संकल्पना स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांचा परीक्षेत मोठा तोटा होताना दिसतो त्यामुळे या तयारीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाथीर् व्हावेच पण परीक्षाथीर् होणेही तितकेच गरजेचे आहे. मॅथेमॅटिकल कन्सेप्ट समजून घेण्याबरोबरच परीक्षेच्या तयारीला महत्त्व देणे आवश्यक आहे. दहावीच्या गणितअभ्यासक्रमामध्ये समाविष्ट धडे हे पुढील अभ्यासक्रमांची बेसिक तयारी असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही तयारी अत्यंत महत्वाची आहे.

डॉ. अ. ल. देशमुख

दहावी म्हणजे पाठ्यपुस्तकाबाबतची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांनी इतर मार्गदर्शक पुस्तकांपेक्षा पाठ्यपुस्तकांवर भर द्यावा. सरावासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेले प्रश्नपत्रिका संच विकत घेताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एकाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका असलेले संच घेण्यापेक्षा वेगवेगळया नमुन्यांच्या प्रश्नपत्रिका असणारे संच घेण्यास प्राधान्य द्यावे. अभ्यासक्रमामधील वैयक्तिक प्रयोग करण्यासाठी आवश्यक असणारी काही केमिकल्स विद्यार्थ्यांनी स्वत: विकत घेऊन ते प्रयोग करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment