🌹⚜🌹🔆🌅🔆🌹⚜🌹
🌻 *आनंदी पहाट* 🌻
*कौटुंबिक सौख्य लाभलेली*
*आज जागतिक कुटुंब दिन*
*‼वसुधैव कुटुंबकम्‼*
🏡🔆🌸👬👨👩👧👧👫🌸🔆🏡
*संध्याकाळ होते.. पिल्लांसाठी चारा शोधायला दूरवर गेलेली पाखरे घराकडे धाव घेतात. पाखरेच काय माणसांचेही तसेच आहे. घर कितीही दूर असो.. रस्त्याने कितीही गर्दी असो.. लोकलमध्ये कितीही जीव गुदमरो पण त्याची पर्वा नसते. संध्याकाळी पाऊले नकळत वळतात ती घराकडेच. मग घर कसेही असो. ती सुखद राजधानीच वाटते.*
*अशी कोणती गुरुत्वाकर्षण शक्ती आहे जी खेचून नेते या घरात. हो.. या घराला आहे नात्यांचे बळकट सुरक्षा कवच. इथे कुणीतरी वाट बघतो. वाट बघणारे कुणीतरी आहे हाच जगण्याचा आनंद. घर मग ते कसेही असो. अगदी झोपडी असली तरीही. इथे घरात नांदते गोकुळ. हे घर म्हणजे सगळ्या नात्याची राजधानी. या राजधानीत नात्यांना प्रेमाची विविध नावे आहेत.*
*घरात सुखाचे साम्राज्य आहे. या साम्राज्यातला राजा स्वतः कष्ट उपसून उदारपणे कुटुंबियांचे लाड करतो. घरात वृद्धांचा सन्मान होतो. आपल्या कष्टाचे चीज नविन पिढी करते. या जीवन सार्थकाच्या समाधानाने वृद्धांचे आयुष्य वाढतेय. त्यांची प्रेमळ छाया घरावर आहे.*
*कुटुंबाला जे जे हवे ते इथे घरात.. राजधानीत प्राप्त होते. चांदण्यात न्हाउन निघणारे सौख्य इथे आहे. आशा आकांक्षाची पूर्ती होत ही नात्याची बाग बहरते. या बागेतील पाखरांचे आनंदी सुर ऐकून ते संगीतातील रागही धुंद होतात. बालमुखातील गोड शब्द म्हणजे तर त्यांच्या मुखातून ओघळणारा अमृतरस.*
*ह्या राजधानीतील सदस्य कधी हसतात.. रुसतात.. वादविवादही करतात.. पण तरीही ओले सुके खात जन्मभर एकत्रच राहतात. कुणाला सोडून राहण्याची कल्पनाही करवत नाही. याच भारतीय कुटुंब व्यवस्थेचे जगाला कुतुहल वाटते. शतकानुशतके ही भारतीय कुटुंबातील नात्याची वीण एवढी घट्ट कशी.. याचे ते संशोधन करतात. हा आमचा संस्कृती संस्कार आहे.*
*आज कुटुंब दिन आहे हे जगात सांगितले जाते. पण आम्ही तो नित्त्यच साजरा करतो, म्हणून त्याचा आशय इथे तेवढा समजत नाही. 'हे विश्वची माझे घर' ही भावना जपणारे आम्ही.*
*कितीही संकट आली तरीही आमची कुटुंब व्यवस्था दिवसागणिक आणखी बळकट होवो.. परस्परातील प्रेमभाव वृद्धींगत होवो हीच मनोकामना. तेव्हा सर्वांना या जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*
🏡🌿👫🌺👨👩👧👧🌺👬🌿🏡
*_नाही उणे कशाचे,_*
*_घर हीच राजधानी नाही उणे कशाचे_*
*_संसार साजिरा हा साम्राज्य हे सुखाचे_*
*_घर हीच राजधानी !_*
*_राजा उदार माझा मी तृप्त पट्टराणी_*
*_द्याया दुवा उभी ती पाठीस वृद्धवाणी_*
*_आयुष्य वर्धती ते उद्गार सार्थकाचे_*
*_दिनरात आकळे ना क्षण चांदण्यात न्हाती_*
*_वाटे हवेहवेसे ते सर्व येई हाती_*
*_औदार्य येथे नांदे त्या विश्वचालकाचे_*
*_साऱ्या फुलुन आशा, बहरास बाग आली_*
*_नि:श्वास-श्वास सारे स्वरधुंद राग झाले_*
*_भर त्यात अमृताची वच सानुल्या मुखाचे_*
🌹🌿🌸🔆🏡🔆🌸🌿🌹
*गीत : ग. दि. माडगूळकर* ✍
*संगीत : दशरथ पुजारी* 🎹
*स्वर : सुमन कल्याणपूर* 🎤
*चित्रपट : बोलकी बाहुली (१९६१)*📺
*🎼🎶🎼🎶🎼* 🎧
*👨👨👦 छोटे कुटुंब सुखी कुटुंब 👨👨👦*
*!! नियम पाळा, सुरक्षित रहा !!*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*१५.०५.२०२१*
🏡🌿👫🌸👨👩👧👧🌸👬🌿🏡
No comments:
Post a Comment