K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 4 June 2021

 संत मुक्ताबाई यांच्याबद्दल माहिती

 (जन्म : आपेगाव, महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : कोथळी (जळगाव जिल्हा), इ.स. १२९७) या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते.

संत मुक्ताबाई अभंग

संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.

         पण ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या ‘ताटीचे अभंग’ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी ।  असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते.


शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला l

अवघी साधन हातवटी l मोले मिळत नाही हाटी l

कोणी कोणा शिकवावे l सारे शोधुनिया घ्यावे ll

लडिवाळ मुक्ताबाई l जीव मुद्यल ठायीचे ठायी l

तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l


मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रद्नेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते. मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत. तसेच हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे अनुभवकणच आहेत. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.


वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी

लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l

पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l

सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l

जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l

सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l

एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l


ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एका मागोमाग एक अशा शके १२१८ मध्ये समाध्या घेतल्या तेव्हा निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्यथा-व्याकूळ झाले, उदासीन झाले. मुक्ताई अबोल व उदासी बनली. दु:खी कष्टी अवस्थेत मुक्ताबाई महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहून येथे आल्या. वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी वीज कडाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे.


कडाडली वीज निरंजनी जेव्हा l

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l

जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l

नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l


ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय 


योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. मुक्ताबाईंनी 'ज्ञानबोध' या ग्रंथाचेही लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.


मुक्ताबाईंची समाधी कोथळी (ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव) येथे आहे.

जीवनपट

जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा (घटस्थापना) (शके ११९९ किंवा शके १२०१)

ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा - मातापित्यांचा देहत्याग - ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेली सनद - विसोबा खेचर शरण आले - शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठण गावी आले. - ताटीच्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वरांना विनवणी - ज्ञानेश्वरांकडून ज्ञानेश्वरीची निर्मिती - मुक्ताबाईने चांगदेवाना 'पासष्टी'चा अर्थ सांगितला. - मुक्ताबाईचा पहिला शिष्य - चांगदेव - नामदेवांची भेट - गोरक्षनाथ कृपेचा वर्षाव - अमृत संजीवनीची प्राप्ती - चिरकाल अभंग शरीराचे मिळालेले वरदान - निवडक शिष्यांसमवेत अज्ञातवास - तीर्थयात्रेवरून परतलेल्या ज्ञानदेवादींची भेट - ज्ञानेश्वरांची समाधी (आळंदी) - सोपान व वटेश्वरांची समाधी (सासवड) - चांगदेवांची समाधी (पुणतांबे) - आपेगावी मुक्काम - वेरूळ, घृष्णेश्वर येथे मुक्काम - 'ज्ञानबोध' ग्रंथाची निर्मिती - तापीतीरी स्वरूपाकार झाली. (वैशाख वद्य दशमी){संदर्भ हवा}}


मुक्ताबाईचे स्वतःचे साहित्य :-

मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य आहे. त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.


मुक्ताईंवरील पुस्तके

मुक्ताई जाहली प्रकाश(संशोधन) - स्वामी प्रा.डॉ तुळशीराम महाराज गुट्टे ( संत साहित्यिक )

आदिशक्ती मुक्ताई -प्र. न. पित्रे (धार्मिक)

कडकडोनी वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई : व्यक्ती आणि वाङ्‌मय) - ललितेतर संशोधन अभ्यासग्रंथ - लेखिका केतकी मोडक

धन्य ती मुक्ताई - सुमति क्षेत्रमाडे (कादंबरी)

मी बोलतेय मुक्ताई - नीता पुल्लीवार (ललित)

मुक्ताई - मंदा खापरे (कादंबरी)

मुक्ताई - मृणालिनी जोशी (ललित)

मुक्ताई - शांता परांजपे (ललित)

श्री संत मुक्ताबाई चरित्र - प्रा. बाळकृष्ण लळीत

मुक्ताबाई क्रांतिदर्शी - नंदन हेर्लेकर

मुक्तीकडून मुक्तीकडे (संत मुक्ताबाईंचे व्यक्तिचित्रण, लेखिका - सुहासिनी इर्लेकर)

मुक्ताई दर्शन - बाबुराव मेहूणकर (आध्यात्मिक जीवनपट)

ऐं मुक्ताईं सोsहम् - बाबुराव मेहूणकर (तत्त्वज्ञानपर)

गाथा दासमुक्ताची:प्रथम खंड - दासमुक्ता-बाबुराव मेहूणकर (स्फुट/आत्मकथनपर)

एक समालोचन - दासमुक्ता/बाबुराव मेहूणकर (मुक्ताईवरील एका पुसतकाचे समालोचन)


मुक्ताबाई स्वरूपकार झाल्या

मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हात मुक्ताईनगर हे तालुक्याचे गांव सातशे वर्षा पुवीॅ या गावांचे नाव महतनगर होते 
मुस्लिम राजवटीत आदीलशहाच्या नावावरुन आदीलाबाद त्याचेच अपभ्रंश एदलाबाद झाले 
याच गावी 718 वर्षापुवीॅ संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात अंतर्धान झाल्या ; गुप्त झाल्या ती विज ज्या ठिकाणी पडली तेथे आई मुक्ताई चे प्रशस्त मंदीर संस्थान आहे 
ऐतिहासिक नाव परंपरेशी दुरावलेल्या महतनगर- एदलाबाद-चे 
श्री क्षेत्र मुक्ताई नगर असे सार्थ नामकरण शासनाने केले आहे

एशिया महामार्ग क्र. 46 व मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 तसेच औरंगाबाद- ईदौर या आंतरराज्य महामार्गावर मुक्ताईनगर वसलेले आहे 
तापी-पुर्णा या महानद्याचा विस्तीर्ण संगम ;

योगी चांगदेवाने १४०० वर्ष तपश्चर्या केलेले ठिकाण पुरातन मंदीर असा रमणीय परिसर आहे

श्री संत मुक्ताबाई संस्था मध्ये निवासाच्या महाप्रसादाची व्यवस्था आहे

दरमहा वद्य एकादशी ला हजारो वारकरी वारी करतात वार्षिक महायात्रा माघ वारी महाशिवरात्रीस भरते

आषाढीस पालखी सोहळा 

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र अाळंदी येथे संजिवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका सासवडला समाधिस्त झाले.

नंतर नेवासा, आपेगांव, पुणतांबे, पैठण, घृणेश्वर, पहुर, जामनेर, बोदवड

मार्गे हि संत मंडळी देवासह, ऋषीगण, यक्ष, किन्नर, गंधर्व सर्व मुक्ताईनगर (तेंव्हाचे महत् नगर)

येथे आले असता १५ दिवस मुक्ताईनगर कोथळी परिसरात वास्तव्य करुन वै. वद्य १० ला दुपारी १ वजुन १५ मिनिटांनी विजेच्या

कडकडाटासह मुक्ताई गुप्त (स्व-स्वरुपकार) झाल्या.

त्याच मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताई समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर आहे.

स्मृतिप्रित्यर्थ

जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद तालुक्याचे नाव बदलून संत मुक्ताईच्या नावावरून मुक्ताईनगर केले आहे.

पुण्यातील येरवडा येथे मेंटल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी हॉस्पिटलच्या आवारातच मुक्ताई निवास नावाची धर्मशाळा स्थापन करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment