K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 5 November 2018

आरोग्यविषयक

*फटाक्याने त्वचा जळली तर काय कराल आणि काय नाही?*

_दिवाळी म्हटलं की रोषणाई सोबतच फटाके आलेच. पण फटाके फोडताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही तर चांगलंच महागात पडू शकतं. फटाके फोडताना हवी ती काळजी न घेतल्याने तुम्हाला आनंदाला नजर लागू शकते. दिवाळीचे फटाके फोडताना अनेकांना जळणे, जखम होणे अशा समस्या होतात. तसेच डोळ्यांमध्ये जळजळ होणे, श्वास रोखला जाणे, कान बंद होणे अशाही समस्या होतात. अशावेळी वेळेवर काय काळजी घ्यायची असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आम्ही काय काळजी घ्यावी याच्या काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत._
*_🤔फटाक्यांनी जळाल्यावर काय करावे?_*
1) जळणंही दोन प्रकारचं असतं, एक असतं सुपरफिशल बर्न म्हणजे अशाप्रकारे जळाल्यावर वेदना होतात आणि जळाल्याचा चट्टा उमटतो. दुसरं असतं डीप बर्न यात शरीराचा जळालेला भाग सुन्न होतो. जर जळालेल्या जागेवर वेदना होत असतील तर समजा की, स्थिती गंभीर आहे. अशावेळी जळालेल्या भागावर पाण्याची धार सोडा. याने वेदनाही कमी होतील आणि चट्टेही पडणार नाही.
२) जळालेल्या भागावर बरनॉल लावू नका. त्याऐवजी ऑलिव ऑईल लावा. त्यानंतरही जर वेदना होतच असतील तर लगेच डॉक्टरांना दाखवा.
३) अनेकदा लोक फटाक्याने जळाल्यावर बरनॉल, निळं औषध, शाई, पेट्रोल हे लावतात. याने त्यावेळेपुरत्या वेदना थांबतात. पण याने जखमेवर रंग लागतो आणि याने समस्या वाढूही शकते.
४) जखम झालेल्या भागावर थंड पाणी टाका. तसेच पाण्याच्या भांड्यात जखम झालेला भाग धरा.
५) जळालेला भाग वेदना कमी होईपर्यंत कमीत कमी १५ मिनिटे पाण्यात ठेवायला पाहिजे. तसेच एखादा स्वच्छ कापड भिजवूनही तुम्ही जखमेवर लावू शकता. पण कापडाने जखम घासू नका.
६) फटाक्याने शरीराचा एखादा भाग जास्तच जळाला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे. याबाबत दुर्लक्ष करु नका. डॉक्टरकडे जाताना जखमेवर ओला कपडा ठेवू शकता.
*_🤔जळाल्यावर काय करु नये?_*
१) फटाक्याने त्वचा जळाल्यावर अनेकजण बर्फ लावतात. बर्फाने जळजळ कमी होईल पण याने त्या जागेवरील रक्त गोठण्याची शक्यता असते. याने तुमचां रक्तसंचार कमी होऊ शकतो. त्यामुळे बर्फाचा वापर टाळावा.
२) कधीही जळालेल्या जागेवर कापसाचा वापर करु नका. कापूस त्वचेवर चिकटू शकतो, याने तुम्हाला आणखी जळजळ होऊ शकते. यासोबतच बॅक्टेरिया वाढण्याचीही शक्यता असते.
३) जळालेल्या जागेवर तूप किंवा मलम लगेच लावणे टाळा आणि पुरळ आल्यावर त्या फोडण्याची चूकही करु नका. याने संक्रमण पसरु शकतं आणि त्रास वाढू शकतो.
४) जास्त जळालं असेल तर घरीच उपचार करण्याऐवजी वेळीच रुग्णालयात जावे. जळालेल्या जागेवर एखादा कापड चिकटलेला असेल तर काढू नका.
५) बटर, पीठ किंवा बेकिंग सोडा आगीवर कधीही टाकू नका.
६) क्रीम, लोशन किंवा तेलाचा ट्रिटमेंट म्हणून कधीही वापर करु नये.
७) जखम कधीही खाजवू नका किंवा त्यावरी मास काढू नका.
*संकलित*

‘ऑक्टोबर हीट’मध्ये महिलांनी घ्यायची काळजी

डॉ. वर्षा पांढरे, स्त्रीरोगतज्ज्ञ
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर महिलांच्या आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी सुरू होतात. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हवामानात झालेल्या बदलानुरूप आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे.
हल्ली बहुतांश महिला नोकरदार असतात. शिक्षणाच्या, कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या असतात. त्यांना योग्य सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता नसते. परिणामी, बराच वेळ लघवी रोखून धरण्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. अस्वच्छ शौचालयांचा वापर केला, तर त्यातून जंतुसंसर्गाची भीती असते. या संसर्गात लघवी झाल्याची भावना होते. मात्र, पोट फुगत जाते. ओटीपोटात तीव्र वेदना होतात. पाणी पिऊनही मूत्रविसर्जन होत नाही.
अशा वेळी स्त्रीरोगतज्ज्ञांकडून काही विशिष्ट प्रकारच्या आरोग्यचाचण्या करून घेण्याची गरज असते. त्यांच्या निदानानुसार वैद्यकीय उपचार घेण्याची गरज असते. हे उपचार घेतले जात नाहीत. त्यामुळे मूत्रमार्गातील संसर्ग, जळजळ, रक्तस्राव; तसेच पोटदुखी, अंगदुखी असे आजार वाढत जातात. अंगदुखीमुळे होणारा ताप आणि खोकला यांच्या तक्रारीही वाढतात. काही वेळा ‘ऑक्टोबर हीट’मुळे हा त्रास वाढल्यानंतर घरगुती उपायांना अधिक महत्त्व दिले जाते. मात्र, संसर्गजन्य आजारांसाठी निदान चाचण्या करून औषधोपचार सुरू करण्याची गरज असते. तसे न केल्याने आजार बळावतो, हे लक्षात घेतले जात नाही. प्रतिजैविकांचा मारा करण्याकडे काहींचा कल असतो. अनेकदा अशा प्रकारच्या त्रासात डॉक्टरांनी यापूर्वी दिलेल्या औषधोपचारांचाच वापर पुन्हा केला जातो; परंतु प्रत्येक वेळी आजारांच्या लक्षणांमध्ये बदल असतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्य चाचण्यांमधून संसर्ग नेमका कोणत्या प्रकारचा आहे, याचा पडताळा करता येतो.
उष्माघात टाळा
उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास अनेकांना होतो. अशा वेळी ताजी फळे, पालेभाज्यांचा वापर आहारात करा. गरम; तसेच जड अन्नपदार्थ टाळा; कारण त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. टरबूज, द्राक्षे, अननस, गाजर, काकडी, कच्चा पांढरा कांदा शरीराला थंडावा देतात. जेवणात गरम मसाले, तिखटाचा वापर कमी करा. फ्रिजमध्ये ठेवलेल्या गारेगार पाण्याचा शरीरावर मारा करू नका.
ही काळजी घ्या
- संसर्गजन्य आजारांचे स्वरूप समजून घ्या.
- उष्म्याचा त्रास होत असेल, तर उष्णधर्मीय पदार्थांचे सेवन टाळा.
- पाणी भरपूर प्या.
- आहारात फळे, दूध-दही यांचा वापर करा.
- तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा.
- मासिक पाळीदरम्यान स्वच्छता ठेवा.
- संसर्ग असल्यास कोमट पाण्याने अंघोळ करा.
- गरजेपेक्षा अधिक घाम येत असेल, तर त्यासाठी उपचार घ्या.
- प्रतिजैविके सुरू असतील, तर त्याचा कोर्स पूर्ण करा, अर्धवट सोडू नका.
- जुनी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याखेरीज पुन्हा घेऊ नका.

