K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 21 November 2018

राष्ट्रीय गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

संदेश क्रमांक - १

*अति महत्वाचे*

---------------------

🇮🇳 *राष्ट्रीय गोवर_रुबेला(MR) लसीकरण मोहिम* 🇮🇳

--------------------------------------

*लस न दिल्यास होणारे आजार* ==*

1) गोवर आजार गंभीर  आहे.  फक्त  पुरळ येणे  म्हणजे  गोवर नाही , तर गोवर आजारामुळे  त्या  मुलाची  प्रतिकारशक्ती कमी होते व  इतर आजाराने  मृत्यू  होण्याची शक्यता  जास्त  असते. 

2) भारतात गोवर मुळे अनेक मुले दगावतात.

(गोवर डोस पूर्ण देत नाही. पहिला डोस 9 वा महिन्यात व दूसरा डोस 16 ते 24 महिने डोस पूर्ण न करणे.)

4) रूबेला हा पण  संसर्गजन्य आहे.

5) त्यामुळे सर्दी, डोळे लाल होणे, ताप, कानाला सूज येणे.

-------------------------------------

*डोस दिल्यास===*

1) गोवर व रूबेला आजाराची प्रतिकार शक्ती मिळते.

2) रूबेला पासून सुटका.

3) गोवर पासून मुक्तता.

---------------------------------------

प्रत्येक विद्यार्थी यांना प्रमाणपत्र 

--------------------------------------

*लस किती सुरक्षित==*

1) 1 सूई एकदाच वापरता येते.(ऑटो सिरिन)

2) 2ते8 अंश सेल्सियस तापमानात असते.

3) अनुभवी डॉक्टर.

4) उजव्या दंडला डोस.

5)30 मिनट विद्यार्थी देखरेकीखाली असणार.

6) सोबत एमर्जेन्सी किट 1 डॉक्टर, 1 आरोग्य  सेविका  व 3 मदतनीस

7) सर्व दवाखान्याशी संपर्क असणार.

---------------------------------------

*कोणाला द्यावी=====*

1) 9 महिने ते 15 वयोगटातील सर्व मुले व मुली 

2) पुर्वी दिली असेल तरी

3) 10 वी चे सर्व मुलांना देण्यास काही हरकत नाही.

4) अंध ,अपंग  विद्यार्थी असेल तरी

---------------------------------------

*कोणाला नाही द्यायची===*

1) खूपच आजारी असेल तर.

2) एडमिट असेल तर.

 ----------------------------------------

 *डोस  तारीख 27 नोव्होंबर 2018 पासून मोहीम चालू होईल.* 


संदेश क्रमांक - २

                ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा ही नम्र विनंती.                                                         🌹 *MR लसीकरण मोहिम* 🌹
"""""""""""""""""""""""""""""""""""""""                         
    *MR लसीकरणा विषयीचा*                                                    *संवाद राम आणि शामचा*                               
*रामः* अरे शाम मित्रा तुझ्या मुलांना MR ची लस जरुर दे बरं !

*शामः* अरे पण MR लस म्हणजे काय ?

*रामः* अरे MR लस म्हणजे मिझल आणि रुबेलाची या आजारावरची लस.

*शामः* म्हणजे गोवर आणि रुबेला ?

*रामः* हो. गोवर आणि रुबेला.

*शामः*  पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?

*रामः* अरे मित्रा गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.

*शामः राम ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?

*रामः* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे  बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम  होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.

*शामः* ते कसे ?

*रामः* अरे मित्रा शाम, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?

*शामः* अरे राम मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?

*रामः* शाम रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.

*शामः* मित्रा आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?

*रामः* अरे तुझी मुले ज्या शाळेत शिकतात तिथे तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यावस्था केलीआहे.

*शामः* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?

*रामः* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी,पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अरे शाम, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लससीचा डोस आवश्य द्यावे.                                                   *शामः* राम खरोखरच तुला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेस. मित्रा, मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस आवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद मित्रा धन्यवाद !                                   

*प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
सर्वजण मिळून करुया,
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l*



No comments:

Post a Comment