K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 30 November 2018

पर्यावरण,आरोग्य व शारीरिक शिक्षण



पर्यावरण, आरोग्य व शारीरिक शिक्षण

कनिष्ठ महाविद्यालयासाठी अनिवार्य विषय –
पर्यावरण, आरोग्य व शारीरिक शिक्षण:

राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमाची फेररचना केली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१० पासून नवीन अभ्यासक्रमात आकरावी व बारावीच्या सर्व शाखांना पर्यावरण व आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे विषय सक्तीचे करण्यात आलेले आहेत. 
पर्यावरण : 

कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आणि बायफोकल अभ्यासक्रमांसाठी हा विषय अनिवार्य आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करायचा आहे. यासाठी दोन्ही सत्रांना प्रत्येकी ३० गुण आणि जर्नल ४० गुण अशी एकूण १०० गुणांची ही परीक्षा राहील. या विषयाची लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. परंतु दोन्ही सत्रातील ५० पैकी गुणांची सरासरी काढण्यात येईल आणि या गुणांचा अंतिम निकालात समावेश करुन निकाल जाहीर करण्यात येईल.
या संधार्भीय परिपत्रक   Download   करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 



आरोग्य आणि शारीरिक शिक्षण:




 विषयाची परीक्षा दोन्ही सत्रांमध्ये २५ गुण लेखी व २५ गुणांची प्रात्यक्षिक असे १०० गुण व याचे रुपांतर ५० गुणांमध्ये करावयाचे आहे. व या ५० गुणां चे रुपांतर ग्रेड (श्रेणीत) करावयाचे आहे. यात ३० व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना 'अ' श्रेणी, २३ ते २९ गुण मिळविणाऱ्यांना 'ब' श्रेणी, १८ ते २२ गुणांना 'क' श्रेणी आणि १७ पेक्षा कमी गुणांना 'ड' श्रेणी देण्यात येईल.
या विषयाचे गुणदान करण्या संदर्भातील मानके बोर्डाने दिनांक ०६/०१/२०१४ च्या परिपत्रक तसेच दिनांक ०३/०६/२०१५ नुसार स्पष्ट केलेली आहेत. ही परिपत्रके   Download    करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

वरील परिपत्रकान्वये   आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाचे गुणांकन जतन व बोर्डाकडे पाठविण्यासाठीचे नमुने   Download    करण्यासाठी खालील लिंकला   क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुचविल्याप्रमाणे या विषयांतर्गत विद्यार्थ्याने त्याची नोंदवही अद्यावत करावयाची आहे. ही नोंदवही वर्षाखेरीज महाविद्यालयात जमा करावयाची आहे. ही वही नमुना   PDF    मध्ये   Download   करण्यासाठी पुढील लिंकवर जावा.  



No comments:

Post a Comment