K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल माहिती – Indian Scientists Information in Marathi

आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे. या क्षेत्रात विश्वातील महान शास्त्रज्ञांनी आपले अमुल्य योगदान देऊन आपल्या सर्वांचे जीवन समृद्ध आणि सुखकर बनविले आहे. यामध्ये अनेक भारतीय शास्त्रज्ञांची नावे सुद्धा समोर येतात.

आज आपण अशाच काही महान भारतीय शास्त्रज्ञांची थोडक्यात माहिती बघणार आहोत.

महान भारतीय शास्त्रज्ञांबद्दल माहिती – Indian Scientists Information in Marathi

Indian Scientists Information in Marathi
Indian Scientists Information in Marathi

प्राचीन काळातील महान भारतीय शास्त्रज्ञ – Indian Ancient Scientists

विज्ञानात अगदी प्राचीन काळापासून भारतीय शास्त्रज्ञांनी आपले योगदान दिले आहे. त्यांपैकी काही पुढील प्रमाणे.

  1. आर्यभट्ट : आपल्यापैकी सर्वांना माहित असेल कि शून्याचा शोध भारतातच लागला आहे. परंतु हा शोध कुणी लावला हे तुम्हाला ठाऊक आहे का. हा शोध लावला आहे आर्यभट्ट यांनी. ते प्राचीन काळातील थोर गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि ज्योतीष्याचार्य होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ भारताच्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाला “आर्यभट्ट” नाव दिले आहे.
  2. महर्षी चरक : महर्षी चरक यांना भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक असे म्हटल्या जाते. आपल्या ‘चरक संहिता’ या ग्रंथामध्ये त्यांनी विविध आजारांची माहिती आणि उपचाराच्या पद्धतींबद्दल विस्तृत लिखाण केलेले आहे.
  3. महर्षी वराहमिहिरा : जमिनीच्या खाली पाण्याचे अस्तित्व आहे हे सर्वात आधी सांगणारे शास्त्रज्ञ म्हणजे महर्षी वराहमिहिरा. त्यांनी ‘बृहत्संहिता’ या ग्रंथात ग्रहण, भूकंप, वास्तुशास्त्र इ. विषयांवर प्रकाश टाकलेला आहे.
  4. महर्षी कणाद : यांचे खरे नाव आलुक्य असे होते. कणाद या नावामागची कथा म्हणजे आलुक्य यांचा कणांचा अभ्यास. ‘कण’ म्हणजे वस्तूचे सूक्ष्म अवशेष. याच अभ्यासावरून त्यांचे नाव कणाद असे पडले. अणूंचा सिद्धांत जगासमोर पहिल्यांदा महर्षी कणाद यांनी मांडला.
  5. महर्षी सुश्रुत : शस्त्रक्रियेचे जनक म्हणून महर्षी सुश्रुत यांचे नाव समोर येते. प्राचीन काळातच त्यांनी ‘सुश्रुत संहिता’ या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती लिहलेली आढळते.

नोबेल पारितोषिक मिळविणारे भारतीय शास्त्रज्ञ : Indian Scientists who won Nobel Prize

भारतातील काही शास्त्रज्ञांना जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणारे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ते शास्त्रज्ञ पुढीलप्रमाणे :

  1. भारतरत्न सी.व्ही. रमन : यांना भौतिकशास्त्रातील प्रसिद्ध ‘रमन प्रभाव’ साठी १९३० सालचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  2. हर गोबिंद खुराना : हे भारतीय अमेरिकी शास्त्रज्ञ आहेत. यांना १९६८ साली ‘अनुवांशिकतेवरील संशोधनासाठी’ नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  3. सुब्रमण्यम चंद्रशेखर : यांना एस. चंद्रशेखर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांना ‘ताऱ्यांची रचना आणि उत्पत्ती’च्या शोधासाठी १९८३ साली नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.
  4. व्यंकटरमण रामकृष्णन : यांना २००९ साली ‘राईबोसोमची रचना व कार्य’ या विषयावरील सखोल अभ्यासासाठी नोबेल पारितोषिक मिळालेले आहे.

भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांचे संशोधन – Indian Scientists and their Inventions

  • सी.व्ही. रमन : रमन प्रभाव
  • सत्येंद्रनाथ बोस : यांनी अणूंच्या केंद्रात असणाऱ्या ‘बोसॉन’ चा शोध लावला.
  • डॉ. होमी जे. भाभा : यांना भारतीय अनुशास्त्राचे जनक म्हटल्या जाते. यांच्याद्वारे भारतात अणु उर्जेच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे.
  • डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : यांना भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हटल्या जाते. पहिल्या स्वदेशी क्षेपणास्त्राचे श्रेय डॉ. कलाम यांना जाते.
  • बिरबल सहानी : यांनी वनस्पती शास्त्रात आपले अमूल्य योगदान दिलेले आहे.
  • श्रीनिवास रामानुजन : यांनी गणित विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.
  • विक्रम साराभाई : भारतातील अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात यांच्या पासून झाली आहे.
  • प्रफुल चंद्र रे : यांनी ‘मर्क्युरस नायट्रेट’ या पदार्थाचा शोध लावला तसेच बंगाल केमिकल एंड फार्मासुटीकल कंपनी ची स्थापना केलेली आहे.

अमेरिकी अंतराळ संस्था नासा मध्ये कार्य करत असलेले भारतीय शास्त्रज्ञ : Indian Scientists in NASA

नासा ही अमेरिकेची आणि कदाचित जगातील सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे. या संस्थेत काही भारतीय शास्त्रज्ञांनी आपली कामगिरी बजावली आहे आणि अजूनही ती सुरूच आहे. नासा संस्थेमध्ये कार्यरत असलेले काही भारतीय शास्त्रज्ञांची यादी पुढील प्रमाणे :
१. कल्पना चावला
२. सुनिता विलियम
३. अश्विन वासावडा
४. डॉ. कमलेश लुल्ला
५. डॉ. अनिता सेनगुप्ता
६. डॉ. सुरेश कुळकर्णी
७. डॉ. मेय मयप्पन
८. शर्मिला भट्टाचार्य

भारतीय महिला शास्त्रज्ञ : Female Indian Scientists

शास्त्रज्ञांच्या या यादीमध्ये फक्त पुरुष मंडळीच नाही तर महिला देखील आघाडीवर आहेत. विज्ञानामध्ये अनेक भारतीय महिलांनी आपले अमुल्य योगदान दिलेले आहे. त्यांपैकी काही भारतीय महिला शास्त्रज्ञांची यादी खालीलप्रमाणे :

  1. इरावती कर्वे
  2. अण्णा मनी
  3. कादंबिनी गांगुली
  4. राजेश्वरी चॅटर्जी
  5. टेसी थॉमस
  6. उषा बरवाले झेहर
  7. दर्शन रंगनाथान
  8. शुभा तोळे इ.

सध्या जीवित असलेले महान भारतीय शास्त्रज्ञ : Famous Indian Scientists alive today

मित्रांनो आजही आपल्या मध्ये काही महान शास्त्रज्ञ हजर आहेत. हे लोक रोज आपल्या सर्वांचे जीवन आरामदायी आणि सुखकर बनविण्यासाठी नवनवीन प्रयोग करत आहेत. यांपैकी काही शास्त्रज्ञ पुढीलप्रमाणे :

  1. चेतन चिटणीस
  2. चारुसीता चक्रवर्ती
  3. सिवा उमापती
  4. परमजीत खुराना
  5. रतन कुमार सिन्हा इ.

भारतीय शास्त्रज्ञांबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Quiz on Indian Scientists

१. शास्त्रज्ञ म्हणजे काय?

उत्तर: शास्त्रज्ञ म्हणजे कुठल्याही प्रकारच्या शास्त्राचा अभ्यासक होय. ते आपल्या अभ्यासातून मानवी जीवन अधिकच प्रभावी आणि सुखकर बनविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात.

२. भारतातील रसायन शास्त्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञांची नावे काय ?

उत्तर: नागार्जुन, सत्येंद्रनाथ बोस, महर्षी कणाद, प्रफुल चंद्र रे, हर गोबिंद खुराना, सी.एन.आर. राव, गोविंद देसिराजू इ.

३. भारतातील वैद्यकिय शास्त्रातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोण आहेत ?

उत्तर: श्रीपाद पाटील, राधेशाम शर्मा, दीपा भरतीया, ओम प्रकाश सिंह इ.

४. भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून कुणाला ओळखले जाते ?

५. विश्वातील पहिली महिला शास्त्रज्ञ कोण ?

No comments:

Post a Comment