K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल – What to Do if Money Transferred to Wrong Account

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत का मग काळजी नका करू जाणून घ्या या लेखातून कसे परत मिळवायचे आपले पैसे.

Money Transferred to Wrong Account Number

दैनंदिन व्यवहारात आपल्याला बँकेचे व्यवहार करण्याचे काम तर पडतेच, त्यामध्ये सुध्दा आजकाल च्या या डिजिटल युगात तर बँकेत जायची पण गरज राहिलेली नाही आपल्याला जर एखाद्याला पैसे पाठवायचे असल्यास किंवा कोणत्या व्यक्ती कडून पैसे मागवायचे असल्यास आपण इंटरनेट बँकिंग चा वापर करतो, आणि बँकेचे व्यवहार करतो. पण बरेचदा काही चुकांमुळे किंवा काही कारणामुळे आपल्याने चुकीच्या खात्यात पैसे पाठविल्या जातात, मग अश्या वेळेस आपल्याला काय करावे सुचत नाही आणि आपण गोंधळून जातो, तर अश्या परिस्थिती मध्ये काय करावे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत तर चला पाहूया..

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास काय कराल – What to Do if Money Transferred to Wrong Account

Money Transferred to Wrong Account Number
Money Transferred to Wrong Account Number

बँकेचे व्यवहार किंवा पैसे ट्रान्सफर करते वेळी आपण काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या खात्यातील पैसे कोण्या दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात जाता कामा नये, पण चुकीने पैसे दुसऱ्याच्या खात्यात पैसे गेल्यास आपण सर्वात आधी त्या चुकीच्या व्यवहाराबद्दल बँकेला कळवावे. आपण आपल्या बँकेच्या ब्रांचला भेट देऊन तसेच फोन किंवा ईमेल द्वारे सुध्दा कळवू शकता, सोबतच आपण स्वतः जाऊन बँकेच्या मॅनेजर शी संपर्क साधू शकता, आणि चुकीच्या खात्यामध्ये पैसे गेल्याचे त्यांना सांगू शकता, या व्यतिरिक्त ज्या बँकेत आपले पैसे ट्रान्सफर झालेत ती बँक सुध्दा आपली मदत करू शकते.

ट्रांझेक्शनची संपूर्ण माहिती बँकेला द्या! – Give Details of Transaction to the Bank!

चुकीने ट्रान्सफर झालेल्या पैशांची माहिती आपल्या बँकेला द्या, जसे आपला खाते क्रमांक, पैसे ट्रान्सफर करण्याची तारीख, वेळ, तसेच कोणत्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले तो क्रमांक, सोबतच तुम्हाला पुरावा द्यावा लागेल की तुमच्याने चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत, त्यासाठी आपण स्क्रीन शॉटचा सुध्दा वापर करू शकता.

जर पैसे ट्रान्सफर करणारी बँक आणि पैसे रिसीव करणारी बँक जर एकच असेल तर पैसे परत मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर होते परंतु जर ट्रान्सफर करणारी बँक आणि रिसीव करणारी बँक ह्या दोन्ही वेगवेगळ्या असतील तर यामध्ये थोडा उशीर लागू शकतो, कोणतीही बँक आपल्या खातेदाराची माहिती सार्वजनिक करत नसते किंवा त्यांचे वैयक्तिक खात्याला स्वतः पाहू शकते, एवढंच नाही तर ग्राहकाच्या परवानगी शिवाय ते पैसे ही ट्रान्सफर करू शकत नाही.

आपण ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केलेत त्या ब्रांच ला एक अर्ज करू शकता त्यांनंतर आपल्याला खातेदाराशी संपर्क करून आपली झालेली चुकी सांगू शकता, आणि पैसे परत मागवू शकता पण आपण म्हणणार की कोण आपल्या खात्यात आलेले  पैसे वापस करणार तर अश्या परिस्थिती मध्ये जर त्या व्यक्तीने तुमचे पैसे परत करण्यास मनाई केली तर आपण त्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार करू शकता, त्यानंतर पोलीस बँकेशी चौकशी करून आपले पैसे परत मिळवण्यास आपली मदत करतील.

तर आशा करतो मित्रहो हा लिहिलेला छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत,आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!


No comments:

Post a Comment