शरीराच्या या भागांना मसाज केल्याने हे आश्चर्यकारक फायदे मिळतात
आजकालच्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या ताणा, सतत बैठी कामे, अति प्रवास, या गोष्टीमुळे डोकेदुखी दररोज डोकेदुखी, थकवा, कंबरदुखी अशा लहान-लहान समस्या सारख्या उद्भवत असतात. या छोट्या-छोट्या तक्री शरीराच्या काही भागांवर घराच्या-घरी मसाज केल्याने कमी होतात. त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत.
◆ तळव्याला मसाज करणे.
तळव्याला मसाज केल्यामुळे शांत झोप लागते तसेच थकवा दूर होतो.
◆ पाठीला मसाज केल्याने
पाठीला लागलेली रग कमी होते. अंग मोकळे होऊन ताजेतवाने वाटते कार्यक्षमता वाढते.
◆ मानेला मसाज केल्याने
मानेला मसाज केल्याने थकवा कमी होऊन झोप छान लागते पण, मानेला करताना सांभाळून करावी. अति जोरात किंवा वेड्यावाकड्या पद्धतीने केलेली मसाज समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
◆ नाक आणि ओठाच्या मधला भाग
या भागाला हळुवार बोटांनी मसाज केल्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि अंग दुखत असेल तर आराम पडतो.
◆ कानाची पाळी
कानाच्या पाळीला म्हणजे कान टोचलेल्या ठिकाणी मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते,तसेच पचन सुधारते.
◆ बोटे
अंगठा आणि त्याच मधल्या भागात हळुवार दाब देऊन मसाज केल्याने कानाविषयक समस्या तसेच मान दुखी आणि पाठ दुखी कमी होते.
◆ गुडघ्याचा खालील भाग
गुडघ्याच्या खालील भागात मसाज केल्याने पचनक्रिया सुधारते,तसेच वजन देखील वाढत नाही. या मसाज करताना हळुवार कराव्यात जोर-जोरात करू नये तसेच काही विशेष समस्या असल्या काळजी घ्यावी. या प्रकारच्या मसाज करत असताना काही त्रास जाणवल्यास मसाज करणे लगेच बंद करावे.
••••••••••••
◆नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या योग तज्ज्ञांचा व योग शिक्षकाचा सल्ला घ्यावा.
!!हे ईश्वरा सर्वांच आरोग्य चांगलं ठेव!!
No comments:
Post a Comment