८ जुन - जागतिक महासागर दिन
महासागर कितीही विशाल असले तरी माणसाने केलेला किती कचरा त्यांनी पोटात घ्यावा यालाही अखेर काही मर्यादा आहे. आपण ही मर्यादा ओलांडल्यामुळे तेथील जीवसृष्टीला आणि अन्नसाखळ्यांना धक्का बसला आहे. यामुळे माणसाला मिळणारे मासे तर कमी झाले आहेतच, शिवाय हवामानावरही विपरीत परिणाम होत आहे.
समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होऊ लागला आहे.
सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या.।कचरा कोणताही असो “फेका समुद्रात !” अहो केवढा मोठा आणि खोल समुद्र असतो, एवढ्याशा कचऱ्याने काय होतंय? ही प्रथा जगभरातील (व्यक्तीपासून राष्ट्रांपर्यंत) बहुतेक सर्वांनीच पाळल्यामुळे आता मात्र परिस्थिती गंभीर बनली आहे.
मासे मिळवण्यासाठी अधिकाधिक खोल समुद्रात जावे लागत आहे, पाण्याचा दर्जा घसरला आहे. हवामानावर परिणाम होत आहे. विशिष्ट सजीव नष्ट होऊ लागले आहेत. हे सारे थांबविणे हेच या दिनाचे खरे उद्दिष्टे आहे.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६
No comments:
Post a Comment