निरोगधाम पत्रिका

1. *सकाळी उठून कोणते पाणी प्यावे?*
उत्तर. - थोड़े हल्के गरम पाणी.
2. *पिण्याचे पाणी कसे प्यावे?*
उत्तर. - घोट-घोट व खाली बसून प्यावे.
3. *जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे?*
उत्तर. - 32 वेळा.
4. *पोट भरून जेवण केव्हा करावे?*
उत्तर. - सकाळी.
5. *सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता?*
उत्तर. - सूर्य उगवल्यानंतर अडीच तासापर्यन्त.
6. *सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - ज्यूस
7. *दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - लस्सी किंवा ताक.
8. *रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?*
उत्तर. - दूध
9. *आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?*
उत्तर. - रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.
10. *आईसक्रीम केव्हा खावे ?*
उत्तर. - कधीही नाही.
11. *फ्रिज मधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत?*
उत्तर. - 1 तासानंतर
12. *शीतपेय प्यावे का?*
उत्तर. - अजिबात नाही.
13. *तयार झालेले जेवण किती वेळेत खावे?*
उत्तर. - 40 मिनिटांत
14. *दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे?*
उत्तर. - थोड़ी भूक असू द्यावी.
15. *रात्रीचे जेवण केव्हा करणेे योग्य आहे?*
उत्तर. - सूर्य मावळण्या आधी
16. *जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता?*
उत्तर. - 48 मिनिटे अगोदर
17. *काय रात्री लस्सी पिऊ शकतो?*
उत्तर. - नाही
18. *सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - काम
19. *दुपारच्या जेवणानंतर काय करावे?*
उत्तर. - विश्रांती
20. *रात्री जेवण केल्यानंतर काय करावे?*
उत्तर. - कमीत कमी 500 मीटर एक फेर फटका जरूर मारावा.
21. *जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे?*
उत्तर. - वज्रासन
22. *जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे?*
उत्तर. - 5 -10 मिनिटे
23. *सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे?*
उत्तर. - तोंडाची लाळ
24. *रात्री कधी  झोपावे?*
उत्तर. - 9 - 10 वाजे पर्यन्त
25. *तीन विष कोणते?*
उत्तर.- साखर , मैदा व मीठ.
26. *जेवण किती प्रमाणात असावे?*
उत्तर.- जेवण कधीही पोट भरून करू नये.थोडी भूक नेहमी ठेवावी.
27. *रात्री सलाड खावे का?*
उत्तर. - नाही.
28. *जेवण नेहमी कसे करावे?*
उत्तर. - खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे.
29. *विदेशी पदार्थ खरेदी कराव का?*
उत्तर. - कधीच खरेदी करू नये.
30. *चहा केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कधीच नाही.
31. *दुधात नेहमी काय टाकून प्यावे?*
उत्तर. - हळद
32. *दूधात हळद टाकून का प्यावे?*
उत्तर. - कैंसर न होण्यासाठी
33. *कोणती चिकित्सा पद्धति आरोग्यसाठी चांगली आहे?*
उत्तर. - आयुर्वेद
34. *सोन्याच्या भांड्यातील पाणी  केव्हा पीणेे चांगले असते?*
उत्तर. - ऑक्टोबर ते मार्च (हिवाळयात)
35. *तांब्याच्या भाड्यातील पानी केव्हा पिणे चांगले असते?*
उत्तर. - जून ते सप्टेंबर (पावसाळयात)
36. *माठाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे?*
उत्तर. - मार्च ते जून (उन्हाळ्यात)
37. *सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे?*
उत्तर. - कमीत कमी 2 - 3 ग्लास
38. *पहाटे केव्हा उठावे?*
उत्तर. - सूर्य उगवण्याच्या दीड तास आधी.
ह्या टिप्स आपल्या निरोगी आरोग्यसाठी बहुमूल्य आहेत.

खाद्यपदार्थातील शरीरास आवश्यक खनिजे कशी मिळवाल?

*▪कॅल्शिअम कशात असतं?*
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
*कमतरतेमुळे काय होतं?*
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
*कार्य काय असतं?*
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
*▪लोह कशात असतं?*
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
*कमतरतेमुळे काय होतं?*
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
*कार्य काय असतं?*
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
*▪सोडिअम कशात असतं?*
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
*कमतरतेमुळे काय होतं?*
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
*कार्य काय असतं?*
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
*▪आयोडिन कशात असतं?*
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
*कमतरतेमुळे काय होतं?*
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
*कार्य काय असतं?*
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
*▪पोटॅशिअम कशात असतं?*
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
*कमतरतेमुळे काय होतं?*
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
*कार्य काय असतं?*
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
*▪फॉस्फरस कशात असतं?*
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
*कमतरतेमुळे काय होतं?*
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
*कार्य काय असतं?*
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
*▪सिलिकॉन कशात असतं?*
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
*कमतरतेमुळे काय होतं?*
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
*कार्य काय असतं?*
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
*▪मॅग्नेशिअम कशात असतं?*
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
*कमतरतेमुळे काय होतं?*
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
*कार्य काय असतं?*
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
*▪सल्फर कशात असतं?*
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
*कमतरतेमुळे काय होतं?*
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
*कार्य काय असतं?*
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
*▪क्लोरिन कशात असतं?*
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
*कमतरतेमुळे काय होतं?*
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
*कार्य काय असतं?*
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
*🔸खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔸*
»  फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
»  डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
»  काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
»  दुधात खनिजांचा भरपूर स्रोत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
»  फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
*वेळीच जागे व्हा आणि निरोगी जीवन जगा ..*
योग्य आहार घ्या ! लठ्ठपणा हटवा !
◼◼◼◼◼◼◼◼◼◼

