K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

जी.पी.एस. म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते? – What is GPS Meaning in Marathi

GPS Information in Marathi

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाजवळ मोबाईल फोन पाहायला मिळतो, आणि स्मार्टफोन मुळे माणसाचं जीवन खूप सोपी झालेल आहे आपण असेही म्हटले तरी चालेल, जगातील कुठलीही माहिती व्यक्तीच्या एका क्लिकवर उपलब्ध झालेली आहे, आता माणसाला बाहेर कुठेही फिरायला जायचे असल्यास त्याला कुठल्याही व्यक्तीला रस्ता विचारण्याची गरजच राहिलेली नाही, कारण आता  प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध झालेला आहे.

आणि तो त्याच स्मार्टफोनच्या माध्यमातून अश्याच अनेक गोष्टींचा फायदा घेत आहे, आणि हे सर्व शक्य झाले आहे, जीपीएस मुळे पण हे जीपीएस आहे काय आणि हे कसे कार्य करते हे बऱ्याच लोकांना माहिती नसत त्यासाठी आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत की जीपीएस काय असते आणि ते कार्य कसे करते? तर चला पाहूया..

जी.पी.एस. म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते? – What is GPS Meaning in Marathi

GPS Meaning in Marathi
GPS Meaning in Marathi

जीपीएस म्हणजे नेमकं काय असत? – What is GPS?

जीपीएस (GPS) चा फुल फॉर्म आहे, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम(GLOBAL POSITIONING SYSTEM). आणि जीपीएस प्रणाली ही संपूर्ण जगातील दिशा दर्शवणारी सॅटेलाईट प्रणाली आहे, ही जीपीएस प्रणाली पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची माहिती आणि वेळ जीपीएस रिसीवर ला देते. आणि या प्रणालीचा वापर करून आपण पृथ्वीवरील कोणत्याही रस्त्यांवर फिरू शकतो. तेही कोणतेही रस्ते आणि त्या रस्त्यांमधील अंतर.

जीपीएस चा इतिहास – GPS History in Marathi 

जीपीएस प्रणालीचा शोध अमेरिकेच्या संरक्षण दलाने १९६० मध्ये त्यांच्या सीमारक्षक दलासाठी लावला होता जेणेकरून ते शत्रूच्या ठिकाणांवर नजर ठेवू शकतील.आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती काढू शकतील, परंतु या तंत्रज्ञानाला १९९५ मध्ये जगातील प्रत्येकासाठी उघडण्यात आले आणि ही प्रणाली प्रत्येकाला उपलब्ध करण्यात आली. म्हणून आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ही प्रणाली आपल्याला पाहायला मिळते.

जीपीएस काम कसे करते? – How does GPS work

जीपीएस हे ३० सॅटेलाईट चे एक नेटवर्क आहे जे आपल्या पृथ्वीच्या जमीनीपासून २०,००० किलोमीटर दूर आहे. आणि ते पृथ्वीच्या कक्षेत आजूबाजूला फिरत असते. जेव्हा आपण मोबाईल चे जीपीएस सुरू करतो तेव्हा ४ सॅटेलाईट आपली लोकेशन चेक करतात, आणि वेळोवेळी या चार सॅटेलाइट मूळे आपल्या लोकेशन ची आणि वेळेची माहिती सिग्नल द्वारा ट्रान्समिट केल्या जाते, या ट्रान्समिट केल्या गेलेल्या सिग्नल ची स्पीड ही लाईटच्या स्पीड इतकी असते. आणि आपला मोबाईल या वेळी रिसीवर चे कार्य करतो. त्यामुळे आपल्याला योग्य लोकेशन ची माहिती मिळते.

जीपीएस चा उपयोग – Uses of GPS

  •  जीपीएस प्रणाली मूळे आपल्याला आपली लोकेशन माहिती करून घेण्यासाठी फायदा होतो.
  •  जीपीएस प्रणाली मूळे योग्य वेळेची माहिती आपल्याला मिळण्यास मदत होते.
  •  जीपीएस प्रणाली मूळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होते.
  •  एखाद्या व्यक्तीच्या लोकेशन ला ट्रॅकिंग करण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर होतो.

वरील लेख वाचून जीपीएस विषयी माहिती मिळाली असेल, तर अशा करतो वरील लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!


No comments:

Post a Comment