८ जून - जागतिक मेंदूचा ट्युमर दिन
आज जागतिक मेंदूचा ट्युमर दिन !
मेंदूतील गाठ म्हणजे असा मांसाचा गोळा किंवा मांसाची वाढ, जो मेंदूतील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे तयार होतो. मेंदूच्या पेशींच्या या अनियंत्रित वाढीचे अचूक कारण अजून स्पष्ट नाही. तथापी, गाठ होण्याच्या 20 कारणांपैकी एक, अनुवांशिकतेतून मिळालेल्या एखादे जनुक असे आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या प्राणांना मेंदूची गाठ होण्याचा अधिक धोका असतो.
मानवी इंद्रियांमध्ये सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे 'मेंदू'. भूतलावरील सर्व सजिवांमध्ये मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. मानवी शरीर जितके सुदृढ़ आहे तितक्याच व्याधीदेखील आहेत. मानवी मेंदूमध्ये ज्या गाठी निर्माण होतात त्यांना वैद्यकीय भाषेत ' ब्रेन ट्यूमर' म्हटलं जातं. आज जागतिक 'ब्रेन ट्यूमर दिना निमित्त' ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय याबद्दल डोंबिवली मधील एस.आर.व्ही. ममता रुग्णालयाच्या मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. कविता बऱ्हाटे यांनी मुंबई लाईव्ह ला दिलेल्या या खास मुलाखतीतुन जाणून घेऊया.
*ब्रेन ट्यूमर म्हणजे काय ?
मेंदूमध्ये वेगवेगळ्या गाठी होतात. त्यांना ब्रेन ट्यूमर म्हणतात. हा ब्रेन ट्यूमर बेनाईन व मॅलीग्नंट अशा दोन प्रकारचे असू शकतात. बेनाईन ब्रेन ट्यूमरमध्ये धोका कमी असतो. मॅलीग्नंटला आपण बोली भाषेत कॅन्सर म्हणतो. यामध्ये वेगाने मेंदूतील गाठ वाढून अधिक समस्या निर्माण होतात. बेनाईन ट्यूमरची फार कमी गतीने वाढ होते. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारा काढता येते.
*ब्रेन ट्यूमर कसा होतो ?
मेंदूतील कुठल्याही पेशीची अनावश्यक वाढ होऊन गाठ होऊ शकते. मेंदूमध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. एक न्युरोन म्हणजे मज्जातंतू आणि दुसरी ग्लायल टिशू म्हणजे मेंदूचे बाह्य आवरण. यामध्ये मज्जातंतूपेक्षा मेंदूच्या बाह्य आवरणातून तयार होणारे ट्यूमर सामान्य असतात.
*ब्रेन ट्यूमरचा रुग्ण कसा ओळखावा ?*
तीव्र डोकेदुखी, खूप जास्त उलट्या होणे, अचानक तोल जाणे या बाह्य लक्षणांवरुन ब्रेन ट्यूमरची शंका येऊ शकते. अशावेळी डाँक्टारांकडून सल्लामसलत करून आवश्यक चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. बाह्य लक्षणांवरुन थोडी फार कल्पना येते. पण तो आजार सांगण्यासाठी मेंदूचे स्कॅनिंग करावेच लागते. स्कॅन केल्यानंतरच तो १०० टक्के अथवा कोणत्या प्रकारची गाठ आहे हे सांगणे शक्य होऊ शकते.
ब्रेन ट्यूमर झाल्याची लक्षणे
मेंदूच्या गाठीच्या प्रकारावरून आणि स्थानानुसार, त्या गाठींची भिन्न लक्षणे ठरविली जातात. शरीराच्या भिन्न कार्यांची मेंदूच्या वेगवेगळ्या भागांवर जबाबदारी असल्यामुळे, गाठीद्वारे प्रभावित भागांत त्यानुसार लक्षणे दिसतात. मेंदूतील गाठीची काही सामान्य लक्षणे येथे देतआहोत:
डोकेदुखी
त गाठ असलेल्या रुग्णांपैकी सुमारे 20% रुग्णांमधील प्रारंभिक लक्षण डोकेदुखी हे आहे. गाठ असलेल्या व्यक्तीमधील डोक्याचे दुखणें अनियमित असू शकते, पहाटे असे दुखणें वाढू शकते, त्यानंतर दिवसाच्या मध्यभागी उलट्या होऊ शकतात किंवा ही डोक्याचे दुखणें, खोकल्याने किंवा शारिरीक स्थितीत बदल करतांना (उदा. उठून बसतांना व बसून उभे राहत असतांना) आलेल्या डोक्याच्या कवटीवर दबावाने, वाढू शकते.
