कोरोना आजाराविषयीची माहिती – Coronavirus Information In Marathi
कोरोनाची लागण होऊ नये म्हणून पाळा हि खबरदारी
Coronavirus Information
येत्या काही दिवसात ज्या गोष्टीची भीती भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला होती, चीन मधल्या वूहान शहरापासून ज्या विषाणूचे संक्रमण संपूर्ण जगात होत आहे, आज संपूर्ण जगामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे. पण अश्या वेळी आपण सर्वांनी न भिता या विषाणूचा खंबीरपणे सामना करायला हवा.
कारण कोणतीही गोष्ट तुमच्यावर हावी होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तिला हावी होऊ देत नाही. म्हणजेच आपण आपल्या ठिकाणी योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून या विषाणूला आपल्याला स्वतःपासून दूर ठेवता येईल.
तर खाली काही खबरदारी दिल्या आहेत त्यांचे योग्यरित्या पालन करावे जेणेकरून आपण या विषाणूच्या विळख्यात येणार नाही.
कोरोना आजाराविषयीची माहिती – Coronavirus Information In Marathi
कोरोना आजाराबद्दल घ्यायची काळजी – Tips For Corona Virus
- काम नसताना सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
- बाहेरून आल्यावर आपले हाथ अल्कोहोल युक्त हॅन्ड सॅनिटायझर ने हाथ स्वच्छ करून घ्या. ते उपलब्ध नसेल तर साबणाने किंवा हॅन्डवॉश ने कमीत कमी २० सेकंद स्वच्छ धुवून घ्यावे.
- शिंकताना, खोकताना, तोंडावर रुमाल किंवा आपल्या हाताच्या कोपराचा सहारा घ्यावा.
- स्वास घेण्यास त्रास, खोकला, घसा दुखने, या सारखी लक्षणे दिसली तर सर्वात पहिले आपल्या जवळच्या वैद्यकीय केंद्राला भेट द्या.
- हस्तांदोलन करण्यापेक्षा हाथ जोडून नमस्कार करा.
- आपल्या तोंडाला, डोळ्यांना, नाकाला अस्वच्छ हातांनी स्पर्श करू नका.
- घरून बाहेर पडताना आपल्या तोंडावर मास्क लावून बाहेर पडावे.
या गोष्टींची काळजी घेऊन आपण कोरोना विषाणूला आपल्या जवळ येण्यापासून रोखू शकतो. घाबरायचे काहीही कारण नाही आहे, फक्त आपल्या ठिकाणी प्रत्येकाने काळजी घेतली तर या विषाणू ला हरवायला काही वेळ लागणार नाही. सर्वांनी एकच ठरावा कि Go Corona.
आपल्या आजूबाजूला कोरोना विषयी जागरुकता पसरविण्यासाठी आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सर्व सदस्यांना या लेखाला शेयर करा, जेणेकरून त्यांना या बद्दल माहिती होईल, आपल्या एका शेयर मुळे समाजात कोरोनाविषयी जागरुकता पसरू शकते.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!
No comments:
Post a Comment