*हींग शक्तिशाली घरेलू औषधी*

* दांतों में कीड़ा लग जाने पर रात्रि को दांत में हींग दबाकर सोएं। कीड़े खुद-ब-खुद निकल जाएंगे।
* यदि शरीर के किसी हिस्से में कांटा चुभ गया हो तो उस स्थान पर हींग का घोल भर दें। कुछ समय में कांटा स्वतः निकल आएगा।
* हींग में रोग-प्रतिरोधक क्षमता होती है। दाद, खाज, खुजली व अन्य चर्म रोगों में इसको पानी में घिसकर उन स्थानों पर लगाने से लाभ होता है।
* हींग का लेप बवासीर, तिल्ली व उदरशोथ में लाभप्रद है।
* कब्जियत की शिकायत होने पर हींग के चूर्ण में थोड़ा सा मीठा सोड़ा मिलाकर रात्रि को फांक लें, सबेरे शौच साफ होगा।
* पेट के दर्द, अफारे, ऐंठन आदि में अजवाइन और नमक के साथ हींग का सेवन करें तो लाभ होगा।
* पेट में कीड़े हो जाने पर हींग को पानी में घोलकर एनिमा लेने से पेट के कीड़े शीघ्र निकल आते हैं।
* जख्म यदि कुछ समय तक खुला रहे तो उसमें छोटे-छोटे रोगाणु पनप जाते हैं। जख्म पर हींग का चूर्ण डालने से रोगाणु नष्ट हो जाते हैं।
* प्रतिदिन के भोजन में दाल, कढ़ी व कुछ सब्जियों में हींग का उपयोग करने से भोजन को पचाने में सहायक होती है।

तुप खाण्याचे फायदे

*🔸तुप (गाईचे किंवा म्हशीचे)🔸*
लोणी कढवून त्यातील पाण्याचा अंश पूर्णत: काढून टाकल्यावर उरलेला सारभूत पदार्थ म्हणजे साजूक तूप वं असे तूप सैपाक घरातील अविभाज्य घटक आहे. भारतात साजूक तुपाला आहारामध्ये *‘राजेशाही’* स्थान आहे. साजूक तुपात १०० टक्के फॅट्स आणि ९०० कॅलरीज आहेत. एक चमचा तुपात १३ ग्रॅम फॅट्स, आणि ११७ कॅलरीज असतात. सर्वसाधारणपणे रोज दोन चमचे तुप आहारात सुचवले जाते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
वजन वाढलं की आपण तूप आणि तुपाचे इतर पदार्थ खाणं बंद करतो. पण तूप खाल्यामुळेच वजन वाढतं ही समझ चुकीची आहे. देशी तूप खाण्याचे अनेक फायदे होतात. देशी तूप खाल्याने मेंदू आणि शरीरालाही फायदा मिळतो. पण, प्रत्येक आजारात तूप खाण्याचा सल्ला प्रत्येकाला देण्यात येत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*🎯जाणून घ्या, तूप खाल्याने होणारे  फायदे...🎯*
१. तुपामध्ये व्हिटामिन ए, डी आणि कॅल्शियम, फॉरस्फोरस, मिनरल्स, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक तत्व असतात. देशी तूप खाल्यानं सांधेदुखी त्रास कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
२. रोज शुद्ध तूप खाल्ल्याने वात आणि पित्त याचा त्रास होत नाही.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
३. शुद्ध तुप खाण्याने पचनक्रिया चांगली राहते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
४. तुपामुळे डोळ्यांवर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
५. हृदयाच्या नलिकांमध्ये ब्लॉकेज असल्यास शुद्ध तूप लुब्रिकेंटचे काम करते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
६. गॅसेसचा त्रास कमी करण्यासाठी तुप खुप फायदेशीर ठरतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
७. उन्हाळ्यात पित्त वाढतं त्यासाठी तुपाचे सेवन केल्यास त्याचं प्रमाण कमी होतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
८. डाळ शिजवताना तूप टाकल्याने गॅस होण्याचा त्रास कमी होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
९. शुद्ध तुपामुळे स्किन सॉफ्ट राहते. शुद्ध तुपाने चेहऱ्याचे मसाज करणे फायदेशीर असतं.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
१०.तुपामध्ये तेलापेक्षा अधिक पोषक तत्व असतात. बटर पेक्षा तुपाचं सेवन करणं अधिक चांगलं असतं. तुप घरी तयार करणं अधिक उत्तम आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
✳ कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे. 

