K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 15 May 2021

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती – Olympics Information in Marathi

Olympics Game Information in Marathi

मित्रांनो, आपल्या जीवनातील खेळाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. खेळ म्हटलं कि सर्वात आधी आठवते स्पर्धा. कुठल्या खेळात कोण सर्वोत्कृष्ट हे ठरविण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. अगदी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या खेळांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन होत असते.

परंतु संपूर्ण जगात कुठल्या खेळात कोण सर्वोत्कृष्ट आहे हे कसे समजेल? याचा प्रश्नांचे उत्तर म्हणजे आजचा लेख. होय, जागतिक स्तरावर एखाद्या खेळातील जगज्जेता ठरविण्यासाठी ज्या स्पर्धांचे आयोजन केले जाते त्या म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धा. चला तर बघुयात या स्पर्धांविषयीची महत्वाची माहिती.

ऑलिम्पिक स्पर्धांविषयी महत्वाची माहिती – Olympics Information in Marathi

Olympics Information in Marathi
Olympics Information in Marathi

ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास – Olympic History in Marathi

ऑलिम्पिक खेळांची सुरुवात नेमकी कधी झाली हे जरी सांगता येत नसले तरी, उपलब्ध माहितीनुसार या खेळांची आयोजन जवळपास ३००० वर्षांपासून होत आहे असे निदर्शनास येते. सर्वात आधी ऑलिम्पिक खेळ ग्रीस देशातील ओलीम्पिया या शहरात खेळल्या गेले. आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात १८९६ साली अथेन्स (ग्रीस) येथे झाल्याचे समजते. ज्यामध्ये एकूण १४ देशांनी आपला सहभाग नोंदविला होता.

ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रतिक – Olympics Emblem

खेळाची निशाणी म्हणजे एकात एक गुंतलेले ५ रंगांचे ५ वर्तुळ. हे ५ वर्तुळ ५ खंडांना दर्शवितात.

  • निळा वर्तुळ : युरोप खंड
  • पिवळा वर्तुळ : आशिया खंड
  • काळा वर्तुळ : आफ्रिका खंड
  • हिरवा वर्तुळ : ओशिनिया खंड
  • लाल वर्तुळ : अमेरिका खंड

ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रकार : Olympics Types

१९९२ सालापर्यंत चार वर्षांतून एकदा ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होत असे. परंतु या नंतर उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विभाजित होऊन या स्पर्धांमध्ये २ वर्षांचे अंतर आहे.

पॅरालीम्पिक स्पर्धा – Paralympic Games

दिव्यांग खेळाडूंसाठी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पॅरालीम्पिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे ज्या देशात ऑलिम्पिक स्पर्धा होतात त्याच देशात पॅरालीम्पिक स्पर्धा सुद्धा घेतल्या जातात.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेले खेळ – Olympics Sports List

सद्यस्थितीत ऑलिम्पिक मध्ये एकूण ३५ खेळ समाविष्ट आहेत. ज्यांना ४०० विविध स्पर्धांमध्ये विभागले गेले आहे.

उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा : Summer Olympics Sports List

हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा : Winter Olympics Sports List

  • अल्पाईन स्कीईंग (Alpine Skiing)
  • आईस हॉकी (Snow Hockey)
  • स्नो-बोर्ड (Snow Board)
  • बिओथ्लोन (Biathlon) असे एकूण ७ खेळ

ऑलिम्पिक पदकांची मानके – Olympic Medal

ऑलिम्पिक खेळांमध्ये मिळणारे पदक तीन प्रकारचे असतात. प्रथम विजेत्याला सुवर्ण, द्वितीय विजेत्याला रजत आणि तृतीय विजेत्याला कांस्य पदक दिले जाते. हे पदक वर्तुळाकार असून त्यांचा व्यास ६० मिमी (कमीतकमी) आणि जाडी ३ मिमी (कमीतकमी) असते. या पदकांवर आयोजक देशाचे नाव, वर्ष कोरण्यासाठी मोकळी जागा सोडलेली असते.

Olympic Medal Images

Olympic Medal Images
Olympic Medal Images

सुवर्ण पदक हे वास्तविक पाहता चांदीचे असते ज्यावर सुवर्ण मुलामा दिलेला असतो. रजत पदक हे चांदीचे असते तर कांस्य पदक हे तांबे आणि जस्त या धातूंच्या मिश्रणापासून बनवले जाते. या पदकांचे वजन ठरलेले नसते.

(ऑलिम्पिक पदकांची परिनामे निश्चित नसून ती प्रत्येक आयोजक देशानुसार बदलू शकतात.)

ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभागी देश – Countries Participating in the Olympics

या स्पर्धांमध्ये संपूर्ण जगातील सर्वच देश सहभाग नोंदवतात. ऑलिम्पिक मध्ये आतापर्यंत २०६ देश सहभागी झालेले आहेत.

ऑलिम्पिक बद्दल काही महत्वाचे प्रश्न – Questions about the Olympics

१. आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक कुठल्या देशाने मिळविले आहेत?

उत्तर: यु. एस. (अमेरिका)

२. ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन किती वर्षांनी केले जाते?

उत्तर: ४ वर्षांनी.

३. भारत देशाला ऑलिम्पिक मध्ये किती आणि कोणते पदक मिळाले आहेत?

उत्तर: ९ सुवर्ण, ७ रजत आणि १२ कांस्य असे एकूण २८ पदक.

४. ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोण करते?

उत्तर: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee).

५. भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्ण पदक कुणी जिंकून दिले?

उत्तर: नेमबाज अभिनव बिंद्रा (२००८ बीजिंग ऑलिम्पिक).

६. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर: थॉमस बाच.

७. २०२० सालची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे?

उत्तर: टोकियो (जपान).

No comments:

Post a Comment