K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 22 November 2018

कोरड्या खोकल्यावरती घरगुती उपाय

कोरड्या खोकल्यावरती घरगुती उपाय 


               श्वासनलिकांच्या अनेक साधारण आजारांमध्ये कोरडा खोकला आढळतो. धूर, प्रदूषित वातावरण आणि जंतू यांमुळे घशाचा व श्वासनलिकांचा दाह होतो. यामुळे कोरडा खोकला येतो.
लहान मुलांमध्ये टॉन्सिलच्या ग्रंथींवर सूज असल्यास कोरडा खोकला येतो. चाळिशीनंतर घशात कर्करोगाची वाढ असू शकते. यामुळेही कोरडा खोकला येऊ शकतो. कर्करोगासाठी घशाची ‘आतून’ आरशाने तपासणी करायला लांब दांडीचा आरसा लागतो. उपचाराने कोरडा खोकला १०-१५ दिवसांत बरा झाला नाही तर तज्ज्ञांकडे पाठवावे.
◆उपचार
कोडीनयुक्त खोकल्याचे औषध किंवा गोळी मिळते. हे औषध वयाप्रमाणे अर्धा किंवा एक चमचा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्याने कोरडा खोकला तात्पुरता थांबतो.
◆आयुर्वेद
अडुळसा पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून ३-४ वेळा द्यावा. आयुर्वेदिक औषधांच्या यादीमध्ये इतरही औषधे आहेत त्यांचा वापर करता येईल. अडुळसायुक्त औषधेही (सिरप किंवा अवलेह म्हणजे चाटण) मिळतात.
■आयुर्वेदिक घरघुती उपचार
◆फुफ्फुसाशी निगडीत दमा, खोकला, अॅलर्जी, सायनस, आदींना दूर ठेवण्यासाठी काही दैनंदिन वापरात येणाऱ्या आयुर्वेदिक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. काही पदार्थ आपल्या घरातच असतात.पण आपल्याला त्यांचा वापर कसा करावा, हे माहित नसते.
◆सुंठ हे फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले असते. सुंठ उगाळून खडीसाखर घालून आणि शिजवून तयार केलेले चाटणाचे पाक खोकला असलेल्या व्यक्तींनी थोड्या थोड्या वेळाने घेतल्यास बरे वाटते. वारंवार सर्दी होणाऱ्यांना आणि दमा असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर केल्यास फुफ्फुसासाठी चांगले असते.
◆ज्येष्ठमध फुफ्फुसासाठी उत्कृष्ट औषध आहे. ज्येष्ठमधाचा काढा घेतल्याने खोकला बरा होतो.
◆तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीती भरलेला कफ सुटण्यास मदत होते तुळशीची पाने चावून खाल्ल्यास श्वसनाचे आरोग्य सुधारते.
◆लवंग चघळण्याने दम लागत नाही लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते.
◆गवती चहा,ज्येष्ठमध,दालचिनी, तुळस, पुदीना यांचा काढा थोडीशी साखर घालून पिण्याने ताप, खोकला,सर्दी कमी होतो.श्वासाशी संबंधित असलेले त्रास होत नाहीत.
◆रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे, श्वसनसंस्थेसाठी उत्तम असते. दम लागत असल्यास, छातीत कफ भरला असल्यास अगोदर ताल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात आणि कफ दोष संतुलित होतो.
◆ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी एकत्र करून जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसाची ताकद वाढते आणि खोकला होण्यास प्रतिबंध होतो.
अशाप्रकारे आयुर्वेदिक घरघुती उपचार केल्यास आजार किंवा व्याधीदूर होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
       !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​

No comments:

Post a Comment