K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 18 May 2021

 गणिती उखाणे


१) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी आयताचे क्षेत्रफळ = लांबी गुणिले रुंदी.


२) हिमालयातील काश्मीर म्हणजे भूलोकातील स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूंचा वर्ग.


३) देवीची ओटी भरू खणा-नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ गुणिले पाया गुणिले उंची.


४) स्वातंत्र्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ, (सहा बाजू) वर्ग.. हे घनाचे पृष्ठफळ


५) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ लांबी ७ रुंदी गुणिले उंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.


६) जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा, खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा


७) मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू चौरसाची परिमिती = ४ बाजू.


८) खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा


९) दहा किलो म्हणजे एक मण!! घनाचे घनफळबाजूचा घन!!


(१०) जीवाला जीव देतो तोच खरा मित्र गणित सोडवायला माहिती हवीत सूत्र


११) सम आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार पहिल्यात असते गुणोत्तर तर दुस-यात गुणाकार


१२) गोड म्हणजे स्वीट कडू म्हणजे बीटर..!! एक घनमीटर म्हणजे.. एक हजार लीटर !!!


१३) रविवार नंतर सोमवार येतो, प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग, नेहमीच धन होतो.


१४) महादेवाला आवडते बेलाचे पान कोणत्याही त्रिकोणात एक बाजू, दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान !!


१५) दोनचा वर्ग चार !! चारचा वर्ग सोळा. !!! गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!

No comments:

Post a Comment