कोव्हिड १९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु ५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास मुदतवाढ देण्याबाबत शासनाचा आजचा जीआर वाचा.👇
कोव्हिड १९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना प्रत्येकी रु.५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्याचे आदेश दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार सदर आदेश दि. ३०.०९.२०२० पर्यंत लागू होते व त्यास संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयानुसार दि.३१.१२.२०२० रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्युची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र महाराष्ट्र राज्यात सद्य:स्थितीत कोव्हिड १९ साथीची परिस्थिती विचारात घेता दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयास दि. ३१.१२.२०२० नंतर मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय -
उपरोक्त संदर्भाधीन क्र.१ च्या दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयास दि.०१.०१.२०२१ पासून दि.३०.०६.२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे...
📌📄 शासनाचा आजचा जीआर डाऊनलोड करा.
शासनाचा आजचा जीआर डाऊनलोड करण्यासाठी येथे टच करा. 👈
No comments:
Post a Comment