K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 31 May 2021

कोणत्याही राज्याच्या नकाशा ला स्पर्श करा.

         खूप महत्वाचे आणी चांगली माहिती

या पीडीएफ मध्ये तयार केलेल्या नकाशाच्या कोणत्याही जिल्ह्यास स्पर्श केल्यास त्या जिल्ह्याशी संबंधित सर्व माहिती आपल्याला मिळेल. 

हा पीडीएफ जास्तीत जास्त सामायिक करा जेणेकरून सर्व लोकांना जिल्ह्याशी संबंधित माहिती मिळू शकेल. 👇


कोरोनाने आई-वडील गमावलेल्या अनाथ मुलांना मिळणार शैक्षणिक आधार !

         कोरोनामुळे अनेक मुलांनी आपले आई-वडील गमावले आहेत. कोरोना महामारीच्या या त्सुनामीत छत्र हरवल्याने पोरक्या झालेल्या या मुलांची वैयक्तिक हानी कधीही भरून निघणारी नाही. तथापि, डोक्यावरील छत्र हरविल्याने अनेकांचे भावी जीवनदेखील अंधकारमय झालेले आहे. या स्थितीत या मुलांचे किमान शैक्षणिक नुकसान टळावे व आई किंवा वडिलांअभावी शिक्षण अर्धवट राहू नये


राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी केलेले ट्विट 👇


(मराठीत रूपांतर)

दुसर्‍या लाटेत काही मुले अनाथ झाली आहेत. केंद्राने त्यांच्यासाठी योजना जाहीर केली. राज्य सरकारही या योजनेची सुरूवात करेल आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेईल. लवकरच जाहीर केले जाईल.

सीएमओ महाराष्ट्र (@ सीएमओमहाराष्ट्र) 30 मे, 2021


         कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले आईवडील कोरोनामुळे गमावले आहेत अशा विद्यार्थ्यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या कडे याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली आहे. ज्या मुलांचे कोरोना मुळे डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले आहे त्यांचे शिक्षण, आरोग्य, उदरनिर्वाह भागवण्यासाठी शासनाकडून त्यांचे पालकत्व घेऊन आवश्यक ती मदत केली जाणार आहे.

वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की

'करोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरपले. पालकांचा आधार न राहिल्याने त्यांच्यासमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा आहे. सदर मुलांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत व पुढील शिक्षणाची जबाबदारी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घ्यावी असेही प्रस्तावात म्हटले आहे.



सेतू कामासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे






 जागतिक तंबाखू विरोधी दिन (दि.३१ मे)

परिचय

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम


परिचय

         31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

       तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.


तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम

         तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.


राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

         केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

         तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपली जबाबदारी


व्यसनाधिनतेचे परिणाम 

आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.


लेखक: अनिल आलुरकर

जिल्हा माहिती अधिकारी, बीड


दिनविशेष

 ३१ मे

-----------------------------------------

जागतिक तंबाखू विरोधी दिन

------------------------------------------


जागतिक तंबाखू विरोधी दिनाची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) वतीने ३१ मे १९८७ साली करण्यात आली. ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून होणारे रोग’ या संदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.


तंबाखू वनस्पती


तंबाखूला निकोटियाना प्रजातीच्या वनस्पतीच्या पानांन पासून बनविण्यात येते. तंबाखूचे पीक जगभरात उपलब्ध असून त्याला उत्तम मागणी आहे.  निकोटीन हा तंबाखूमधील एक प्रमुख घटक असतो.


तंबाखूचा  इतिहास

अमेरिकेमध्ये इसवीसनपूर्व ६००० मध्ये तंबाखूची शेती केल्याचे सर्वात जुने पुरावे सापडतात. तेथील आदिवासींनी धार्मिक आणि औषधी कारणासाठी तंबाखूचा वापर केला होता. १४९२ मध्ये क्रिस्तोफर कोलंबसला अमेरिकेतील स्थानिक आदिवासींनी भेट म्हणून तंबाखूची पानं दिली. कोलंबसमार्फत तंबाखूची युरोपला ओळख झाली. १५५६ मध्ये फ्रान्स, १५५८ मध्ये पोर्तुगाल, १५५९ मध्ये स्पेन आणि १५६५ मध्ये इंग्लंड या देशांमध्ये तंबाखूचे पीक दाखल झाले. पुढे १६५० मध्ये युरोपीय व्यापाऱ्यांनी तंबाखू आफ्रिकेतही नेली आणि तिथे या मोठे उत्पन्न देणाऱ्या या पिकाची लागवड सुरु झाली. १७५३ मध्ये स्वीडिश वनस्पतिशास्त्रज्ञ कॅरोलस लिनिअस यांनी नामांकित केलेल्या तंबाखूच्या प्रजाती – निकोटीयाना रस्टिका आणि निकोटीयाना टॅबॅकम यांना पहिल्यांदाच नाव देण्यात आले. १७९४ मधेय अमेरिकेत पहिल्यांदा तंबाखूवर कर लावण्यात आला. १८२६ मध्ये शास्त्रज्ञांना तंबाखूपासून निकोटीन वेगळे करण्यात प्रथमच यश आले. १९१२ मध्ये प्रथमच धूम्रपान आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा संबंध जोडला गेला. १९९० च्या दशकात अमेरिकेसह अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंधने आली. भारतात तंबाखूचे पीक इसवीसन  १६००च्या सुमारास पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आणले. भारतात त्या आधीही तंबाखूच्या काही स्थानिक जाती होत्या. परकीय व्यापाऱ्यांसाठी भारत हे तंबाखूचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनले. ब्रिटीश राजवटीत तंबाखू हे एक प्रमुख नगदी पीक होते.

