K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 9 June 2021


जागतिक दृष्टीदान दिन 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' (नेत्रदान माहिती व महत्व)


         नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिवस अंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 'असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' या घोषवाक्याचा आधार घेत डोळ्यांविषयी काळजी घेत अंध व्यक्तींना नेत्रदान करून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत.या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. 


💥 उद्देश्य
         जागतिक दृष्टीदान दिनाचे उद्दिष्टे नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे.विकासशील देशांमध्ये प्रमुख सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे. 


         डोळे ही ईश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे; परंतु काही व्यक्ती यापासून वंचित असतात. काही कारणास्तव त्यांना अंधत्व प्राप्त होते. जन्मानंतर त्यांना अंधत्व येते. त्यामुळे अशा व्यक्ती जगाचे सौंदर्य पाहू शकत नाहीत. सौंदर्याने भरलेली सृष्टी ज्यांना पाहता येत नाही, ते या सृष्टीसौंदर्याला मुकतात. या व्यक्तींना नेत्र मिळाले, तर ते सृष्टीचा आस्वाद घेऊ शकतील. परमेश्वराने माणुसकी या नात्याने दृष्टी असणाऱ्या व्यक्तीने दृष्टिहीन व्यक्तीला नेत्रदान केले, तर दात्याच्या जीवनाचे नक्कीच सार्थक होईल.

💥 नेत्रदान कोण करू शकतो?
          एक वर्ष वय असलेली कोणतीही व्यक्ती आपले नेत्रदान करु शकते. जिवंत असताना आपले डोळे दान करण्यासाठी इच्छापत्र लिहून दिल्यास मृत्यूनंतर अशा व्यक्तीचे डोळे दान होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईकांनी त्याच्या इच्छेचा आदर ठेऊन कार्यवाही करायला हवी. मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, चष्मा वापरत असणारे व्यक्तीही नेत्रदान करू शकतात.
         एका व्यक्तीच्या नेत्रदानाने किमान दोन जणांना असंख्य रंगांनी बहारलेले नयनरम्य जग बघता येऊ शकते. तुम्ही घेतलेल्या एका निर्णयामुळे एखाद्याचे आयुष्य सुंदर आणि सुखकर होऊ शकते.
         अवयवदान, रक्तदान, नेत्रदान आदींना फार महत्त्व आहे. धनदान, अन्नदान यापेक्षा जर नेत्रदान करून एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी दिली, तर आयुष्यात आपल्या कर्तबगारीने दाता खूप मोठा होईल. त्याच्या हातून कदाचित समाजकार्यदेखील घडेल.

💥 नेत्रदान करतेवेळी घ्यावयाची काळजी
         नेत्रदान करायचे इच्छापत्र लिहून दिल्यावर मृत्यूनंतर नातेवाईकांनी शक्य तितक्या लवकर म्हणजे मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासामध्ये मृत व्यक्तीचे डोळे नेत्र बॅकेत जमा होतील, असे पहावे. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्र बँकेत दूरध्वनी करुन खालील बाबीची पूर्तता करायला हवी. 
1) मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे दोन्ही डोळे झाकून त्यावर कापसाचा बोळा ठेवावा, 
2) पंखा चालू असल्यास तो बंद करावा, 
3) शक्य असल्यास अधूनमधून सूक्ष्म जंतूनाशकाचे थेंब मृत पावलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये टाकावे. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

💥 कोणत्या मृत व्यक्तीचे नेत्र दान होऊ शकत नाही
         रॅबिज, सिफीलिस, सांसर्गिक काविळ, सेप्टीसेमिया आणि एड्स अशासारख्या रोगाने बाधित असणाऱ्यांना आपले डोळे दान करता येत नाही.

💥 बाहुलीच्या पडदा अस्पष्ट होण्याची कारणे
         1) संसर्ग, 2) इजा, 3) डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर व्यवस्थित काळजी न घेणे, 4) कुपोषण, 5) अनुवांशिकता.

💥 मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे
         नेत्रदान करणाऱ्या व्यक्तिच्या मृत्युनंतर 6 ते 8 तासाच्या आत नेत्रदान करणे गरजेचे असते. ज्या व्यक्तिला नेत्रदानासाठी कॉर्नियाचा वापर करायचा आहे, त्याला 24 तासाच्या आत कॉर्नियाचे प्रत्यारोपण करणे गरजेचे असते. नेत्रदानाचा अर्थ शरिरातून संपूर्ण डोळा काढून घेणे असा होत नाही. यात मृत व्यक्तीच्या डोळ्याचा कॉर्नियाचा वापर करण्यात येतो.

💥 नेत्रदान आणि कायदा
         जिवंतपणी कोणालाही कायद्यानुसार नेत्रदान करता येत नाही तसेच ज्या व्यक्तीला डोळ्याचे रोपण करण्यात आले आहे त्या व्यक्तीलाही कोणाचे डोळे मिळाले आहेत, हेही सांगितले जात नाही.

💥 डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
👁👁👁👁👁👁👁
         डोळे हा अवयव सर्वात महत्वाचा आहे, मात्र डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे, डोळ्याची काळजी कशी घ्यावी याविषयी थोडक्यात पण अतिशय महत्वाची माहिती आहे, आपण डोळ्याची काळजी तर करत नाही, पण डोळ्यांना अपाय होईल असं काही करतो, तर डोळ्यांना अपाय होवू नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेणे देखील महत्वाचे आहे.