स्तनपानाचे महत्त्व-

डॉ. पियुष रणखांब, बालरोगतज्ज्ञस्तनपानाचे महत्त्व
डॉ. पियुष रणखांब, बालरोगतज्ज्ञ
स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण चुकीच्या पद्धतीने / तंत्रामुळे मातेला पाठदुखी, स्तनांना सूज येऊन त्यात रक्त किंवा पाणी साठणे, ताप येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. तसेच बाळांना कुपोषण होऊ शकते, परिणामी अनेकदा संसर्ग होतो. त्यामुळे आईला ज्या स्थितीमध्ये आरामदायी वाटत असेल, त्या स्थितीत तिने स्तनपान द्यावे. त्यावेळी तिच्या पाठीला आधार असणे महत्त्वाचे आहे. स्तनपान देण्यासाठी भारतीय पद्धत, क्रेडल पद्धत, मॉडिफाइड क्रेडल पद्धत प्रचलित आहे. आडवे पडून बाळाला स्तनपान देऊ नये, हा एक गैरसमज आढळतो.
सामान्य प्रकृती असलेल्या बाळाला जन्मानंतर तीस मिनिटांच्या आत आईच्या पोटावर किंवा छातीवर ठेवावे. त्यामुळे बाळाला उब मिळते आणि स्तनपान करण्याची संधी मिळते. स्तनपान जेवढ्या लवकर सुरू होईल, तेवढ्या लवकर आई आणि बाळामध्ये भावनिक बंध निर्माण होतो.
व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब करा
आईने बाळ रडेपर्यंत थांबण्याऐवजी संकेत समजून स्तनपान देण्यास प्रोत्साहन द्यावे. बाळाला आईचे दूध सुरू असेपर्यंत वेगळे पाणी पाजण्याची गरज नसते. दूधातून बाळाला अधिक प्रमाणातील लॅक्टोज, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार आणि पाणी मिळते. त्यामुळे त्याची तहानही भागते.
हे घटक अग्रभागातील दूधातून मिळतात. मागील भागातील दुधात स्निग्धांश मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यामुळे बाळाची भूक भागते. बाळाच्या सुदृढ वाढीसाठी हे आवश्यक असते. त्यामुळे बाळाची इच्छा असेपर्यंत त्याला स्तनपान द्यावे. स्तनपानामुळे बाळाची तहान आणि भूक दोन्ही भागते. जेव्हा बाळ जेव्हा आईपासून विलग होते, तेव्हा बाळाची तहानभूक पूर्ण झाली आहे, असे समजावे.
स्तनपान पूर्ण झाल्यावर बाळाला ढेकर देण्यास मदत करावी. कारण सगळीच बाळे स्तपान करताना हवाही पोटात घेतात. बाळाला उभ्या स्थितीत कडेवर घ्यावे किंवा मांडीवर बसवावे आणि पाठीवर हात फिरवावा किंवा हलकेच चापटी मारावी. ही क्रिया पार पाडली नाही, तर बाळाच्या पोटातील अतिरिक्त हवेमुळे उलटी होऊ शकते. तसेच हवा आतड्यापर्यंत पोहोचली तर बाळ अस्वस्थ होऊ शकते.
हे लक्षात ठेवा-
- बाळाचे तोंड पूर्ण उघडले पाहिजे.
- बाळाच्या हनुवटीचा स्पर्श स्तनाला व्हावा.
- बाळाचा खालचा ओठ हा बाहेरच्या बाजूला वळलेला असावा.
- या स्थितीमध्ये बाळाचे पूर्ण शरीर आईच्या समोर असावे. बाळाचे डोके, मान यांना शरीराच्या एका रेषेत आधार मिळावा.
- परिणामकारक स्तनपानासाठी बाळ जन्मापासून आई बाळाच्या जवळपास असणे अपेक्षित आहे.
स्तनपानामधील अडथळे
- आईला स्तनपानात स्वारस्य नसणे, अति अस्वस्थता वाटणे, स्तनाग्रांना भेगा पडणे, सूज येऊन त्यात पाणी साचणे
- हवा बाळाच्या पोटात गेल्यामुळे आलेला अति दाब, दुभंगलेले ओठ किंवा जबड्यांसारखे जन्मजात व्यंग असल्यास बाळाला स्तनपान करताना अडचणी येतात.