तंबाखूचे प्राचीन पुरावे

भारतातील प्राचीन साहित्यांमध्ये तंबाखूचे ‘तमाखू’ असे वर्णन करण्यात आले आहे. संस्कृत आणि इतर काही प्रादेशिक भाषेतील साहित्यांमध्ये तंबाखूचे सतराव्या शतकापूर्वीचेही दाखले मिळतात. काही इतिहासकारांच्या मते सतराव्या शतकाच्या सुरवातीस तंबाखूची वनस्पती अमेरिकेतुन भारतात स्थलांतरीत झाली. भारतामध्ये गांज्याचा वापर इसवीसनपूर्व २००० पासून असून, सर्वप्रथम त्याचा उल्लेख अथर्ववेदामध्ये करण्यात आला आहे, प्राचीन काळी तंबाखूचा उपयोग आशीर्वाद आणि आरोग्य या दोन्हीसाठी केला गेला. तसेच, पाहुण्यांचे स्वागत करतानाही तंबाखू भेट म्हणून दिली जात असे. पुरातत्वशास्त्रज्ञांना प्राचीन माया संस्कृतीच्या उत्खननात निकोटीनचे काही अंश सापडले. माया संस्कृतीतील ते अवशेष साधारण हजार वर्षे जुने आहेत. प्राचीन काळातील तंबाखूच्या वापराचा हा पहिला प्रत्यक्ष पुरावा मानला जातो. २०१८ मध्ये उत्तर अमेरिकेतील शास्त्रज्ञांना ३५०० वर्षे जुन्या चुनखडीच्या (लाईमस्टोन) चिलीममध्ये निकोटिनचे अंश सापडले. आईस एज (हिमयुग) साईटच्या उत्खननदरम्यानही उत्तर अमेरिकेत सर्वात जुन्या तंबाखूचा पुरावा सापडला. हा पुरावा तंबाखूच्या बियांचा आहे. या बिया सुमारे १२००० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत.

तंबाखूचे उत्पादन करणारे देश

तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन चीन मध्ये होते. यानंतर ब्राझील आणि भारताचा क्रमांक येतो. भारतात आंध्रप्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि पश्चिमबंगाल या राज्यांमध्ये तंबाखूचे पीक घेतले जाते. तमिळनाडु, आंध्र प्रदेश, पंजाब, बिहार, म्हैसूर आणि पश्चिम बंगालमध्ये तंबाखू संशोधन केंद्रे आहेत.


तंबाखूमुळे होणारे रोग

निकोटीनमुळे तंबाखूचे सेवन करण्याची सवय लागते. तंबाखूच्या सेवनाने घसा, फुफ्फुस, तसेच मुखाचा कॅन्सर होतो. सिगारेट हे प्रमुख तंबाखूजन्य माध्यम असून, जगभरात साधारण १.१ अब्ज लोक सिगारेट ओढतात असे डब्ल्यूएचओची आकडेवारी सांगते. त्यांपैकी ८० टक्के लोक हे कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील आहेत. दरवर्षी जगभरात साधारण ८० लाख लोकांचा तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्यू होतो. त्यांपैकी ८ लाख ९० हजार जणांचा मृत्यू धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे (पॅसिव्ह स्मोकिंग) होतो.

तंबाखूचा समावेश असणाऱ्या उत्पादनांमध्ये निकोटिन, कार्बन मोनॉक्साईड आणि टार यांसह सुमारे ५००० विषारी पदार्थ असतात. आरोग्यासाठी अपायकारक असणाऱ्या या घटकांमुळेच तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याचा धोका असतो.


शाळा मार्गदर्शिका



 राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती...!

         एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर, हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते. खंडेराव हे व्यसनी, छंदीफंदी होते. पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले.


*कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्ये झाली. मालेराव हा मुलगा आणि मुक्ताबाई ही कन्या. अहिल्या-बाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.”*


*आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरत्यांनी मान राखला आणि सती न जाता राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले. मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत, तेव्हा स्वतः अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असत. मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार वागत असत.*


*मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती. दौलतीचा कारभार मोठा होता. पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली, तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती. लवकरच त्यांचे देहावसान झाले. अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या. पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला. तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.*


*अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ? ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ? शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.*


*अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.*


*अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली. राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या.*


*महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंग सारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.*


*त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या. जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.*


*बाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.*


*वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धाम या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.* 


*अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.*


*अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली. अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.*


*मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते. महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.*

स्रोत : आंतरजाल

Sunday 30 May 2021

 eBalabharati ची स्वाध्यायपुस्तिका

शिक्षण उत्सव उपक्रम पुस्तिका 

इ.१ ली व २ री




स्वयं अध्ययन स्वाध्याय पुस्तिका 

इ.१ ली ते ८ वी 

विषय गणित




स्वयं अध्ययन स्वाध्याय पुस्तिका 

इ.१ ली ते ८ वी

Subject - English.


Saturday 29 May 2021

वय वर्ष १८ ते ४४ वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत.

           दि.५ मे.२०२१ पासून खुल्या दराचे राष्ट्रीय कोविड-१९ देगात्मक लसीकरण शासनाच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील कोविड १९ लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मान्यताप्राप्लस निर्मात्या कंपन्यांकडून केंद्र शासना व्यतिरिक्त उर्वरित ५०% कोटयातून राज्य शासनाला केंद्र शासनाच्या वाटपानुसार लस खरेदीक येणार आहे.

          राज्य मंत्रीमंडळाने दि. २८ एप्रिल, २०२१ व्या बैठकीत राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.

           राज्यात दि. ०१ मे, २०२१ पासून वय वर्ष १८ ते ४४ वयोगटावरील सर्व नागरिकांचे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याबाबत शासनाचा जीआर 👇

Thanks

🏸🏑🏆 🏹 🥇 🤼‍♂️ 🏋️‍♂️

इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांना क्रिडा विभागातून सवलतीचे गुण

         इयत्ता ८ वी इ. ९ वी मध्ये सदर विद्यार्थ्याचा क्रिडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा

         तसेच सन २०२०-२१ या वर्षात इ.१२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्याच्या बाबतीत ६.१२ पूर्वी [.११ मधील विद्यार्थ्याचा किडास्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा

असे आहेत क्रीडा गुणांसाठी पात्र खेळ

         आर्चरी, ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बास्केट बॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॅण्डबॉल, हॉकी, ज्युदो, व्हॉलिबॉल, लॉनटेनिस, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, तायक्वांदो, जलतरण, कुस्ती, कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल, नेटबॉल, कराटे, स्क्वेंश, वुशू, नेहरू हॉकी, फुटबॉल, रग्बी, सेपक टकरा, मॉडर्न पेन्टॅथलॉन, सॉफ्ट टेनिस, मल्लखांब, खो-खो, चॉल बॅडमिटन, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, थ्रोबॉल, रोलर स्केटिंग/ हॉकी, योगासन, किक बॉक्सिंग, सिकर्ड, रोलबॉल, डॉजबॉल, शूटिगबॉल, टेनिक्चाईट, आट्यापाट्या.

         सन २०२०-२१ या वर्षात परीक्षा देणाऱ्या इ.१० वी व इ. १२ वी व्या विद्यार्थ्यांना क्रिडा सवलतीचे गुण देण्याबाबत शासनाचा जीआर वाचा 👇

 सदर सवलत ही केवळ सन २०२०-२१ च्या परीक्षेकरिताच देण्यात येत आहे.


