K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 19 May 2021

 म्युकरमायकोसिस - वेळेत निदान केल्यास 'म्युकरमायकोसिस' वर उपचार शक्य...

          कोरोनातून बरे झाल्यावरही म्युकरमायकोसिसच्या संसर्गाला बळी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. 

💥 हा आजार नेमका काय आहे❓

💥 त्याचा संसर्ग कुणाला होतो❓ 

💥 तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ❓ 

🩺🎤 अशा मुद्द्यांवर नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांच्याशी साधलेला संवाद...

म्युकरमायकोसिस म्हणजे काय 

         म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुनाच आहे. परंतु, आता कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने तो बळावत आहे.तसेच कोरोनाच्या उपचारात रुग्णांना लागणाऱ्या स्टिरॉइड्स (Steroids) औषधांमुळे हा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. हवा आणि मातीच्या माध्यमातून या बुरशीचा संसर्ग होतो, रोग प्रतिकारशक्ती सक्षम असलेल्यांना यापासून धोका नाही परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. कोरोनाची साथ येण्यापूर्वी वर्षातून दोन किंवा तीन रुग्णांना याची बाधा होत असल्याचे दिसायचे. त्यामुळे हा आजार तसा दुर्मीळ आहे; परंतु कोरोना च्या दुसऱ्या लाटेत या आजाराची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र हा आजार इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणे एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला होत नाही.

म्युकरमायकोसिसची बाधा कोणाला होऊ शकते ❓

         'म्युकर' म्हणजे विषारी मुंगळा आहे. ज्या व्यक्तींमध्ये अनियंत्रित प्रमाणात साखरेची पातळी वाढते तिथे हा मुंगळा चिकटतो. शरीरात साखर वाढली की लाल पेशींमधून लोह स्रवते.हे लोह सर्व शरीरात पसरायला लागते आणि या बुरशीच्या वाढीला पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे साखरेची पातळी अनियंत्रित असलेल्यांनाच याची बाधा होण्याचा धोका आहे. तेव्हा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखर पूर्णपणे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.


कृपया हे पण वाचा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीस (Mucormycosis) आजारावर उपचार करणेबाबत शासनाचा जीआर (दि.18 मे)...


कोरोनाबाधितांना याचा काय धोका आहे          गंभीर प्रकृतीच्या कोरोना बाधित रुग्णांना उपचारात "स्टेरॉईड" (Steroids) दिले जातात. स्टेरॉईडमुळे शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने मोठ्या प्रमाणात वाढते. साखरेची पातळी बरेच दिवस वाढलेली राहिली आणि या दरम्यान बुरशीचा संसर्ग झाल्यास बुरशी वाढायला सुरुवात होते पहिल्या लाटेमध्ये असे रुग्ण तुलनेने कमी होते; परंतु दुसऱ्या लाटेमध्ये अनेक करोनाधितांमध्ये या बुरशीचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांना लावलेल्या प्राणवायूच्या नळ्या मुखपट्टी यामधूनही बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे प्राणवायू साठी वापरलेले पाणी रुग्णाला नाकातोंडात लावलेल्या नळ्या, हे नियमितपणे निर्जंतुक करणे गरजेचे आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये दोन ते सहा आठवड्यांमध्ये या बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता असते; परंतु दुसऱ्या लाटेत याची लागण होण्याच्या दिवसांमध्येही घट झाली असून आता कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही याची बाधा होत असल्याचे आढळले आहे.

