आरोग्य व शारीरिक शिक्षण विषय लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कार्य (इ. १२ वी) परीक्षा एप्रिल मे २०२१
🎯 या विषयाची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा नवीन मूल्यमापन आराखड्यानुसार होईल.
सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा मूल्यांकन इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना राहिल.
त्यामुळे सदर परीक्षेचे दिनांक १०/०६/२०२१ पर्यंत कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर आयोजन करून त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे सादर करावे.
📌 परिपत्रक पहा 👇
लेखी परीक्षा २५ गुण प्रात्यक्षिक परीक्षा २५ गुण असे एकूण ५० गुणांपैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीत रुपांतर करण्यात यावे.
मार्गदर्शक सूचना :
१) कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात.
२) कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत.
३) कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट/सतरंजी
स्रोत : व्हॉट्सॲप
No comments:
Post a Comment