  येत्या सहा जून रोजी शिव स्वराज्य दिन साजरा करणेबाबत



         6 जून : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमी पुत्रांच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी 6 जुन हा दिवस जानेवारी 2021 या वर्षा पासुन ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावा या दिवशी सकाळी 11.00 वाजता सर्व पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, याबाबतच्या योग्य त्या सुचना निर्गमित करुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची दक्षता घ्यावी. सदरचा कार्यक्रम हा कोवीड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सामाजिक आंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पार पाडण्यात यावा.

या बाबतचा शासनाचा 28 मे चा जीआर वाचा 👇


Thanks

Practice test on Cell structure and organisation.

Google form test -

All the very best to all of the students


 प्रकल्प म्हणजे काय ?


              विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

प्रकल्पाची उद्दिष्टे :-

1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –

( विद्यार्थ्यांसाठी )

1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.

2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.

3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.

4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.

5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.

6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.

7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.

8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.

9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.

10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा. 

कृपया हे पण वाचा : 👇


 पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी:-

भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे. 
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

इतिहास व ना.शास्त्र  -:
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.


इयत्ता 11 वी व 12 वी साठी प्रकल्प -


१.पर्यावरणावर आर्थिक वाढीचा परिणाम
२.भारतातील संसाधन वापराचे प्रकार
३.पाण्यातील प्रदूषण टिकविणारे वनस्पती व प्राण्यांची माहिती गोळा करा.
४.कारखान्यातील दुषित द्रव पदार्थांचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम
५.पर्यावरणाच्या समस्या
६.जंगल तोड नियंत्रण करणारे  उपाय
७.वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे मानव प्राणी पर्यावरण संबंधी माहिती मिळवा
८. पर्यावरण व्यवस्थापन व पर्यावरणीय व्यवस्थापनाचे उद्धेश
९. आपल्या घरात पर्यावरणीय व्यवस्थापन प्रणाली कशी राबवाल
१०. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या कशी सोडविणार
११.आपल्या गावातील पाणी वापराचे लेखा परिक्षन
१२. प्रदूषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक काय्ध्यांची माहिती मिळवा.
१३. ठिबक सिंचन योजना पाणी वाचवू शकेल का?
१४. जागतिकीकरणाने अधिक प्रदूषण वाढते.
१५. मुंबईच्या समुद्रात मालवाहू जहाजांच्या टक्करने झालेल्या पर्यावरणीय परिणामांची माहिती  मिळवा.
१६.आम्ही युवक राष्ट्राची संपत्ती
१७. औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
१८. आपल्या शहरातील कचरा व्यवस्थापनाची माहिती मिळवा.
१९. शेतीचा पर्यावरणावरील परिणाम
२०. पशुपालनाचा  पर्यावरणावरील परिणाम
२१. कारखाने , खाणकाम पर्यावरणावरील परिणाम
२२. वाहतुकीचा पर्यावरणावरील परिणाम
२३. वाढते वायू प्रदूषणाचे पर्यावरणावरील परिणाम
२४. जमिनीची धूप रोखण्यासाठी उपाय
२५. पाळीव प्राणी पर्यावरणावरील परिणाम
२६.इ कचरा व्यवस्थापन
२७. सांडपाणी व्यवस्थापन
२८. नैसर्गिक संसाधने त्याचे व्यवस्थापन आणि संवर्धन
२९. वीज निर्मिती आणि वीज बचत  धोरण
३०. नैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला?
३१. प्रदुषण - आरोग्यावरील अनपेक्षीत परीणाम
३२. पर्यावरण बदल - कारणे, परिणाम
३३.  अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती व पर्यावरण
३४. ताडोबा व्याघ्र प्रकल्प
३५.  पर्यावरण व सार्वजनिक उत्सव

पर्यावरण
https://kpborase.blogspot.com/p/blog-page_88.html?m=0


https://kpborase.blogspot.com/p/blog-page_68.html?m=0

 व्यायामाचे ३५ फायदे


         माहीती मोठी आहे निश्चित वाचा व आपल्या  परिवारातील सदस्यांना इतर मित्रांच्या ग्रुपमध्ये पाठवा.*
रोजची कितीही धावपळ असेल, श्रम असतील तरी व्यायामासाठी वेगळा वेळ द्यायलाच हवा. व्यायाम ही कायम करायची गोष्ट आहे; कधीतरी करुन सोडून देण्याची नाही हे स्पष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्याला व्यायाम हा आयुष्यभर करायचा आहे तरच आपले आरोग्य औषध गोळ्यांशिवाय टिकून राहील.

*(१)* व्यायाम करणाऱ्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच.

*(२)*  व्यायाम करणार्‍यांची उर्जा पातळी चांगली असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा कितीही भार पडला तरी तो त्यांना सहन होतो आणि ते उत्तम कार्यक्षमतेने काम करू शकतात.

*(३)* कमी उर्जेमध्ये, कमी वेळेमध्ये काम करण्याची क्षमता त्यांच्या विकसित झालेली असते.

*(४)* कोणत्याही गोष्टीचा आळस येत नसल्यामुळे त्यांना कोणतेही काम सोपेच वाटते.

*(५)*  त्यांच्या शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालत असते.

*(६)* व्यायाम करणार्‍या व्यक्तीची हाडे मजबूत असतात.

*(७)* व्यायामामुळे स्नायूंची ताकद वाढून व्यक्तीच्या कार्यक्षमतेत प्रचंड वाढ होते.

*(८)* व्यायामामुळे शरीरातील अनेक प्रकारच्या  वेदनां व पीडा दूर होतात.

*(९)*  पडणे, धडपडणे, मुरगळणे, आखडणे, करक लागणे अशा गोष्टींचा त्रास त्यांना होत नाही.

*(१०)* व्यायाम करणार्‍याचे शरीर सुडौल असते. उंची, जाडी, वजन यांचा योग्य समतोल त्यांच्या शरीरात साधलेला असतो.

*(११)* नियमित व्यायाम करून शारीरिक सौंदर्य प्राप्त करता येतेच.
*(१२)* नियमित व्यायाम करुन बेडौल शरीर सुडौल-आकर्षक करता येते.

*(१३)* नियमित व्यायाम करणारयांची त्वचा नितळ असते .

*(१४)* व्यायाम करणार्‍यांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असते.

*(१५)* नियमित व्यायाम करणारे कोणत्याही आजारांना सहज बळी पडत नाहीत .

*(१६)* व्यायाम करणार्‍याचे हृदय निरोगी असते. त्यामुळे हृदयाचे ठोके सामान्य असतात.

