१४ जून : जागतिक रक्तदान दिन (Blood Donor Day)
द्रव्यदानं परम दानम्
अन्नदानं ततोधिकम्
ततः श्रेष्ठ रक्तदानम्
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जाते. शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.
कुठलीही अपेक्षा न करता सामाजिक उत्तदरायित्व म्हणून आपल्या आसपास हजारो रक्तदाते रक्तदान करत आहेत. काही समाजसेवकांनी हजारो रक्तदात्यांना विविध संघटनांद्वारे एकत्र आणल्यामुळे समाजात रक्तदानाची चळवळ जोमाने सुरू आहे.
सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसऱ्याचा जीव वाचवू शकते. आज संपूर्ण जगभरात 'जागतिक रक्तदाता दिन साजरा होत आहे. रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी 2004 पासून जागतिक आरोग्य संघटना 14 जून रोजी 'जागतिक रक्तदाता दिवस साजरा करत असते.
का साजरा केला जातो?
A-B-O या रक्तगटांचा शोध लावणारे आणि रक्तदान संकल्पनेला अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणारे ऑस्ट्रियाचे नोबेल विजेते डॉ. कार्ल लॅन्डस्टेनर यांच्या जन्मदिनानिमित्त 'जागतिक रक्तदान दिन' साजरा केला जातो.
२०२० वर्षाची थीम आणि घोषवाक्य
'सुरक्षित रक्त, जीव वाचवते' अशी या वर्षीच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम असून 'रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा' हे गेल्या वर्षीचं घोषवाक्य होते.
Theme of the year (2021)
For 2021, the World Blood Donor Day slogan will be “Give blood and keep the world-beating”. The message highlights the essential contribution blood donors make to keeping the world pulsating by saving lives and improving others' health.
रक्तदान कोण करू शकते, काय आहेत आवश्यक अटी?
कोणतीही सुदृढ, सशक्त, रोग न झालेली व्यक्ती रक्तदान करू शकतो.
• वयाच्या 18 व्या वर्षापासून 60 व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येते. रक्तदानानंतर कोणतेही कष्टाचे काम करू शकतो.
• रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याचे वजन 45 किलो हुन अधिक असावे.
रक्तदाताच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण 12.5 असावे.
• रक्तदाताच्या नाडीचे ठोके 80 ते 100 असावेत.
• गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत..
आज धकाधकीच्या बर्याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशनच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपणासारखा सूज्ञ नागरिकच करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प युवकांनी करावा.
एक पिशवी रक्त दिल्याने तब्बल 3 लोकांचा जीव वाचवता येऊ शकतो. लालपेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा अशा तीन घटकांना वेगळे करता येते. त्यामुळे रक्तदान केल्याने किती लोकांचे जीवन आपण वाचवू शकतो, ही जाणीव ठेवून नियमित रक्तदान करण्याचा संकल्प करावा.
मानवी रक्ताबद्दल काही रंजक गोष्टी
नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त एक कप (जवळपास 250 ML) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास पाच लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या सात टक्के रक्त असते.
प्लाझ्मा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते तर प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.
1ML रक्तामध्ये 10,000 पांढऱ्या रक्तपेशी आणि2,50,000 प्लेटलेट्स असतात.
लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड (CO2) संपवतात. पांढ-या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात त्यांना सैनिक पेशी सुद्धा म्हणतात.
आपल्या नसांमध्ये 400 किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त 30 मीटरपर्यंत उडू शकते.
रक्तदान कोण करू शकत नाही?
• एच आय व्ही पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
• Hepatitis B or C रोग असलेले व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
• तसेच सर्दी फ्लू खोकला पोट दुखी किंवा पोटाचा त्रास असलेल्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
• रक्तदान करण्यासाठी शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक असले पाहिजे.
रक्तदान केल्याचे फायदे (benefits of blood donate in marathi)
• रक्तदान केल्याने अटॅकचे आकांशा कमी असते.
• रक्तदान केल्याने रक्त पातळ होण्याचे मदत होते,
• रक्तदान करणे हृदयासाठी चांगले असते.
• रक्तदान केल्याने कॅन्सर आणि अन्य आजार होण्याची शक्यता कमी असते.
• रक्तदान केल्याने बोनमॅरो नवीन रेड सेल्स निर्माण होते.
• नवीन ब्लड सेल्स मुळे शरीर चांगले राहते.
एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती काळ रक्तदान करता येणार नाही?
• संपूर्ण रक्त दान दिल्यानंतर पुढच्या वेळी रक्तदान करण्यासाठी त्याने किमान 56 दिवस वाट पाहिली पाहिजे.
• "प्लेटलेट" दान केल्यावर पुढच्या वेळी रक्तदान करण्यासाठी त्याने कमीतकमी 2 आठवडे थांबावे.
• जर "प्लाझ्मा" देणगी देत असेल तर पुढच्या वेळी रक्तदान करण्यासाठी त्याने कमीतकमी 4 आठवड्यांची प्रतीक्षा करावी.
• जर तुम्ही "डबल रेड सेल्स" दान केले तर पुढच्या वेळी रक्तदान करण्यासाठी त्याने किमान 112 दिवस थांबावे.
प्लाझ्माच्या शरीरात काय काम आहे?
रक्ताचा प्लाझ्मा एक हलका पिवळा द्रव असती. जो पेंढाच्या रंगासारखा असतो. पाण्याबरोबर प्लाझ्मामध्ये क्षार आणि एन्झाईम्स प्लाझ्माचा मुख्य हेतू पौष्टिकता, हार्मोन्स आणि प्रथिने शरीराच्या आवश्यक भागापर्यंत पोचविणे हा आहे. पाणी, मीठ आणि एंजाइमसह मानवी असतात.
प्लाझ्मामध्ये देखील महत्त्वपूर्ण घटक असतात. यामध्ये इम्युनोग्लोबुलिन (प्रतिपिंडे, क्लोटींग घटक आणि प्रथिने अल्बमिन आणि फायब्रीनोजेन समाविष्ट आहेत. जेव्हा आपण रक्तदान करता तेव्हा आरोग्य व्यावसायिक आपल्या प्लाझ्मामधून या महत्वाच्या घटकांना वेगळ्या बनवून विविध उत्पादनांमध्ये केंद्रित करू शकतात. या उत्पादनांचा नंतर उपचार म्हणून वापर केला जातो शॉक भावात आणि इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे ग्रस्त लोकांचे जीवन वाचविण्यात मदत होते. प्लाझ्मामधील प्रथिने आणि प्रतिपिंडे देखील ऑटोम्यून्यून डिसऑर्डर आणि हिमोफिलिया यासारख्या दुर्मिळ तीच परिस्थितीसाठी धेरपी तयार करण्यासाठी वापरल्या जातात. या परिस्थितीसह लोक या उपचारामुळे दीर्घ आणि उत्पादक आयुष्य जगू शकतात. खरं तर काही आरोग्य संस्था प्लाइमाला "जीवनाची देणगी म्हणतात.
WORLD BLOOD DONATION DAY 2021: QUOTES
स्रोत : इंटरनेट
No comments:
Post a Comment