K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 5 June 2021

महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या अनुषंगाने राज्यात शासकीय कामकाजासाठी ईमेल तसेच व्हॉट्सॲपचा वापर ग्राह्य धरण्याबाबत. शासनाचा निर्णय पहा.

१) कोरोना विषाणूंचा (COVID- १९) प्रसार राज्य शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये, तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने या विभागाच्या संदर्भ क्रमांक १, २ व ५ येथील शासन निर्णयान्वये विविध सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.


२. लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे घरातच राहूनही कार्यालयीन आवश्यकतेनुसार व तातडीनुसार शासकीय कामकाजाचा निपटारा करणेसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय ईमेल (जसे एनआयसी मेल, इ.), त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल तसेच व्हॉट्सॲपचा वापर शासकीय कामकाजासाठी तसेच संबंधितांना सूचना / आदेश देण्यासाठी करणे ग्राह्य धरण्यात येईल.


३. सबब सर्व राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :


अ) प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय ई-मेल आयडी / त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ई-मेल आयडी तसेच एस. एम. एस / व्हॉट्सॲपची सुविधा असलेला मोबाईल क्रमांक, त्यांचे कार्यालय प्रमुखांस उपलब्ध करून द्यावा.


ब) शासकीय कामकाजासाठी शासकीय ई-मेल आयडी / त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल आयडी तसेच व्हॉट्सॲपचा वापर करून त्यांच्या कामाचा जास्तीत जास्त निपटारा करावा.


क) प्रस्ताव ई-मेलद्वारे फॉरवर्ड केल्यानंतर त्याबाबतची सूचना लगेचच संबंधितांस एस.एम.एस (SMS) / व्हाट्सॲपवरून (Whatsapp) देण्याबाबत दक्षता घेण्यात यावी.


ड) उक्त पद्धतीने वरिष्ठांकडून प्राप्त सूचनेनुसार ईमेलद्वारे अंतिम मान्यतेसाठी सादर केलेला प्रस्ताव (फॉरवर्ड केलेला प्रस्ताव) हा तो सादर करणारे व अंतिम मान्यता देणारे या दोन्ही स्तरामधील अधिकाऱ्यांनी पाहिला, तपासला व मान्य केला आहे, असे गृहित धरण्यात येईल.


प्रस्ताव तयार करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांनी प्रस्ताव ई-मेलद्वारे अंतिमत: फॉरवर्ड करण्यापूर्वी तो सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून फॉरवर्ड करावा व त्याची प्रत (C.C. मध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना चिन्हांकित करावी.


४. तरी सर्व मंत्रालयीन अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर सूचना त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी / कर्मचारी यांचे निदर्शनास आणाव्यात.


५. उक्त सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.


६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२००६०५१४०३१९१९०७ असा आहे. हे आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहेत.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



हशश





No comments:

Post a Comment