K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

 नवरीसाठी 101+ भरपूर नवीन उखाणे

Marathi Ukhane For Bride

         एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांपैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. प्रत्येक स्त्रीच्या लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा नवरा हवा असणे, प्रेमळ तसेच स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक मुलीला हवा असतो. कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीसोबत काढायचे असते. मग त्या व्यक्तीने त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी, आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी या प्रमाणे.

         लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात. आजच्या लेखात नवरी साठी स्पेशल उखाणे (Marathi Ukhane for Female) तेही मराठी मध्ये आपल्या साठी घेऊन आलोत. ज्या उखाण्यांचा फायदा आपल्याला लग्नात होईल. तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीं चा विवाह असेल तर त्या मैत्रिणीला सुध्दा या उखाण्यांमुळे फायदा होईल, आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे (Marathi Ukhane) बोलल्यामुळे समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडणार. तर चला पाहूया नवरी साठी उखाणे तेही मराठीत.

नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे – Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Bride For Marriage

नवरी चे उखाणे – Navriche Ukhane


छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,

… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.


गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,

.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

 

माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,

.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.


कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,

… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.


पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,

… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.


मंदिरात वाहाते, फुल आणि पान,

… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.


रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,

… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.


खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,

… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.


पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,

… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.


मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,

… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.


सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,

… रावांचे नांव घेते, …च्या घरात.


पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,

… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.


सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,

… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.


रला यांनी हात, वाटली मला भिती,

हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.


नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,

…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,


कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,

…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.


हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,

… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.


नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,

आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,


चांदीचे जोडवे पतीची खुन,

.. रावांचे नांव घेते,… ची सुन.


दारी होता टेबल, त्यावर होता फोन,

… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?


मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,

… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.


अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,

आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.


गुलाबाचे फुल दिसायला ताजे,

… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.


डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,

… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,


…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,

त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.


संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,

… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,


अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,

… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.


पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,

… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.


पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,

…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.


तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,

…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.


एका जन्माचं वचन न घेता जन्मोजन्मी आपल्या पतीची सौभाग्यवती राहण्याचे वचन घेणारी नवरी. त्याच नात्याला उखाण्यांमधून एका विशिष्ट शब्दात मांडण्यासाठी या लेखात आपल्याला बरेच नवरी साठी उखाणे लिहिलेले दिसतील आणि त्या उखाण्यांचा उपयोग करून आपण सर्वांवर एक चांगला प्रभाव टाकू शकता. जर तुलना केली तर नवरदेवापेक्षा नवरीला बऱ्याच ठिकाणी उखाणे घ्यावे लागतात. आणि तेव्हा नवऱ्या मुलीला उखाणे येणे खूप आवश्यक असते.


आपल्याही मैत्रिणीमध्ये जर कुणाला उखाणे येत नसतील किंवा नवरीसाठी उत्तम उखाण्यांच्या शोधात असतील तर आपण आपल्या मैत्रिणीला या लेखातील उखाण्यांना शेयर करू शकता. आणि त्यांची ऊखाणे शोधण्यात मदत करु शकता. नवऱ्या मुलींसाठी एकापेक्षा एक उखाणे माझी मराठी वर आपल्याला मिळतील ज्याचा उपयोग नवऱ्या मुली आपल्या लग्नाच्या दिवसाला करू शकतात. लेखाच्या खाली ही अश्या प्रकारे उखाणे आपल्याला पाहायला मिळतील.


आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,

… राव हेच माझे अलंकार खरे.


लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,

…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,


केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,

… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.


डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,

.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.


अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,

… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.


ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.


कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,

… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,


शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,

… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,


श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,

… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.


ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,

… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.


यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,

… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,


अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,

… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,


लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,

… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.


राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,

… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,


श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,

… रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.


वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,

… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.


घातली मी वरमाला हसले… राव गाली,

थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.


जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,

घडविले देवानी… रावांना जीव लावून,


राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,

… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,


 पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,

… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,


गृह कामाचे शिक्षण देते माता,

…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.


दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,

… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.


पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,

… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.


चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,

… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.


 नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,

…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.


हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.

… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.


वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,

…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,


शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,

…रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.


जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.


स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी,

…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.


मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,

… रावांचे हेच रुप मला फार आवडले,


आज सारे सुख माझ्या दारी दाटले,

…रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.


मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,

…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

 

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,

…रावामुळेच लागला मला त्याचा लळा.


शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,

…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.


इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग,

…रावांच्या संसारात मी आहे हंग.


निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,

…रावांवर आहे माझा विश्वास.


प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,

…रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.


प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,

…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.


चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,

…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.


नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,

… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.


करवंदाची साल चंदनाचे खोड,

… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.


सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,

… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.


वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा

…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.


 सुशिक्षीत धराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,

रावांशी लग्न करुन सौभाग्यवती झाले.


प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,

…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.


नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,

…रावां सोबत आली मी सासरी.


गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,

…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.


शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,

आता ….राव माझे जीवनसाथी.

 

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,

…रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.


मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,

…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.


गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.


पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,

…रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.


“नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,

…रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!”


 “दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,

…चे नाव घेते तुमच्या साठी!”


Navariche Ukhane

Premrupi Divyat Lavate Pritichi Vat,

… Ravanche Nav Ghyayala Keli Aajpasun Suruvat.


Nadichya Kathavar Krushan Vajavito Basari,

… Ravanchya Sobat Aali Mi Sasari.


Gulabachya Jhadala Phul Yetat Dat,

…Ravanche Nav Ghete Soda Majhi Vat.


Shubhamangal Prasangi Akshada Padatat Mathi,

Aata …Rav Majhe Janmsathi.

 

Aakashachya Pragannat Bramha, Vishnu Aani Mahesh,

…Ravanche Nav Ghete Aani Karte Mi Gruhapravesh.


Mangalsutratil Don Vatya Sasar Aani Maher,

…Ravani Dila Saubhagyacha Aaher.

 

Gorya Gorya Hatavar Rekhatali Mehandi,

…Ravanche Nav Ghenyachi Varanvar Yevo Sandhi.


Parvatine Pan Kela Mahadevalach Varin,

…Ravanchya Sathin, Aadarsh Sansar Karin.


Nanda Saukhyabhare Dila Sarvani Aashirvad,

…Ravanche Nav Ghete Dya Satyanarayanacha Prasa.


Don Jivanche Milan, Janu Shat-Janmachya Gathi,

…Ravanche Nav Ghete Tumachyasathi.


नवऱ्या मुलींना सासुरवाडीला गेल्यावर उखाणे घ्यावेच लागतात. आणि अश्या ठिकाणी आपल्याला उत्तम उखाणे येण्यासाठी या लेखात भरभरून उखाणे लिहिलेले आहेत, तर या ऊखाण्यांचा वापर आपण तेथे करू शकता. तर आशा करतो वरील लेखातील लिहिलेले नवरी साठी चे उखाणे आपल्याला आवडले असतील. आपल्याला वरील लेखातील उखाणे आवडले असतील तर या लेखाला आपल्या लग्न ठरलेल्या मैत्रिणींना शेयर करायला विसरू नका. 


आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!


Thank You So Much And Keep Loving Us!


स्रोत : माझी मराठी

No comments:

Post a Comment