चांगल्या दृष्टीक्षेपासाठी निरोगी आहाराचे सेवन करावं: - आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, बीन्स, आणि गाजराचा समावेश जास्तीत जास्त करावा.

धूम्रपान सोडावं :- धूम्रपान केल्यामुळे मोतीबिंदू, ऑप्टिक आणि मज्जातंतूच्या नुकसानासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात. 

सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचण्यासाठी यूव्ही सनग्लासेस वापरा: - जे आपल्या डोळ्यांचा संरक्षणासाठी चांगले आहेत.

सेफ्टी ग्लासेस वापरा :- आपण कार्यस्थळी धोकादायक पदार्थासोबत काम करीत असल्यास आपल्याला आपले डोळ्यांच्या संरक्षणासाठी सेफ्टी ग्लासेस घालणे आवश्यक आहे.

संगणकावर बऱ्याच काळ काम करीत असल्यास : वारंवार जागेवरून उठा. डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.

टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्माचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

कमी प्रकाशात वाचू नका : डोळ्यांच्या त्रासांसाठी हे देखील कारणीभूत असतं.

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमाने डोळ्यांची तपासणी करा.

खिडकी किंवा दिव्यांमधून येणार थेट प्रकाश संगणकावर पडू देउ नये. डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न करा. गरज असल्यास अँटी ग्लेयर स्क्रीनचा वापर करा.

कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर करीत असाल तर जास्त काळ घालण्यापासून टाळावं: कॉन्टॅक्ट लॅन्स वापरताना पोहणे आणि झोपणे टाळा. 

पुरेशी झोप घ्यावी यासाठी रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.

*दिवसातून दोन वेळा साध्या गार पाण्याने डोळे स्वच्छ करा/धूवा, असं केलं तर तुम्हाला आयुष्यात डोळ्याच्या समस्या येणार नाहीत.*

*डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये. संगणकावर सलग काम करु नये. मधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी.*

*वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.*

*प्रवासामध्ये वाचू नये.*

*अपुऱ्या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.*

*अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये.सूर्यकिरणांपासून डोळ्यांच्या रेटिनावर गंभीर परिणाम होवू शकतो, तेव्हा काळा गॉगल प्रखर उन्हात वापरा.*

 *सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.*

*पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.*

*डोळ्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक उत्पादनाची पाहणी करावी. क्लिनिंग सोल्युशन, कॉन्टॅक्ट लेन्सेस आमि आय ड्प्स यांची एक्सपायरी डेट तपासून घ्यावी. कॉन्टॅक्स लेन्स वापरताना अधिक काळजी घ्यावा.*

*डोळ्यांना सूज अथवा डोळयांखाली काळी वर्तुळे आल्यास चंदन आणि जायफळाची पेस्ट डोळ्यांभोवती रात्री लावून ठेवा. सकाळी धुऊन टाका. यामुळे डोळ्यांना गारवा मिळून त्याखालील काळी वर्तुळे नाहीशी होतील. अथवा टोमॅटो आणि लिंबाचा रस डोळ्यांच्या खाली लावून तो सुखल्यावर चेहरा धुवून घ्यावा. नियमित असे केल्याने डोळ्याखालची वर्तुळे हळू-हळू कमी होतात. तसेच बदामाच्या तेलाने जवळपास २० मिनिटे डोळ्यांभोवती मसाज करावा,पुदीन्याचा रस लावल्यानेही काळी वर्तुळे कमी होतात,काकडीच्या किंवा बटाटयाच्या चकत्या डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखालील फुगीरपणा सूज कमी होऊन तिथली त्वचा ताजीतवानी होते.*

*काकडीचा रस काढा आणि तो चेहर्याला लावा किंवा तो थोडा असेल तर तो डोळ्याभोवती लावा. दहा ते पंधरा मिनिटे त्याठिकाणी ठेवा आणि पंधरा मिनिटांनी धुवून टाका. त्यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होईल.हाच काकडीचा रस बटाट्याच्या रसात मिसळून तो चेहर्याला लावून असाच दहा पंधरा मिनिटे ठेवून तो स्वच्छ पाण्याने धुवावा. त्याने काळी वर्तुळे तर जातातच परंतु काही कारणांनी चेहर्याला सूज आली असेल तर ती सूज उतरण्याससुध्दा मदत होते.*

*डोळे लाल झाले असल्यास किंवा डोळ्यांविषयी काही तक्रार असल्यास सातत्याने ड्रॉप्सचा वापर करू नये, असं केल्याने अनेकवेळा त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.*

डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामालाही महत्त्व आहे. डोळ्यांचे दोन महत्त्वाचे व्यायाम आपण घरच्या घरीही करू शकतो.

*1) एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते.*

*2) काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठिपक्याकडे एकटक पाहावे. असे करताना बुबळे फिरतील व डोळ्यांचा व्यायाम चांगला होईल. या व्यायामांच्या माध्यमातून डोळ्यांभोवती असलेल्या आठ स्नायूंची क्षमता वाढवता येते.*

*डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी नेहमी हिरवा भाजीपाला आहार मध्ये समाविष्ट करावा. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी विटामिन भरपूर असलेले पदार्थ आहारामध्ये खावे. आहार संतुलित असायला हवा. संतुलित आहाराने डोळ्यांचे विकार होत नाही.*

*नेत्रतज्ञांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कशाचाही रस घालू नये . अथवा ड्रॉप्स टाकू नये .* 
 
असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही. भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
1 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव 
2 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
3 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
4 सामाजिक आणि धार्मिक मान्यता

संग्रहित

No comments:

Post a Comment