K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 19 November 2018

शाळेत जाणाऱ्या मुलांचा आहार कसा असावा

शाळेत जाणाऱ्या मुलांचा आहार कसा असावा


                    मुले लहान असतात तेव्हा आया काही ना काही प्रकार करून त्यांना खायला घालतात. मात्र जशी मुले मोठी होतात म्हणजे आईपासून लांब  होत शाळेत जाऊ लागतात तेव्हा मात्र मुलांचा आहार संतुलित कसा राहिल याकडे आईचे लक्ष अधिक असते. कारण मोठ्या होत जाणाऱ्या मुलांची पोषणाची गरजही वाढते. हल्ली लहान वयातही मुलांना अनेक आजार ग्रासताना दिसताहेत. त्यामागे काही प्रमाणात का होईना आहाराच्या बदलत्या सवयी आणि व्यायामाचा अभाव ही कारणे आहेतच. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या किंवा पाच वर्ष वयावरील मुलांना संतुलित आहार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शारिरीक आणि बौद्धिक विकास हा संतुलित आहारामुळेच होतो. दिवसभर मुलांना उर्जा मिळण्यासाठी उपयुक्त असाच आहार शाळकरी मुलांना देणे गरजचे आहे. कॅलरीच्या भाषेत सांगायचे तर शाळकरी मुलांना दिवसभरात १९२५ कॅलरी उर्जा मिळणे आवश्यक आहे.
आयुर्वेदाच्या मते मुलांमध्ये चार धातूंचे पोषण व्यवस्थित व्हायला पाहिजे. जेणेकरून मुलांचा सर्वांगिण विकास होईल. हे चार धातू म्हणजे रक्तधातू, मांसधातू, अस्थिधातू आणि मज्जाधातू. त्यांचा प्रत्येकाचा शरीराच्या वाढीमध्ये सहभाग असतो. रक्त, मांस, बौद्धीक वृद्धीसाठी मज्जाधातू, सर्व शरीर, अवयवांना प्राणशक्तीचा पुरवठा करतो तो रक्तधातू, शारिरीक विकासासाठी, दमसासवाढण्यासाठी मांसधातू, उंची आणि मजबूतीसाठी अस्थिधातू यांची गरज असते. हे धातू वृद्धींगत होणे आवश्यक असते
http://aaosairam.blogspot.com​
◆के जीवनसत्त्व
मुलांमध्ये हाडांच्या निर्मितीसाठी हे महत्त्वाचे आहे. शिवाय फुफ्फुसाच्या संक्रमणापासून बचाव करते. के जीवनसत्त्व ब्रोकोली, कोबी, मासे, हिरव्या पालेभाज्या मधून मिळते.
◆ए जीवनसत्त्व
हाडांच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे जीवनसत्त्व आहे. पेशी आणि उती यांच्या विकासासाठी गरजेचे असते. याच्या कमतरतेमुळे हाडांच्या विकासावर प्रभाव पडतो. ए जीवनसत्त्वामुळे डोळ्यांची दृष्टी चांगली राहण्यास मदत होते. ए जीवनसत्त्व मिळण्यासाठी आहारात गाजर, मेथी, कोबी, माश्याचे तेल, अंड्याचा पिवळा बलक, पालक, मेथी आदींचा समावेश असावा.
◆बी कॉम्प्लेक्स
लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्व आहे. यामुळे शरीरात प्राणवायूचे वहन होते. शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी प्राणवायूची गरज असते. तसेच चयापयच क्रिया सुयोग्य राहण्यासाठीही बी कॉम्प्लेक्स आवश्यक असते. अ‍ॅनिमिया होण्यास याची कमतरता कारणीभूत असते.बी कॉम्प्लेक्स मिळण्यासाठी सालासकटचे धान्य, मासे, चिकन, अंडी, दूधाचे पदार्थ तसे हिरव्या पालेभाज्या, फळे खावी.
http://aaosairam.blogspot.com​
◆डी जीवनसत्त्व
मुलांच्या एकूणच शारिरीक विकासासाठी डी जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. शरीरात कॅल्शिअमची पातळी राखण्यासाठी हे आवश्यक आहे तसेच स्नायूंची कार्यप्रणाली आणि हाडांची मजबूती यांच्यासाठी डी जीवनसत्त्वाची गरज असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डी जीवनसत्त्वाचा नैसर्गिक स्रोत म्हणजे सकाळची कोवळी उन्हे. त्याशिवाय दूध, अंडे. चिकन, मासे यांच्या सेवनातून डी जीवनसत्त्व मिळते.