*(१७)* नियमित व नियोजन बध्द व्यायामाने हदयाची-फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

*(१८)* त्यांचा श्‍वास चांगला असतो. रक्तवाहिन्या निर्दोष असतात. त्यामुळे त्यांना हृदयविकारापासून मुक्ती मिळते.

*(१९)* नियमित व्यायाम करणारयांच्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.

*(२०)* व्यायामाने रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

*(२१)* शरिरारील कित्येक आजारांसाठी व्यायाम हे महत्वाचे औषध आहे.

*(२२)*  व्यायाम करणार्‍यांना दैनंदिन ताणतणावाचा चांगला सामना करता येतो.

*(२३)*  नियमित योग्य व्यायामाने मनाची एकाग्रता वाढेल, ताणतणावांचं नियोजन साध्य होईल.

*(२४)*  त्यांचा आत्मविश्‍वास आणि आनंद या दोन्हीत वाढ झालेली असते.

*(२५)* नियोजनबध्द व्यामामूळे डिप्रेशन नैरश्यासारख्या रोगांपासून सहज मुक्ती मिळते.

*(२६)* नियमित व्यायाम करणारयांची जठराग्नी प्रदिप्त होते, अन्नाचे योग्य पचन होते, मल, मुत्र, स्वेदाचे योग्य प्रकार निस्सरण होते.

*(२७)* योग्य व्यायाम आणि योग्य प्रमाणात आहार घेतल्यास वजन घटण्याची शक्यता असते.

*(२८)* व्यायामामुळे चयापचयाची गती वाढते. अन्नाचे अधिक चांगले पचन होते. चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.

*(२९)* व्यायामाने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तशर्करा कमी होण्यास आणि ती नियंत्रणात राहण्यास मदत होते.

*(३०)* व्यायामाचा महत्त्वाचा परिणाम मेंदू व मज्जासंस्थेवर होतो. सर्व शरीराचे नियंत्रण करणाऱ्या मेंदूला भरपूर रक्तपुरवठा होत राहिल्यामुळे तो शरीरातील प्रत्येक अवयवाकडून परिणामकारक कार्य करवून घेतो.

*(३१)* नियमित व्यायामाने लैंगिक क्षमताही टिकून राहतात. त्याचा परिणाम वैवाहिक जीवनाचा आनंद दीर्घ काळ मिळण्यासाठी होतो.

*(३२)* नित्यनियमाने व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते. कारण व्यायामामुळे शरीरातील वृध्दत्वाकडे जाणारी प्रक्रिया मंद होत असते.

*(३३)* बैठी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी असते.

*(३४)* फक्त एक तास व्यायाम केला असता आठ किंवा त्यापेक्षा जास्त काळ बैठेकाम करण्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका टळतो.

*(३५)* आयुष्याचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतरही ज्या व्यक्ती रोज 50-60 मिनिटे योग्य व्यायामासाठी देतील त्यांना शतायुषी होण्याचे भाग्य नक्कीच लाभेल,
बदलत्या जीवनशैलीत शारीरिक श्रमांना दुय्यम लेखून, बैठ्या कामांनी विनासायास जास्तीत जास्त आर्थिक यश मिळवणं हे ध्येय बाळगलं जातं. रोजच्या कामातले मर्यादित स्वरूपातले शारीरिक श्रम आणि झेपेल तेवढा मर्यादित; पण नियमित व्यायाम करून नवी आरोग्यशैली अंगीकारणं हेच सर्वस्वी उचित ठरेल. जोपर्यंत शरीर काम करते आहे तोपर्यंत काही ना काही व्यायाम करीतच राहिले पाहिजे.

Friday 28 May 2021

 🙏 भोजनातील हानिकारक संयोग, नक्की टाळा 🙏


👉 *दह्या सोबत* : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

👉 *तुपा सोबत* : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

👉 *मधा सोबत* : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

👉 *फणसा नंतर* : पान खाणे हानिकारक असते.

👉 *मुळ्या सोबत* : गुळ खाणे नुकसानदायक असते.

👉 *खीरी सोबत* : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

👉 *गरम पाण्याबरोबर* : मध घेऊ नये

👉 *थंड पाण्याबरोबर* : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.

👉 *कलिंगडा बरोबर* : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

👉 *चहा सोबत* : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

👉 *माशा सोबत* : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

👉 *मांस बरोबर* : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

👉 *गरम जेवणा बरोबर* : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

👉 *खरबुजा बरोबर* : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.

 

परीक्षेच्या सीझनमध्ये कोणता आहार घ्याल?

 
चांगल्या मार्कांसाठी योग्य आहार आवश्यक

डाॅ. वैशाली जोशी

योग्य खा, चांगलं यश मिळवा!

आपलं मूल परीक्षेला बसतंय म्हणून त्याची काळजी घेण्याच्या नादात आई-वडील त्याचे खाण्यापिण्याच्या बाबतीत अतिलाड करतात आणि मग ते लाड ऐन परीक्षेच्या काळात अंगाशी येतात. असं होऊ नये म्हणून..

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस साधारणपणे बारावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होते. नंतर दहावी ते अगदी एप्रिलपर्यंत इतर इयत्तांच्या परीक्षा चालूच असतात. थोडक्यात या महिन्यापासून एप्रिल महिन्यापर्यंत अभ्यासाचा ताण, हवाबदल, नंतरचे रणरणते ऊन, तहानलेला घसा हे सगळं सुरू असतं. यात भर पडते ती वेगवेगळ्या अामिषांनी. आंबा आणि काजूचा सीझन सुरू होतो. अभ्यासासाठी घरी बसावे लागते. त्यामुळे सारखी भूक भूक होते. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी चांगलेचुंगले खाण्याचा आनंद घ्यावासा वाटतो.  रोजचं जेवण नकोसं झालेलं असतं. पण तरीही या काळात पिझ्झा, नूडल्स, आइस्क्रीम, थंड पेये थोडं लांब ठेवलं तर बरं. कारण याच काळामध्ये हवाबदल, अभ्यासाचा ताण, त्याकरिता केलेली जागरणं आणि चुकीचा आहार यामुळे आजारपणं वाढण्याची शक्यता असते.

अभ्यासाला प्राधान्य देताना तितकेच महत्त्व आरोग्याला दिले पाहिजे. कारण आहार योग्य असेल तर मुलांना अभ्यास करायला लागणारी ऊर्जा मिळते व त्याच बरोबर त्यांची स्मरणशक्ती व तरतरी वाढू शकते. मुलांमध्ये या काळात चीडचीड वाढते, मूड बदलतात, मानसिक ताण येतो. पण योग्य आहाराने ही लक्षणे कमी होतात. तीन तास पेपरला बसण्यासाठी लागणारी ताकदही येते. पण चुकीचा आहार असेल तर मात्र आळस येतो व मेंदू मंदावतो.