ग्लानी
ची गाठ असलेल्या काही व्यक्तींमध्ये, डोकेदुखीऐवजी, ग्लानी येणे हे मेंदूच्या गाठीचे पहिले लक्षण असू शकते. मेंदूतील काही असामान्य विद्युतीय क्रियांमुळे ग्लानींचे झटके येऊ पाहतात. मेंदूत गाठ असलेल्या व्यक्तीमध्ये हे झटके, अचानक आपली चेतना गमावण्याच्या, शारीरिक कार्यांवर नियंत्रण गमावण्याच्या, किंवा कमी काळासाठी (30 सेकंद एवढ्या वेळेसाठी) श्वासोच्छवासाची क्रिया न होऊ शकल्याने त्वचेचे निळे पडण्याच्या स्वरूपात येऊ शकतात.
स्मृतीभ्रंश
मेंदूच्या गाठीमुळे रुग्णाला स्मृतीच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. विकिरण किंवा शस्त्रक्रियेसारख्या उपचारांमुळेही त्याला स्मृतीच्या समस्या होऊ शकतात. मेंदूत गाठ असलेल्या रुग्णांमध्ये, थकवा, स्मृतीच्यासमस्या आणखी वाढू शकतात. दीर्घकालिक स्मृतीपेक्षा रुग्णाची अल्पकालिक स्मृती अधिक प्रभावित होते (मिळवतांना हवा असलेला दूरध्वनी क्रमांक विसरणे). (अधिक वाचा: स्मृतीभ्रंश - त्यामागील कारणे)
निराशा
संशोधकांचे असे देखील म्हणणे आहे की मेंदूत गाठ असलेल्या चारमधील एक रुग्णाला मोठ्या पातळीचे अवसादात्मक आजार होऊ शकते. या आजारात अवसाद रुग्णालाच न होता त्याच्या आप्तेष्टांमध्येही दिसू शकते. आधी करायला, पहायला किंवा ऐकायला रुचिकर वाटत होत्या, त्या गोष्टींमध्ये रुग्णाचे मन न लागणें, निद्रानाश, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणें, आपण अनुपयोगी असल्याची भावना, कोणत्याही परिस्थितीत उदास राहणें आणि हेच काय, तर आत्महत्येचे विचारही येऊ शकतात आणि या सगळ्या अवसादाच्या सूचना आहेत.
रुग्णाच्या व्यक्तिमत्वातील बदल आणि मूड स्वींग्स
तील गाठी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात बदल देखील घडवू शकतात. जी व्यक्ती आधी स्वयंप्रेरित आणि गतिशील होती, तीच व्यक्ती नकारात्मक आणि निष्क्रीय होऊ शकते. गाठ व्यक्तीच्या विचार आणि क्रियाशीलतेवर प्रभाव पाडू शकते. तसेच, कीमोथेरपी आणि विकिरण यांसारख्या उपचार प्रक्रियांमुळे मेंदूच्या कार्यांमध्ये आणखी व्यत्यय येऊ पाहतो. मेंदूत गाठ असलेल्या रुग्णांमध्ये सामान्यतः अचानक आणि अस्पष्ट मूड स्विंग दिसतात.
विचार करण्याशी संबंधित कार्ये
त गाठ असलेल्या रुग्णांमध्ये एकाग्रता व लक्ष केंद्रित करण्याची शक्ती बदलते, संवाद व भाषा बदलते आणि बुद्धीमत्ता कमी होते. मेंदूच्या वेगवेगळ्या ठिकाणी उदा. पॅरिएटल, फ्रन्टल किंवा टेम्पोरल लोब्समधे, तयार झालेल्या गाठी एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम करू शकतात.
