K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 19 November 2018

डोळ्यावरची काळी वर्तुळे ह्या घरगुती उपायांनी घालवा

डोळ्यावरची काळी वर्तुळे ह्या घरगुती उपायांनी घालवा


तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली डार्क सर्कल्स तयार होतात. जर तुमच्याही डोळ्यांच्या खाली असे डार्क सर्कल्स तयार झाली असतील, तर काळजी करण्याची काहीही कारण नाही. या लेखात आम्ही घरच्या घरी ही डार्क सर्कल्स कशी घालवायची याचे काही उपाय सांगणार आहोत.
◆बदाम तेल
पूर्णपणे नैसर्गिक असलेलं बदाम तेल केसांच्या व त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे डार्क सर्कल्स नाहीशी होतात.
●वापर कसा करावा
झोपण्यापुर्वी डोळ्याखाली बदाम तेल लावून हळूवारपणे मालिश करा. रात्रभर हे ऑईल तुमच्या चेहऱ्यावर असू द्या. सकाळी थंड पाण्याचे चेहरी धुवा. जोपर्यंत तुमचे डार्क सर्कल्स पुर्णपणे नाहीशी होत नाहीत, तोपर्यंत दररोज हे करा.
◆ काकडी
डोळ्यांवर काकडीचे स्लाईस लावून स्पा घेणाऱ्या हॉलिवूडच्या चित्रपटांतील महिला तुम्हा आठवत असतील. त्यामागे हेच महत्त्वाचे कारण आहे. काकडीमुळे त्वचा चमकदार बनते. त्याचबरोबर थकलेल्या डोळ्यांना आरामसुद्धा मिळतो. काकडी शरीरासाठी थंड असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत सुद्धा होते. तसेच काकडी आणि लिंबाचा रस एकत्रित करून डोळ्याखाली 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवावा. त्यामुळे डोळे अधिकच आकर्षक वाटतील.
●कसा वापर करावा
ताज्या काकडीचे स्लाईस तयार करून सुमारे 30 मिनिटे ते थंड करा. त्यानंतर काकडीचे हे स्लाईस दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा,आठवडाभर दिवसातून दोन वेळा ही क्रिया करा.
◆ कच्चा बटाटा
बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक असतात. त्यामुळे बटाट्यामुळे त्वचेचा तजेलदारपणा वाढून डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळे नाहीशी होण्यास मदत होते. डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळे हटवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रसही वापरू शकता.
●कसा वापर करावा
बटाटी थंड करा. त्याचा किस करून त्याचा रस काढा. हा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांभोवती लावावा. हा बटाट्याचा रस पुर्णपणे तुमच्या डोळ्यांभोवतीच्या डार्क सर्कलवर लागला आहे की नाही हे पाहा. 15 मिनिटांपर्यंत हा रस तुमच्या डोळ्यांभोवती असू द्या. तो सुकल्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. डोळ्यांभोवती असणारी काळी वर्तुळे फिकी होण्यास मदत होते. दोन ते तीन आठवडे रोज एक किंवा दोन वेळा हे करा
◆ गुलाब पाणी
आपल्याला आईने गुलाब पाण्याने चेहरा धुण्यास सांगितल्याच आठवत असेल. त्यामागे खूप महत्त्वाची कारणं होती. गुलाब पाण्याने केवळ त्वचेचा रंग बदलत नाही, तर डोळ्याभोवतीचे डार्क सर्कल्स दूर होण्यासही मदत होते. तसेच थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो.
●कसा वापर करावा
गुलाब पाण्यात मिनिटभरासाठी कापसाचे बोळे बुडवा त्यानंतर हा कापसाचा बोळा तुमच्या बंद केलेल्या डोळ्यांवर ठेवा.15 मिनिटांनंतर हे कापसाचे बोळे काढा.दोन ते तीन आठवड्यांसाठी रोज दोनवेळा ही कृती करा.
◆टोमॅटो
टोमॅटोमध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे घटक असतात. टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करून डोळ्यांभोवती लावावा. टोमॅटोमुळे चेहऱ्याचा ग्लोसुद्धा वाढतो.
●कसा वापर करावा
एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण 10 मिनीटे डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने ते धुवावे.दिवसातून साधारण दोनवेळा दोन ते तीन आठवडे हा प्रयोग करा.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
╔══╗       संकलन: कुलदिप बोरसे
                  स्रोत:- सौंदर्य उपचार
╚══╝ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ   +९१८२७५५९१३२१
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █ ▄ █
           
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
      !!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!​​

No comments:

Post a Comment