यासाठी प्रत्येक दिवसाचे एक साधारण वेळापत्रक ठरवावे. त्यात अभ्यास, आहार, झोप, आराम व व्यायाम या सर्वाना स्वतंत्र वेळ द्यावा. हे वेळापत्रक नियमित पाळावे.

परीक्षेच्या काळात मानसिक व शारीरिक तणावामुळे शरीराची काही अन्नघटकांची गरज वाढते. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी. या उन्हाळ्याच्या काळात बाहेरच्या उष्णतेबरोबर शरीराचे उष्णतामानही वाढलेले असते. त्यातच भर पडते अपुऱ्या झोपेची. मानवी शरीराला शक्यतोवर संपूर्ण दिवसाच्या एकतृतीयांश भाग तरी झोपेची आवश्यकता असते. म्हणजे २४ तासांच्या दिवसात साताठ तास झोप ही गरजेची, पण परीक्षेसाठी मुले जागरणं करून अभ्यास करतात. त्यामुळे सहा ताससुद्धा पूर्ण झोप होत नाही. झोप शरीरातील उष्णतामानाचे नियंत्रण करत असते. तीच कमी झाली तर निदान आहाराने तरी आपण ते नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू शकतो. मानवी शरीर ७० टक्के पाण्याने बनलेले आहे आणि पाण्याचे संतुलन राखण्यासाठी व शरीराचे उष्णतामान कमी करण्याकरिता सर्वसाधारणपणे दोन ते तीन लिटर द्रवपदार्थ पोटात जाणे अत्यावश्यक आहे. अशा वेळी पाण्याबरोबरच नारळपाणी, दूध, कोकम,लिंबू, आवळा यासारखी सरबते, ताक, ग्रीन टी प्यावे. किलगड, संत्री, मोसंबी, डािळब यांसारख्या फळांचे रस, किंवा फळांचे मिल्क शेक शरीरात पाणी आणि ऊर्जा तर देतातच, याशिवाय भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वही पुरवतात. चहा कॉफीचे प्रमाण कमीच ठेवावे. कोल्ड्रिंक्स टाळावीत.

शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे या काळात अतिशय गरजेचे असते. त्यासाठी जीवनसत्त्वे ब, क, अ, ई असलेला आहार घ्यावा.

जीवनसत्त्व अ – रताळी, गाजर, भोपळा, पालेभाज्या, भोपळी मिरच्या, ब्रोकोली, टोमॅटो या भाज्या. पपई, आंबा, संत्री ही फळे, जर्दाळू, दूध व दुधाचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ जास्त करून प्राण्यांचे यकृत, कॉड लिवर ऑइल, अंडय़ाचा पिवळा भाग.

जीवनसत्त्वे ब – धान्य, कडधान्यं,  दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ, हिरव्या पालेभाज्या व इतर भाज्या, अंडी.

जीवनसत्त्व क – संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू, स्ट्रॉबेरी, अननस, द्राक्षे व मोड आलेली कडधान्यं, पालेभाज्या.

जीवनसत्त्व ई – पालक आणि ब्रोकोली, बदाम, शेंगदाणे, अवकॅडो, सूर्यफुलाच्या बिया, ऑलिव्ह ऑइल, सूर्यफुलाचे तेल, करडईचे तेल, सोयाबीनचे तेल, मासे, शेल फिश.

कॅल्शियम- दूध व दुग्धजन्य पदार्थ (चीझ, दही, खवा) हिरव्या पालेभाज्या, विडय़ाची पाने, तीळ, अळीव, खसखस, सूर्यफुलाच्या बिया, बदाम, धान्य प्रामुख्याने नाचणी व राजगिरा, कडधान्य जसे कुळीथ, मटकी, राजमा,सोया, उडीद हरबरा, मासे व समुद्री अन्न.

झिंक–  बाजरी, मका, गहू, नाचणी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, काजू, बदाम, तीळ,  कर्दळीच्या बिया, कडधान्य जशी छोले, चवळी, राजमा, सोया, मशरूम, कालवं, मटण, कोंबडीचे मटण, खेकडा, लॉबस्टर.

मॅग्नेशियम–  कडधान्ये, मुळा, विडय़ाचे पान, बदाम, काजू, अक्रोड, नारळ, अळीव, खसखस, फळे- जशी पिकलेला आंबा, प्लम, दूध व दुग्धजन्य पदार्थ.

पोटॅशियम – सालासकट बटाटा, रताळे, अळूकुडय़ा, सुरण, फणस, आवळा, चेरी, आंबा, मोसंबी, ताजे जर्दाळू, चिकू, अवाकॅडो, केळे यांसारखी फळे, मशरूम, रावस व इतर काही मासे व नारळ पाणी.

या काळात कर्बोदकं, प्रथिने, चरबीयुक्त, जीवनसत्त्वे व खनिजे या सगळ्यांचा सामावेश असलेला एक संतुलित आहार घ्यावा. जास्त प्रथिनयुक्त आहारामुळे भूक काही काळ लांबते. त्यात दररोज मोड आलेली कडधान्य, उसळी, दूध, मांसाहारी पदार्थ व अंडी याचा समावेश करता येईल. त्याचबरोबर इडली, डोसा यांसारखे आंबवलेले व डाळी व कडधान्यमिश्रित पदार्थही आहारातील प्रथिने वाढवण्यास उपयुक्त ठरतात. माशांमध्ये प्रथिनांबरोबर ओमेगा थ्री हा चांगल्या चरबीचा प्रकार आढळतो ज्याने स्मरणशक्ती वाढते आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आठवडय़ातून दोन वेळेला मासे खाण्यास हरकत नाही. अति कबरेदक व स्निग्ध पदार्थ असलेले अन्न टाळावे, कारण त्याने झोप येऊ शकते. खूप प्रमाणात भात व बटाटा परीक्षेच्या दिवशी नक्कीच टाळावे.

