K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 3 November 2018

आरोग्य विषयक

*मुत्रमार्गातील खडे व उपचार* *मूतखडा* नेहमी आढळणारा आजार म्हणजे मुत्रमार्ग व किडनीतील खडे स्टोन त्याच्या सोबतच्या गैरसमजूती बऱ्याच आहेत उदा. लक्षणावरून इतर तपास न करता मुतखड्याचे निदान करणे व त्याच्या बरोबर गावठी उपाय व गोळ्या चालू करणे एकदा निदान झाल्यावर गोळ्या किंवा गावठी उपाय वर्षानुवर्षे चालू ठेवणे ( बऱ्याच वेळा किडनीवर त्याचे दुष्पपरिणाम होवून ती काम करणे बंद होते.) सोनोग्राफी करुन घेणे व योग्य सल्ला न घेता तसेच गोळ्या चालू करणे पित्तपिशवीच्या खड्यांविषयी गोळ्या चालू ठेवण्याबाबत अशाच गैरसमजूती आढळतात. पोटात दुखत असल्यास दुखीचे इंजेक्शन घेणे. बऱ्याच वेळा मुत्रमार्गात मुतखडा अडकून भयंकर वेदना होतात त्यावेळी तपास करुन निदान न करता लोक परत परत दुखीवरचे इंजेक्शन घेत राहतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटते पण यामुळे आजार बळावून किडनीचे कार्य कमी होते, ती काढावी सुद्धा लागू शकते. *मुतखडा होणे टाळण्यासाठी काय करावे?* पाणी भरपूर पिणे. लघवी तुंबवून न ठेवणे. काढलेला स्टोन/पडलेले स्टोन तपासून घेऊन ते कुठच्या प्रकारचे आहे ते जाणून घेऊन त्याप्रमाणे पथ्य करावे. *मुतखड्याची लक्षणे कोणती?* पोट दुखणे. लघवीला त्रास होणे. लघवी तुंबणे. कधी कधी जंतूचा होऊ व ताप येणे. लघवीतून रक्त जाणे. *मुतखड्याचे निदान करण्यासाठी काय करावे?* लघवीची तपासणी करणे, त्यामध्ये लघवीतील रक्तपेशी व जंतंच्या प्रादुर्भावचे निदान होते.सोनोग्राफी जी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे जंतूंच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसली आहेत का? किडनीला त्याचा काही त्रास आहे का? या सर्वांची उत्तरे आपल्याला सोनोग्राफीतून मिळतात पण त्याच्याबरोबर नुसती सोनोग्राफी करुन भागत नाही त्याच्याबरोबर इतर तपास, लक्षणे व सर्व रिपोर्टचा एकत्रित विचार करुन मग त्याच्यावर उपचार ठरवावे लागतात. रक्त तपासणी करुन किडनीचे कार्य कमी झालेले नाही ना हे तपासावे लागते. एकदा निदान झाल्यावर काय उपचार करु शकतात? उपाय हे मुतखड्याचा आकार, स्थान, जंतूचा प्रादुर्भाव किदनीला होणारा त्रास, इतर रिपोर्टस यावर अवलंबून असतात. एक महत्त्वाची गोष्ट सांगाविशी वाटते. काही मुतखडे निदान झाल्याझाल्या लगेच काढावे लागतात काही मुतखडे एकाद दुसरा महीना थांबून तुम्ही बघू शकता पण त्यावर लक्ष ठेवावे लागते. ते विरघळले आहेत का? हे अधून मधून बघावे लागते. तर काहींना काहीच करावे लागत नाही. वरील निर्णय घेण्यासाठी / युरोलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते मुतखडा होणे ही प्रवृत्ती आहे... मुतखडा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे..... ज्यांना एकदा मुतखडा झालेला आहे अश्या रुग्णांनी काळजी घ्यावी. 1.खडा पडल्यानंतर किंवा दुर्बिणीने काढल्यानंतर सुद्धा दुसरे मुतखडे होऊ शकतात. दर सहा महिन्याला तपासणी करून घेणे आवश्यक आहे. 2.पोटात दुखल्यास ताबडतोब केव्हाही अगदी रात्री अपरात्री जास्त दुखल्यास दुर्लक्ष करू नये. 3.रोज भरपूर पाणी पिणे तासाला १ ग्लास दिवसाला साधारण ५ ते 10 लिटर प्यावे. रूतु व शारीरीक षमते नुसार 4.एकदा मुतखडा झालेल्या रुग्णांना परत मुतखडा होण्याची शक्यता जास्त असते. 5.कॅल्शियम युक्त पदार्थ टाळावे. पुन्हा खडे होऊ नये म्हणून *हे पदार्थ टाळावे* पालक, टोमॅटो, आवळा, चिकू, काजू, काकडी, कोलिफ्लोवर, पम्पकीन (भोपळा), मशरूम, वांगी चुना तंबाखू चहा *हे पदार्थ भरपूर घ्यावे* नारळ पाणी, बदाम, लिंबू, बार्ली, कुळीत डाळ, गाजर, अननस रस, केली, कारली हे .मक्याच्या कनिसातील केसांचा काढा कुळीताची आमटी 1) पाणफुटीचे पाण 4 ते 6 2) मिरे 10 3) लवंग 10 4) बडीसोप 1 चमचा 5 लिंबाचा रस 2 चमचे इडलिंबू गळलींबु किंवा साध लिंबू हा प्रयोग 6 ते 12 दिवस करावा पुन्हा खडे होऊ नये म्हणून वरील प्रयोग आवशकते नुसार 6 दिवसांनी repeat करावा.

No comments:

Post a Comment