K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 24 June 2021


                 🌳 वटपूर्णिमा 🌳

        *प्राणवायू.. हा सध्याच्या काळात जगभर चर्चा होणारा विषय. पण भारतीय संस्कृतीने हे प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखले होते, म्हणूनच सण कोणताही असो आम्ही निसर्गाशी मैत्री करतो.* 

        *जगदगुरु संत तुकाराम म्हणूनच वृक्षवेलींना सोयरे मानतात. निसर्ग संरक्षण, संवर्धन.. संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत.*

        *वड तर औषधी वृक्ष. याची साल.. पाने.. फळेच काय पण समिधाही जीवनाला उपकारक. वड हा मोफत प्राणवायूचा खजिनाच. शेकडो वर्षाचा सेवाव्रती. आजही विस्तिर्ण डेरेदार वृक्षाच्या सानिध्यात पिढ्यानपीढ्या सुखेनैव जगताहेत.*

        *स्त्रीच्या जीवनात पती हा तिच्या संसाराचा प्राण. यमराजाकडून पतीचे प्राण पुन्हा परत मिळवणारी ही भार्येची.. वटसावित्रीची पूजेची कथा. ही सावित्री वटवृक्षाप्रमाणेच आपल्या पतीला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभण्याचे वरदान प्राप्त करते.*

        *सावित्री ही बुद्धिमान.. आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जंगलात राहणारी चतुर पतिव्रता होती. प्रत्यक्ष यमाच्या कार्याआड आली. वादविवाद करुन यमाला प्रसन्न करुन घेत आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. तसेच अंध सासूसासऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आता या कथाभागापेक्षा प्राणवायू देणाऱ्या वड वृक्ष महात्म्य सांगायला इथे पौराणिक कथाशी संबंध जोडलाय.*

        *आज महिला सौभाग्यालंकाराने नटुन मनातील पवित्र सावित्रीभावाने पतीच्या दिर्घायू निरामय आरोग्याची कामना करतात. मधूर आम्रफळे.. फुले.. त्याला अर्पण करुन त्या वृक्षाचे पूजन करतात. आज उपवासही.. म्हणजेच निसर्गपूजनाला भक्तीची जोड.*

        *सर्व सत्यवानांच्या सावित्रींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आपले पतीदेव यांना निरायम दीर्घायुष्य लाभो हीच शुभकामना..!*


🌸🌿🌷🌳🙏🌳🌷🌿🌸

  1️⃣

  *_वटपौर्णिमा आली गं,_*

  *_ओटी आंब्यांन भरूया_*

  *_सण वर्षाचा आज,_*

  *_पूजा वडाची करूया  llधृ ll_*


  *_पतिव्रतेचा हा वसा गं,_*

  *_सुवासिनींचे हे वाण_*

  *_नारीजातीने करावा,_*

  *_भोळ्या भ्रताराचा मान_*

  *_हाथ जोडुनी देवाला,_*

  *_प्रदक्षिणेला फिरूया_*


  *_सात जन्माचा सोबती,_*

  *_धनी माझा पतीदेव_*

  *_माझ्या संसाराच्या मंदिरी,_*

  *_लाख मोलाची ही ठेव_*

  *_काया वाचा मने,_* 

  *_मनामंदी त्याच्या नावाला स्मरूया_*


  *_सावित्रीच्या कुंकुवाला,_*

  *_सत्यवानाचा गं रंग_*

  *_औक्ष उदंड मिळावं,_*

  *_भाव फिरे धाग्यासंग_*

  *_भाव सात जन्माचं,_* 

  *_आशा मनात धरूया_*


 

  *_पतिव्रता मध्ये थोर_*

  *_सावित्री गं सती_*

  *_जिंकूनिया प्राण पुन्हा_*

  *_आणिला गं पती_*


  *_मद्रदेशी अश्वपती_*

  *_राज्य करितो नृपती_*

  *_एकुलती कन्या त्याची_*

  *_रूप गुणवती_*


  *_सवे घेऊनिया सेना_* 

  *_निघे वर संशोधना_*

  *_सावित्रीने सत्यवान_*

  *_वरीला ग चित्ती_*

  *.......*


 

🌳 वटपूर्णिमा 🌳

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.


ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे तीन दिवसाचे व्रत असते. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल तर फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. दिवसभर उपवास करून यादिवशी रात्री उपवास सोडावा.


वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या वटवृक्षाची पूजा करुन स्त्रिया “मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य आणि मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित आणि संपन्न होऊ दे”, अशी प्रार्थना करतात.


सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||


वट पौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारे साहित्य-

सावित्री आणि सत्यवानची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, तूप,पाच प्रकारची फळं, फुले, दिवा, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, हळद-कुंकू, पंचामृत, हिरव्या बांगड्या, शेंदूर, अत्तर, कापूर, पूजेचे वस्त्र, विड्याचे पाने, सुपारी, पैसे, गूळ खोबऱ्याचे नैवेद्य, आंबे, दुर्वा, गहू


*वट पौर्णिमा व्रत शुभ मुहूर्त-*

*– वट पौर्णिमा व्रत तिथी – २४ जून २०२१*


*– पौर्णिमा तिथी प्रारंभ – २४ जून सकाळी ३ वाजून ३२ मिनिटांपासून*


*– पौर्णिमा तिथी समाप्त – २५ जून सकाळी १२ वाजून ९ मिनिटांपर्यंत*


पूजा कशी करावी?

जेष्ठ पौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवणाऱ्या महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर व्रताची सुरुवात करावी. या दिवशी श्रृंगार करावा. त्यानंतर वट वृक्षाची पूजा करावी. वडाला फुले, वाण, पाणी देत त्याभोवती परिक्रमा करावी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.


🌺 वट पौर्णिमा 🌺

पौराणिक कथा

भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र आणि गुणी कन्या होती. सावित्री मोठी झाल्यावर राजाने तिला आपला पती निवडण्याची परवानगी दिली.


सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी आणि मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करु नको, असा सल्ला सावित्रीला दिला.


पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करु लागली.


सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करुन सावित्री व्रताचा आरंभ केला. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आला आणि तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण हरु लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले आणि पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला.


अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वरदान मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे आणि राज्य परत मागितले आणि आपल्याला पुत्र व्हावा असे वरदान मागितला. यमराजाने घाईघाईने तथास्तु म्हटले. काही काळाने त्याला वचनबद्ध झाल्याचे कळाले आणि सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करुन उपवास करतात आणि वट सावित्री व्रत ठेवतात.


 वटसावित्री आरती

अश्वपती पुसता झाला।। नारद सागंताती तयाला।।अल्पायुषी सत्यवंत।। सावित्री ने कां प्रणीला।।आणखी वर वरी बाळे।। मनी निश्चय जो केला।।आरती वडराजा।।१।।


दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ।।धृ।।ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ।।त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी।।आरती वडराजा ।।२।।


स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला।।धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला।येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला।।आरती वडराजा ।।३।।


जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती।। चारी वर देऊनिया। दयावंता द्यावा पती।।आरती वडराजा ।।४।।


पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी।।तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती।।आरती वडराजा ।।५।।


पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती।। स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया। आणिलासी आपुला पती।। अभय देऊनिया। पतिव्रते तारी त्यासी।।आरती वडराजा ।।६।।


वडाची आरती ऑडियो -


वटपौर्णिमा गाणे


Kp


No comments:

Post a Comment