K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 13 June 2021

 SCERT मार्फत ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत उद्यापासून (दि.१४ जून) सह्याद्री वाहिनीवर पाच तास विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण

         राज्य शासनाकडून येत्या  सोमवारपासून (दि.१४ जून) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ( Doordarshan’s Sahyadri channel) ज्ञानगंगा ( Gyanganga) या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. पहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कोरोनाच्या ( Corona) संकटकाळात राज्यातील शाळा ( School) व कॉलेज ( Collage) बंद असल्याने विद्यार्थांना शिक्षण घेण्यास अडचण येत होती. त्यामुळे विद्यार्थांना ऑनलाईन शिक्षणाचा ( Online Education) पर्याय स्वीकारावा लागत आहे. त्यामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सोमवारपासून दररोज सकाळी ७.३० सात ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे.

         विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक धडे देण्यात येणार आहे. १५ जून पासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळे तसेच राज्य सरकारकडून राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एमकेसीएल ( MKCL) आणि राज्य परिषदेच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘टिलीमिली’( Tili Mili ) हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. परंतु, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही शैक्षणिक कार्यक्रम अद्याप तरी सुरु झाला नव्हता.


सह्याद्री’ वाहिनीवरील दहावी-बारावीच्या तासिकांचे वेळापत्रक खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.

दि.१४ जून ते १८ जून


 🔖 दि.१४ जून ते १८ जून चे वेळापत्रक डाऊनलोड करा. 👈


दि. २१ जुन तेे २५ जून 

🔖 दि.२१ जून ते २५ जून चे वेळापत्रक डाऊनलोड करा. 👈


दि. २८ जून ते २ जुलै


🔖 दि.२८ जून ते २ जुलै वेळापत्रक डाऊनलोड करा. 👈


 प्रक्षेपण बाबतचे परिपत्रक डाऊनलोड करा


No comments:

Post a Comment