K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 4 November 2018


स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये (१) स्वच्छता पाळा , रोगराई टाळा. (२) जिथे स्वच्छता असे, तिथे आरोग्य वसे. (३) कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू मनावर. (४) कचरा करूनी कमी, आरोग्याची मिळेल हमी. (५) गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र.. (६) परिसराची करू सफाई, आरोग्याची होईल कमाई. (७) सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैंदाशीला घाला आवर. (८) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार , हे तर दूषित पाण्याचे प्रहार. (९) उघड्यावर शौचास बसु नका, रोगांना आमंत्रण देऊ नका. (१०) परिसर स्वच्छ ठेवाल, तर निरोगी व्हाल. (११) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू. (१२) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा. (१३) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. (१४) नका बसु उघड्यावर संडासाला , संधी मिळेल रोगाराई पसरण्याला. (१५) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट. (१६) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने. (१७) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामीण आरोग्याचा हाच कानमंत्र. (१८) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता. (१९) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा. (२०) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू. (२१) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू . (२२) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती. (२३) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति. (२४) नखे कापा बोटाची , नाही होणार व्याधि पोटाची. (२५) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि. (२६) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी. (२७) सांडपाण्याला आळा , रोगाराई टाळा. (२८) स्वच्छ सुंदर परिसर , जीवन निरोगी निरंतर. (२९) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात. (३०) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू. (३१) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे. (३२) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरी शौचालय बांधले. (३३) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुया वापर. (३४) कचरा कुंडीचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू (३५) केरकचरा मुक्त गाव, सर्वत्र होईल नाव. (३६) थोडी तर ठेवा जाण, सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण. (३७) स्वच्छतेचे ठेवा ध्यान. स्वच्छतेनेच देश बनेल महान. (३८) स्वच्छता हे महा अभियान, स्वच्छतेसाठी द्या आपला योगदान. (३९) स्वच्छतेचे करा पालन स्वच्छ करा घराचे अंगण. (४०) स्वच्छ सुंदर परिसरातुनच, सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात. (४१) स्वच्छ शाळा करा हातांनी, सुंदर गाणी गाऊ मुखांनी. (४२) स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर. (४३) संडास बांधा घरोघरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी. (४४) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती. =================================

No comments:

Post a Comment