हृदय विकारासाठीच्या चाचण्या---
हृदयविकारासाठी या चाचण्या गरजेच्या
मनोज देशमुख, एमडी रेडिओलॉजी आणि इमेजिंग
......
सीटी करोनरी अँजिओग्राफी या चाचणीचा उपयोग करून रक्तवाहिनी निमुळती होण्याची प्रक्रिया लक्षात येते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या गुठळ्या समजतात. शरीराला अधिक छेद करणाऱ्या कॅथेटर अँजिओग्राफी या चाचणीला ही पर्यायी चाचणी आहे. कॅथेटर अँजिओग्राफीमध्ये रक्तवाहिनीमध्ये कॅथेटर घालण्यात येते. ही चाचणी करण्याचा सल्ला हृदयविकारतज्ज्ञ, हृदयविकार शल्यविशारद किंवा प्राथमिक उपचार करणाऱ्या डॉक्टरकडून देण्यात येतो. हृदय सुरू असताना या प्रक्रियेद्वारे इमेजिंग करण्यात येते.
हृदयाची किंवा हृदयातील रक्तवाहिन्यांची क्रॉस सेक्शन स्थितीमधील छायाचित्रे घेण्यासाठी सीटी स्कॅनर एक्स-रे आणि अतिरिक्त क्षमता असलेल्या संगणकाचा वापर करतात. विविध प्रकारचे हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी हे स्कॅन मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहेत. कोणताही आजार होण्याआधी रक्तवाहिनी निमुळती होणे यात समजू शकते.
कार्डिअॅक सिटीअँजिओग्राफी केल्यामुळे विविध प्रकारचे हृदयविकार समजू शकतात. यात हृदयविकाराच्या रक्तवाहिनीचा आजार, धमनीचा आजार आणि हृदयाशी संबंधित इतर आजार समजू शकतात. ज्यांच्या स्ट्रेस टेस्टमधून निश्चित निदान झालेले नाही, अशा रुग्णांसाठी या तपासणीची मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे शल्यविशारद तसेच इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट्स यांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यासाठी या चाचणीची मदत होऊ शकते.
..........
कार्डिअॅक सीटी स्कॅन केव्हा करावे?
- हृदयातील रक्तवाहिन्या निमुळत्या झाल्यामुळे किंवा त्यात गुठळ्या झाल्यामुळे छातीत दुखत आहे का, हे निश्चित करण्यासाठी कार्डिअॅक सीटी अँजिओग्राफी हा पर्याय आहे. हा पर्याय पारंपरिक कॅथेटरवर आधारित अँजिओग्रामपेक्षा वेगळा आहे. कॅथेटरवर आधारित तपासणीमध्ये कॅथेटर रक्तावाहिन्यांमध्ये घालण्यात येतो. कॅथेटर घालून अँजिओग्राम काढण्याची आवश्यकता नसल्याचे सीटी अँजिओग्राफीमधून समजू शकते.
- सीटी तपासणीवरून मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा धक्का टाळण्यासाठी रुग्णाला स्टॅटिन हे कोलेस्टरॉल कमी करणारे औषध घ्यायची गरज आहे का आणि इतर औषधे किंवा जीवनशैलीतील बदल करण्याची आवश्यकता आहे का, हे निश्चित करण्यास हृदयविकार तज्ज्ञांना मदत होते.
- इन्क्लुसिव्ह स्ट्रेस टेस्ट - स्ट्रेस टेस्टमधून निश्चित निदान झाले नाही, तर डॉक्टर कार्डिअॅक सीटी स्कॅन करून घेण्यास सांगू शकतात. या चाचणीमधून हृदयातील रक्तवाहिनीच्या समस्या किंवा इतर समस्या समजू शकतात.
- हृदयविकार असणे - छातीत दुखण्याप्रमाणे, श्वास लागणे, मान, जबडा, पाठ किंवा खांदेदुखीची समस्या इत्यादी हृदयविकाराची लक्षणे जाणवत असतील, तर अशा व्यक्तीने सीटी अँजिओग्राफी करून घेणे योग्य असते.
- हृदयातील रक्तवाहिनीच्या बायपास शस्त्रक्रियेनंतर बायपास ग्राफ्ट्सचे मूल्यमापन करणे.
- जन्मजात व्यंग किंवा हृदयातील रक्तवाहिन्यांचे मूल्यमापन करणे.

संकलित

No comments:

Post a Comment