K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 1 June 2021

 

*१ जून - जागतिक पालक दिन

        जागतिक पालक दिन हा १ जून २०१२ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने १७ सप्टेंबर २०१२ रोजी हा संकल्प केला. जगभरातील पालकांचे प्रेम, वचनबद्धता आणि निस्वार्थ प्रयत्नांना त्यांच्या मुलांकडे सन्मानित करण्यासाठी आणि मान्य करण्यासाठी हा दिवस घोषित करण्यात आला.

*🌹  पालक नव्हे, मित्र बना  🌹*

         मुलं डोळ्यांदेखत केव्हा मोठी होतात, हे पालकांना कळतच नाही. बोट धरून नाजूक पाऊल पुढे टाकून चालणं शिकणारी मुले पालकांची उंची गाठतात आणि त्यांची म्हातारपणाची काठी होत असतात.

         मुलांना 'मोठ्ठ' करण्यासाठी पालक विविध भूमिकांमधून झिजत असतात. वयाची टप्पे ओलांडणार्‍या मुलांशी सुसंगत संवाद साधताना पालकांना कसरत करावी लागत असते. पालक नव्हे तर मित्र म्हणून त्यांना वयात आलेल्या मुलांशी सुसंवाद साधावा लागत असतो.

         परंतु, काही कुटुंबातील पालक मुलांशी सुसंगती साधण्‍यात अपयशी ठरत असतात. 'मित्र' म्हणून भूमिका त्यांना वठवता येत नाही. आपली मुले कितीही मोठी झाली तरी ती लहानच आहे, असे त्यांना वाटते. 'गप्प बस, तुला काय कळतं त्यातलं?' असे म्हणून कळत्या वयात मुलांना सारखं ऐकवत असतात.

         मुलांनी धोक्याचं वय ओलांडलं अर्थात वयाचं १६ वर्ष पूर्ण केल्यानंतर पालकांनी 'पालक' म्हणून नव्हे तर एक 'मित्र' म्हणून मुलांशी सुसंवाद साधणं आवश्यक झाले आहे.

किशोरावस्थेत पदार्पण करणारी मुले लहरी असतात. या स्थितीत त्यांच्या इच्छेनुसार घ्यावं लागत असतं. त्याच्या मनाविरूध्द एखादी गोष्‍ट झाल्यास ते हिरमुसतात. वेळ प्रसंगी केव्हा काय करतील याचा भरवसा नसतो.

         अलिकडच्या काळात मानसोपचारतज्ज्ञाकडे येणार्‍या पाककांची संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पालकांविषयी नव्हे तर पाल्यांच्याच समस्या अधिक आहेत.

        तारूण्यात प्रवेश कणार्‍या मुलांमुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत

         तारूण्याच्या उंबरवठ्यावर पाऊल ठेवणार्‍या मुलांमध्ये अमुलाग्र बदल होत असतात. त्याच्यात असे काही बदल होतात की, त्याने त्यांचे पालक थक्क होत असतात. मुलांना बालपणी न आवडणार्‍या गोष्ट त्यांना किशोरावस्थेत आवडत असतात. मुले-मुलींशी तर मुली-मुलांशी मैत्री करतात. मुले अधिक वेळ घराबाहेर घालवतात. पालकांच्या सांगण्‍याकडे त्यांचे मुळीच लक्ष नसते.

         पालकांनी मुलीला 'तो मुलगा कोण?', या पालकांच्या प्रश्नाला 'तो माझा चांगला मित्र आहे आणि बाकी काही नाही.' असे साचेबद्ध ठरलेलं उत्तर मुली देत असतात. या स्थितीत पालकांनी आणखी काही सुनावले म्हणजे ती आणखी बिथरते. कॉलेजातून घरी यायला मुद्दाम उशीर, चौकशीअंती समजतं, ते प्रेमप्रकरण. तर, मुलांच्या बाबतीतही 'सेम टू सेन' अस्संच. परंतु थोडं वेगळं, म्हणजे लपून सिगारेटी‍ फुंकणं, अभ्यासाच्या वेळी मित्रासोबत रिकामं भटकणं वैगेरे वैगेरे.

         अशा परिस्थितीत काय करावं? त्यांच्याशी कसं वागावं? असे यक्ष प्रश्न पालकांसमोर उभे ठाकतात. आपल्याच मुलांना समजावण्यासाठी पालक 'समन्वयक' शोधतात. काही वेळेस तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच मानसोपचारतज्ज्ञांचा आश्रय घ्यावा लागत असतो. तेव्हा त्यांना आपल्याच मुलांना समजून घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा फिज् पेड करावी लागत असते. याला आपण काय म्हणावे?

         'कारट्याने वा कारटीने समाजात आमचे नाक कापले' असे पालक 'नाक' सलामत असतानाही म्हणत असतात. परंतु आपली मुले कोणत्या मानसिकतेतून जात आहेत. याचा विचार करणारे फार कमी संख्येने पालक आहेत.

         तारूण्यात प्रवेश कणार्‍या मुलांमुलीमध्ये शारीरिक व मानसिक बदल होत असतात. या वयात मुलांना पुरुषत्वाची तर मुलींना स्त्रित्वाची जाणीव होत असते. याच अवस्थेतून पालकही गेलेले असतात. परंतु आपल्या मुलांना ते समजून घेत नाहीत. या वयात पालकांनी मुलांशी मित्रासारखं वागलं पाहिजे. आपल्याविषयी मुलांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. तेव्हा मुले पालकांशी बिनधास्त संवाद साधतात. मनातील विचार कळवितात.

         मुले आपल्या पालकांपेक्षा आपल्या मित्रांकडे भावना व्यक्त करत असतात. मुलांचा विश्वास संपादन करून 'तु अमुकच व्हावं लागेल' असे म्हणण्या पेक्षा 'तुला काय व्हायचं आहे?' असे विचारून त्याच्या मनातील इच्छा जाणून घ्यावं. त्याच्या करियरच्या बाबतीत पालकांनी कोणताही समझोता करू नये.

         राहिला त्यांचा प्रेमात पडण्याचा प्रश्न. तर वयात येण्याइतकीच प्रेमात पडणं, ही नैसर्गिक गोष्ट आहे. हे आधी समजून घ्यावं. त्याचं प्रेम किती खोलवर रूजलेलं आहे, हे आधी ओळखले पाहिजे.

         आपल्या पाल्यांवरील ‍विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. त्यांच्यातील नातं खरोखरीच मित्रत्वाचं आहे का याचाही अंदाज आधी घेतला पाहिजे. परंतु पालक येथेच चुकतात.

         खरी परिस्थिती जाणून न घेता. मुलांना चारचौघात सुनावत असतात. त्याचे अनिष्ठ परिणाम मुलांच्या मानसिक विचारसरणीवर होतात. त्यामुळे भविष्यात मोठी किंमत मोजाण्याआधीच आपल्या पाल्याशी पालकांनी मित्रत्त्वाचे संबंध जोपासणे गरजेचे आहे.

*संकलित

No comments:

Post a Comment