कुठलीही खाण्याची वेळ टाळू नये, जसे न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळचे खाणे व रात्रीचे जेवण. सकाळची न्याहारी तर अजिबात चुकवू नये. आपला मेंदू सर्वात छोटा अवयव असला तरी रोजच्या आहारातील २० टक्के ऊर्जा मेंदू आपल्या कामाकरिता वापरतो. त्याला ऊर्जा मिळाली नाही तर मात्र एकाग्रता कमी होते. त्यासाठी एकच वेळी भरपेट खाण्याऐवजी थोडय़ा थोडय़ा वेळाने पण कमी खावे. दिवसभरात चार-पाच वेळेला खावे. त्यामुळे मेंदूला सतत ऊर्जा मिळाल्यामुळे मन शांत राहते. एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे एकाच वेळी भरपूर न खाता दर दोन-तीन तासांनी हलका आहार घ्यावा म्हणजे झोपही येत नाही आणि पचनही चांगले होते.

न्याहारी व दोन्हीवेळची जेवणं चौरस असावीत. दोन जेवणांमध्ये भूक लागल्यास चिप्स, वडा-पाव, नूडल्स खाण्याऐवजी सूप, सलाड, दही, मक्याच्या किंवा इतर धान्याच्या लाह्य़ा, भरपूर भाज्या घातलेले सॅण्डविच, फळे, सुका मेवा, भाजलेला बटाटा, मक्याची किंवा मोड आलेल्या कडधान्याची भेळ यांसारखे पदार्थ खावेत. कुकीज, चॉकलेट बिस्किटं, केक यांसारखे पदार्थ खावेसे वाटले तरी ते कमी खावेत कारण त्याने रक्तातील साखर पटकन वाढते पण तेवढय़ाच पटकन उतरते व लगेच भूक लागते.

पालकांनी या काळात मुलांना शक्यतो घरीच तयार केलेले ताजे अन्न द्यावे. तिखट, तेलकट व मसालेदार पदार्थही टाळावेत. त्याने घशाला त्रास होऊ शकतो व ते पचायला जड असल्यामुळे झोपही येते. मुले बरेचदा आइस्क्रीम किंवा मिल्कशेकची मागणी करतात आणि मग सर्दी-खोकला-ताप यामुळे ऐन परीक्षेच्या दिवसांत आजारी पडतात.

आहार आणि झोप याचबरोबर आरामाचीही गरज शरीराला असते. पण या आरामाच्या वेळात टीव्हीसमोर न बसता मोकळ्या हवेत फिरून यावे. सायकल चालवणे, जॉिगग किंवा पोहणे यांसारखे व्यायाम करावेत. वेळ नसेलच तर शक्यतो रोज किमान बारा सूर्यनमस्कार तरी घालावेत. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारून शरीर व मन प्रसन्न होते.

करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा

(Before you choose your career)


 माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे?

         हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न जीवनात योग्य करिअरची निवड करणं फार महत्त्वाचं असत. काही विद्यार्थी करिअरची निवड करण्यापूर्वी करिअर काऊंन्सिलरचा सल्ला घेतात. पण तुमच्याशिवाय दुसरे कोणीही तुम्हाला जास्त ओळखू शकत नाही. त्यामुळे करिअर निवडण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. हे प्रश्नांमुळे करिअर निवडण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल, तर जाणून घेऊया काय आहे हे प्रश्न...


मी कोणते काम न कंटाळता करु शकतो?

         हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याचबरोबर स्वतःला विचारा की, कोणते काम करणे, तुम्हाला अधिक भावते? जर तुम्ही तुमच्या आवडीने, मनाप्रमाणे कामाची, करिअरची निवड केली तर तुम्ही अधिक चांगले काम करू शकाल. त्यामुळे त्यानुसारच कोर्सची निवड करा. यामुळे यशाची पायरी गाठण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.


मी ज्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहे, त्याचा मला माझ्या करिअरमध्ये फायदा होईल का?

         हा प्रश्न स्वतःला विचारणे आणि त्यानुसार कोर्सला प्रवेश घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विनाकारण कोणत्याही कोर्समध्ये पैसे, वेळ वाया घालवणे काही कामाचे नाही.


हा कोर्स माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे का?

         प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व वेगवेगळे असते. त्यानुसारच रायला आवडते. काम त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच हा प्रश्न स्वतःला विचारणे, जगदी गरजेचे आहे.


१० वर्षांनंतर मी स्वतःला कुठे बघतो?

         या प्रश्नावर तुमचे संपूर्ण करिअर अवलंबून असते. हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारल्याने तुम्ही स्वतःच्या ड्रिम करिअरसाठी पूर्ण मेहनत घेऊ शकाल. करिअरची ब्लू प्रिंट तुमच्याकडे तयार असेल आणि भविष्यातील तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही.

अभ्यास कसा करावा ? एकाग्रता रहस्य !!!

         प्रस्तुत लेख विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य या रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.

         कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.

         मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही। सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामथ्र्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करून घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.

         स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते. योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करून घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करून परमसत्याची प्राप्ती करून घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.


१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे. 


२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे,चुळबुळ करू नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे.सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.


३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंतः चक्षुसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.


४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो उसेच हे आहे. वॉर्म अप त काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

अभ्यास कसा करावा?

आपण ज्यांना टीनएजर्स असे संबोधतो किंवा
किशोरवयीन मुलं म्हणतो- म्हणजे १३ ते १८ या
वयोगंटातील मुले व अभ्यासांचा कंटाळा
करणारी.
मला माझ्या तीन इच्छा कोणत्या हे
विचारले तर सांगेन -
परीक्षा आणि अभ्यास नावाचे राक्षस नसावेत.
शिक्षकांनी आमच्याशी मित्राप्रमाणे  वागावे आणि
शाळेत जाणे म्हणजे पिकनीक ला गेल्या सारखे वाटणे असे १४
वर्षाची सरीता सांगते.
       सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले अभ्यांसाचा
कंटाळा करतात.अभ्यास न करण्याची कारणे
ती शोधत असतात. "माझ पोट आज दुखतंय मला
आज बर वाटंत नाही किंवा मला सगळ येतयं. वैगरे
बहुतेक वाक्य आईवडीलांना आपल्या मुलांकडुन
ऎकायला मिळतात.

          खुप अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणे हे
मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास
न करणारी मुले आणि त्यांना अभ्यांसाला
जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या
दोघांच्या वादविवादाने घरांच वातावरण
पार बिघडुन जाते. म्हणुनच मुले का अभ्यास करत
नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली
पाहीजेत.

१. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाण
वाटतं.बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपुर असतो आणि
अभ्यास आणि आपल्याला एवढा प्रंचड
अभ्यास करायचा आहे, हे पाहुनच मुलांचा
अभ्यासातला रस संपतो.
२. आमचे शिक्षक आम्हाला निट शिकवत
नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात
येणारे अनेक विषय असतात. ते योग्य रीतीने
शिकवले तरच मुलांना रस वाटतो.
३. पाठांतराचा तीटकारा- अनेक मुले न
समजताच धडाधड पाठंतर करतात. पण मध्येच
एखादा विषय शब्द किंवा वाक्य विसरल तर
प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं.
त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क
मिळतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी
लागणारा आत्मविश्वास ते गमावतात.
४. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटंत
नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासांच महत्वच पटलेल
नसतं.पालकांना वाटत असंत की, आपल्या
मुलांनी अभ्यास का करायचा हेच माहीत नसंत.
आणि हेच माहीत नसल्याने त्यांचे अभ्यासांत
लक्ष लागंत नाही.
५. "माझे आई-वडील माझ्याकडुन अति अपेक्षा
करतात." अस अनेक मुलं म्हणतात. आई-वडीलांच्या
अति अपेक्षामुळे मुलांवर दडपण येतं. मुले एकाग्र बनु
शकत नाहीत. (या ठिकाणी सद्या चालु
असलेल्या ’घरोघरी’ या उत्कृष्ट नाटकाची
सहजच आठवंण यावे.)
६. काही वेळा मित्रांच्या संगतीने , आई-वडील
घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत , एकमेंकाशी
सतत भांडत असतात, मुलांला देखील सतत
मारहाण करत असतात, त्याने मुलं अभ्यासात
मागे पडतात.
७. काही वेळा मित्रांच्या संगतीने अभ्यास
करण्यांच मुलं टाळतात. अभ्यास आपल्या
मित्राला आवडत नाही, म्हणुन त्यांना पण
आवडत नाही. कारण आपण जर का अभ्यास मधे
रस दाखवला तर ग्रुप मधे बाहेर फेकले जावु अशी
त्यांना भीती असते.
अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा,
बुध्दीचा मोठया पमाणावर विकास
होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची
माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या
प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता
असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर
भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा
करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत.
त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच
सुधारता येईल.
१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे
ट्रँफिकच्या आवाजापासुन दुर असायला हवे.
टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके
नसावीत.
२. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ
असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन
एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री
दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण
त्यावेळी सर्वजण झोपलेले असतात आणि सर्वत्र
शांतता असते.
३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १
तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग
होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर
वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त
वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे
त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा
मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो.
तेव्हा त्यांची स्मरणशक्ती कमी होते. आणि
तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच
कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच
अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५
मिनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला
सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती
ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन
लक्षात यायला मदत होते.
४. छोट्या मध्यांतराप्रमाणे मुलांनी काही
काळ खेळण्यात, मित्रांशी गप्पा मारण्यात,
टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे
मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि
अभ्यास करताना उस्ताह येतो.
५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे
परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.
६. एखादा धडा वाचताना तो नेमका
कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील
मुद्याची शिर्षके, धड्याची प्रस्तावना आणि
सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट
ओळख होते
७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे
वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास
लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची
उत्तरे अधिक चांगल्या तऱ्हेने लिहु शकता. आणि
तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लिखाणामुळे
तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो.
शिकण्याची क्षमता ही माणसाला
मिळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग
करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

माहिती संकलन : कुलदिप बोरसे.
स्त्रोत: आरोग्य.कॉम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

 Covid -19 आणि मासिक पाळी व्यवस्थापन राज्यस्तरीय वेबिनार  

(Covid 19 and Menstrual Management State Level Webinar)


         राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, SCERT पुणे (समता विभाग) आणि युनिसेफ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मासिक पाळी स्वच्छता दिन, दि. २८ मे निमित्त राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

         प्रा. वर्षाताई गायकवाड, मा. शिक्षणमंत्री शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, तसेच मा. राज्य मंत्री, श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रेरणेने व मा. वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, तसेच मा. विशाल सोळंकी, आयुक्त, (शिक्षण) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर चर्चासत्रास राज्यातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व शिक्षक / शिक्षिका तसेच MHM प्रशिक्षक, विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, विशेष तज्ञ, विशेष शिक्षक यांनी ऑनलाईन झूम मिटिंगद्वारे उपस्थित राहावे.


YouTube link -

प्रमुख उपस्थिती

मा.वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व 

मा.दिनकर टेमकर, संचालक, SCERT पुणे.

वार : - शक्रवार.

दिनांक :- २८ मे, २०२१ वेळ: - सकाळी: १०:३०


डॉ. कमलादेवी आ उपसंचालक SCERT (समता विभाग) पुणे.


 दहावीची परीक्षा होणार नाही; नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन.


शासनाचा आजचा जीआर (दि.३१ मे)

         राज्यातील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार इ. १० वी ची परीक्षा दि. २९ एप्रिल २०२१ पासून सुरु होणार होती. कोविड १९ चा प्रार्दुभाव वाढत गेल्यामुळे इ. १० वीची परीक्षा घ्यावी किंवा कसे याबाबत शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विचार विनिमय करण्यात आली. कोविड १९ चा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव विचारात घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि कोविड १९ चा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इ.१० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन मा. मंत्रीमंडळाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहेे.
         कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.

हे पण वाचा : इयत्ता दहावी साठी मूल्यमापन पद्धती जाहीर करणे बाबत शासनाचा आजचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


         शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयीच्या निकषांची माहिती दिली.
दहावीच्या निकालाचे नेमके सूत्र कसे?

         दहावीचा निकालाचे सत्र शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे
हे सूत्र खालीलप्रमाणे -


- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० गुण


- विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे २० गुण


- विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे ५० टक्के वेटेज


- वरीलप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुणांपैकी मूल्यांकन होणार


- म्हणजेच प्रत्येक विषयातील १०० गुणांपैकी नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वेटेज वापरून तयार होणार अंतिम निकाल



शाळांमध्ये निकालासाठी समिती

        विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावीर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल. शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात येईल.
नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थांचे काय?

         नववीत अनुत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या दहावीच्यचा परीक्षेला बसले आहेत, त्यांचेदेखील मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी कायम राहणार आहे. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 स्रोत : म. टा. ऑनलाईन.

इयत्ता दहावी साठी मूल्यमापन पद्धती जाहीर करणे बाबत शासनाचा आजचा जीआर पहा. 👇
काळजी घ्या

 पासपोर्ट सेवा


पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा



 Blueprint & Question Paper Format

            XI th and XII th Biology Blueprint and Question Paper Format.

Sr.No.Name of the content Download link 
 1Blueprint 1Download
 2Blueprint 2Download
 3XII th Blueprint ChartDownload
 4XII th BlueprintDownload
 5Comming soon...Download

Thanks

Thursday 27 May 2021

 ब्लॉगचे लेखन.

