K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 19 November 2018

पडो..... झडो.........मूल वाढो...

डॉ .सुकुमार मुंजे
M.D(Adv. Hypno & NLP)

*पडो.....  झडो.........मूल वाढो..*

*आजकालच्या आया मुलांच्याबद्दल अतिदक्ष असतात. त्यांचे लहान निर्णय सुद्धा स्वतःच घेतात यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत.*

*उदाहरणच द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांनासुद्धा आया आज हात धरून रस्ता ओलांडून देतात. त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे किंवा अतिवर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यांवरसुद्धा हीच स्थिती दिसते. ही वर्तणूक मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे*.

*मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला - "स्वराली" हिला - तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो. गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली होती. ती गाडीतून उतरून रस्ता ओलांडून जाण्याच्या तयारीत राहिली, पण हा रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास ५ ते ७ मिनिटे लागली. रस्ता ओलांडणे तिला का जमत नव्हते? निरीक्षण करताना असे दिसले की, समोरून येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत नव्हता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात तिच्या जवळून जाईल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.*

*एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला अतिशय जपते, इतके की, सायकलसुद्धा बिल्डिंगच्या आवारातच फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेलेसुद्धा तिच्या आईला चालत नाही, लगेच डॉक्टरांच्याकडे घेऊन जाते... यामुळे स्वराली सायकलवरून पडली किंवा घरात तिला थोडेही लागले तरी जोरजोरात रडते. ह्याचे  कारण तिच्यात सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई किंवा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरातील वातावरण गंभीर होते. या सर्व उदाहरणावरून आपण येणारी पिढी पंगू तर करत नाही ना? याचा सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.*

*लहानपणी मुले खेळताना पडलीच पाहिजेत. त्यातून त्यांची सहनशीलता वाढते,  वेदनेचा दाह शमवण्याची सवय होऊ लागतेे, तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा यामुळे ही नाजुक मुले भविष्यात नाऊमेद किवा अपयशी होण्याची शक्यता अधिक असते. तसेच संघर्षशक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो. याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते आणि धाडसी निर्णय घेताना मन कचरते.*

*आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत. साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढताना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणाला तरी बोलावून करूया", असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हँनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते.*

 *आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते?*

*पाश्चिमात्य देशांत मुले आपली सायकल (पंक्चर इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते, यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात.*

*नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किंवा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर घालणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे. लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहेत.*

*स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा. आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा. दोन कप चहासाठी किती चहा साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही. हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे!, ही जखम दोन दिवसांची असते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. या व अशा कामांतून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते, तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते.*

*आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते,*
*"मला जे कष्ट करावे लागले ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत" इतकी मी धन दौलत करून, त्यांची सोय करून ठेवणार आहे." मुळात हा विचारच अधोगतीकडे घेऊन जाणारा आहे हे पालक विसरले आहेत. तुम्ही अपार कष्ट उपसले म्हणून धन संचय करू शकलात. तेच कष्ट तुमच्या मुलांना शिकवले नाहीत तर तुम्ही मिळवलेले ते धन तुमच्या नंतर संपून जाईल हेच यांना समजत नाही.*

 *याच्या उलट अभ्यासासाठी मात्र मुलांवर हे पालक अतोनात जबरदस्ती करताना दिसतात, म्हणजे तुम्हाला बौद्धिक पातळी वाढवायची आहे, पण शारीरिक क्षमता घालवायची आहे हेच दिसून येते.*

*लक्षात ठेवा, हे सर्व शिकवले नाही तर नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे,*
*पडो, झडो, मूल वाढो, हे त्रिवार सत्य आहे.*

No comments:

Post a Comment