बुरशी कुठे आणि कशी वाढते

         रुग्णांमध्ये नाकावाटे शरीरात प्रवेश करणारी ही बुरशी प्रथम नाकाच्या मागच्या बाजूस वाढायला लागते. तिथे काळी खपली तयार करते. म्हणून या संसर्गाला काळी बुरशी असेही म्हणतात. नाकातून ही सायनसमध्ये वाढते. त्यानंतर डोळ्याच्या नेत्रपटलावर वाढते आणि तेथून मेंदूत प्रवेश करते. मग ही बुरशी रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते आणि तेथून सर्वत्र पसरत जाते. ती जसजशी पसरते तशा रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे एखाद्या अवयवाला होणारा रक्तपुरवठा बंद होतो आणि तेथील पेशी मृत व्हायला लागतात आणि अवयवाचे कार्य थांबते. त्यामुळे जेव्हा ही बुरशी नेत्रपटलावर पसरते तेव्हा दृष्टी जाते. नाक,सायनस आणि डोळा या भागांतील बुरशी शस्त्रक्रिया करून काढून टाकणे शक्य आहे; परंतु बुरशीचा प्रसार मेंदूपर्यंत झाल्यास अशा शस्त्रक्रिया धोकादायक असतात. नाकातून प्रवेश केलेली बुरशी कर्करोगापेक्षा जलदगतीने पसरत जाते. त्यामुळे ती मेंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याचे निदान होऊन उपचार सुरू होणे गरजेचे आहे.

या आजाराचे निदान कसे होते

         नाकामध्ये ही बुरशी नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु नाकाच्यावर वाढायला सुरुवात झाली की लक्षणे दिसायला लागतात यात प्रामुख्याने नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे विशेषतः एका डोळ्याला, डोळे लाल होणे, दृष्टी किंवा नजर कमी होणे, दात दुखणे, दात हलणे, गालाच्या वरच्या हाडा जवळ दुखणे इत्यादी लक्षणे सुरुवातीला दिसून येतात, मधुमेह किंवा कोरोनाची बाधा झालेली असल्यास अशी लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी तातडीने कान, नाक, घसा तज्ञांचा सल्ला घ्यावा. अनेकदा रुग्ण दात हलतोय म्हणून दंतरोग तज्ञ कडे जातो अकारण ही लक्षणे दिसल्यास कान, नाक, घसा तज्ञांकडे जाणे अधिक फायदेशीर आहे.

यावर उपचार कसे होतात

         बुरशी जेथे पसरते तेथे तयार झालेल्या मृत पेशी शस्त्रक्रियेने काढून जातात. या मृत पेशी काढल्याशिवाय रक्तवाहिन्यांचे काम पुन्हा सुरू होत नाही. त्यानंतर तेथे विरोधी बुरशी विरोधी इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे पुन्हा बुरशीची वाढ होत नाही, बुरशी पूर्णपणे काढून टाकली नाही किंवा तिचे बारीक कण मागे राहिले तर ती पुन्हा वाढत जाते. त्यामुळे बुरशी कोणत्या भागापर्यंत पसरली आहे. याचे निदान एमआरआयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होते. मृत पेशी पूर्णपणे काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतरच बुरशीविरोधी औषधे चांगले काम करू शकतात.वेळीच हे उपचार केले तर म्युकरमायकोसिस १०० टके बरा होतो. त्यामुळे या आजाराविषयी भीती बाळगण्यापेक्षा तो मुळापासून काढून टाकण्यासाठी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

प्रतिबंधात्मक उपाय काही करता येऊ

शकतात का

         कोरोनाची बाधा झालेल्या, अनियंत्रित मधुमेह असलेल्या, अतिदक्षता विभागात किता कृत्रिम श्वसनयंत्रणेवर बराच काळ राहिलेल्या रुग्णांना याचा अधिक धोका आहे. त्यामुळे दर काही दिवसांनी या रुग्णांनी नाकाची तपासणी डॉक्टरांकडून करून घेतली तर वेळेत या बुरशीची पहिली खपली दिसून येते आणि उपचारही सुरू करता येतात. दुसरे म्हणजे साखर नियंत्रणात ठेवणे यासाठी आवश्यक औषधे, इन्सुलिन वेळच्या वेळी घेणे हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे.

