मराठी मधील काही मजेदार फिश पॉन्ड - Fish Pond in Marathi
शाळा, कॉलेज चे स्नेहसंम्मेलन, वार्षिक महोत्सव, किंवा निरोप समारंभ म्हटला कि खूप सारी मज्जा असते. आपल्या पैकी प्रत्येकाने हि मज्जा नक्कीच अनुभवलेली असेल. या वेळी सर्व काही विसरून फक्त आणि फक्त आनंद आणि हर्षोल्लासाचे वातावरण असते.
या प्रसंगी विविध कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन केले जाते. परंतु वरील प्रत्येक कार्यक्रम मध्ये एक खेळ असा असतो कि तो नसेल तर हे कार्यक्रम पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. आणि तो खेळ म्हणजे ‘फिश पॉन्ड’.
होय मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत या खेळाबद्दल थोडी माहिती आणि काही मराठी फिश पॉन्ड.
मराठी मधील काही मजेदार फिश पॉन्ड – Fish Pond in Marathi
खेळाचे नियम : Rules of the Game
याला काही नियम वगैरे नाहीत. आपल्याला फक्त एका चिठ्ठीवर आपल्या मित्र-मैत्रिणीचे नाव लिहावे लागते आणि ती चिठ्ठी समोर ठेवलेल्या भांड्यामध्ये टाकावी लागेल.
मुलांसाठी मराठी फिश पॉन्ड : Fish Pond in Marathi for Boy
- इकडून जातांना हसतो, तिकडून जातांना हसतो,
———– वाटते, तो एकटाच दात घासतो. - पितात दुध लोक, आम्हाला हवी साय,
———- पाहून मुली म्हणतात, हाय हुफ हाय हुफ हाय हाय - हिरव्या भाज्या खाल्ल्याने, शरीराला मिळते पोषण
———- पाहून मुली म्हणतात हाच आमचा हृतिक रोशन - ३ फुटाचा बूट, ४ फुट हाईट
——— तरी पण करतात वातावरण टाईट. - ——– येताच वर्गात
सर्वांना वाटते आम्ही आहे स्वर्गात.
काही वेळाने हि चिठ्ठी सर्वांसमोर वाचल्या जाईल. आणि ज्याचे नाव चिठ्ठीवर असेल त्याने न रागावता फक्त मज्जा लुटायची. या चिठ्ठीवर आपण काही सिक्रेट संदेश सुद्धा लिहू शकता.
- चिमणी उडते भूर भूर भूर……
——- भाऊचा DP म्हणजे नुसता धूर…… - गाईला इंग्रजीत म्हणतात काऊ
गाईला इंग्रजीत म्हणतात काऊ
किती लागले मागे तरी पण पटले नाही———– भाऊ. - ———– भाऊ म्हणजे
चेहरा भोळा अन लफडी सोळा - ———– भाऊ म्हणजे
साधा चेहरा पण विषय गहरा. - सांग सांग भोलानाथ, पाणी पडेल का
घरातून बाहेर पडल्यावर ————- दिसेल का - वाटीत वाटी, वाटीत भात
——- बसले दारात, तर कुत्रे कशे येतील घरात - अंगात नाही थेंबभर रक्त, अंगात नाही थेंबभर रक्त
——– भाऊ आमचे ग्रेट खलीचे भक्त.
हा खेळ केवळ आनंद आणि मजेचा विषय आहे. यातून कोणाची मने दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. खेळ खेळून झाल्यावर सर्व गोष्टी तिथल्या तिथेच विसरून जाव्या. कुणीही त्या वैयक्तिक घेऊ नयेत.
बेस्ट फ्रेंड्स साठी फिश पॉन्ड – Fish Pond in Marathi for Friends
- ———- आणि ——— यांची आहे घट्ट दोस्ती
एक गेला पुण्यात आणि दुसरा गेला तंबाखू चुन्यात. - —— भाऊंच्या घरात मार्बल ची फरशी,
सर्व मुली म्हणतात होणार सून मी या घरची - दोन चपला हाणा पण,
——— भाऊ ला पैलवान म्हणा. - ———- भाऊ म्हणजे,
खाऊ गल्लीतला बाहुबली - ४ दिवस एकच एक पॅन्ट घालतो,
तरी बघा——– काय ऐटीत चालतो. - डोक दुखल्यावर लावलात बाम,
—– भाऊ म्हणजे डीक्टो गुलाबजाम - आओ देखे जरा किसमे कितना है दम,
पूर्ण जिल्ह्यात ———— भाऊ एकटेच हॅन्डसम
मुलींवर/ मुलींसाठी फिश पॉन्ड – Fish Pond in Marathi for Girl
- गोरे गोरे गाल तिचे काळे काळे केस,
तरी पण ——— ला पाहून तोंडाला येतो फेस - मागून बघितलं तर दिसते हसीना,
समोरून बघितल्यावर येतो पसीना. - —— आली, हवा आली
खर खर सांग किती दिवस झाले तू अंघोळ नाही केली - Climax के बिना फिल्म होती है अधुरी,
——– बन जा मेरी माधुरी. - उंच गेला माझा झोका,
——— चा फोटो पाहून अजय देवगण ने दिला काजोल ला धोका - ——— बसली अंधारात, ——– बसली अंधारात
हसली म्हणून दिसली. - ———- तू नको समजूस स्वतःला मधुबाला
तू तर दिसतेस जणू सडलेला भाजीपाला - ———– स्वतःला समजते परी
पण तुझ्या पेक्षा आमची कामवाली बरी. - हात आहेत अगरबत्ती, चेहरा आहे धुपबत्ती
——- तू इतनी बक बक करती ही फिर भी क्यू नही थकती. - Wheat ला मराठीत म्हणतात गहू,
—— ला भेटल्याशिवाय मी कशी राहू. - अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक
——– तुझी उंची नसेल वाढत तर रोज झाडाला लटक. - तिकडून आला म्हशींचा घोळका,
आता त्यात ———— ला ओळखा.
शिक्षकांवर फिश पॉन्ड – Fish Ponds in Marathi for Teachers
- ———– सर/मॅडम साठी :
अजीब दास्तां ही ये…… कहा शुरू कहा खतम….
ये लेक्चर ही कोनसा…. न वो समझ सके ना हम - लिहून लिहून झिजले किती तरी खडू
——— सर/ मॅडम कधी देणार तुमच्या लग्नाचे लाडू. - कधी देतात प्रश्नपत्रिका तर कधी देतात उत्तरपत्रिका
——– लवकर द्या आता लग्नपत्रिका
No comments:
Post a Comment