शाळेची घंटा वाजणार; पण फक्त शिक्षकांसाठीच.
सकाळ वृत्तसेवा
नगर, ता. ११: जिल्ह्यात पहिली ते बारावीपर्यंतच्या पाच हजार ३७६ शाळा सोमवारपासून (ता. १४) सुरू होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांसह शाळा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली, तरी ती विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर फक्त शिक्षकांसाठी राहणार आहे.
१०० टक्के उपस्थिती अनिवार्य
विद्यार्थी येणार नसले, तरी शिक्षकांना मात्र रोज शाळेत जावे लागणार आहे. राज्य सरकारने सर्व शाळांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना शाळेत जाऊनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण द्यावे लागणार आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होणार की नाही, याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेताना राज्य सरकारला दूरगामी विचार करावा लागणार आहे.
अद्याप शासनाने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही; परंतु या वर्षीही मागील वर्षाप्रमाणेच शाळा ऑनलाइन सुरू राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. १४ जूनपूर्वी शाळेची व स्वच्छतागृहांची स्वच्छता, शाळांचे निर्जंतुकीकरण, मास्क, सॅनिटायझर, साबण, हँडवॉश, पाणी यांची उपलब्धता करून घ्यावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षि शारीरिक अंतर राखणे शक्य व्ह यासाठी वर्गात प्रत्येक बाका एक विद्यार्थी किंवा बैठकव्यवस्थे किमान एक मीटर अंतर राहील, याची दक्षात घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळा भरणार असल्या, तरी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात यावे, असे आदेश शिक्षण विभागाला प्राप्त झालेले नाहीत.
स्रोत :
No comments:
Post a Comment