आठवड्याची मुलाखत

डॉ. अशेष भूमकर

कान, नाक, घसा तज्ञ

मुलाखत - शैलजा तिवले

काय आहे म्युकरमायकोसिस

         या दुर्मिळ बुरशीजन्य आजाराचा संसर्ग तोंड अथवा नाकाद्वारे होतो. नाकाद्वारे डोळे नंतर मेंदूपर्यंत ही बुरशी जाते. तोंडावर असलेल्या सायनसमध्ये ही बुरशी वाढते. या बुरशीचा संसर्ग झपाट्याने होत असतो. काही दिवसातच अनेक अवयवांवर ही बुरशी हल्ला करते. रुग्णाच्या कपाळाखाली किंवा तोंडात टाळू्वर काळे व्रण दिसणं, हे या आजाराचं गंभीर लक्षण मानलं जातं. ‘म्युकर’ बुरशीचा संसर्ग शरीराच्या ज्या भागात होतो, त्या भागातल्या केशनलिका ही बुरशी निकामी करते. म्हणजेच, केशनलिका बंद पाडते. बुरशीच्या संसर्गानं बंद पडलेल्या केशनलिकांमुळे तिथल्या पेशी मृत पावतात. वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचाराने या आजार रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

म्युकरमायकोसिस लक्षणे 

  • १. चेहऱ्यावर सूज येणे
  • २. गाल प्रचंड दुखणे
  • ३. डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे
  • ४. दृष्टी कमी होणे
  • ५. डोके दुखणे
  • ६. नाक चोंदणे
  • ७. रक्ताळलेली किंवा काळसर जखम
  • ८. दात, दाढ अथवा हिरड्या दुखणे

संभाव्य कारणे

  • १. कोरोना उपचारादरम्‍यान अतिरिक्त स्टेरॉईड आणि इम्युनोमॉड्यूलेटरचा वापर
  • २. उपचारासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेटरचा वापर
  • ३. जास्त काळ ऑक्सिजनद्वारे उपचार
  • ४. अनियंत्रित मधुमेह

कोणते उपाय करावे

  • १. कोरोनातून बरे झाल्यानंतर घरातही मास्क वापराच
  • २. डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्सरे काढा
  • ३. घरातील बुरशी वाढते अशी ठिकाणे स्वच्छ करा
  • ४. धुळीपासून दूर रहा
  • ५. रोगप्रतिकारशक्ती वाढेल, असा आहार घ्या
  • ६. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

‘या’ गोष्टींवर नियंत्रण ठेवा

  • i. रक्तातील साखर नियंत्रित करा
  • ii. कोविड उपचारादरम्यान स्टेरॉईडचा नियंत्रित वापर करा
  • iii. रुग्णाला ऑक्सिजन देताना स्टराईल (Sterile) पाण्याचा वापर करा
  • iv. अँटिबायोटिक्स, अँटिफंगल औषधांचा योग्य वापर करा
  • v. नाक चोंदणे अथवा बंद होणे म्हणजे सर्दीच असेल असं नाही
  • vi. लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
  • vii. निदान झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांना भेटा
  • viii. कान-नाक-घसा तज्ज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर तसेच तोंडाचे किंवा दातांच्या डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्या
Source of info : Perfectnewsindia 

दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, काळ्या बुरशीला थांबवण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 

प्रथम, साखरेचे नियंत्रण खूप चांगले असावे, 

दुसरे म्हणजे आपण स्टिरॉइड्स कधी द्यायचे याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे आणि

तिसरे स्टिरॉइड्सचा हलका किंवा मध्यम डोस द्यावा.

म्युकरमायकोसिस होण्याची ठळक 5 कारणे व त्यांचे निराकरण:- आयुर्वेदीय दृष्टिकोनातून

 *1. कोविड मध्ये वापरलेल्या  औषधांमुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती.* 😥😥

👉🏻आजार बरा झाला असला तरी त्यानंतर त्यामळे विस्कटलेली शरीराची घडी नीट करणे या बद्दल च्या  योजना आयुर्वेद शास्त्रात आहेत. त्यासाठी ताप जाऊन 15 ते 20 दिवस झाले असल्यास तुपाचा योग्य वापर आहारात करावा. आपल्या आयुर्वेद वैद्याकडून जीर्ण ज्वरा च्या चिकित्सेचा प्रोटोकॉल तयार करून घ्यावा.
शिवाय सर्व औषधोपचाराची माहिती वैद्यांना देऊन शरीराचे सार संहनन पूर्ववत करण्यासाठी रसायन औषध सुरू करावे.