केंद्रीय लक्षणे
केंद्रीय लक्षणे किंवा स्थानीकृत लक्षणे अशी आहेत जी मेंदूच्या केवळ विशिष्ट भागाला प्रभावित करू शकतात. ही लक्षणे गाठीचे ठिकाण ओळखण्यास मदत करू शकतात. दुहेरी दृष्टी, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा, डोके दुखणें किंवा डोके बधीर वाटणे ही काही विशिष्ट केंद्रीय लक्षणे आहेत. ही लक्षणे स्पष्टपणे गाठीमुळे आणि त्याच्या मेंदूतील स्थानामुळे आहेत.
मास इफेक्ट
कवटीमधल्या घट्ट जागेतील गाठीच्या वाढीमुळे, गाठ त्याच्या भोवतील निरोगी तंतूंवर दबाव आणण्यास सुरूवात करते, आणि याच्या परिणामाला मास इफेक्ट (मोठ्या प्रमाणावरील प्रभाव) असे म्हणतात. गाठीजवळ द्रव्य तयार होत असल्यामुळे, मेंदूतील दबावात आणखी वाढ होते. मास इफेक्टच्या लक्षणांमध्ये वर्तनातील बदल, गुंगी, उलटी आणि डोकेदुखी यांचा समावेश होतो.
थकवा
ची गाठ असलेल्या रूग्णांमध्ये सामान्यतः थकव्याची विशिष्ट लक्षणे जसे निद्रानाश, अशक्तपणा, चिडचिड, अचानक थकल्यासारखे वाटणे आणि एकाग्रतेतील अडचणी दिसून येतात.
*यंदा रुग्णाची संख्या घटली की वाढली ?
दरवर्षी ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांची संख्या ५ टक्के वाढत आहे. नवनवीन स्कॅन उपलब्ध झाल्यामुळे ब्रेन ट्यूमरचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं ट्यूमरचे निदान लवकर होतं. वयोमान वाढल्यामुळं काही जणांमध्ये ट्यूमरचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
*आवश्यक उपचार पध्दती ?
मेंदूतील गाठीचा गोळा काढण्यासाठी शस्त्रक्रियाच केली जाते. ही गाठ कोणत्या स्थितीत व किती मोठी आहे याचं निदान झाल्यावर डाॅक्टर पुढील प्रक्रिया ठरवतात. ब्रेन ट्यूमर हा मेंदूच्या आत असेल तर ती ट्यूमरची गाठ छोटी असली तरी काढता येत नाही. तर हीच गाठ मेंदूच्या बाह्य आवरणात असेल तर काढली जाते.
*रेडिएशन थेरपी बद्दल
मेंदूतील गाठ काढल्यानंतर परत ती तयार होऊ नये या साठी रेडिएशन थेरपी केली जाते. गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया केल्यानंतर काही भाग मेंदूत राहिल्यास रेडिएशन थेरपी देऊन त्या पेशींना निकामी केलं जातं. मेंदूच्या खूप आतमध्ये असलेल्या गाठीवर सर्जरी होत नसल्यामुळं त्यावर रेडिएशन थोरपी केली जाते. त्यामुळे ती गाठ हळूहळू कमी होत जाते.
*पथ्य काय पाळावे ?
रेडिएशन थेरपी आणि किमो थेरपी करताना जे पथ्य सांगितले जाते ते पाळावेच लागतं.
*गर्भवती महिलांवर परिणाम होऊ शकतो?
या महिलांवर कोणतीच शस्त्रक्रिया केली जात नाही. तसेच गरोदरपणात रेडिएशन थेरपीही दिली जात नाही. ट्यूमरची गाठ छोटी असल्यास त्यावर लक्ष ठेवलं जातं तसेच कोणतीही औषधे यावेळस दिली जात नाहीत. ज्यावेळी स्त्री बाळाला सुखरूप जन्म देते त्यानंतर ट्यूमरच्या गाठीवर शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.
*
*संकलित
No comments:
Post a Comment