K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 23 May 2021

 

भागवत एकादशी’ निमित्त जाणून घ्या पूजाविधी आणि एकादशीच्या व्रताचे महत्त्व

         वारकरी संप्रादयामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने ठेवले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडला जातो.
         एकादशीत 'स्मार्त' आणि 'भागवत', असे दोन भेद सांगितले आहे. ज्या पक्षात हे दोन भेद येतात. त्यावेळी पंचांगात पहिल्या

दिवशी 'स्मार्त' व दुसर्‍या दिवशी 'भागवत', असे लिहिलेले असते. अनेकदा एका पक्षात 'स्मार्त' आणि 'भागवत', अशा एका पाठोपाठ दोन एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते. परंतु, भागवत एकादशीला नाव नसते. यावेळी 19 मार्चला पापमोचनी स्मार्त एकादशी आहे. तर आज संपूर्ण राज्यात भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2020) साजरी होत आहे. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा कशा पद्धतीने करावी तसेच एकादशीचे नेमकं महत्त्व काय याविषयी जाणून घेऊयात...

भागवत एकादशी पूजाविधी -

         वारकरी संप्रादयामध्ये परंपरेने 20 मार्चची भागवत एकादशी साजरी केली जाते. यामुळे द्वादशी 21 मार्चला व त्रयोदशीला 22 मार्चला साजरी करण्यात येणार आहे. या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात. भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम, श्रद्धा व विश्वासाने केले जाते. या व्रताच्या प्रभावामुळे मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थ स्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते, असे पौराणिक कथेत म्हटले आहे.

एकादशीचे महत्त्व -

वारकरी संप्रादयामध्ये एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो.

याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्‌तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो. पौराणिक कथेनुसार,  एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात. म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात. म्हणून एकादशीला उपवास केला जातो. या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात.

         

एकादशीची व्रते व उपवास


एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.

१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..

२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.

३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.

४. एकादश्या जर दोन असतील तर भागवत आणि स्मार्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.

५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.

६. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते.

७, एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.

सूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो.



1 comment:

  1. या दिवशी कोणता ग्रंथ वाचायचा या बद्दल माहिती मिळेल का?

    ReplyDelete