 *2. कोविड काळात व नन्तर सुद्धा शरीराच्या स्वच्छतेकडे झालेले गंभीर दुर्लक्ष!!!!

👁️👁️कोव्हिड काळात झालेले स्वच्छतेकडे दुर्लक्ष भरून काढण्यासाठ शक्य तेवढया प्रमाणात आयुर्वेदीय जीवनशैली आचरणात आणावी. त्यातही 
**अभ्यंग* (सर्वांगास औषधी तेल लावणे)

**योग्य काष्ठऔषधींनी दंतधावन* (दातांना ब्रश करणे)

**गंडूष* (औषधींच्या काढायच्या गुळण्या करण्याचा प्रकार)

**नस्य* (नाकामध्ये औषध प्रविष्ट करणे)  

**अंजन* (काजळ लावल्या प्रमाणे डोळ्यांना लावायची औषधे)

**धूपन*
या आयुर्वेदातील वैशिष्ट्य पूर्ण उपक्रमांद्वारे बुरशी शरीरात वाढण्यास वावच रहात नाही.

 *3. पुन: पुन्हा एकच मास्क वापरणे* 😷😷

👁️👁️बहुतांशी लोक कापडी मास्क वापरतात त्याची योग्य स्वच्छता ठेवावी..त्याला कडक इस्त्री करणे हा सुद्धा एक चांगला उपाय आहे.तरी आयुर्वेदातील धुपन द्रव्यांनी त्याचे धुपन रोज केल्यास त्यामार्गे बुरशी शरीरात जाण्यास आळा बसतो.

 *4. कोव्हिडं मध्ये व नंतर चुकीच्या पद्धतींत केलेले आहारसेवन* 🍗🍖🥒🥝

👁️👁️आहाराची मात्रा व स्वरूप, जड आहार, सहज न पचणारा विष्टम्भी आहार याचे ज्ञान सामान्य माणसांना नसते.आणि या जर्जर शरीरात  असा आहार रोज गेल्यास आम हा विषारी पदार्थ शरीरात तयार होतो यामुळे शरीरात कृमी (बुरशीचे मोल्स या प्रकारात मोडतात)वाढण्याची शक्यता असते. जीर्ण ज्वरासह पूर्वी झालेल्या आमाच्या अजीर्णाचे analysis वैद्य योग्य पद्धतीने करतात.  आपण ते लवकरात लवकर करून घ्यावे व त्यावर वैद्याच्या सल्ल्याने उपाय योजना सुरू करावी


 *5. अतिप्रमाणात चिंता करणे,पुरेशी झोप न घेणे* 😞😔

👁️👁️शरीराच्या स्वास्थ्या सोबत मनाचे स्वास्थ जपणे फार गरजेचे आहे. या गोष्टीकडे 99℅ वेळा दुर्लक्ष होते. डोळ्यांच्या आजारात या बाबतीतला निष्काळजीपणा अंधत्वाचा धोका वाढवतो. योग्य समुपदेशन, शिरोधारा, पादाभ्यंग या गोष्टीनी लवकरात लवकर वरील बाबींचे निराकरण होते.
👁️👁️
हे मुद्दे संक्षेपाने लिहिलेले आहेत.या पुढे यावरील प्रत्येक मुद्द्यावर विस्तारित लिहिले जाईल.
या pandemic मध्ये उदभवलेल्या या भयानक आजाराला तोंड देण्यासाठी आयुर्वेद समर्थ आहे. अथ पासून इति पर्यंत अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी लक्षात घेऊन या जीवघेण्या आजारावर आयुर्वेदाच्या साथीने  मात करता येऊ शकते

म्युकरमायकोसिस माहिती (हिंदीत)



No comments:

Post a Comment