प्रस्तावना :
       माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचा भरमसाठ साठा रोज आपल्या मोबाईल वा इतर माध्यमातून येत असतोयात शिक्षण क्षेत्र देखील अपवाद नाहीया दररोजच्या येणाऱ्या  माहितीचे योग्य प्रकारे नियोजन करुन सुव्यवस्थित जपणुक करुन ठेवल्यासच त्या माहितीचा उपयोग होऊ शकतोअन्यथा या माहितीच्या जाळात आपणास हवी असणारी माहिती गहाळ होण्याची शक्यता असतेया जाणीवेतून शिक्षण विभागातील अत्यावश्यक  नियमित शालेय उपयोगी येणाऱ्या माहितीची सॉर्टींग करुन सर्वांना सहज उपलब्ध होईल,अशा पद्धतीने एकाच ठिकाणी संग्रहित करण्याची कल्पना सुचलीया करिता ब्लॉगचा पर्याय सुचला.
        सध्या शिक्षण विभागातील विविध माहितीचा पुरवठा करणाऱ्या अनेक वेबसाईटस् उपलब्ध आहेतएक ना अनेकविध वेबसाईटस् चे पर्याय आहेत.परंतु अजूनही थेट शिक्षकांपर्यंत पोचण्यात सदर वेबसाईटसना यश मिळाले नाही केवळ माहिती  तंत्रज्ञानाचे योग्य ज्ञान  नियमित संगणक  इंटरनेटशी संबंध असणाऱ्या शिक्षकांपुरतेच सदर वेबसाईटसचा वापर होताना दिसून येत आहेपरंतु शिक्षणात माहिती  तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून घेऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे ध्येय गाठायचे असेल तर तंत्रज्ञानाचे सामान्य ज्ञान असणाऱ्या शिक्षकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे त्याकरिता ब्लॉग हा उत्तम पर्याय आहेअसे मला वाटतेत्यात ब्लॉगचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे ब्लॉग हा शिक्षकाच्या आवश्यकतेनुसार तयार केलेला असतो  त्यात वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल ही केला जाऊ शकतो.

ब्लॉगची वैशिष्ट्ये :
    1)   संपूर्ण मराठी भाषेत ब्लॉगचे लेखन.
    2)   माहितीमध्ये सुटसुटीतपणा  सहज माहिती सापडेल अशी रचना.
    3)   केवळ दोन क्लिकवर आवश्यक माहितीची उपलब्धता.
    4)   ब्लॉगमध्ये सुंदर शैक्षणिक फोटोंचा समावेश.
    5)   अमर्यादित शैक्षणिक  शालेय उपयोगी माहितीचा साठा.
    6)   शालेय कामकाजासाठी आवश्यक विविध वेबसाईटस लिंकचा समावेश.
    7)   संगणकाशिवाय मोबाईलवरही वापरण्यास सुलभ.
    8)   वेळेनुसार  आवश्यकतेनुसार ब्लॉगवरील माहितीचे अद्यावतीकरण.
    9)   विद्यार्थ्यांसह शिक्षक,मुख्याध्यापक  पालकांसाठीही उपयोगी.

ब्लॉगमधील समाविष्ट उपयुक्त घटक :
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त घटक :
1)   संगीतमय कविता
2)   बडबडगीते
3)   बोधकथा
4)   परिपाठ
5)   सुविचार संग्रह
6)   रंगभरण चित्रे
7)   किशोर मासिके
8)   संगीतमय पाढे
9)   वाचनकार्ड
10)बालसंस्कार

शिक्षकांसाठी उपयुक्त घटक :
1)   नियोजन
2)   परिपाठ
3)   अभ्यासक्रम
4)   शै.उपक्रम
5)   शै.साहित्य
6)   अध्ययन निष्पत्ती
7)   मूल्यमापन नोंदी  प्रश्नपत्रिका
8)   मूल्यवर्धन पुस्तिका
9)   -पाठ्यपुस्तके
10)-बुक्स
11)-वाचनालय
12)घोषवाक्ये
13)नवोपक्रम
14)यशोगाथा
15)शासननिर्णय
16)ज्ञानरचनावाद माहिती पुस्तिका
17)ऑडिओ विभाग
18)शैक्षणिक लेखमाला विभाग
19)ऑनलाईन नोंदणी विभाग
20)फलक लेखन
21)ओरिगामी पुस्तिका
22)गणित विभाग
23)बालसंस्कार
24)आरोग्यमंत्र
25)तंत्रस्नेही होऊया विभाग
26)YOUTUBE विभाग
27)विकीपीडिया विभाग

मुख्याध्यापकांसाठी उपयुक्त विभाग :
1)   अभ्यासक्रम
2)   नियोजन
3)   अध्ययन निष्पत्ती
4)   मूल्यमापन
5)   शासन निर्णय
6)   सरल Manual
7)   परिपत्रके  अर्ज
8)   -बुक्स
9)   अत्यावश्यक माहिती विभाग
10)ज्ञानरचनावाद
11)शै.उपक्रम
12)वर्गसजावट  बोलक्या भिंती
13)शोध विभाग
14)-वाचनालय
15)विकीपीडिया विभाग
16)शैक्षणिक लेखमाला विभाग
17)महत्त्वपूर्ण संकेतस्थळे लिंक
18)तंत्रस्नेही होऊया विभाग
19)ऑनलाईन नोंदणी विभाग
20)यशोगाथा

पालकांसाठी उपयुक्त विभाग :
1)   बालसंस्कार
2)   आरोग्यमंत्र
3)   -बुक्स
4)   -वाचनालय
5)   विकीपीडीया
6)   तंत्रस्नेही होऊया विभाग

ब्लॉग वापरण्याचे फायदे :
    1)   कोणतीही माहिती सहज  सुलभ पद्धतीने उपलब्ध होईल.
    2)   विविध शालेय  शैक्षणिक वेबसाईटसचे लिंक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
    3)   तंत्रज्ञानाचा शालेय कामकाजासाठी प्रभावी वापर.
    4)   माहिती गहाळ वा पुन्हा पुन्हा शोधण्याची आवश्यकता नाही.
    5)   तंत्रज्ञानाची कमी जान असणाऱ्यांसाठी अधिक फायदेशीर.
    6)   शिक्षक स्वतःचे शैक्षणिक अनुभव  शैक्षणिक प्रयोग देवाणघेवाण करु शकतात.
    7)   शालेय उपयोगी माहिती इतरत्र शोधण्याची आवश्यकता नाही.
    8)   त्यामुळे वेळ  श्रमाची बचत होईल