◆सी जीवनसत्त्व
मुलांची प्रतिकार शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते त्यामुळे मुले लवकर आजारीही पडतात. सी जीवनसत्त्वाचे सेवन केल्याने प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे संसर्गापासून बचाव होता. सी जीवनसत्त्व हिरड्यांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. तसेच लाल रक्तपेशींची निर्मिती क़रण्यास सहाय्य करते. सी जीवनसत्त्वाचे महत्त्वाचे काम म्हणजे शरीरात लोहाचे शोषण करण्यास मदत करणे.सी जीवनसत्त्वासाठी वर्गीय फळे म्हणजे संत्रे, मोसंबी, qलब तसेच स्ट्रॉबेरी, टोमॅटो, बटाटा, खरबूज, कलिंगड, फ्लॉवर, पालक, पपई आणि आंबा यांचे सेवन करावे.
◆ई जीवनसत्त्व
लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये याची मदत होते. जन्मतःच बाळांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असते. त्यामुळे मुलांना ई जीवनसत्त्वयुक्त आहार दिला पाहिजे. त्यामुळे मुलांना जंतुसंसर्ग होण्यापासून रक्षण होते. ई जीवनसत्व मिळण्यासाठी सुकामेवा, बदाम, अक्रोड, सूर्यफुलाचे बी, रताळे, आंबा, पपई, भोपळा आदींचे सेवन करावे.
◆प्रथिने
वाढत्या वयाच्या मुलांना प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळणे अत्यंत आवश्यक आहे. स्नायूंचा विकास आणि हाडाची मजबूती यासाठी दुधाचे पदार्थ, पनीर, अंडी मांस आदींचे सेवन करावे.
http://aaosairam.blogspot.com​
◆फळे
जीवनसत्त्वे मिळवण्यासाठी फळांचा समावेश केला जातोच पण फळांमध्ये लोह आणि इतरही काही पौष्टीक घटक असतात त्यामुळे मोसमानुसार फळांचे सेवन करणे आवश्यक आहे.
◆पाणी आणि तंतुमय पदार्थ
आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणेही आवश्यक आहे. त्याशिवाय विविध सूप, नारळपाणी, फळांचे रस आदी मुलांना प्यायला द्यावे. त्याशिवाय आहारातील बदलांमुळे तंतुमय आहार घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुलांना तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात द्यावेत. त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.
◆या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
मुलांना दिवसभरात पाच वेळा विविध पौष्टीक पदार्थ द्यावेत. खाण्यासाठी मुले कंटाळा करत असतील तर त्यांना समजावू सांगावे.
◆मुलांसाठी पदार्थ बनवताना विविधता ठेवल्यास मुले आनंदाने जेवतात. काकडी, फळे किंवा कच्च्या भाज्या खाण्याची सवय लावावी. मुलांना मैदानी खेळ खेळू द्यावेत जेणेकरून त्यांना भूक लागेल.
http://aaosairam.blogspot.com​
◆मुलांना घरातील ताजे, स्वच्छ आहार घेण्याची सवय लावावी. जंकफूड, फास्टफूड टाळावे. त्यासाठी पालकांनीही मुलांसमवेत घरातील आहार सेवन करावा. त्यांच्यासमोर जंकफूडचे सेवन करू नये आणि त्यांनाही सवय लावू नये.
◆आयुर्वेदानुसार धातूंचे पोषण करण्यासाठी वर दिलेला आहार सेवन करणे गरजेचा आहे. त्याव्यतिरिक्त काही जीवनसत्त्वांचा समावेश मुलांच्या आहारात होणे गरजेचा आहे.

No comments:

Post a Comment