शिक्षक पालक सभा
( पालक शिक्षक सभा समिती )
Parents Teacher Committee
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकशाळांच्या भौतिक, शैक्षणिक व विद्यार्थी विकासाच्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी व शालेय कामकाजामध्येपालकांचा सक्रिय सहभाग व सहयोग वाढवण्यासाठी दिनांक16 मे 1996 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक मान्यताप्राप्तशाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्यकरण्यात आले आहे. त्या अनुषंगाने माध्यमिक शाळासंहितेतील नियम क्रमांक 3.2 मध्ये तरतूद करण्यात आलेलीआहे.
त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील प्रत्येकखाजगी विनाअनुदानित शाळेतही पालक-शिक्षक सभास्थापने संदर्भात निर्णय देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने दिनांक 24 ऑगस्ट 2010 रोजी शासन निर्णय पारितकरण्यात आला या शासन निर्णयामध्ये पालक-शिक्षक संघाचेमार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली.
पालक-शिक्षक सभेची मार्गदर्शक तत्त्वे:
१. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक पालक-शिक्षकसंघाचे सभासद असतील.
२. पालक-शिक्षक संघाच्या मूळ उद्देश विद्यार्थी वशिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे. पालक शिक्षकसंघाने शाळेचा दैनंदिन कामकाजात व प्रशासनात लक्ष्यघालने अपेक्षित नाही.
३. प्रत्येक शाळेत पालक शिक्षक सभेची स्थापना करणेअनिवार्य आहे.
४. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तीस दिवसाच्याआत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे प्रत्येक शैक्षणिकसंस्थेला बंधनकारक असेल.
पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीचीरचना:
१. अध्यक्ष प्राचार्य /मुख्याध्यापक
२. उपाध्यक्ष पालकांमधूनएक
३. सचिव शिक्षकांमधूनएक
४. सहसचिव (२) पालकांमधून १ वशिक्षकांमधून १
५. सदस्य प्रत्येक इयत्तेतील एकशिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एकपालक
(जेवढ्या तुकडे असतील तेवढेपालक)
- कार्यकारणी समितीमध्ये 50 टक्के महिला असणेअनिवार्य असेल.
- ही कार्यकारिणी सदस्यांच्या नावाची यादी शाळेच्यासूचनाफलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शितकरण्यात येईल.
- पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर 15दिवसाच्या आत सदस्यांची यादी संबंधितशिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्याकडेसादर करण्यात यावी.
पालक शिक्षक संघाची कर्तव्य किंवा कार्य :
१. नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे .
२. अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीयोग्य त्या उपाययोजना सुचवणे.
३. अभ्यासक्रमाशी पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचेनियोजन करण्यासाठी शाळांना साह्य करणे.
४. सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे.
५. शाळेतील शैक्षणिक शुल्क, सत्र फी व सहशालेयउपक्रमांसाठी आकारण्यात येणारे शुल्क संबंधीचीमाहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारणीसमितीपुढे त्यांचे म्हणणे मांडणे.
हे परिपत्रक PDF स्वरूपात Download करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .
No comments:
Post a Comment