K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 20 December 2018

ACCIDENT (अपघात)

ACCIDENT (अपघात)


           तरणीबांड मुलं  किडयामुंगींसारखी मरायला नकोत म्हणून हा "पोस्ट प्रपंच ".
ही पोस्ट माझी नाही,पण सर्वाना उपयोगाला यावी म्हणून संकलन करून पुढे पाठवत आहे--
      खरं म्हणजे आपण मुलांशी महत्त्वाचं बोलायला हव. त्यांच्याशी संवाद वाढायला हवा.
 *पालक म्हणून हे नक्की करा*
1) लायसेन्स असल्याशिवाय कोणतेही वाहन हातात देवू नका.
2) आपले मित्र,नातेवाईक यांनी आपल्या मुलाचे "रफ ड्रायव्हिंग" बाबतीत आपल्याला सांगितल्यास त्याकडे दूर्लक्ष नको. मुलाला लगेच जाब विचारा.
3) मुलाला बाईक घेताना त्याबरोबर "हेल्मेट" लगेच घ्या.
4) मुलगा असो वा मुलगी हेल्मेट  वापरायला भाग पाडा.
5) एक किलोमीटर अंतराचे आत काम असल्यास मुलांना गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक द्या.
6) प्रत्येक घरात एक सायकल हवीच.
 *मुलांनो हे टाळा*
1) भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय गाडीला हात लावू नका.
2) कुठलेही वाहन हे लवकर जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या.
3) कोणाच्याही गाडीवर "ट्रिपल सीट " नको.
4) वाहनावर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल "फाजील आत्मविश्वास " नको.
5) गाडीची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच गाडी स्टार्ट करा.
6) वळणावर आजीबात "ओव्हरटेक "नको.
7) गावात 20ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते  50 स्पिड पुरेसा आहे. यापेक्षा जास्त स्पिड नको.
8) मित्रांच्या नादाने "रेसिंग किंवा स्टंट "करू नका.
9)बाईकला असलेले दोन्ही आरसे काढण्याचे फॅड आलंय. पण तसे करणे चुकीचे आहे.
10) रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका.
11) रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि.. रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. कडेला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे.
12) आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर "फास्ट"येवू नका.
13) *डंपर,ऊसाचा ट्रक,सिमेंट- काँक्रीट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर* यांच्या जास्त जवळ जावू नका.
14)मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका.

      *गाडीची काळजी*
1) गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे.
2) दोन्ही ब्रेक- मागचा/ पुढचा लागतो का याची खात्री करा.
3) दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे.
4)गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्वाचे आहे.
5) वळताना इंडीकेटरचा वापर करा.
 *मुलांनो हे आवश्य करा*
1) आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्याच्या आई-वडीलांना ताबडतोब द्या.
2) दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा.
3) गाडी- टूव्हिलर शक्यतो पिवळ्या रंगाची घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो.
4) ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा.
5) रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे नकोत. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा.
6) पुढच्या वाहनापासून किमान 15  फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा.
7) टूव्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहूण्यासारख वागाव. मोठ्या वाहनांचा आदर करावा.
 ट्रक,बस इ.वाहनांचा *DT ड्रायव्हिंग टाईम* जास्त असतो. त्या वाहनांच्या ड्रायव्हरची खोड काढू नका. बर्याचदा या मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर स्ट्रेस आणि टेंशन मधे असतात.

       *सर्व शहरवासीयांनी*
 बेशिस्तपणे वाहन चालविणार्या मुलांची माहिती त्याच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी.
 *मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो*
 प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी


सहाय्यक पोलीस आयुक्त,
    ट्रॅफिक पुणे सिटी

No comments:

Post a Comment