येत्या सहा जून रोजी शिव स्वराज्य दिन साजरा करणेबाबत
6 जून : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. अशा या भूमी पुत्रांच्या स्वातंत्र्य दिनाचे महत्व आणखीन दृढ होण्यासाठी 6 जुन हा दिवस जानेवारी 2021 या वर्षा पासुन ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करावा या दिवशी सकाळी 11.00 वाजता सर्व पदाधिकारी / अधिकारी / कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, याबाबतच्या योग्य त्या सुचना निर्गमित करुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची दक्षता घ्यावी. सदरचा कार्यक्रम हा कोवीड-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सामाजिक आंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पार पाडण्यात यावा.
या बाबतचा शासनाचा 28 मे चा जीआर वाचा 👇
Thanks
No comments:
Post a Comment