K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 9 November 2018

भाऊबीज

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

                   *भाऊ*


आई झाली बाबा झाले ताई सुध्दा झाली
भावाबद्दल का बरं कुणीच काही लिहित नाही

तोही आहेच की चार शब्द लिहावा असा
जणू काही लपून बसलेला शिंपल्यातील मोती जसा

भाऊ म्हणजे जणू काही दुसरा बाबा असतो
जबाबदारीची जाणीव होताच तोच बाबांची जागा घेतो

व्यक्त होता येत नाही त्याला आपल्यासारख
त्यालाही मन आहे तरीही का वागतात त्याच्याशी परक्यासारखं

लहानपणी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याबरोबर भांडणारा
मोठं होताच आपले हवे ते हट्ट पुरवणारा

ओरडणारा चिडणारा रागाने डोक्यावर घर घेणारा
पण वेळोवेळी तितक्याच समजूतदार पणे वागणारा

रक्षाबंधन भाऊबीजेला आपली आतुरतेने वाट पाहणारा
माझी ताई का नाही आली म्हणून डोळ्यातून आसवं गाळणारा

एकही दिवस आपल्याशी न भांडता राहणारा
पण क्षणात सगळं विसरून आपले हट्ट पुरवणारा

लग्न झाल्यावर परत येऊ नकोस अस आपल्याला बोलणारा
आपण सासरी जाताना धाय मोकलून रडणारा

मी नाही बांधणार तुज्याकडून राखी अस बोलणारा
आपल्याला हवी ती ओवाळणी देऊन आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणारा

कितीही भांडला आपल्याशी तरी आपलं दुःख जाणणारा
वेळोवेळी फोन करून आपली चौकशी करणारा

लग्न होताच त्याच थोडस बदलणारा.
पण तरीही आपल्या ताईला कधीही न विसरणारा

आपणही कधी कधी समजून घेऊ त्याला
खरच तोड नाही या बहीण भावाच्या नात्याला

रक्ताचा असो वा मानलेला खरच भाऊ बहिणीच नात खूप गोड असते
म्हणूनच आई बाबा गेल्यानंतरही प्रत्येक बहिणीला भावासाठीच माहेरची ओढ असते.
------------------------------------------------------------------------

भाऊबीज (यमद्वितीया) -


या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती !

तिथी -
कार्तिक शुद्ध द्वितीया

या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.

बहिणीने भावाला ओवाळणे :-

या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’

अध्यात्मिक महत्त्व : -

या दिवशी धर्मशास्त्राने भावा-बहिणीचे नाते जोपासण्यावर विशेष भर दिलेला आहे. पुरुषाच्या मनात स्त्रीप्रती शुद्धभाव निर्माण होऊन चित्तावरील कामवासनेचा विकार न्यून व्हावा, हाच या मागील उद्देश आहे. ज्याप्रमाणे आईचे मुलावर असणारे प्रेम निर्मळ असते, तसेच बहिणीचेही भावावरील प्रेम पवित्र असते. या प्रेमाची देवाण-घेवाण होऊन एकमेकांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी भाऊ आणि बहीण भाऊबीज साजरी करतात.

भाऊबीजेला भगिनींना स्वसंरक्षणार्थ समर्थ करूया !

‘कित्येक भगिनींवर आज बलात्कार होतो, कित्येकींचे संसार उद्ध्वस्त होतात. एकतर्फी प्रेमातून कित्येकींची उघड उघड हत्याही होते. समाजाच्या प्रेतवत्, म्हणजे क्षात्रधर्महीन मानसिकतेचे हे प्रतीक आहे. स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे. याचबरोबर भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल. दीपावलीच्या निमित्ताने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी काहीतरी करण्यासाठी यथाशक्ती पाऊल उचलले, तरच हा सण खर्‍या अर्थाने साजरा होईल.’

No comments:

Post a Comment