आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयाच्या परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करणेबाबत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा एप्रिल मे २०२१
📌 विद्यार्थ्यांसाठी असलेले आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा दोन्ही सत्रांत न घेता एकाच म्हणजे द्वितीय सत्रात घ्यावी.
📌 प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पद्धतीनुसार श्रेणी देण्यात यावी.
📌 सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करून त्याचे मूल्यांकन विभागीय मंडळाकडे जमा करावे.
परिपत्रक पहा 👇
महत्त्वाचे :
कोविड-१९ ची परिस्थिती पाहता सर्व शासन नियमांचे पालन करुन मुख्याध्यापक व संबंधित विषय शिक्षकांनी परीक्षेचे आयोजन करावे.
मार्गदर्शक सूचना
१) कमीत कमी विद्यार्थ्यांच्या बॅचेस करुन शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात.
२) कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरुपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत.
३) कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट / सतरंजी इ.
स्रोत : व्हॉट्सॲप
No comments:
Post a Comment